तू आणि मी फक्त तू आणि मी बाकी कोणीच नाही!


तू आणि मी फक्त तू आणि मी  
बाकी  कोणीच  नाही! 
माझी  तू  नि  तुझा  मी! 
तू  दूर  जाताना  तुझा  हात  पकडून  
तुला  जवळ  घ्यावे  मी 
कडाडू  दे  सारे  आभाळ  
आणि  बरसू  दे  मेघमल्हार 
तू  घाबरशील  अन बिलगशील मला... 
तुला  घेईन  मिठीत  मी! 
तू  पाहशील  माझ्याकडे  
अन  तुझ्याकडे  पाहीन  मी 
गहिवरू  दे  श्वास...  
आणि  संपून  जावू  देत  सारे  आभास 
विसरून  जावू  जगाला  जेव्हा.... 
तुझ्या  ओठांना  स्पर्श  करतील  ओठ  माझे 
लागू दे  आग पेटू  दे  ठिणगी  जेव्हा... 
भिजलेल्या  तुला  पाहतील  डोळे  माझे 
वारा सोसाट व्हावा  अन 
पानाफुलांची  बरसात व्हावी 
मी  तुला  उचलून घ्यावे
अन तू  लाजावे 
मग तू  आणि मी प्रेमरसात भिजून 
चिंब ओले व्हावे... 
कवी- अनामिक 

ते तुझे हसणे नव्हते


ते तुझे  हसणे  नव्हते 
ते नशिबीच  पडले होते 
दारिद्र्य लाभले मज 
आयुष्यही दुखांनेच घेरले होते ....

खरेच शोना माझ्या ह्या दारिद्र्यात  
तुझा ही हाथ सुटणारच आहे ....

तू   जाशीलही  निघून 
ही वेळच  तशी आहे 
सगळे  सोडून  गेल्यावर 
मला तूच किती वेळ सांभाळणार आहे ......

तुझे सुख तुला मिळावं 
आजवर दुसरं काहीच  स्वप्नी नव्हतं
आजही देवाकडे हाथ जोडून 
तुला सुखी ठेवच म्हणणार आहे .......

खरेच शोना माझ्या ह्या दारिद्र्यात  
तुझा ही हाथ सुटणारच आहे
एकटा आलो  इथवर  अन  मी 
आता एकटाच  विरहात जाळणार आहे  ....

खरेच शोना माझ्या ह्या दारिद्र्यात  
तुझा ही हाथ सुटणारच आहे....
-
©प्रशांत डी शिंदे


उगाच मी उन्हातली फ़ुले मनात आणली


उगाच मी उन्हातली फ़ुले मनात आणली
क्षणात गारव्यातली सुखे उन्हात आणली ..

पुरेल हीच पानगळ पुढे मला हयातभर
फ़ुलायची उमेद तू अशा वयात आणली !..

नसेन मांडली कथेत वेगळी व्यथा जरी 
तिला न कोणत्याच मी कथानकात आणली !..

बघून पारिजातका दवातला सडा तुझा 
कधी न आर्जवे पुन्हा तुझ्या पुढ्यात आणली !..

नको विचार एवढा करू मना मनातला
तुझी न कल्पना कधी कुणी मनात आणली !..

अता कसे लढायचे पराभवा तुझ्या पुढे ?
तहातलीच जिंदगी रणांगणात आणली !..

निमूट भोगली तुझ्या समोर जन्मठेप मी 
कधी न कोणती सजा तुझ्या गुन्ह्यात आणली..
कवी - अनामिक 

कुणाचेच नसतात हक्क

कुणाचेच नसतात हक्क
कोणावर पण तरीही डोळे
भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा
पण तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडायचा सारा तर आकडे
पडतील कमी,
तरीही सुख
मोजताना पापण्या भिजतातच ना?
लाख झाला असेल
मनाचा दगड ,तरीही आठवणींनी त्याला पाझर
फुटतोच ना?
तोडताना जोडलेली नाती मनात
वेदना होतातच ना ?
या सगळ्यातनं हाती उरायचे शून्य,
पण तरीही जीव जडतातच ना ?.
कवी- अनामिक 

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझेमाझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
कवी- अनामिक