!!!!तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!

!!!!तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!

वाटलं साथ असेल जन्मोजन्मीची
नातं असेल मनोमनीच
आधार असेल जीवनाचा
पण अशा काही विचाराचा
तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!

वाटलं असशील अमावस्या रात्रीची चांदणी
जी वाट दाखवेल माझ्या मुक्कामाची
आधार असेल माझ्या प्रत्येक अंधाऱ्या रात्रीचा
पण अशा काही वाटेवर जाण्याचा
तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!

वाटलं असेल मी एक चंद्र तुझा
सुखावशील शीतल छायेत  माझ्या
फक्त तो तूला नि तुलाच भासणारा
पण तुझ्या त्या आकाशात उगवण्याचा
तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!

वाटलं असेल संगती मी तुझ्या प्रत्येकक्षणी
साथ असेल पदोपदीची
आधार असेल प्रत्येक क्षणाचा
पण अशा काही चिरकाल क्षणाचा
तो हक्क तर मला कधी दिला होतास का !!!

स्वप्नी माझ्या येऊन तू

स्वप्नी माझ्या येऊन तू
फक्त गप्पा मारत बसतेस
तर कधी मिठीत येऊन
अचानक निरोप घेऊन जातेस

गप्प राहा ग आता
किती बडबड करतेस ...
सुख - दु:ख वाटताना
माझ्यावर का तू रुसतेस?

दिसलो नाही एकदा जरी
अबोला माझ्याशी धरतेस
आयुष्याची गणितं मांडताना
मैत्री मात्र विसरतेस ...!!!

माझ्याविना तू , तुझ्याविना मी
कधी ना राहू शकलो
तरीही या गोंडस नात्याला
प्रेम नाही म्हणू शकलो !!

बोहल्यावर चढलीस तेव्हा मात्र
नयनी दोघांच्या अश्रू तरळले
भाव नजरेतील सावरताना
लोकांनीही पहिले ...

मैत्री कि प्रेम म्हणावे
कधीच नाही कोणा कळले
नाते तुझे-माझे ..
असे कसे हे जगावेगळे ... !!!!!

तो एक क्षण तुझ्या प्रत्येक आठवणींचा.

तो एक क्षण तुझ्या प्रत्येक आठवणींचा.

तो एक क्षण तुझ्या बरोबरच्या प्रत्येक सोबतींचा.

तो एक क्षण तुझ्या बरोबर मारलेल्या प्रत्येक गप्पांचा.

तो एक क्षण तुझ्या बरोबर टाकलेल्या प्रत्येक पावलांचा.

तो एक क्षण तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नांचा.

तो एक क्षण तुझ्या माझ्यात झालेल्या छोट्या मोठ्या भांडणांचा.

तो एक क्षण तुझी प्रत्येकवेळेला समजूत काढताना झालेल्या दमछाकीचा.

तो एक क्षण तुझ्या प्रेमात अखंड बुडाल्यावर होत असलेल्या धाकधुकीचा.

तो एक क्षण अश्या प्रत्येक क्षणांची आठवण रोज होऊ देणाऱ्यांचा.

तो एक क्षण तो एक क्षण......

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत

खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत

पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत

नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत

एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत

तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत

दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत

मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत

हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत

विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत

नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत

पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत

इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत

पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली
डोळे होते माझे मिटलेले...आणि रात्र तिने चोरून नेली
मागुन तिच्या अठवणीनी जोप माझी हिसकावून नेली
पुढे पहाटेची वाट पाहता पाहता....कविता ही मला स्पूरुण गेली
...
... अश्या रात्रिमागुन रात्रि गेल्या ...तिला काही माझी कीव आलि नाही ..
स्वप्नातली भेट आमची सत्यात काही उतरली नाही ..
ती काही आली नाही....पण तिच्या आठवणी मात्र आल्या ...
अस्थिर माझ्या मनाला जगणं शिकवून गेल्या
पेनातली शाई संपली...वहीच्या ओळी भारत गेल्या ...
कवितेच्या प्रत्येक कडव्यात आठवणी तिच्या भरून गेल्या ..
दिस सरले ..महीने सरले....वर्षामागुन वर्ष गेली...
माझी प्रत्येक रात्र..त्याच स्वप्नात रंगून गेली ..
मला आठवत... तिला जिन्कताना पहाण्यासाथी मी नेहमीच तिच्याकडून हरत असे .
तिच्या चेहरयावरचा आनंद मनात साठवून घेत असे ...
पण हरता हरता ..तिलाच हरवून बसेल असं कधी वाटलं नव्हतं ..
आयुष्यावर असे काले ढग जमतील असं मनात सुद्धा आलं नव्हतं ...
आता जगायला मी शिकलो आहे....नेहमीच जिंकत आहे ...
कारण ह्या वेळेस आठवणी तिच्या मी पणाला लावल्याआहेत ...
त्यांना गमावून बसलो तर मी जगुच शकणार नाही ...
ह्या ह्रदयाच्या ठोक्यांचा मी अर्थच लावू शकणार नाही.