विचार

विचार करत होतो मी
कोण माझा विचार करतय का?
विचार करुन सांग मला
तु माझा विचार करतेस का?
जर करत् असशील विचार् माझा
तर पुढे काय विचार तुझा?
जर करत नसशील विचार् माझा
तर का करत नाहीस विचार माझा?
मी तुझा विचार करत असताना
तु माझ्याबद्द्ल अविचारी का?
हा प्रश्न मी तुला विचारलाच् का?
ह्याचा विचार तु कधी केलास का?
विचार करुन विचारतो तुला
जर् पटला माझा विचार तुला
तर कळव तुझा विचार मला
- अनमिक 

आठवण

तळहातावर वेचलेल्या फुलांचा सुगंध
जेव्हा घेईन
तेव्हा तुझी आठवण येईल...
पावसाच्या कोसळणाऱ्या जलधारांमध्ये
जेव्हा भिजेन
तेव्हा तुझी आठवण येईल...
संध्याकाळचा गारा वारा मला सुखावेल
तेव्हा तुझी आठवण येईल...
पाण्यावर
तरंगणाऱ्या चांदण्यांना हळुवार स्पर्श
करेल
तेव्हा तुझी आठवण येईल...
जेव्हा जेव्हा माझे हृदय धडकेल
तेव्हा तुझी आठवण येईल... तुझ्यावर
माझ्यापेक्षाही खूप प्रेम करते
मी शेवटचा श्वास
घेईपर्यंत मला तुझी आठवण
येईल...

कायले म्या प्रेमात पडलो

 काय राव कायले म्या प्रेमात पडलो
                                         फुकट माशासारखा जाळ्यात अडकलो

समद्यास्नी  होते थे मले झाले
अन जिंदगीचे पाप एकदम फिटले
प्रेम म्हणते मराठीत अन हिंदीत त्याले प्यार
झोप माई मोडली अन सपान   झाले ठार
                                                  येते भेटाले तर धास्ती भरते मनात
                                                  थे काय बोलते येत नाई ध्यानात
                                                  शेंट  लिपस्टिक  मध्ये पैसा पुरा जाय
                                                  पैजाम्याचे खिशे उघडेबंब व्हाय
एकदिशी  तिले सिनेमाले नेले
पाच रुपयाचे पोप्कॉर्न सत्तरीला खाल्ले
हाल मध्ये होता अंधार म्या म्हटले पकड
लात बसली माया कमरेत म्या झालो उकड
                                                   रोजचे फोनने माये कान दुखते
                                                   तिले सांगितले तर म्हणते काय होते
                                                   थे म्हणे तुया मंदी ब्यालांस नाय
                                                   माया काय अंबानी सासरा हाय

काय राव कायले म्या प्रेमात पडलो
फुकट माशासारखा जाळ्यात अडकलो
प्रेम म्हणते मराठीत अन हिंदीत त्याले प्यार
झोप माई मोडली अन सपान झाले ठार
                                         काय राव कायले म्या प्रेमात पडलो
                                         फुकट माशासारखा जाळ्यात अडकलो

-अनामिक

तुझी आठवण

तुझ्याशिवाय मला
करमतच नाही गडे
जरी सारखा कडेला
टीव्ही बडबडे

तू गेल्यापासून गिरवतोय
स्वयंपाकाचे धडे
कांदा, बटाटा मधेच
उगा  कारलं कडमडे

दारी पडती जेव्हा
कचऱ्यांचे सडे,
तुझी आठवण
मजला घालते साकडे

उघडतो कपाट जेव्हा
पडती खाली कपडे
घर आवरून आवरून
झालेत हातपाय वाकडे

तुझी आठवण येते जेव्हा
तांदळात निघती खडे
अन कांदा चिरताना
नकळत येवू लागते रडे

ये परतुनी तुला पाहुनी
मन आकाशी उडे
कॅलेंडरवर मीही मोजतो
रोज रोज आकडे

स्वातंत्र्य कुठले, एकटेपणाची
शिक्षा मजला घडे
हळू हळू मग उमजत जाते
प्रीत हि तुजवर जडे.......

-अनामिक

मी....

मी हसणारा, मी हसवणारा...
मी खेळणारा, मी खेळवणारा...
मी बोलणारा, अन बोलायेला लावणारा...

मनातल सगळ काही जाणणारा,
अन मनात घर करून राहणारा...
मी ....

स्वतःच दुखः न विसरणारा ...
डोळ्यात साचलेल्या आश्रुना, कधीही न पुसणारा...
फक्त तिलाच आठवणींत शोधणारा...
अन कोणाच्याही नकळत खूप खूप रडणारा...
मी...

कोणालाही न कळणारा...
त्यांचात असून हि,
वेगळा असा राहणारा..
तिझ्याच आठवणीत झुरणारा,
अन तिझ्या परत येण्याची,
रोज वाट पाहणारा...
रोज वाट पाहणारा...
मी....

-अनामिक