तुझी आठवण आली…

नभभर पसरल्या,दाट धुक्यांच्या ह्या शाली, पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
       तुझ्या अवखळ मनाची, श्वास श्वास सांगे कथा,
       किती बरसला तरीही, न मनमेघ होई रिता,
       कसा आवरु मनाला, या गूढ संधिकाली,
       पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
गालावरच्या बटांना, नको आवरुस सखे,
काय बोलावे कळेना, होती शब्द इथे मुके,
तुझ्या रुपवर्णनास, कमी शब्दांच्या पखाली,
पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
       कधी सरणार सये, तुझ्या माझ्यातले अंतर,
       जाणवावे सखे तुला, कधी माझेही अंतर,
       जेव्हा भेटशील मला, मी होईन भाग्यशाली,
       पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
-आदित्य चंद्रशेखर

मी ती गोष्ट शोधतोय

गोष्ट

मी ती गोष्ट शोधतोय
बर्‍यासश्या हाताला लागतायत
.
.
लहानपणी आज्जीने सांगितलेली त्या राजकन्येची,
शाळेत मस्ती करता करता मीच सांगितलेली कापूसकोंड्याची,
इतिहासाच्या सरांनी सांगितलेली आठव्या हेन्द्रीची,
आजोबांनी सांगितलेला शिवबांचा इतिहास,
आईने मांडीवर बसवून सांगितलेली ध्रुवबाळाची,
अशा किती सार्‍या गोष्टींनी वेढलंय मला
.
.
पण मला ती गोष्ट सापडत नाहीय्ये
निळ्या डोळ्यांच्या, उडणार्‍या परीची,
पर्‍यांच्या स्वप्नील नगरीत घेऊन जाणारी
.
.
कां कुणास ठाऊक, परंतु आता माझी खात्री पटलीय
ती गोष्ट फक्त तूच सांगू शकतेस,
निळे डोळे मिचकावत सांगायचीस ना…. तश्शीच
मी तीच गोष्ट शोधतोय, अजूनही


-अनामिक 

कशी असेल ती अता

कशी  असेल ती अता
असेल का ती ठीक ??
अता तिला जून सर्व आठवत असेल का??
आठवल्या क्षणामध्ये परत ती जाऊ पाहेल का??
गेलीच तरी तर ,त्या क्षणात मला पाहिलं का??
पाहिलं जरी मला तर , एकदा तरी मला परत बोलवेल का??
  बोलावले तरी माझ्यासंगे प्रेमाचे २ शब्द म्हणेल का??
माझ्यासाठी तीच मन परत,माझ्या मनाशी हितगुज साधेल का??
साधल तरी मनातले प्रश्न,सुख दुख माझ्यासमोर मांडेल का??
मांडले तरी ,मी दिलेल्या त्या  उत्तरांचा ती विचार करेल का???
  माझ्यासाठी परत ,सर्वांसाठी ती झगडेल का???
दिलेल्या आठवणीत परत मागण्याचा देवा कडे हट्ट करेल का??
प्रत्येक क्षणी नाही  पण दिवसातून एकदा तरी आठवण काढेल का???
काढलेल्या त्या वेळात फक्त मलाच ती पाहेल का??
मी नाही होऊ शकलो तिचा ,तरी ती आनंदात राहील ना???
  माझ्यापेक्षा हि जास्त प्रेम देणारा तिला मिळेल ना???
त्याच्या सहवासात राहून सर्व दिलेले क्षण विसरून ती आनंदी राहेल ना
मी दिलेले सर्व क्षण ,आठवणींची जळमट मनाच्या गाभार्यातून काढून टाकेल ना???
आयुष्याच्या तिच्या सुंदर वळणावर एकदा तरी माझी आठवण तिला येईल ना??
  आली तरी माझ्यासाठी ,तिचे डोळे  पाणावतील  ना ??

माझ्या मनात असा मग प्रश्नाचा साठा साचला
  एका तरी उत्तरासाठी तो वाट पहाट बसला :-/
 
-अनामिक 

खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???

एका छोटीचे मनोगत..
कशाला गं आईनं असं मला माललं..
ललून ललून नाक माझं लाल लाल झालं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???

अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात..
टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात..
माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं..
त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं..
सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??

बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलाला
त्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला..
त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं..
सांग आता यात माझं असं काय चुकलं..??
रूमाल सगळा लाल लाल ,होता घाण झाला..
दूध ओतून त्याला मी गोला गोला केला..
कलतंच नाही मला नेमकं काय झालं.
खलं खलं सांग आजी माझं काय चुकलं??

- प्राजु

आजीची प्रतिक्रिया:

राणी मा़झी छोटुली तू, आहेस उचापती
हसू येते मला, पाहून तुझ्या करामती
ललू नको बघ तुझे नाक झाले लाल
हस बघू, फुगवू नको गोबले गोबले गाल
हसलीस की तुला देईन गोड गोड खाऊ
संध्याकाळी फिरायला आपण दोघीच जाऊ
फुगे घेऊ, बाग पाहू, करू मस्तं धमाल
बाबांसाठी घेऊन येऊ एक पांधला रुमाल
माललं त मालू दे, आई आहेच वेडी
हसण्या रुसण्यातही अगं गंमत असते थोडी

– (खोडकर) अनामिक

खरचं मी तिच्यावर खुप प्रेम करतो


मैत्री की प्रेम?????
नेहमी तिचाचं विचार,
नेहमी तिचीचं आठवण..
का एका मैत्रिणीसाठी मी इतके
झुरतो,
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
        
        चार चौघात मित्र
        मला तिच्या नावाने चिडवतो,
        का त्याचा प्रयत्न फसतो,
        कारण ?????
        खरं तर मनात मी हसतो..
        की खरचं मी तिच्यावर खुप
        प्रेमकरतो ???
परदेशी चाललास पण मला विसरु
नको,
का तो तिचा शेवटचा sMs
मी परत
परत वाचतो..
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
         तू परत कधी येणार ?
         ती रोज रोज विचारते..
         का? नक्की नाही
         म्हणताना माझा आवाजखालावतो..
        की खरचं मी तिच्यावर खुप
        प्रेम करतो ???
तिला एक स्थळ आले,
कोणी तिला पाहून गेला
का तिने त्याचे नाव
घेता मीविषय
बदलतो..
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
         हे प्रेम नाही मैत्रीचं आहे,
         एकचं उत्तर नेहमी,
         पण ?????
         का ते खरे की खोटे असा प्रश्न
         मला पडतो..
की खरचं मी तिच्यावर खुप प्रेम
करतो ???
- अनामिक