कोण म्हणत देव नसतो

कोण म्हणत देव नसतो
आधार मागितला चालण्यासाठी,
आई-वडिल दिलेत...
जग बघण्यासाठी.
थोड पुढ चालून
प्रवास काटावा म्हटल,
तर मित्र दिलेत
आधारसाठी.....
आल्या जन्मी काही करावस वाटल
जग बघण्यासठी,
गुरु दिलेत....
ज्ञान वाढवण्यासाठी.
कोण म्हणत देव नसतो....
सहवास हवा होता
सुख:दुखाची देवाण-घेवाणासाठी
जीवनाचा जोडीदार दिलास....
भरुन आलेल मन मोकळ करण्यासठी.
सगळ मिळाल्यावर आता मात्र
आभार मानावस वाटल
जन्मदाताच तो.....
शेवटी त्यान त्याच्याच दारात आणुन टाकल
Finally got Thailand visa & air tickets. journey will start on 19th Nov. 2010
new domain for shri datta ganesh mandal has been launched.
check it by clicking following link

www.sdgmrahuri.in

शेवटची भेट...........

मला ती आज शेवटच भेटणार होती
दुख:शी भेट माझी आज तिथेच घडणार होती
आजचा दिवस सहज सरत होता
"अरे जरा दमानं" सांगितल तरी ऐकत नव्हता

तिला आज भेटुच नये असे वाटत होतं
मन माझं तिच्या निरोपाच्या
भयाने आतल्याआत तुटत होतं
पण पुन्हा तिचं ते मोहक रुप,
ते गहिरे डोळे मला दिसणार नव्हते
एकदाच शेवटच म्हणत
आज मन तिच्यासाथी हरणार होतं

कधी नव्हे ते आज पोहोचलो मी वेळेवर
नेहमी जिथे बसायचो बसलो
हात टेकवत त्या बाकावर
आज बागेतली गुलाबी फ़ुलं
मला काळी कुळकुळीत दिसत होती
पाखरांचे ते किलबीलणे मला विरह गाणी वाटत होती

अचानक बागेतलं वातावरण शांत झालं
"ही वादळापुर्वीची शांतत रे"!!
जणु मला इशा-याने सांगितल
हळु हळु काळे ढग जमु लागले
माझा हा विरह सोहळा पाहण्यास जणु ते आतुर झाले

तेवढ्यात ती आल्याची चाहुल लागली
तिने मला पाहताच लगबगीने पावलं टाकली
ती जवळ जवळ येत होती आणि पाऊशी सुरु झाला
सोबत त्याच्या विजाही कडाडु लागल्या
"आज तिच्या नजरेला नजर देउनच बोलणार"
मनात मी शपथ घेतली
पण ती समोर येताच माझ्याच
नजरेने माघार घेतली, नजर माझी भेदरली

ती शांत उभी होती
"उशीर का केलास"? मी विचारले
"अरे काम होतं जरासं!!" ती उत्तरली
बरं ठिक आहे म्हणत!! मी मान वळवली

का रे काय झाले ? तिने विचिरले
कुठे काय !! काही नाही ?
म्हणत मी तिच्या त्या प्रश्नाला टाळलं

"अछ्चा माझं लग्न ठरलय तो युएसए ला आहे"! तिने हसत सांगितल

माझं काय? मी झुरत विचारलं
अरे सॉरी घरातले तयार नव्ह्ते
मी तरी काय करु ?? सगळं गणितच चुकले
चल मी निघते म्हणत ती उठु लागली
पाठी न बघताच ती पुढे चालु लागली

नजर माझी तिच्या पाठमो-या
आकृतीकडे फ़क्त पाहत राहीली
हळु ह्ळु तिची ती आकॄती
माझ्या डोळयात फ़क्त भीजत राहीली
सोबत पावसाची सरही वाढु लागली
त्या पावसाच्या पाण्यात माझ्या
स्वप्नांची कागदी नाव बुडु लागली.........

काय हरकत आहे?



आहे माझं प्रेम तुझ्यावर
जीव ओवाळते ना मी
वाट पाहते तुझ्या येण्याची
काय हरकत आहे?

तुझं हसणं बोलणं वावरणं
आवडतं मला
तुझं निखळ स्वच्छ वागणं
मोहवितं मला
काय हरकत आहे?

हो, मी पाहते स्वप्न
तुझ्या माझ्या स्वप्नांची
तू रंग भरावेस असंही वाट्त मला
काय हरकत आहे?

माझी स्वप्न माझी आहेत
माझे रंग माझे आहेत
माझं प्रेम माझं आहे
मग काय हरकत आहे?

माझी तुझ्यावर बंधन नाहीत
तुलातशीस्पंदनं ही नाही
तुला माझा त्रास ही नाही
की मझ्या प्रेमाचा जाच ही नाही
तरी..


तू प्रेम केल नाही
तरी मी प्रेम करते ना
कुणासमोर नाही तरी
आतल्या आत झुरते ना
काय हरकत आहे?

हरकत असून तरी काय होणार आहे?
बंधन घातलीत मनाला
तरी किती पाळल्या जाणार आहेत?
मग का बंधून ठेवायच?
प्रेम करणारच ना बांधुन देखील
मग मुक्त पणे करायचं
काय हरकत आहे?
 

प्रेमाचे बारा महिने!


जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत "ती" दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं
मार्च मध्ये "ती" माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली, म्हणजे फसली ...!

मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो
जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं
ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त भिरवलं

सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो
ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो
नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं
एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं
धाडस करुन मी तिला प्रपोज केलं

त्यावर ती म्हणते कशी,
"
बारा महिने एकत्र भिरलो
हे काय कमी झालं
अरे वेड्या, आता नविन ब्वायफ्रेंड,
नविन वर्ष नाही का आलं?"

मन हे नेहमी
फुलपाखरासारखं असावं
एकिने नाही म्हटलं तर काय झालं
लगेच दुसरीवर बसायला हवं!!

मिळेल का अशी...एक प्रेयसी?

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.
एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.
एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.
एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.
एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.
एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी...एक प्रेयसी?

साधी, भोळी, अल्लड माझी प्रेयसी...

कधी विचारही केला नव्हता की असे काही घडेल,
सर्वकाही विसरून, मी तिच्यावर प्रेम करेल,
तो काळच तसा होता, ती वेळच तशी होती,
प्रसंग आहे तेव्हाचा, जेव्हातीमाझी नव्हती,

ध्येय नव्हते जीवनाला, कुठला ध्यासही नव्हता,
नव्हती चिंता उद्याची, स्वतःवर विश्वासही नव्हता,
अशातच जेव्हा मी पहिल्यांदा तिला पाहिले,
विद्युत् वेगाने माझे काळीज धडधड्ले,

तिचं लाजन, तिचं हासन, आणि बोलके डोळे,
काळजाच्या कप्प्यात साठवले सगळे,
मग तिची आठवण होताच मला पड़े भ्रांत,
बोलायचे म्हटले तर, तिचा स्वाभाव शांत,

काय कराव तेच कळत नव्हते,
कसही करून तिचे मन जिंकायचे होते,
हिम्मत करून शेवटी तिला प्रेमपत्र लिहिले,
विचार करण्यास मुदत म्हणुन काही दिवस दिले,

महिना होउन सुद्धा तिचा होकर नाही आला,
होकाराच्या प्रतिक्षेत माझा जिव व्याकुळ झाला,
समजुन चुकले मी, हा नक्कीच तिचा नकार आहे,
तिला विसरने हाच एकमात्र उपाय आहे,

शेवटी करायला नको ते धाडस मी केले,
होकर आहे की नकार थेट तिलाच विचारले,
मग माझे पत्र दाखवत ती म्हणाली, हे काय आहे..?,
तुझ्या एव्हडेच माझे तुझ्यावर्ती प्रेम आहे,

एकून तिचे उत्तर, ‘मनबेभान होउन नाचले,
अतिआनंदाने डोळ्यात पानी साचले,
ध्येय मिळाले जीवनाला, ध्यासही गावला,
माझ्यावरचा विश्वास मी तिच्या डोळ्यात पहिला,

आता दीवसही माझा तिच्या नावाने उगतो,
स्वप्नातला चंद्रही तिच्यासाठी झुरतो,
रक्तासारखी माझ्यात ती सामावली सर्वांगी,
साधी, भोळी, अल्लड माझी प्रेयसी...

आता तु नाहीस म्हणून काय झाले............ ......



आता तु नाहीस म्हणून काय झाले
तु दिलेल्या आठवणी तरी आहेत
तुझ्या बरोबर राहीलेल्या
प्रत्येक क्षणाच्या जाणिवा तरी आहेत

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे
तुझ्या अस्तित्वाच्या सावल्यांच्या
पाऊलखुणा तरी आहेत

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझ्याबरोबर पाहिलेली स्वप्नं तरी आहेत
त्याच स्वप्नांच्या नगरात जायची
माझी वाट तरी मोकळी आहे

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझ्याकडून मिळालेली प्रेरणा तरी आहे
याच प्रेरणेच्या जोरावर
आज उंच भरारी घेत आहे

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझा शब्द न् शब्द कानात घुमत आहे
गर्दीत उभा राहूनही एकट्यानेच
तुझीच वाट पहात आहे ...