चंद्रावरती बांधलाय बंगला ..!!


चंद्रावर जमीन मिळतेय
तेव्हाच घेऊन ठेवलीय
दहा रुपये एकरने
चक्क वीस एकर घेऊन ठेवलीय
माझ्याकडे कागद पत्र आहे
कालच चंद्राचा सेल आला
बंगला बांधून तयार आहे
कधी येताय राहायला ..?
हुरळून गेलो कसा असेल बंगला
चंद्राने "ई"मेल केलाय .
मस्त बंगला..! छान बांधलाय ...!!
फळांची झाडे लावलीत
आंबा, पेरू ,सफरचंद द्राक्षे
काय म्हणाल ते
बंगला एस्पैस नि खोल्या छान
सूर्य टांगून ठेवलाय आवारात
मस्त गाभूळ्लेला
तुम्हाला हवां तसा ...!!
खरेच कंटाळा आलाय येथला
रहायला धड जागा नाही
झोपायला धड खोली नाही
राहायला येथे ..
नि कामाला तेथे ......
नुसती धडधड नि नुसती वणवण
शरीर गेलेय थकून
नि हाडे लागलीत बोलू
चला चंद्रावरच जाउया ..
चंद्र म्हणतो येथे छान आहे
हात उभारले कि त्याचे पंख होतात
"हू !!"म्हणाले की
तुम्ही मस्त उडू लागता
येथे गाडीचा खर्च नाही
उडालाकी बुडण्याचे भय नाही
चांदण्याची नाणी येथे खूप आहेत
आणि मुठभर उचला
येथे सगळे फुकट आहे
येथे खायला लागते काय
प्यायला अमृत दुसरे काय ..?
यायचे तर लवकर या
येथे आल्यावर एक होईल
तुमाचा मात्र अडाम होईल
येताना मात्र ईव आणा
मग चंद्राची पृथ्वी होईल
त्याला वेळ लागणार नाही
येथे तारुण्य भरपूर आहे
हे चंद्राचे अंगण आहे ...!!

आई हा शब्द आहे का ?




I
एकटीच आहे मी अता...
पण कोणाशी बोलू मी काही,
भेटतात लोक येता जाता..
पण तू भेटत नाहीस मला आई. . .

आतुरतेने वाट बघते मी तुजी अता,

घरट्यात अता एक चिमनी आली,
डोळ्यात भरला आहे पाण्याचा साथा,
पण तुजी परतीची वाट आहे का आई. . .


आली मला उचकी अता,
असे वाटे की तू आली..
अंधाराला एकटक पाहता,
माजा उजेड आहेस तू आई. . .

काही गोष्टी कलू लागले आहे अता,

विनाकारण देवाने खुपच केली घाई..
देवाकडे निरागसपने पाहता,
देवाने का हिरावून घेतली माझी आई. . .

थांबू लागली आहे मी चालता चालता,
एकटीच चालत आहे मी पायी,
बाकीच्या पालकांना पाहता,
वाटे, असेल का त्यात माझी आई. . .

घरात जेवत आहे मी अता,
पण माझ्या पोटात भूकच नाही..
प्रत्येक ख़ास खाता खाता वाटे,
मला प्रेमाने जेवण भरव ना आई. . .

पूर्ण केले मी माझे GRADUATION अता,
पण नाही आली मी पहिली..
कुठे कुठे चुकते मी अता,
मला प्रेमाचे धपाटे देऊन एकदा शिकव ना आई. . .

एक मुलगा आवडतो मला अता,
तो दिसतो एकदम सही..
लग्न करणार आहे मी अता,
वरुनच आशिर्वाद देशील ना आई. . .

या जगात नाहीस तू अता,
पण तुझी आठवन मला सतत आली..
आयुष्याचे गोड गीत गाता,
तू नसण्याचे खुप दुःख आहे आई. . .

तुला मी माफ़ नाही करणार मी अता,
देवा कड़े जायची का केलीस तू घाई..
निघून गेलीस तू अचानक काही न कलवता,
ये सांग ना कशी दिसतेस तू फ़क्त माझी आई. . .

घाबरू नकोस तू अता..

छानपने संभाळते जीजू आणि ताई,
तू हळूच आम्हाला पाहतेस ना..
स्वर्गातुन सुट्टी घेउन आम्हाला भेटायला ये ना आई. . .

प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं

प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं
बायको झाल्यापासून
भांडणे खुप वाढली आहेत,
संसाराच्या वृक्षावरील
हिरवी पाने पार झाडली आहेत,,
उरला आहे तो फ़क्त पालापाचोळा…
प्रेयसी असतांना,
“तू म्हणशील तसंच होणार”
असं सारं नेहमी म्हणायची,
आता मात्र माझ्यावरंच
वेळ आली आहे रडायची,,
उरलं आहे ते फ़क्त अश्रुत बुडायचं…
प्रेयसी असतांना,
वेळ देत नाही म्हणायची
बायको म्हणुन सोबत असतांना
काय दिवे लावतेय,
“आमचं किती प्रेम आहे”
असं सा-या जगाला उगीचं दाखवतेय,,
उरला आहे तो फ़क्त बिनपैश्याचा तमाशा…
प्रेयसी असतांना,
माझ्याकरीता तुला
खुप गोष्टी कराव्याश्या वाटायच्या,
बायको झाल्यानंतर मात्र
कणिक तू मळायचीस
अन पोळ्या मी लाटायाच्या..?
उरलं आहे ते फ़क्त पूर्ण वेळ स्वयंपाकी व्हायचं…
प्रेयसी असतांना,
तुला सोडुच नये असं वाटायचं
बायको झाल्यानंतर
कधी एकदाचं सोडतो असं झालंय,
कामे दोघांनी करायची असतात
पण तू माझं ओझ्याचं गाढव केलंय,,
उरलं आहे ते फ़क्त ओझं वाहता-वाहता जीव सोडायचं…
- अनामिक

राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!

स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफङाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी
राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!
- ग्रेस

निषेध !!

आम्ही कधीच पेटून उठत नाही
आम्हाला कुणीतरी चिथवावं लागतं.
आमच्यातल्या विवेकाला
धर्माचं नाहीतर अस्मितेचं
गाजर दाखवून फितवावं लागतं.
मग कुठेतरी
आतून भ्याड आणि बुळे असणारे आम्ही पेटुन उठतो.
अन्‌ स्वत:च्या षंढत्वाबद्दल वाटणा-या घृणेला
कुठल्यातरी निषेधाचं लेबल लावून
मिळेल ते जाळत सुटतो.
कुठला धर्म? कुठल्या भावना?
कुठली अस्मिता? कुठल्या विटंबना
आम्हाला नसतो विधीनिषेध
आम्ही फक्त नोंदवत असतो
आमच्या लाचार कृतीशून्यते विरुद्धचा आमचा निषेध !!
-गुरु ठाकूर