बाबा कधी येणार तुम्ही.....!!!



बाबा कुठे आहात तुम्ही
घरी कधी येणार तुम्ही,
मला काही प्रश्न पडलेत
त्याची उत्तरे हवी आहेत!१!

पालक सभेला हझर नसता
वाढदिवसाला फोनवरून शुभेछा करता,
कसल्याच कार्यक्रमाला उपस्थित नसता
दरवेळेस फक्त आश्वासन देता!२!

हट्ट करण्यासाठी समोर नसता
घास भरवण्यासाठीहि तुम्ही नसता
रात्रीच झोपताना बरोबर नसता
मांडीवर खेळवायला तुम्ही नसता!३!

बाबा मला काही सांगता येत नाही
तुमच्या कुशीत रडता येत नाही,
तुमची आठवण किती येते
हे फोनवर बोलता येत नाही!४!

वर्गमैत्रिणी त्यांच्या बाबांचं सांगतात
तेव्हा मनाला खूप लागतं,
माझ्याच बाबतीत हे नाही
म्हणून मन त्यांच्यावर जळत!५!

मलाही बागेत फिरायला जायचंय
हाताला धरून गारीगार खायचंय,
माझेही बाबा किती छान आहेत
हे सगळ्या मैत्रिणीसमोर सांगायचं!६!

बाबा....
पाणावले डोळे वाट पाहून
सांगा मला कधी येणार,
हसायला विसरली तुमची छकुली
तिला चावी कधी देणार...???!७!
-विशाल एक चारोळीकार व कवी

No comments:

Post a Comment