"अनपेक्षित भेट"


आज पुन्हा तुझी-माझी भेट झाली...
माझ्या डायरीची पानं नवी-कोरी झाली....
समोर आलास सारं पुन्हा आठवले...
मिटलेले मनाचे दरवाजे अलगद उघडले...
पहिल्यांदाही अशीच नकळत भेट झाली
निम्मित पावसाचे अन भेटची वेळ वाढली....
अनेकदा भेटलो त्यानंतरही आपण...
मैत्रीने तुझ्या केले मनात घर..
वेडा वेडा व्हायचास बोलतांना माझ्याशी
खुप सारी मस्ती,थट्टाही जराशी..
तुझं सोबत असणं गॄहीतच धरलं मी...
मैत्रीशिवाय तुझ्या,आयुष्याचा विचारच नाही कधी...
पण कधीच नाही जाणल्या मी भावना तुझ्या...
मी तर रमले होते विश्वात माझ्या...
अचानक गेलास निघुन ,बोलला नाहीस काही,
पण सोबत नसणे तुझे सांगुन गेले बरच काही,
काळ चालत रहिला,अशीच वर्ष उलटली...
स्मॄतीनीं तुझ्या नेहमीच माझी साथ दिली...
हरले नाही मी,वाट पाहत राहीले तुझी,
येशील तु परतुन खात्री होती माझी,
आज पुन्हा भेटलो अगदी तसेच अनपेक्षित...
नजरेला नजरा भिडल्या,अन मनं झाली आनंदित...
आज तुझ्या नजरेतले भाव मात्र मी अचुकपणे हेरले..
नकळत माझ्याही त्यात होकाराचे सुर मिसळले..

तू असताना......

तू असताना......

प्रत्येक संध्याकाळी...ठरलेल्या वेळी.....
ठरल्याप्रमाने तुझी वाट बघताना...
तू उशीर करणार...हे माहिती असताना...
मी उगाचच कासावीस व्हायचो...
मग तुझ्याचसाठी घेतलेल्या गुलाबाची एक एक पाकळी...
she loves me....she loves me not...
असे करत तोडत जायचो...

नेहमीप्रमाने पुन्हा एकदा..
शेवटची पाकळी loves me not वरच अडायची...
मी उदास होउन बसताच...
तुझी हाक कानावर पडायची...
मी काहीही न बोलता..माझ्या मनातलं..
तू अगदी बिनचुक ओळखायचिस...
शेवटच्या पाकळीचे दोन भाग करून...
I will always love you...अस बोलायचिस..

आता तू नसताना...
अजुन देखिल माझी हरएक संध्याकाळी..
गुलाबाच्या पाकळ्यांसवेच सरते...
अन आज ही ती शेवटची पाकळी...
loves me not वरच अडते...
फरक फ़क्त इतकाच की....
आता तिचे दोन भाग करायला..
I will always love you अस सांगायला..
तू इथे नसतेस...

कॉलेज लाइफ़ "


कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

प्रेम नावाचा "टाईमपास"


                    
http://wallpapers.oneindia.in/d/194930-2/love-aaj-kal03.jpg

त्याची अन तिची पहिली भॆट
दोघांची होणाऱी "नजऱभेट"
काळजाला जाऊन भिडणारी थेट
दोघांचं एकमेकांना पाहून हसणं
अन नाजुकशा जाळ्यात अलगद फसणं...
या हसण्या या फसण्याची
सवय झालीय सगळयांना...

नजऱभेटीचं रूपांतर चोरून भॆटीत
भेटीचं रूपांतर हळुवार मिठीत
अन त्याहीपुढे कित्येक पटीत
नात्यातल्या या वेगाची
सवय झालीय सगळयांना...

मग रंगू लागतात स्वप्नं
एक त्याचं,एक तिचं फक्त दोन मनं
त्याचं हसणं तेव्हा तिचं हसणं
तिचं रडणं तेव्हा त्याचं रडणं
या हसण्या या रडण्याची
सवय झालीय सगळयांना...

दिल्या जातात वेळा,पाळल्याही जातात वेळा
घेतल्या जातात शपथा दिल्या जातात उपमा
त्याला ती वाटते "रांझ्याची हीर"
तिलाही तो वाटतो "कपूरांचा रणबीर"
या शपथा या उपमांची
सवय झालीय सगळयांना...

मग येतो असाही एक दिवस
पूनवेची रात्र वाटू लागते अवस
दोघांनाही येऊ लागतो एकमेकांचा कंटाळा
हीर वाटू लागते "बधीर" अन
रणबीर वाटू लागतो चक्क "काळा"
या अवसेची या पूनवेची
सवय झालीय सगळयांना...

पहिल्या भेटीच्या चौकातच
फूटतात "नव्या वाटा"
दोघंही करतात एकमेकांना "टाटा"
अहो तु्म्ही कशाला होताय डिस्टर्ब
दुःख वैगरे विसरा
त्याला भॆटते दूसरी
तिलाही भॆटतो दूसरा
पुन्हा होते देवाणघेवाण,पुन्हा होते "दिलफेक"
पुन्हा जुन्या कहानीचा नव्याने "रिटेक"
बदलत्या प्रेमाच्या रंगाची
सवय झालीय सगळयांना...

खरं सांगायचं अगदी मनापासून तर
प्रेम नावाचा "टाईमपास" करण्याची
सवय झालीय सगळयांना....
._,___

तू राहशील का माझी....

उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत
साथ तुझी सोडणार नाही
हा पाऊस नसला तरी
माझे बरसने थाबंनार नाही || १ ||

डोळे मिटून घे अन्
घे हा मातीचा सुगंध
त्यातही शेवटी येईल तुला
फ़क्त माझाच मंद गंध || २ ||

तू असे म्हणतेस
की तुझ्या आठवणीवर जगायचेय
माझ्या आठवणी असताना
मला सोबतीला का घ्यायचेय ? || ३ ||

तू नाही आता एकटी
मीही तुझ्या साथीला आहे
मृगजळ नाही तर
माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे || ४ ||

म्हणुन खरे सांगतो तुला
मला हवीय सोबत तुझी
मी आहे फ़क्त तुझा
तू राहशील का माझी ? || ५ ||

तू नव्हतीस तेव्हा
जीवन माझे होते व्यर्थ
तुझ्या साथीमधेच माझ्या
जीवनाला आहे अर्थ || ६ ||

कवी : प्रताप