आईची माया


ते लहानपनिचे दिवस
अजुनही आठवतात
ती आईची माया अजुनही
मनातल्या पारंब्या हलवतात.........

होते लहान जेव्हा
एक एक शब्द शिकाविलास
हातात हात घेउन
जीवनाची वाट दाखविलिस........

शाळेत जाताना सुद्धा प्रत्येक
गोष्ट हातात आणून द्यायची
वेळ होऊ नये म्हणून
सगळ्यानच्या आधी उठायची.......

चेह-यावरच्या दुखांना
नकळतच ओळखायची पण
स्वतःच्या दुखाह्ची मात्र
चाहुलसुद्छा लागु न द्यायची.....

मला ठेच लागताच
तिचा चेहरा पडायचा
आणि माझ्या अश्रुआधि
अश्रु तिचे गळायचे.....

कौलेजमधे असताना
मैत्रिनिसारखी वागायची
कौलेज मधल्या गमती-जमतीही
ती आनंदाने ऐकायची........

स्वतःची आवड बाजूला ठेउन
माझ्या आवडी निवडी सामभळायचि
नाही हा शब्द सुद्धा कधीही
कानी न पडू द्यायची......
आहे अजून हि अशीच माय माझी... 
 
-अनामिक 

अशा या बायका!



तुम्ही त्यांची स्तुती केलीत,
तर म्हणतात, तुम्ही खोटारडे आहात

* तुम्ही स्तुती केली नाहीत,
तर म्हणतात, मेल्याला माझं कौतुकच नाही

* तुम्ही बोलू लागलात,
तर म्हणतात, गप्प बसा, माझं ऐका

* तुम्ही गप्प बसलात,
तर म्हणतात, मुखदुर्बळच आहे आमचं ध्यान

* तुम्ही योग्य वेळ साधून मुका घेतलात,
तर म्हणतात, जरा सभ्यपणे वागा

* तुम्ही योग्य वेळ साधली नाहीत,
तर म्हणतात, असा कसा हा नेभळटराव

* तुम्ही त्यांचं सगळं ऐकलंत,
तर म्हणतात, होयबा बनू नका

* तुम्ही ऐकलं नाहीत, तर म्हणतात,
जर्रा समजून घेत नाहीत मला

* तर अशा या बायका...
यांच्याबरोबर जगणं कठीण...
आणि... ...
त्यांच्याशिवाय जगणं..
.
.
.
.
.
त्याहून कठीण!!!
-अनामिक 

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात.
 -अनामिक 

कळत नाही कधी कधी...

कळत नाही कधी कधी,
हे असे का होते?
मन कोणासाठी तरी,
एवढे वेडे का होते?

ज्याच्यासाठी हे वेडे होते,
त्याला ते माहितीही नसते,
मग आपल्याच मनाला,
हे असे का होते?

कधी स्वपनांच्या दुनियेत हरवते,
कधी जगाला ही विसरते,
कधी मोहाच्या चार क्षणांसाठी,
हे क्षण क्षण झुरते.

माहिती नाही अजुन हे,
असं किती दिवस चालणार?
स्वपनांच्या दुनियेतून अखेर हे,
माझं मन कधी बाहेर पडणार
- अनामिक 

तुझ्या वेणीतलं मोगर्‍याचं फ़ुल व्हायचंय मला

खोवशील ना मला माझ्याही नकळत
तुझ्या वेणीतलं मोगर्याचं फ़ुल व्हायचंय मला

भिजशील ना माझ्या अंगणात मनसोक्त
तुला आवडणारी सुखद श्रावणसर व्हायचंय मला

झेलशील ना मला हळूवार अलगद
तुझ्या अळवावरचा टपोरा थेंब व्हायचंय मला

देशील ना मला प्रेमानं आलिंगन
तुझ्या कुशीतली कापसाची ऊशी व्हायचंय मला

सावरशील ना मला नेहमी भरकटताना
तुझ्या साडीचा ढळणारा पदर व्हायचंय मला

शोधशील ना मला नितळ सागरकिनारी
तुला सापडणार्या शिंपल्यातला मोती व्हायचंय मला

पुसशील ना मला तुझ्या रुमालाने
तुझ्या गालावरुन ओघळणारा अश्रू व्हायचंय मला

घालशील ना हळुवार प्रेमाची फ़ुंकर
तुझ्या नाजूक तळहातावरला फ़ोड व्हायचंय मला

परडीत वेचशील ना मला तुडवता
तुझ्या परसदारातल्या प्राजक्ताचा सडा व्हायचंय मला

बाळगशील ना मला नेहमी बरोबर
तुझ्या गळ्यातला लाडका ताईत व्हायचंय मला

पहाशील ना माझ्याकडे साश्रू नयनांनी
तुझ्या पाणिदार डोळ्यातलं काजळ व्हायचंय मला

झुलशील ना माझ्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर
तुझ्या कानातलं झुबकेदार डूल व्हायचंय मला

न्याहाळशील ना मला रात्रभर एकटक
तुझ्या शयनगृहातील आरसा व्हायचंय मला

नाचशील ना माझ्या सप्तसुरी तालावर
तुझ्या पायातलं रुणझुणतं पैजण व्हायचंय मला

धरशील ना मला ह्रदयाशी कौतूकानं
तुझ्या पायात घोटाळणारं इवलसं पिलू व्हायचंय मला

पहाशील ना मला सारखं मागे वळून
तुझ्या पाठीवरला दिसणारा तिळ व्हायचंय मला

-अनामिक