मैत्री कि प्रेम

मैत्री कि प्रेम
कधी कधी वाटतो फक्त एक गेम

मित्र म्हणून माझ्या सर्व थट्टा काबुल करतेस
पण माझ प्रेम जाणवताच मागे का सरतेस

मित्र म्हणून मला सर्व सांगायला तयार असतेस
मग प्रेम माझ्यावरच माझ्यापासूनच का लपवतेस

कसली भीती आहे तुला आपल्या नात्यामध्ये
प्रियकर का नको तुला एका मित्रामध्ये

मित्र म्हणून सांग मी किती दिवस वाट पाहू
तुला मिठीत घेऊन रडण्यास आसुलेत माझे बाहू

"तुझीच मी" या शब्दांची वाट पाहतो
एकदा तरी तुला विचारेन म्हणतो

वाटते भीती मी जर पुढे आलो
मित्राची काही बंधन विसरलो

तर आपण पुन्हा असू  सोबत का
मी एक चांगला मित्र नि जीवनसाथी होऊ शकतो का

पण नको मी वाट पाहीन तुझ्या एका इशाऱ्याची
करून घेऊन सवय मी आतल्या आत जुरण्याची

कारण तू मित्र मानलस तरी चालेल मला
जेणेकरून तुझ्यासोबत असण्याचा एक बहाणा तरी मिळेल मला

आकाशातला एक तारा आपला असावा,

आकाशातला एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा,
एक छोटे जग प्रत्येका जवळ असावे,
जगाच्या या गर्दित कुणीच एकटे नसावे.....
क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.

आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हा ही
क्षितीजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी

कधी मलाच कळत नाही,

कधी मलाच कळत
नाही,
प्रेम मला येत नाही..
अगं प्रेमच करतोय मी,
तु करावं असं मी म्हणत नाही..
प्रेम कर माझ्यावर,
मि तुला म्हणणार नाही..
मी मात्र जळत राहणार,
जोवर तुला कळणार नाही..
किती दिवस असं
वागशील,
एकदा तरी प्रेमाने बघशील..
जळलेल्या प्रेमाची
आठवण काढशील,
तुला कळून चुकेल..
माझं प्रेम खरं होतं,
उशीर झाला असेल..
प्रेत माझं जळत होतं,
मी शांत होईनचं..
राख थंड होईलचं,
माझं प्रेम आठवेलचं..
माझा भास होईलचं,
तुला माझी आठवण येईलचं..

प्रेम,

प्रेम,  
नुसता शब्द उच्चारला तरी डोळ्या पुढे उभे रहातात
एक तरुण आणि एक तरुणी.....
कॉलेजला जाणारी, चोरून एकमेकांना भेटणारी.
डोळ्या पुढे येतो
पडणारा पाऊस, एखादी एकांतातली जागा.
मनातली हुरहूर.

प्रेमात पडलेल्या त्याला, सगळी कडे तीच  दिसते.
आरशातून  सारखी ती त्याच्या कडे बघते.
मित्र त्याला नकोसे वाटतात, एकटाच असतो तो.
मनातल्या मनात सगळ काही तिलाच सांगतो तो.

तिचीही परिस्थिती काही वेगळी नसते.
तिचीही परिस्थिती काही वेगळी नसते
मैत्रिणींशी तीही तशी फटकुनच रहाते
साडी नेसते तेंव्हा त्यानीच बघावस वाटत.
आरश्यात बघून गजरा घालताना तो मागेच तर असतो.

प्रेमात पडल्यावर पाऊस हवाहवासा वाटतो
दोघांशिवाय जगात कोणीच नसावस वाटत
भेटल्यावर दोघही बोलतात  एकमेकान बद्दलच
जगात कारण दुसर कोणीच तर नसत.

झाल कधी भांडण तरी ते मिटावस  वाटत
दोघांनाही एकमेकांना जास्तच भेटवस वाटत
भांडण तर फक्त निमित्त असत
दोघानाही एकमेकां शिवाय जमायचं नसत.

कधी आधी प्रेम जमत आणि नंतर लग्न होत
कधी आधी लग्न होत अन नंतर प्रेम जमत
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
तरी सुध्धा प्रत्येकाच ते वेगळच असत.

प्रेमात काही घ्यायचं नसत
दुसर्याला सर्वस्व द्यायचं असत
आधी आपल मन अन मग
स्वताःच असणच हरवायचं असत.

ह्या हरवण्यातहि एक जगण असत
तिच्या साठी स्वतःला बदलायचं असत
बदलत बदलत आणि एक दिवस
आपणच ती व्हायचं असत.

ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

कधी ना विसरणारी  ती
कधी ना विसरणारा मी
आणि पुष्टच्या आठवणी
ती एक सायंकाळ

ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

अखंड धरती ती
अनंत  आकाश मी
आणि अस्पर्ष क्षितिजाची 
ती एक सायंकाळ

ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

न संपणारी रात्र ती

न संपणारा दिवस मी
आणि गर्द आसवांची
ती एक सायंकाळ

ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

स्वप्नातली राजकुमारी ती
स्वप्नातला राजकुमार मी
आणि खरया अस्तीत्वाची
ती एक सायंकाळ

ती , मी आणि ती एक सायंकाळ !!


जीवनाची राणी ती
मृत्यूचा राजा मी
आणि झुरणाऱ्या जीवांची
ती एक सायंकाळ

ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

अर्धवट प्रेमिका ती
अर्धवट प्रेमी मी
आणि अर्धवट प्रेम कहाणीची
ती एक सायंकाळ

ती , मी आणि ती एक सायंकाळ !!


दूर कुठेतरीची सुरवात ती
जवळचा अंत मी
आणि दोघांच्या मिलनाची
ती एक सायंकाळ

ती , मी आणि ती एक सायंकाळ !!