नाही नाही म्हणतांनाही, रोजच तुझी आठवण येते..

नाही नाही म्हणतांनाही,
रोजच तुझी आठवण येते..
खोटं हासु जपणार्या डोळ्यात
तरंग दु:खाचे उठवुन जाते..

क्षणोक्षणी वाढु लागला आहे
आता आपल्यातला हा दुरावा..
अजुनही तुझ्याच प्रीतीत रंगले
कसा देऊ तुला याचा पुरावा..??

गेलास तु सारं विसरुन सख्या
पाहिलेही नाहीस एकदा वळुन..
प्रत्येक क्षण तो तुझ्या सहवासातला
टाकतो काळीज माझं पोखरुन..

अजु्नही वेडं मनं माझं
तुझीच आसं धरुन बसलयं..
येशील परतुनी माझ्याकडे
या खोट्या आशेपोटी फसलयं..

नसलास तु जरी आता माझा
तरी ध्यास मला तुझ्याच सुखाचा
अंतरी अखंड तेवत राहील
दीप फक्त तुझ्याच प्रीतीचा..

3 comments:

  1. tuzya aathavanincha pavasaat bhijatana galavarati kadhi garam themb oghalale samazalach nahi... kharach khoop chan aahe tuzi kavita.. nahi nahi kavita navhe tuzi aatavan...

    ReplyDelete
  2. Far chhan Kavita aahet hya................

    ReplyDelete