कुणाचेच नसतात हक्क
कोणावर पण तरीही डोळे
भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा
पण तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडायचा सारा तर आकडे
पडतील कमी,
तरीही सुख
मोजताना पापण्या भिजतातच ना?
लाख झाला असेल
मनाचा दगड ,तरीही आठवणींनी त्याला पाझर
फुटतोच ना?
तोडताना जोडलेली नाती मनात
वेदना होतातच ना ?
या सगळ्यातनं हाती उरायचे शून्य,
पण तरीही जीव जडतातच ना ?.
कवी- अनामिक
No comments:
Post a Comment