"प्रश्न"



कुठेच उत्तर मिळत नाही म्हणून
एक प्रश्नाने आत्महत्या केली
सर्व प्रश्न एकत्र आले आणि
एकान मडके आणले
एकानं सरणाची तयारी केली
सरणाला अग्नी देऊन.............
निश्वास टाकत एक प्रश्न म्हणला..
"चला एक तरी प्रश्न मीटला!

कारण तो मोठा झालाय ना....


..
..

त्याला जन्म देताना तिला वेदना असह्य झाल्या होत्या ....
वेदनेन कळवळून तीन किंकालीच फोडली ....
पण क्षणात तान्हुल्याचा चेहरा पाहून आनंदान देहभानच हरपून गेली ...

त्याच्या मुखातून जेव्हा पहिल्यांदा आई शब्द आला तेव्हा ती कौतुकान ऐकतच राहिली ....
जीभ अडखळत त्याच बोबड बोलन ती सार्यांना ऐकवायची ...

त्यान पहिल्यांदा पाऊल उचललं तो क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा ...
ती पाहतच राहिली ...

तो चिमुकला शाळेतून घरी परतण्याची वेळ झाली कि तिची नजर दरवाजाकडे जायची ...
अन तो आला कि माझ लेकरू आल म्हणून कवटाळायची ......

तीन पतीला सांगितला हवे तर माझे दागिने मोडा...एकवेळ जेवू ...
पण माझ लेकरू चांगल शिकलं पाहिजे ....
आपल्याला कष्ट पडले तरी चालतील ....
आपली फरपट झाली तरी चालेल
पण त्याच्या नशिबात कष्ट नकोत ..त्याची फरपट नको ...


जन्मल्यापासून तीन त्याची काळजी घेतली ..खूप सोसल ....
लहानाचा मोठा केला ...काळजाचा तुकडा म्हणून खूप जपल ...
आता तो मोठा झालाय....
कमाऊ लागलाय...स्वताचे निर्णय स्वत घेवू लागलाय ....
आज त्यान आईला वृद्धाश्रमात ठेवण्याचा एक निर्णय घेतलाय अन आईला ऐकवलाय...
त्याचा निर्णय ऐकून आज तिला पुन्हा असह्य वेदना झाल्या
पण किंकाळी नाही फोडता आली ..
.कारण तो मोठा झालाय ना....

आता त्याने तिला शाळेत टाकलंय...वृद्धांच्या शाळेत ...वृद्धाश्रमात ...
आताहि ती वाट पाहते त्याच्या येण्याची ...पण खिडकीच्या पलीकड्च काही काही दिसत नाही ...

आता तिच्याही तोंडून आई शब्द बाहेर पडतो ..पण पाठीत चमक उठल्यानंतर ...
ऐकायला कोणीच नसत ......कारण तो मोठा झालाय ...

ती पण पाऊल उचलते पुढे टाकण्यासाठी ...
गुढघ्याना भार सहन होत नाही ..कोलमडते ...पण काठीच्या आधारान पुन्हा उभी राहते ..
सावरते स्वताला ...
समजावते ....
येईल माझ लेकरू नक्कीच मला नेण्यासाठी ...
नाही आला तरी चालेल कारण तो आता मोठा झालाय ...त्याचा संसार मोठा झालाय ...

"एक चित्र"


(एवढ्यात एक चित्र माझ्या पाहण्यात आलं, त्याला कसला तरी पुरस्कार मिळाला होता. त्यामधे भर उन्हामधे एक छोटं बाळ निपचित पडलं आहे, मृत्युच्या दाराशी जणू. दुष्काळी उन्हाळ्याचा तो एक बळी असावा. आणि एक गिधाड दुरुन त्या मुलाकडे बघत आहे, त्याच्या मरणाची वाट बघत. ते बघून एक विचार आला मनात, तो खाली मांडलाय)


ऊन हसतंय, बेभान हसतंय
एवढं की जमिनीच्या डोळ्यातही पाणी नाही

कुठे आमरस, तर कुठे आईसक्रीम
कुणाकडे मात्र चतकोर भाकरही नाही

कुठे एसी ची थंड झुळुक , फ़्रीजचे गारगार पाणी
मृत्युच येथे कूलर, साधी जगायचीही सोय नाही

फ़िरंगी मंडळीना याचेच मोठे कौतुक
काय समजावं, ही गरिबी एवढी सुंदरही नाही
मोठमोठे पुरस्कार त्या फ़ोटोना लाभतात
जल्लोश करायला येथे स्मशानाचेही भाग्य नाही...

कविता लिहाविशी वाटतच नाही...



आता कविता लिहाविशी वाटतच नाही...
खर प्रेम शब्दात मावतच नाही..
भारंभार प्रेम कविता करूनही..
लोकाना प्रेम समजतच नाही...

आता कविता लिहाविशी वाटतच नाही...
सभोवतीच दू:ख शब्दात उतरतच नाही...
कितीही खोल शब्द असला तरी..
कुणाच्या काळजात दुखतच नाही..

आता कविता लिहाविशी वाटतच नाही...
कवितांच जंगल...आणि शब्दांच्या गर्दी..
ह्यात नेमकेपणाच नेमका सापडत नाही...
कवीला काय सांगायचय ते शेवटपर्यंत कळतच नाही...

म्हणून,
आता कविता लिहाविशी वाटतच नाही....

"दूर दूर त्या वळनावरती..."



दूर दूर त्या वळनावरती
भेट आपुली घडली होती
बघता बघता दोघांचीही
ह्रदय जणू धडधडली होती

ह्रदय अशी धडधडली जेव्हा
डोळ्यांचे जाहले इशारे
तुझी पापनी अलगद उठता
तीर मनाला भिडले सारे

तीर मनाला भिडतान्नाही
गंध तयाचा दरवळला
हलके हलके श्वासही माझा
गंधासोबत विरघलला

विरघलताना श्वास म्हणाला
सांग माझी तू होशील का?
चिंब भिजुनी पावसात या
मिठीत मजला घेशील का?

मिठीत मजला घेशील जेव्हा
धरणीला या सूर मिळे
भेट आपुली पाहून राणी
मंद मंद पाउस जले

मंद मंद पाउस जले हा
झुरू लागली ही धरती
प्रीतिचा गुलमोहर फुलला
दूर दूर...त्या वळनावरती......