पहिला पाऊस पडतो तेंव्हा :)



पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं! 

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्‍या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा 

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ 



पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्‍यापाशी
तळं होऊन साचायचं! 


आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील 


ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे 

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं! 

म्हणून...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

उत्तर एकाचे तरी देशील का ?

उत्तर एकाचे तरी देशील का ?
जीतकी ओढ मला तुझी
तितकीच तुलाही आहे का ?
जीतके प्रेम माझे तुझ्यावर तीतकेच तुझही
तीतकेच तुझही आहे का ?

मी समोर नसतानाही
मला कधी पाहतेस का ?
उत्तर रात्रि शान्तसमयी
स्वप्नात मला पाहतेस का ?

ऎक क्षण मी दिसाव,
म्हनुण व्याकुळ होतेस का ?
तो क्षण सम्पुच नये,
असा विचार कधी करतेस का?

एकान्ती आपल्या गुजगोष्टी,
आठवुन कधी पाहतेस का ?
त्यातल्या प्रत्येक शब्दाने,
मोहरुन कधी जातेस का ?

माझा वेडेपना आठवुन,
स्वत:शी कधी हसतेस का ?
माझ्या सोबत वेडे व्हावे,
असे कधी ठरवतेस का ?

काळही सगळा सम्पुन जायील,
विचारणे माझे सम्पनार नाही
प्रश्न माझे अनेक आहे,
उत्तर एकाचे तरी देशील का ?

तुझे प्रेम म्हणजे असे




तुझे प्रेम म्हणजे असे
उत्तुंग शिखरावर उभे राहणे
तुझे प्रेम म्हणजे असे
खोल खोल दरीत स्वत: ला झोकून देणे जसे
तुझे प्रेम म्हणजे
पहाटे पहाटे फ़ुलावरच्या दवाला टिपणे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
नदीच्या अवखळ पाण्याबरोबर वाहत जाणे
जसे तुझे प्रेम म्हणजे असे
भर पावसात भिजणारे पारिजातक जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
कुडकुडणार्‍या थंडीत शेकोटीतले कोळसे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
वार्‍यासंगे उडणारे पतंग जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
उन्हाळ्याच्या रोहीणीत तापणारा सुर्यप्रकाश जसे...

दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला

दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला
चेहरा कंटाळवाणा पण अबाधित राहिला
मी सिनेमाला जरी सुरुवातीला कंटाळा लो
फक्त पैसे वसूल व्हावे म्हणून शेवट पाहिला
चार मिळता चार लिहिली ना कमी ना जास्त ही
प्रेमपात्रा ना ही कागद रद्धीचा मी शोधला
नामस्मरणाला सुद्धा दिधली ठराविक वेळ मी
मी किलो आन् ग्रॅम वरती मोक्ष मोजून घेतला
लाल हिरवे दीप येथे पाप पुण्याचे उभे
सोयीचा जो वाटला मी तोच सिग्नल पाळला
मी धुके ही पाहिले आन् धबधबे ही पाहिले
पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला
मी पिझा ही चापतो आन् भाकरी ही हाणतो
घास जो पडला मुखी मी तो रवन्थत ठेवला
भोगताना योग स्मरला योगताना भोग रे
राम ही ना झेपला मज कृष्ण ही ना झेपला
मी मला दिसलो असा की ना जसा दिसलो कुणा
कुरूपतेचा आळ कायम आरशावर ठेवला

विवाह सोहळा म्हणजे,

विवाह सोहळा म्हणजे,
वधू - वर  मिलन,
सनई चौघड्यांच वादन 
पाहुण्या मंडळींचं आगमन,

नवरदेवाची मिरवणूक,
पिऊन तर्र असणाऱ्यांची,
सगळ्यांनाच हसवणूक,
कंटाळलेल्या बापड्यांची मात्र 
उगाचच पिळवणूक,    

पुरोहिताची मंगलाष्टकाला सुरुवात, 
वधू-वराची नव्या आयुष्याची रुजवात, 
मध्यंतरात सत्कारांचीच बरसात, 
नसते मात्र मान्यवरांची खबरबात, 

वरमाला घालताना देवाचे नमन,  
सप्तपदीत मनातून दिलेले वचन,
वधूच्या डोळ्यातले पाणी,
सांगते माहेरच्या प्रेमाची कहाणी, 

भोजन पंगतीत वधू -वर ही वाढतात,
प्रेमाच्या मायेन आग्रह ही धरतात,
वरमाया थोड्या धुसफूस करतात,
मान असताना पण उगाचच भाव खातात,  
   
वधू मातेची मात्र घालमेल खूप काही सांगते,
हे बघून पापणीची कडाही ओलावते, 
बिदायीला वधू पिता धाय मोकलून रडतो,
लहानपणीची लाडाची लेक आठवतो,