तिच्या' लग्नाचं 'इनविटेशन"




तिच्या' लग्नाचं 'इनविटेशन"
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला,
नाव ख़राब होइल, म्हणुन पुसनारा हात अडला...,
दोन-चार थेम्बं तिच्या बापाच्या नावावरही पडली होती,
ज्याच्याकड े पदर पसरवून ,'ती' माझ्यासाठी रडली होती,
एक थेम्ब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती,
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भीती वाटली होती.,
'आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं'..,
यावरही एक थेम्ब पडला,
'ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..
तो भाबडा बोल आठवला...,
काही घसरलेली आसवं, लग्नस्थळ दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची भेटायचीजागा होती,
'अहेर आनु नये' यावरही थोडा ओलावाहोता,
तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता...... .,
सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.,
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली..... ..,
आज घरी दिसली..... .......!

"अनुरागी " झालयं जिणं..................

काहीतरी बोलावं म्हणुन म्हटलं त्याने
वारा फार छान सुटलायं.......
तिच्याही लक्षात आलं इतकं बोलताना
त्याला किती घाम फुटलायं.......
सागायचं होतं जे त्याला कधीपासु
तिलाही तेचं ऐकायचं होतं......
आधी कोण मौन तोडतो ते खरंतर
दोघांनाही बघायचं होतं.......
त्याला होकाराच्या खुषी पेक्षा ही
नकाराचं होतं भयं........
तिच्या नंतर ही जपुन ठेवली असती
त्याने काळजात सयं.....
भीत भीतचं त्याने विचारलं सांग
होशील का माझी.........
आयुष्यभरासाठी हवीयं ग राणी
मला साथ तुझी.........
ती काहीचं न बोलता नेहमी सारखी
गोड खळ्यांनी हसली........
नकार तर नाहीय तिचा निदान
एवढी तरी खात्री पटली.........
पण होकार ही स्पष्ट त्याला अजुन
नव्हता दिला तिनं............
एकचं सुख पहील्यापेक्षा आता थोडं "अनुरागी " झालयं जिणं..................

बर्फाचे हिरे


काल पावसाबरोबर देवाने
बर्फाचे लहान खडे वाटले
जणू धरतीपर्यंत पोचण्या आधी
आभाळाचे रडे गोठले
मी पण उगीच उडास मी
पावसातही माझे दु:ख मांडले
खरंतर ढगांच्या ओंजळीतून
देवाचे अनमोल हिरे सांडले
माझ्यावर आपटत ते
बर्फाचे हिरे पडत होतो
मी हातात घेतलं की
विर्घळून गायब होत होते
देणारा देतोय आभाळातून
घेणाऱ्याला घेता येत नाही
नीट घेता न येणाऱ्याला
काही पण देता येत नाही
पावसात भिजता भिजता
माझं दु:ख विर्घळून गेलं
देवाच्या हिऱ्यांचं मला
महत्त्व कळून गेलं
हिरे पडतात सगळीकडे
ते मला बघता आले पाहिजेत
स्वत:ला घेता आले नाहीत तरी
दुसऱ्यांना देता आले पाहिजेत

होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?

होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?
वाटतं नशीब करतंय आपलंच हसं..
नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस,
सर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉस

नुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातं उतू
क्रिकेटात तुमची ट्यूब फोडतो लेल्यांचा नातू

लवकर गेलात स्टॉपवर की बस येते लेट
एरवी वेळेवर धावलात तरी चुकते तिची भेट

विकेंडला जोडून कामवाली मारते दांड्या
आणि नेमका जेवायला येतो सहकुटुंब बंड्या

रस्त्यावरचा मोठा खड्डा तुमच्याच वाट्याला
पंक्चरायला तुमचंच चाक पडलेल्या काट्याला

निवांत येऊन टीव्हीसमोर बसता तेव्हाच वीज जाते
देवळात चप्पल नेमकी तुमचीच चोरीला जाते

'व्हाय मी' हा प्रश्न देवाला विचारून तुम्ही थकता..
रुद्राक्ष आणि ग्रहाच्या अंगठ्या वापरता न चुकता

मग 'लकी शर्ट' आणि लकी दिवस हेरून कामं करता
'आजचे भविष्य' पाच पेपरातून जमा करून वाचता..

'सालं नशीबच कंडम' म्हणून पुन्हा पुन्हा रडता
साध्या साध्या कामात शंकाकुशंकाना ओढता

पण गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही 'पार्शालिटी'
देण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची 'इक्वॅलिटी'

आपल्या आयुष्याची स्टोरी आपण जगत जायची

म्हणूनच मुली मला आवडत नाहीत...........

मैत्रीसाठी जीव देतात
कटू घटना सोडून देतात
मुलांपासून हे शिकत नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत...........
हेवा, असूया ओसंडून वाहे
एकमेकींना पाण्यात पाहतात
जय वीरू सम उदाहरणे नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत............
बाहेरचे तर सोडून द्या हो
घरामधे ही या असेच करतात
उखाळ्या पाखाळ्या थांबवत नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत..........
मुलं बोलली कि या भाव खातातनाही बोलली कि नावे ठेवतात विक्षिप्तपणा काही सोडत नाहीत म्हणूनच मुली मला आवडत नाहीत........
मनात एक आणि ओठावर एक
टोमण्यातून बोलणे असते
म्हणणे यांचे सरळ सांगत नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत........
कशास उगारता बोटं कुणावर
केलय का आत्मपरीक्षण सत्वर
एकमेकींना आधार देत नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत........