आगळी-वेगळी प्रेम कविता

कॉलेजमध्ये असताना
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..

वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति

कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली

आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास

मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?

तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.

मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..

ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु...?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु...

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास
युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास

एकतर्फ़ी प्रेम

एकतर्फ़ी प्रेम करणे
म्हणजे पण एक दिव्य असते
जीवंत पणीच मेल्याचे
ते एक स्वप्न असते

एकतर्फ़ी प्रेम म्हणजे
एका ह्रुदयाचे दूसर्‍या ह्रुदयाशी
एकरूप होन्याची
व्यर्थ धड्पड असते

एकतर्फ़ी प्रेम म्हणजे
एक किनार्‍याची दूसर्‍या किनार्‍याशी
मिलनाची आस असते
आकाश्याने धरणीला कवेत घेण्याचे
ते एक फ़क्त भास आसते

एकतर्फ़ी प्रेम म्हणजे
पण एक दिव्य असते
समोरच्या साठी ते हास्य असले
तरी प्रेमी साठी ते एक
मुके भाष्य असते

खरच विश्वास नाहि मला

खरच विश्वास नाहि मला
हेच ते डोळे आहेत का?जे मला नेहमी टाळायचेतेच आज माझ्या प्रेमाने भरुन आले आहेत !हा भास तर नाहि ना पन मला ते जानवतय…

नक्किच i can fill that

जेंव्हा तु एकदा फोन ठेवतान sweet dreams म्हणतानाहळुच म्हनालीस miss u तेंव्हाच कळल होत मला
तुही माझ्या प्रेमात पडली आहेस !

खरच मला नाहि अजुन विश्वासतु कित्ति गोड हसतेस हल्लि…मध्य रात्रिचे तुझे sms वाचताना
मन माझ कित्ति आनंदि असत !

i m just falling into love.........i m just crashing into love
मी तुझ्या प्रेमात वेडा तर नाहि ना होत आहे?

का तु माझ्या प्रेमाला नाहि नाहि म्हनुन मला त्रास दिलास…पन तो त्रास हि कित्ति मस्त होता जितक कि तुझ लाजुन माझ्या मीठित सामावुन जान !

खरच नाहि मला विश्वास अजुनही कित्ति जपतेस तु मला त्यामुळेच कि काय तुझी आठवन
आलि कि मी गुदमरुन जातो…कारन तु कुठेच नसतेस तरिहि फ़ार जवळ असतेस, अगदी जवळ !

काय मस्त प्रवास होता तो तितकाच जीवघेना…तुला विचारन्या पासुन ते, तु हो म्हने पर्यंतचा…
तुच सांगितलस मला कि हे जग कस वाइट असत ते आणि तु कित्ति चांगला आहेस ते !

तुझि फ़ार आठवन येते…. आज पहाटे माझ्या गालीतुझ्या अधरांचा स्पर्श झाला… तु जवळ नव्हतीसतरिही जीव माझा मोहरुन गेला…!

 ये ना लवकर ….

तुझ्या वाचुन जगन्याची सवय झाली आहे… अश्रुंवाचुन रडण्याची सवय झाली आहे …!
तुझी फ़ार आठवन येते

हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....!

मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं.....

मैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....



घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....

हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......



मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....

प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोश्ट !......



मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......

मैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी........



इन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....

हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....!

असाच आज विचार करत बसलो माझ्या आजवरच्या जीवनाचा

असाच आज विचार करत बसलो
माझ्या आजवरच्या जीवनाचा
गोळाबेरीज मांडायला बसलो
माझ्याच आयुष्यातील शब्दफुलांचा
...बेरजेत सगळे माझ्या गोळेच गोळे आले
...कसेही सोडवले तरी,गणित माझे उणेच आले
...करू तरी काय मी,माझी काय चुक
...प्रत्येक गोष्टीला आज इथे एक नवा लुक

काल जे सोपे होते,तेच आज कठीण झाले
कठीण का झाले शोधता शोधता
आयुष्य माझे शून्य झाले.....
कळले जेव्हा शून्यातच धावतोय
अर्थच माझ्या जीवनाचे सारे तेव्हा अर्थहीन झाले
...उपदेशांच्या भडिमारांचा पिरयामिड रचला लोकांनी
...शपथेवर मला आणि अपेक्षांनाही जगवला लोकांनी
...पण साला पिरयामिड पत्त्यांचाच डोलारा निघाला
...माझ्याच खांद्यावर अपेक्षांचा तेव्हा छानपैकी'जनाजा'निघाला...
पण मित्रांनो,
तेव्हाही तिथे एक कुणीतरी नाचत होत
माझ्याच नावाने मनापासून साखर कुणी वाटत होतं
पालवीच्या पानांमागे चंद्र जेव्हा लपत होता
माझ्यासाठी कुणीतरी तेव्हा तीळ तीळ मरत होतं
...मग कळले तेव्हा मला,गणितात मी मध्यात होतो
...काही उण्या अंकाचीच बेरीज मी करत होतो
...मग म्हटले जाउदे साला,पेपरच कठीण आहे
...अजून बराच वेळ आहे,आपल्याला कुठे घाई आहे
आता मात्र ठरवलयं मी हसतच जगणार
मीही आता मनाने कुणासाठी साखर वाटणार
अश्यामध्येच मित्रांनो एक फायदा असतो
आपलं झाकून मनामध्येच सारया जगाला हसवण्याचा आनंद असतो....