पुढल्या जन्मी तरी माझी होशील का.....??

दुर दुर माझ्या स्वप्नांमध्ये
 एकदा तरी चालत येशील का?
 जग आज वेगळे असेल तुझे
 स्पनांत तरी माझी होशील का...?

 मी आहेच असा खुळा वेडा
 तुझी सदा नुसती गंमत केली
 सगळं जग हसतयं माझ्यावर
 आज तु हि एकदा हसशील का...?

 बघ ना खेळु आपण आज
 पुन्हा तोच आपला खेळ
 अर्धा अधुरा प्रत्येक वेळी
 आज तरी पुर्ण करशील का….?

 माहित आहे मला आज सगळं
 ना खेळु शकते ना येऊ शकते तु
 मीच निरंतर जळता सुर्य दिवसा
 रात्रीला तरी चांदणं देशील का…?.

 वाट पाहतोय असाच वेडा बनुन
 एकदा तरी वाट चुकशील का
 आयुष्य हे असेच चालले निघुन
 पुढल्या जन्मी तरी माझी होशील का.....?
 पुढल्या जन्मी तरी माझी होशील का.....??

मृत्युंजय संगरी




धड धड धड रथचक्र निघाले, उधळीत धूळ अंबरी,
अवतरला......मृत्युंजय संगरी

मित्राच्या वचनास जागतो, दिला शब्द तसेच वागतो...
कवच कुंडले सहज त्यागतो,
स्वाभिमानी असून ठरला...जो अहंकारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

अवध्य नाही, ज्याला माधव,तुच्छ गांडिव, दुर्बळ पांडव...

स्पर्शला ज्या, कवचीत पराभव...
आसूड होऊन बरसे घेऊन...सूड जो अंतरी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

पराक्रमी जो....जो महादानी, असा जन्मला नाही कोणी...
परशुराम शिष्योत्तम असुनी...
कपटाने लढला, महारथी... तो अत्याचारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

सज्ज होइ म्हणे अर्जुना, सावध करतो तो श्रीकृष्णा
नव्हेच पोकळ रणगर्जना...
सूत पुत्र का उगाच झाला...कौरव सेना अधीकारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

जसे वीजांचे ...चाले तांडव, तसे भयंकर लढती बांधव...
युद्ध निर्णय...होय असंभव...
कोण डावा..कोण उजवा...सर्वश्रेष्ठ धनुर्धारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

इंद्रवज्र अन् सुर्यकिरण हे... पुन्हा न व्हावे...असेच रण हे...
साशंकीत का आज मरण हे..
प्रशनचिन्ह का प्रथम उमटले...असे कुरुक्षेत्री !
अवतरला......मृत्युंजय संगरी

बाण थकले...त्राण ही नाही... प्राण आता...कंठाशी येई...
शक्ती संपली ...युक्ती न काही,
कुणी न पुढती येतो, जातो... कुणी न माघारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

शाप गुरुचा घातक ठरला, अस्त्रे शस्त्रे कर्ण विसरला...
दैवगतीचा फेरा कसला ?
त्यात रथाचे चाक अडकले....धरतीच्या उदरी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

हताश राधेय उतरे खालती, घाम ओघळे...भाळावरती...
सांगे तेव्हा...पार्थसारथी...
हीच संधी, आहे अर्जुना...
सोड नियम अन् शस्त्र घे हाती...दुश्कुर्ती संव्हारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

बाण ताणला...स्मरुन देवता, मृत्युंजय मृत्युस भेटता...
धडावेगळे शीर जाहले..
पुत्र कुंतीचे पाच राहीले..
एक संपले शापित जीवन...स्वकुळास उद्धारी !
अवतरला......मृत्युंजय संगरी

बागेतल्या रोजच्याच ठिकाणी रोजच्याच वेळी...


बागेतल्या रोजच्याच ठिकाणी
रोजच्याच वेळी...
मी तिची वाट बघत होतो
रोजच्याच प्रमाणे तिला
आज ही उशीर झाला होता
आणि रोजच्याच प्रमाणे मी ही
पुन्हा पुन्हा घड्याळाकडे बघत होतो ...

ती येण्याआधी मग, रोजच्याच प्रमाणे
आधी तिची आठवण आली ...
मी ही मग सवयी प्रमाणे ...
गेलो आठवणीच्या संगे..
पुन्हा एकदा..
केली सैर आजवरच्या प्रवासाची.....

आलो जेव्हा भानावारती..
जवळ माझ्या ती बसली होती
डोळे मोठे...नाक फेंदारालेल..
माझ्या मनी डोकावली भीती...

चेहऱ्यावर ढळलेली बट...
डाव्या करंगळीने माघे सारून..
जळजळीत नजर माझ्यावर फेकून...
बोलली ती मला....

"आज काय असेल तो
सोक्ष मोक्ष लावून टाक...
कोण तुला जास्त प्यारी
माझी आठवण की मी स्वतः
या प्रश्नाचे उत्तर तू
लगेच मला देऊन टाक... "

मग स्वतःच रुसली..
मान वळवूनं बसली...
पडलो होतो मी संभ्रमात....
इतक्यात...
तिचीच आठवण...खुदकन हसली...

मग बोललो मी तिला
टाकू नकोस अशी तू
धर्मसंकटात मला....
तुझी अन माझी भेट
फ़क्त काही तासांची असते
तुझी आठवणच मग सखे
नेहमी माझ्या सोबत असते
तुझ्या विरहाला तुझी आठवणच
माझ्या पासून दूर ठेवते...
तू नसताना तुझ्याच रूपाने
अगदी नववधु प्रमाणे सजते...
रात्रभर मग तिच्याच कुशीत मी
तुझीच स्वप्ने वेचीत जातो...
बांधून त्यांच्या तोरणमाळा
मी तव आगमनास झुरतं राहतो...

न कळले तुला जे आजवर
ते सांगतो मी आता..

तुझ्याविना नाही सखे
तुझ्या आठवणींचे अस्तित्व ....
अन तुझ्या आठवणींशिवाय प्रिये
कोण सांगेल तुझे महत्त्व ......

तुझी मझी मैत्रि अशी असावी!!!!


मैत्रि तुझी अशी असवी,

आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,

नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,

सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,

एकमेकांना समजुन घ्यावे,

मैत्रि आपण अशी जगवी,

एकमेकांचा आधार असावी,
सुख दुखात नेहमी सोबत असवी,

असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,

तुझी मझी मैत्रि अशी असावी!!!!

मनसोक्त जगून घ्यावं...

मनसोक्त जगून घ्यावं...
नाजुकशा कळीचं ते मोहक हास्य,
फुलणाऱ्या फुलाचं ते अबोल भाष्य,
डोळ्यात सारं साठवून मिटून घ्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...

काळोखाच्या शालीवर तारकांची कोरीव नक्षी,
अनंत आकाशी भरारी घेती छोटे छोटे पक्षी,
छोट्याशा मनातील स्वप्नांना मग आशेचं बळ द्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...

वाट बघणारा श्रीकॄष्ण घाली राधिकेला सुमधूर साद,
बासरीच्या सुराकडे खेचला जाई तिच्या पैंजणांचा नाद,
हळूवार या नादावर कधी आपलंही मन थिरकावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...

सरला जरी ऋतू, जरी नसला कधी बहर,
येतील दिवस चैतन्याचे,घेऊन नव्या पालवीचा मोहर,
निसर्गाचं हे गुपित जरा आपणही जाणून घ्यावं,
जे आहे आज आहे, मनसोक्त जगून घ्यावं...