लाख क्षण अपूरे पडतातआयुष्याला दिशा देण्यासाठीपण, एक चुक पुष्कळ आहेते दिशाहीन करण्यासाठी,,,,,,,,,,,!किती प्रयास घ्यावे लागतातयशाचं शिखर चढण्यासाठीपण, जरासा गर्व पुरा पडतोवरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!देवालाही दोष देतो आपणनवसाला न पावण्यासाठीकितींदा जिगर दाखवतो आपणइतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!किती सराव करावा लागतोविजयश्रीवर नाव कोरण्यासाठीपण, जरासा आळस कारणीभूत ठरतोजिंकता जिंकता हरण्यासाठी,,,,,,,!कितीतरी उत्तरं अपुरी पडतातआयुष्याचं गणित सुटण्यासाठीकितीतरी अनुभवातनं जावं लागतंआयुष्य एक कोडं आहे हे पटण्यासाठी,,,,,,,,,!विश्वासाची ऊब द्यावी लागतेनात्याला जीवनभर तारण्यासाठीएक अविश्वासाचा दगड सक्षम आहेते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी.""
तुझ्याशी खूप बोलावे वाटते पण शब्द चुकण्याची..........
तुझ्याशी खूप बोलावे वाटते
पण शब्द चुकण्याची भीती वाटते
तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भीती वाटते...
तुझ्या खूप जवळ यावे वाटते
पण तोल सुटण्याची भीती वाटते
तुझा तो मन भुलविणारा चेहरा
मला अस्वस्थ करतो
पण त्याचे उत्तर देण्याची भीती वाटते...
तुझ्या सहवासात मी नाही याची उणीव भासते
पण तू माझ्या आयुष्यात आहे याची
मला सतत जाणीव असते
तुझी स्तुती शब्दात करावी वाटते
पण तुझ्या पुढे शब्द अपुरे पडतात....
तुझ्या पुढे जग सोडावे वाटते
पण समाजाची भीती वाटते
तुझ्या वर प्राण अर्पण करावा वाटतो
पण आई वडिलांची काळजी वाटते....
तुझ्या याच गुणांवर मी प्रेम करतो
पण तुला सांगण्याची भीती वाटते....
तुझी माझी मैत्री अशीच सुगंधी राहो
अशी मी जन्मो जन्मी प्रार्थना करतो
तूच सांग मला हे प्रेम आहे कि मैत्री
तुला काय वाटते....
पण शब्द चुकण्याची भीती वाटते
तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भीती वाटते...
तुझ्या खूप जवळ यावे वाटते
पण तोल सुटण्याची भीती वाटते
तुझा तो मन भुलविणारा चेहरा
मला अस्वस्थ करतो
पण त्याचे उत्तर देण्याची भीती वाटते...
तुझ्या सहवासात मी नाही याची उणीव भासते
पण तू माझ्या आयुष्यात आहे याची
मला सतत जाणीव असते
तुझी स्तुती शब्दात करावी वाटते
पण तुझ्या पुढे शब्द अपुरे पडतात....
तुझ्या पुढे जग सोडावे वाटते
पण समाजाची भीती वाटते
तुझ्या वर प्राण अर्पण करावा वाटतो
पण आई वडिलांची काळजी वाटते....
तुझ्या याच गुणांवर मी प्रेम करतो
पण तुला सांगण्याची भीती वाटते....
तुझी माझी मैत्री अशीच सुगंधी राहो
अशी मी जन्मो जन्मी प्रार्थना करतो
तूच सांग मला हे प्रेम आहे कि मैत्री
तुला काय वाटते....
प्रेम हे काय असत...
मनाची गोष्ट का
भावनांचा खेळ..
एक-मेकांना समजणे
का शब्दांचे ते खेळ..
तुझे-माझे करणे
का तुझ्यात मी असणे..
एक-मेकां वर रुसणे
का एक-मेकांना मनवणे..
एक-मेकांशी भांडणे
का वेळेस प्रेमाने सॉरी म्हणणे..
रात्री फोन वर तासन-तास गप्पा मारणे
का बोलता बोलता मधेच झोपणे..
दोघांनी एकाच नजरेने पाहणे
का एक-मेकांच्या स्वप्नासाठी प्रयत्न करणे..
एक-मेकांच्या आवडी-निवडी लक्षात घेणे
का तिला/त्याला जसे आवडेल तसेच राहणे..
प्रेमात एक आलिंगन देणे
का दुखात त्याच खांद्यावर डोके ठेवून रडणे..
रात्र-दिवस तिचा/त्याचा विचार करणे
का तिच्या/त्याच्या शिवाय काही न उमजणे..
प्रेमात उंच असे मनोरे बांधणे
का ती/तो सोडून गेल्यावर तेच मनोरे तुटणे..
तिच्या/त्याच्या साठी काहीही करायला तयार होणे
का ती/तो सोडून गेल्यावर जीवही द्यायला तयार राहणे...
हेच कोडं मनात असते...
नाही सुटत अजूनही ते कि
नक्की "प्रेम म्हणजे काय असतं........"........प्रेम म्हणजे काय असतं........
म्हणून मला पावसात चिंब भिजायला आवडत....
मुसळधार पावसात भिजून चिंब व्हायचं
थंडगार वाऱ्याच्या स्पर्शाने
शहारून गारठून जायचं
म्हणून मला पावसात चिंब भिजायला आवडत
तू छत्री काढणार पण
मी मात्र असूनही नाही म्हणायचं
मग एकाच छत्रीतून दोघांनी
एकत्र अर्धवट भिजत जायचं
उगाच खर्च नको सांगत
रिक्षेला नाही म्हणायचं
म्हणून मला पावसात चिंब भिजायला आवडत
छत्री पुरत नसूनही
तसंच भिजत चालत राहायचं
एकाच छत्रीत चालताना
चोरून एकमेकांना बघायचं
उगीच खोडी काढायची म्हणून
मी चिखल उडवत चालायचं
हवहवसं असूनही तू
उगाच लटक रागवायचं
म्हणून मला पावसात चिंब भिजायला आवडत
आज तू सोबत सोडलीस
तरी मी एकटच चालायचं
छत्री सोबत असते
पण स्वतालाच नाही म्हणायचं
खर्च जमतो
पण तरीही रिक्षेला टाळायच
चालता चालता तुझ्या
आठवणीत मी रमायचं
स्वतःवरच जाता जाता
चिखल उडवून घ्यायचं
तुला येणारा राग आठवत
स्वतःचच समाधान करून घ्यायचं
सगळ्या घटना आठवत
हळूच मग रडायचं
पावसानेही माझ्या अश्रूत
अलगद त्याच पाणी मिसळायचं
कळलच कोणाला तर
पावसाच पाणी आहे सांगत उडवून लावयच
म्हणून मला पावसात चिंब भिजायला आवडत
आता तु नाहीस म्हणून काय झाले............ ......
आता तु नाहीस म्हणून काय झाले
तु दिलेल्या आठवणी तरी आहेत
तुझ्या बरोबर राहीलेल्या
प्रत्येक क्षणाच्या जाणिवा तरी आहेत
आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे
तुझ्या अस्तित्वाच्या सावल्यांच्या
पाऊलखुणा तरी आहेत
आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझ्याबरोबर पाहिलेली स्वप्नं तरी आहेत
त्याच स्वप्नांच्या नगरात जायची
माझी वाट तरी मोकळी आहे
आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझ्याकडून मिळालेली प्रेरणा तरी आहे
याच प्रेरणेच्या जोरावर
आज उंच भरारी घेत आहे
आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझा शब्द न् शब्द कानात घुमत आहे
गर्दीत उभा राहूनही एकट्यानेच
तुझीच वाट पहात आहे ...
Subscribe to:
Posts (Atom)