विसरू नको रे आई बापाला


  झिजवली त्यांनी काया ,
 काया झीजवून तुझ्या  चीरावर 
 धरली  सुखाची छाया  रे वेड्या 
 मिळणार नाही तुला 
 आई बापाची माया
 
 तुला मिळेल बंगला माडी 
 त्याची भारी मोटार गाडी 
 आई बाप मिळणार नाही 
 हि जाण राहू दे थोडी
 विसरू नको रे आई बापाला
 झिजवली त्यांनी काया ,
 काया झीजवून तुझ्या  चीरावर 
 धरली  सुखाची छाया  रे वेड्या 
 मिळणार नाही तुला 
 आई बापाची माया
 
 तुला मिळेल बायका पोर 
 गण गोत्र मित्र परिवार, 
 खर्चाने गुरफटलेला 
 हा मायेचा  बाझार
 विसरू नको रे आई बापाला
 झिजवली त्यांनी काया ,
 काया झीजवून तुझ्या  चीरावर 
 धरली  सुखाची छाया  रे वेड्या 
 मिळणार नाही तुला 
 आई बापाची माया
 
 आई बाप जिवंत असता 
 नाही केली त्याची सेवा 
 ते मेव्ल्यारती कश्याला 
 रे  म्हणतोस देवा  देवा
 बुन्धी लाडवाचे जेवण  करुनी 
 मग म्हणतोस जेवा जेवा
 विसरू नको रे आई बापाला
 झिजवली त्यांनी काया ,
 काया झीजवून तुझ्या  चीरावर 
 धरली  सुखाची छाया  रे वेड्या 
 मिळणार नाही तुला 
 आई बापाची माया
 
 स्वामी तिन्ही जगाचा 
 आई विना भिकारी 
 तू समजून वूम्जून  वेड्या 
 होऊ नको अविचारी,
 जीवना मधली अमोल संधी 
  नको रे घालू वाया
 विसरू नको रे आई बापाला
 झिजवली त्यांनी काया ,
 काया झीजवून तुझ्या  चीरावर 
 धरली  सुखाची छाया  रे वेड्या 
 मिळणार नाही तुला 
 आई बापाची माया

11 comments:

  1. हि कविता मला खूप आवडली. एका लहान पोरांना म्हणताना बघितलं . ह्या रचनेचे लेखक कोण आहे ?

    ReplyDelete
  2. Replies
    1. खूप खूप छान❤️

      Delete
    2. खूप च छान,❤️

      Delete
  3. अति सुंदर

    ReplyDelete
  4. जय साई मित्रा
    आपन यातील काही शब्द चुकीचे टाकले आहेत ज्याने ते चुकीचे गायिले जावू नयेत .शमा असावी खाली मी लिहिले शब्द हे आपन चुकीच्या शब्दांच्या जागी लिहून आपन अपलोड करावं असं मला वाट्ते कारण यात याचे गीतकार कोण आहेत हे माहीत नाही परन्तु यात सोपान हे नाव असून संत सोपान महाराज यांचा उच्चार होतो यासाठी आपन ते बदलावे. असे मला वाट्ते. काही राग रुसवा असेल तर शमा असावी.
    जय साई
    पहिला शब्द -शिरावर
    दुसरा शब्द- शेती वाडी मोटार गाडी
    तिसरा- मेल्यावर्ती
    चौथा- बुंदी लाडवाच्या पंगती बसवशी

    ReplyDelete
  5. हेच् बरोबर आहे भाऊ तुमच मला पटल फार फार धन्यवाद भाऊ तुमचे

    ReplyDelete
  6. मी विलास नामदेवराव ठाकरे यवतमाळ 9420049401 9689449401

    ReplyDelete
  7. एक नंबर भाऊ माझ्या मनासारखा गाण आहे

    ReplyDelete
  8. 🇮🇳 यवतमाळची माणसं लई प्रेमळ हळव्या मनाची आहेत, माझा पण एक सैन्य सेवेत असताना जीवा भावाचामित्र श्री भारत चिकाटे (वाघ वाडी),जैन मंदिराजवळ राहतात.. दोन वर्षांपूर्वी ते महसूल सेवेतून सेवा निवृत्त झाले आहेत.. तुम्ही यवतमाळचे आहात हे वाचल्यावर आठवण झाली...👏👏👏

    ReplyDelete
  9. झक्कास भजन सुंदर रचना आहे
    थोडं दरस्ती करावी.पण सुंदर आहे
    --- भगवान पाटील,शहादा
    हार्मोनियम वादक व गायक 🙏

    ReplyDelete