निशब्द



जिकडे पहावे तिकडे

एकच चित्र दिसत आहे,

कोन्क्रीट च्या इमारतीच-इमारती दिसत आहेत,

माणसांचे लोंढेच लोंढे,

हिरवळ नाही

जंगल नाही

पशु नाही पक्षी नाही,

इतकेच काय पाणी हि नाही,

वृक्ष तोडीने हैराण

धरणीचा श्वास गुदमरलेला पाहून

शब्दच फुटत नाही तोंडातून

निशब्द होऊन जात आहे

मन माझे.


Ravindra Koshti

मी काही बोललो तर

मी काही बोललो तर 
दुनिया हसते मला..
मी हसलो तर दुनिया म्हणते 
वेडा हसतोय बघा...
फेसबुक वर काही पोस्ट केल
तर कमेंट सोडा... लाईक ही नाही.
ऑफिस मध्ये कोणी
सरळ बोलत ही नाही

माझं चांगल का कुणाला पाहवत नाही..
माझी उदासी म्हणजे 
आजूबाजूच्या लोकांचा बोनस
माझं काहीही वाईट झाल
तर याचं चांगलच

लावली जीभ टाळयाला
मी कधी कुणाचाच वाईट चिंतील नाही...
मी कधीच कुणाच वाईटही केल नाही....
मग अस का?...........
मग अस का?........

कवी - गणेश पावले

चुंबन - The Kiss


ही भाषा आहे ओठांची
ओठांच्या कानांसाठी

जणू..
दोघंजण..एकमेकांचं ह्रदय प्राशणारे
दोन उनाड प्रेमिक..घर सोडलेले

ओठांच्या संगमी दोन यात्री

जणू..
प्रेम सिध्दांतानुसार
दोन ओठांवर आदळून लोपण्यास
उचंबळलेल्या दोन लाटा

देहाच्या सीमेवर
एकमेकांसाठी आतुर दोन इच्छांचे मिलन

जणू प्रेमच लिहतंय सुरेख अक्षरांत एक प्रेमगीत

जणू,सुंदर चुंबनाक्षरांची ओठांवर अस्तरं

एका माळेत गुंफण्यासाठी
ओठांच्या दोन जोड्यांवरुन फुलांचं खुडणं

ओठांचे हे मधुमिलन म्हणजे
स्मितहास्याच्या जोडीची
लालचुटूक मधुचंद्र शैय्याच..
 

आठवण...सुखभरी.....

आठवण...सुखभरी.....

प्रेमात पडल्यावर सगळं जग सुंदर होऊन जातं

वेळीअवेळी आठवण येऊन डोळ्यात पाणी येतं

आवडता चेहरा सारखा नजरेसमोर येतो

स्वप्नातही तोच कसा पुढे उभा र्‍हातो ?

कॅडबी द्यावी का द्यावं छान फूल

काय बरं द्यावं याची सतत पडते भूल

उशीर हा करतो किती, वेळ मुळी पाळत नाही

कसा वेळ काढतो इतका हेच हिला समजत नाही

कधी गप्पा कधी रुसवा वेळ जातो भराभरा

तीन तास गेले की चल मी निघते जरा

सहवासाची ओढ अशी काही केल्या जात नाही

आज बास, उद्या भेटू बोलणं काही संपत नाही

क्षण-दिवस सुखभरे निघून जातात पटकन्

लग्न एकदा झाले की नुसती उरते आठवण....

व्याकूळ आसवांत वाहून रात गेली

व्याकूळ आसवांत
वाहून रात गेली 
तळ मळ हृदयाची 
हृदयास कळून आली 

जे जे कोंडिले मनी 
सारेच ओठी आले
हितगुज तुज मनाचे
सारे सारे कळाले..

भावनांचा फुटला बांध
सामावून मिठीत..
बावरली लाजली तू 
चेहरा नको ओंजळीत 

व्याकूळ आसवांत 
वाहून रात गेली
विरघळ झाली मनाची 
तुझी जाणीव मज झाली

चुकले का हो ?


आकाशाला, भास म्हणालो, चुकले का हो?
धरतीला, इतिहास म्हणालो, चुकले का हो



चिरंजीव वेदना, अंतरी, दरवळणारी
जखमांना, मधुमास म्हणालो, चुकले का हो?

कलेवराला, जगण्यासाठी, काय लागते?
आठवणींना, श्र्वास म्हणालो, चुकले का हो?

मरण्याआधी, नाव सांग त्या, हत्याऱ्याचे
मी त्याना, विश्र्वास म्हणालो, चुकले का हो?

निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो
प्रीतीला, हव्यास म्हणालो, चुकले का हो?

लिहिल्या कविता, लिहिल्या ग़ज़ला, गीते लिहिली
सरस्वतीचा, दास म्हणालो, चुकले का हो?

चौदा वर्ष, पतीविना, राहिली उर्मिला
हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?

घात आप्त, आघाता सगे, अपघात सोयरे
ह्रदयाची, आरास म्हणालो, चुकले का हो?

चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो!
याचनेस, गळफास म्हणालो, चुकले का हो?

जन्मठेप, आत्म्याला कोणी, दिली `सजा ’?
कोणीस, कारावास म्हणालो, चुकले का हो?

का?




 का? अचानक...........
असे हे दिवस बदलतात,
क्षणात होत्याचे नव्हते करतात,
दुखाना अचानक सुखात बदलतात,
सुखाना अचानक दुखात बदलतात,

का? अचानक............
मला थोड़े यश मिळताच,
माझ्या यशावर जलू लागतात,
माझ्या प्रगतिच्या वाटेवर,
का असे काटे पसरवितात,

का? अचानक............
जर माझी जबाबदारी वाढतेय,
तर यांचे काय कमी होतेय,
जरी मला वरुन मान मिळतोय,
तरी यांना मी तरी कुठे कमी देतोय,

का? अचानक............
कालपर्यंत माझ्या मदतीला येणारे,
आज हाकेला दुर्लक्ष करतात,
काय माझा दोष आहे,
ज्याची मला शिक्षा देतात,

का? अचानक............
अशी मानसे बदलतात,
माझ्या चंगुलपनाचा फायदा घेतात,
मी चांगले बोलतोय,
मग ते का वाकडयात शिरतात,

का? अचानक............
कालपर्यंत वरुन चांगले भासनारे,
आज का मागुन सुरे खुपसतात,
मी तोंडावरच चांगले वाईट बोलतो
मग ते का मागुन वार करतात
का? अचानक...........का? अचानक........

एक छोटीसी प्रेमकहाणी



एक छोटीसी प्रेमकहाणी
एका मुलीने देवाला विचारलं प्रेम काय असत ?
देव म्हणाला
बागेतून एक फुल घेवून ये.
ती मुलगी फूल आणायला गेली ,
...तिला एक फूल आवडल ,
पण तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,
ती पुढे चालत गेली ,
पण तिला चांगल फूल नाही मिळालं,
जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,
तेव्हा ते फूल तिथे नव्हतं,
तिला खूप पश्चाताप झाला ,
तिने देवाला येऊन सांगितलं ,
तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम "
जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असतं.
तेव्हा त्याची कदर नाही करत,
पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय असत ..!

अबोल मैत्री ....... !!!!


मनाला झालेलं दुख: व्यक्त करायचं असत 
त्यासाठी आसवांची साथ हवी असते 
आजही तसच झालय 
झालेलं दुख: व्यक्त करण्यासाठी 
आसव येण्याची वाट पाहतोय 

माझ मन निरागस आहे 
पण ते तिला समजत नाही 
कठोर शब्दाने ती मला ती दूर करतेय 
फक्त तिच्या मैत्रीसाठी आज रडतोय 
का अस वागतेस ?
जिथे बोलण्यास शब्द फुटत नाहीत 
तिथे तू रडण्यास भाग पाडतेस ......
आज तू मैत्रीला विसरलीस 
उद्या मला विसरून जा 
बस आयुष्यात दिलेल्या सुखांना 
एकदा आठवून जा ........

निशिब्द भावनेला तू किरकोळ समजलीस 
अजाण वेळेस तू मला सोडून चाललीस 
मैत्रीत तू मला विसरत चाललीस 
माझ्या मनाची ही दुरावस्ता
आज तू नाही पाहिलीस 
बस तू माझ्या मैत्रीला विसरत चाललीस .......  With - एक मैत्रीण 

ऋषिकेश केदारी

कधीतरी कुणावर प्रेम करावं


कधीतरी कुणावर प्रेम करावं

एक आठवण म्हणून नव्हे,....एक साठवण म्हणून,

प्रेम करावं फुलांच्या पाकल्यासारखं...

घट्ट मिठीत साठलेले

कुशीमध्ये दडलेले पण स्पर्शाने फुललेलं,

कधीतरी कुणावर प्रेम करावं
... ... आकाशाच्या अथांगतेसारखे... ..
दूरपर्यंत पसरलेलं पण नजरेला भिडलेलं,
कधीतरी कुणावर प्रेम करावं
दिवा-वातीच्या संगतीसारखं.....
दिव्याच्या आधारानी तरणारेनि ज्योतीसारखं
जळणारे,
कधीतरी...कुणावर प्रेम करावं
त्या दर्यावाराच्या खडकासारखे
लाटांना अलगद झेलणारे
पण त्यांच्यातच झिजणारे,
कधीतरी कुणावर प्रेम करावं
स्वप्नासारखे भंगणारे...
खोल दरीत लोटणारे
गगनालाही लाजवणारे
पण कधीतरी......
कधीतरी कुणावर प्रेम करावं.

हवा आहे मला हाथ

हवा आहे मला हाथ
कधी ना सोडणारा साथ
हवी आहेत दोन पाऊले
नेहमी सोबत चालणारी
जीवनाच्या वाटेवरून
कधीही परत ना फिरणारी. हवं आहे एक मन
माझं मन समजणारं
कधी हलकेच रुसणारं
कधी खुदकन हसणारं..........
हवं आहे एक हास्य
मनाला वेड लावणारं 

एक अनामिक

जेव्हा तू फिरवलीस पाठ I तोच माझा प्रेमभंग क्रमांक आठ...II

तुझे रूप पाहण्यात
होतो मी ग दंग..
तंद्री उडाली ऐसी
झाला रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग..
माझा झाला प्रेमभंग..

तुझे स्मित हास्य  I  मला 'गुगली' होता...II
अन तिरपा कटाक्ष I तो 'दुसरा'च होता...II

स्वप्नात तूच ग असशी..

ध्यानी मनी तूच दिसशी...
मी तुला पहिले असता...
तुझ्या मागे मागे आलो..
डोळ्यावर येत किरणे..
जरा जागा जागा झालो..
होता स्वप्नाचा त्या भंग..
होतो रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग..
माझा झाला प्रेमभंग..

तुझी मोरचाल I  करती माझे ग हाल .II
तुझे ओठ बंद  I करती लाखो सवाल ...II

तुज बघणे अन तुज पूजणे
हा नित्यक्रम रोजचा..
तू समोर येत माझ्या
माझी बंद होते वाचा..
तुला लावे मी जेव्हा फोन
तू उचलत नाहीत त्याला..
नुसतीच वाजते रिंग
होतो रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग

मनाचिये दारी I किती संकल्प केले II
तू येत समोरी I ते गोंधळून गेले II

तू मनात 'घर' या केले
मी मनात 'पक्के' केले..
तुज गाठून सांगावेसे
ओठात अडकुनी गेले..
योगायोग काय असावा
तू म्हणालीस मज सॉरी
तेव्हा तिकडून आली तुझ्या
प्रियकराची स्वारी
तंद्री उडाली ऐसी
झाला रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग..
माझा झाला प्रेमभंग..

मनाशी बांधली खुणगाठ I तुझ्याशीच बांधावी लग्नाची गाठ...II

जेव्हा तू फिरवलीस पाठ I तोच माझा प्रेमभंग क्रमांक आठ...II

ती समोर असताना …

ती समोर असताना …मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं.. मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं ..
तिने कित्ती सुंदर दिसावं..  जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..  तासन तास पाहत रहावं..
तिने कित्ती गोड बोलावं..  ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं .. सोबत तिच्या..
तिने कित्ती साधं रहावं ..  त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव .. अदांवर तिच्या..
तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं.. अश्रूंनी तिच्या..
तिचं हसणं .. कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं.. गालावरल्या खळीत तिच्या..
तिच्या नजरेने मलाच शोधावं..अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं.. लाजेने चूर चूर व्हावं..
तिने फक्त माझंच रहावं.. मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..

बागेतल्या रोजच्याच ठिकाणी..

बागेतल्या रोजच्याच ठिकाणी
रोजच्याच वेळी...
मी तिची वाट बघत होतो
रोजच्याच प्रमाणे तिला
आज ही उशीर झाला होता
आणि रोजच्याच प्रमाणे मी ही
पुन्हा पुन्हा घड्याळाकडे बघत होतो ...

ती येण्याआधी मग, रोजच्याच प्रमाणे
आधी तिची आठवण आली ...
मी ही मग सवयी प्रमाणे ...
गेलो आठवणीच्या संगे..
पुन्हा एकदा..
केली सैर आजवरच्या प्रवासाची.....

आलो जेव्हा भानावारती..
जवळ माझ्या ती बसली होती
डोळे मोठे...नाक फेंदारालेल..
माझ्या मनी डोकावली भीती...

चेहऱ्यावर ढळलेली बट...
डाव्या करंगळीने माघे सारून..
जळजळीत नजर माझ्यावर फेकून...
बोलली ती मला....

"आज काय असेल तो
सोक्ष मोक्ष लावून टाक...
कोण तुला जास्त प्यारी
माझी आठवण की मी स्वतः
या प्रश्नाचे उत्तर तू
लगेच मला देऊन टाक... "

मग स्वतःच रुसली..
मान वळवूनं बसली...
पडलो होतो मी संभ्रमात....
इतक्यात...
तिचीच आठवण...खुदकन हसली...

मग बोललो मी तिला
टाकू नकोस अशी तू
धर्मसंकटात मला....
तुझी अन माझी भेट
फ़क्त काही तासांची असते
तुझी आठवणच मग सखे
नेहमी माझ्या सोबत असते
तुझ्या विरहाला तुझी आठवणच
माझ्या पासून दूर ठेवते...
तू नसताना तुझ्याच रूपाने
अगदी नववधु प्रमाणे सजते...
रात्रभर मग तिच्याच कुशीत मी
तुझीच स्वप्ने वेचीत जातो...
बांधून त्यांच्या तोरणमाळा
मी तव आगमनास झुरतं राहतो...

न कळले तुला जे आजवर
ते सांगतो मी आता..

तुझ्याविना नाही सखे
तुझ्या आठवणींचे अस्तित्व ....
अन तुझ्या आठवणींशिवाय प्रिये
कोण सांगेल तुझे महत्त्व ......



--पंकज सोनवणे....(स्वरचित)

एका सागराची कथा


एकदा काय झालं
एक सरिता रागावली
आपल्या बॉयफ्रेंडला  म्हणाली
हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?
दर वेळी मीच का
मीच का खाली यायचं डोंगरावरून ?
आणयच  रानातला सार तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघयचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकूळ संगोमोक्त
कधी एकदा तुला गच्च मिठी मरीन
तुझ्यात हरवून, हरपून  जाईन
आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा  त्या चंद्रिकेकडे टक लाऊन असतोस
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भारती येते तिच्यासाठी 
मी नाही जा !
बोलणारच नाही आता
येणारच नाही
काठावरच्या लोकांना सांगून
मोठ्ठा  धारण बांधीन
थांबून  राहीन तेथेच
बघच मग
सरिताच ती बोलल्या प्रमाणे वागली
सगर बिचारा  तडफडला
आकसला आतल्या-आत झुरत गेला
शेवटी फुटला बंध त्याच्याही संयमाचा
उठला तड, ओरडला दहाड
उफळला वारा  पिऊन
लाटांच तांडव घेऊन
सुटला सुसाट सरितेच्या देशेने
लोक वेडे
म्हणाले सुनामी आली! सुनामी आली!

....................कवी अज्ञात......................

तु येणार आहेस...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
झाडावरली कोकिळा जेव्हा
गाणं गाऊ लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
ठिबक्या ठिबक्या पावसानंतर जेव्हा
माती तिचा गंध देऊ लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
वर्षाराणी पाणी सांडुन जेव्हा
जमिनीवरुन वाहु लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
सुगरिणीचं पिलु जेव्हा
खोप्यातुन बाहेर डोकावु लागते...

तु येणार आहेस
याची मला चाहुल लागते,
चंद्रासोबत चांदणीही जेव्हा
अवकाशात चमकु लागते...

आता तु जाणार आहेस
याची मला चाहुल लागते,
भग्नावस्था सारी, कोरडया खट्ट रानी
निरव शांतता पानोपानी,
जेव्हा पसरु लागते...

----मनोज----

तु आपल म्हटलेस आणि

तु आपल म्हटलेस आणि,
जग माझे बदलल.
सगळ काही मीळlल,
स्वप्न सत्यात उतरल.
झुरत होतो तुझ्यासाठी,
मारत होतो तुझ्यासाठी,
कळत होता वेडेपणा तरी,
तसेच वागत होतो तुझ्यासाठी .
तु हा म्हटलस आणि,
जग माझे बदलल.
सगळ काही मीळlल,
आयुष्य माझे पालटल.
क्षणो क्षणी,ओढ़ होती
क्षणो क्षणी बैचैनी,
मनामध्ये शिरली होती
तुझीच ती धुंदी.
तु हा म्हटलस,आणि
सुख मला मीळlल.
हवे होते जसे मला
उत्तर तसेच मीळlल.
तु आपल म्हटलेस आणि
जग माझे बदलल.
सगळ काही मीळlल
मन आनंदाने भरल.
किती स्वप्ने पहिली होती
किती कल्पना रंगवल्या होत्या
तुझ्या विचlरने सखे
रात्र रात्र जागवल्या होत्या
स्वप्नातून सत्यात तु आलीस
आणि प्रेम माझे खरे ठरले
तु आपल म्हटलेस आणि
जग माझे बदलल

माझा गाव


निळ्या खाडीच्या काठाला
माझा हिरवाच गाव.
जगात मी मिरवितो
त्याचे लावुनिया नाव !
पूल ओलांडिता पुढे
रस्ता येईल तांबडा.
घरी आणील सरळ
जरी दिसला वाकडा.
माणसांच्या जागीसाठी
दाटी करितात माड.
गर्द मधेच एखादे
आंब्या फणसाचे झाड.
असो झाडी किंवा वाडी
सुने नाही वाटायचे.
नादी आपुल्याच कोणी
तेथे गात असायचे.
थोडया पायवाटा हिंडा
लालतांबडया वाकडया.
होडया उपडया झालेल्या
तशा बघाल टेकडया.
जेथे होईल माध्यान्ह
तेथे पान वाढलेले.
काळोखात कुणीतरी
ज्योत घेउन आलेले.
गोव्यतला माझा गाव
असा ओव्यांतच गावा.
तेथे जावून राहून
डोळे भरून पाहावा.
- बा. . बोरकर

मनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ

मनातले समजण्यासाठी का तुला लागतोय वेळ,
ह्रदयाचा माझ्या केलास तु विनाकारणच खेळ.
मी म्हणालो नाही म्हणून काय ?
तूही म्हणायचं नव्हतसं.
चुकलेल्याला वाट,
तहानलेल्यांना विहीर,
आणि माझ्यासारख्यांना प्रेमाचा घाट,
का... तुला दाखवायचाचं नव्हतं.
मला वाटलं तू समझशील,
अनं.... तु माझा तू स्वीकार करशील.
नाही मजला तुझ्यापासून कोणतीचं आशा,
फ़क्त तुच आहेस माझ्या जीवनाची दिशा.
माझं मन झालय व्याकूळ फ़क्त तुझ्यासाठी,
करु नकोस दिशा भूल या ह्रदयाची.
मनातं आहे फ़क्त खंत तुझ्याच प्रेमाची,
देईन तुला मी साथ "सात जन्मांची".

दोन पाखरांचा संसार होता...

दोन पाखरांचा संसार होता...
वास्तवात नाही पण तिच्या स्वप्नात होता..

१४ फेब्रुवारी ला लग्न...
आणि व्हायचा विचार होता..

लग्नानंतर रोज एक चोकलेट..
आणि रोज बाहेर फिरायला जायचं असा तिचा हटट होता..

आपले चौघांचे कुटुंब असेल..
मोठी कृपा तर छोटा पार्थ असेल...

दर १ नोव्हेंबर ला कैंडललाइट डिनर..
तिथे आपल्या दोघं शिवाय आणखी कुणी नसेल..

आपल्या दोघांच छोटस घर असेल..
गुलाबी भिंती आणि मार्बल फ्लोर असेल..

कृपा ला डॉक्टर आणि पार्थ ला स्पोर्टसमन बनवायचे...
आणि आपण आपल्या जबाबदारीतुन मुक्त व्हायचे....

आमच्या ह्या संसाराला कुणाची तरी नज़र लागली...
आमच्या स्वप्नाची नाव नशिबाच्या सागरात बूडू लागली..

त्या बुडणाऱ्या नावेकडे बघन्यावाचून कोणताच पर्याय नव्हता...
घात करणाऱ्या त्या लाटा थाम्बायाचे नाव घेत नव्हत्या...

शेवटी स्वप्नांची ती नाव बूडून गेली...
पाखरांच्या स्वप्नाना तडा देऊन गेली..

स्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे तडफडत होती...
आता कधी जिव निघून जातो ह्याकडे नज़र लागली होती...

नवी-नवी मैत्री आपुली

नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...

रोजचाच चंद्र नभी तो,
वाटे आज मज का आज नवा,
ओढ लागली चंद्रालाही माझी आज...मलाही वाटे तो हवा-हवा..
नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...

वेग-वेगळ्या प्रवासाचे  प्रवाशी आपण,
वाटा जुन्या जरी,भेट आपुली नव्या वळणावर,
सवे सोबती तुझ्या....रस्ता जुनाही वाटे आज का नवा-नवा,
नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...

भेट जरी नवी आपुली,
ओळख न जाणे कोण जन्मांची,
अंतर आपल्यातली विस्कटू लागली...ओढ लावे  आता जीवा....
नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...

अजाण,हळवे,नाते आपले..
अवचित जुळावे कैसे कोण  ठाव,
मैत्रीचे सुंदर आपुले नाव नसलेले एकच गाव,
त्यात दोघेच आपण आणि रोज पाहु  एक दिवस नवा...
नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...

जेव्हा तू फिरवलीस पाठ I तोच माझा प्रेमभंग क्रमांक आठ...II

तुझे रूप पाहण्यात
होतो मी ग दंग..
तंद्री उडाली ऐसी
झाला रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग..
माझा झाला प्रेमभंग..

तुझे स्मित हास्य  I  मला 'गुगली' होता...II
अन तिरपा कटाक्ष I तो 'दुसरा'च होता...II

स्वप्नात तूच ग असशी..
ध्यानी मनी तूच दिसशी...
मी तुला पहिले असता...
तुझ्या मागे मागे आलो..
डोळ्यावर येत किरणे..
जरा जागा जागा झालो..
होता स्वप्नाचा त्या भंग..
होतो रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग..
माझा झाला प्रेमभंग..

तुझी मोरचाल I  करती माझे ग हाल .II
तुझे ओठ बंद  I करती लाखो सवाल ...II

तुज बघणे अन तुज पूजणे
हा नित्यक्रम रोजचा..
तू समोर येत माझ्या
माझी बंद होते वाचा..
तुला लावे मी जेव्हा फोन
तू उचलत नाहीत त्याला..
नुसतीच वाजते रिंग
होतो रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग

मनाचिये दारी I किती संकल्प केले II
तू येत समोरी I ते गोंधळून गेले II

तू मनात 'घर' या केले
मी मनात 'पक्के' केले..
तुज गाठून सांगावेसे
ओठात अडकुनी गेले..
योगायोग काय असावा
तू म्हणालीस मज सॉरी
तेव्हा तिकडून आली तुझ्या
प्रियकराची स्वारी
तंद्री उडाली ऐसी
झाला रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग..
माझा झाला प्रेमभंग..

मनाशी बांधली खुणगाठ I तुझ्याशीच बांधावी लग्नाची गाठ...II
जेव्हा तू फिरवलीस पाठ I तोच माझा प्रेमभंग क्रमांक आठ...II

ते ओठ तेव्हा माझे नसतील…!

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल
आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन…
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन…
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा…
माझ्यासाठी अश्रू दाटतील….
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील…!

कोणीतरी असावे.....

कोणीतरी असावे जीवनात
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारं
आपल्या खांद्यावर डोके टेकवून सगळं जग हिंडणार

कोणीतरी असावं जीवनात
रडताना आपली आसवं स्वताच्या आसवात बदलणारं
जगाचा सामना करण्यासाठी हिम्मत देणारं

कोणीतरी असावं जीवनात
आपल्या तोंडात प्रेमाने घास भरवणार
एक ज्यूस एकाच स्ट्रोने शेअर करणारं

कोणीतरी असावं जीवनात
काही चुकलं तर जीव बाहेर येईपर्यंत रागावणारं
आपल्या चुका समजून घेवून त्या सुधारण्यासाठी संधी देणारं

कोणीतरी असावं जीवनात
बाईक वर मागची सीट भरून काढणारं
कोणी बघेल हि भीती असली तरी
बिंदास सगळं जग हिंडणार

बासुरीची धून

बासुरीची धून ऐकता बेधुंद राधा मोहरली.
घट डोईवरी घेवुनी ठुमकत ती थिरकली.

लटकेच मान वेळावुनी ठुमकत लचकत गेली.
पैंजणाची छुम छुम मना नादवत लहरली.

कान्हाच्या मिश्कील लीलांना लीलया पहा फसली.
आजर्वे करी रासलीला तरी नंदनाची प्रिया ही रुसलेली.

सप्तरंगांत भिजुनी मादक शहाऱ्यात ती शहारली.
अधोवदनी बावरी साजणी कान्हाच्या मनमानसी रुजली.

होळीची ज्वाला जणु त्याच्या रोम रोमात भडकली.
रंगुनी रंगात प्रणयदंग कृष्णाराधेची प्रीत बहरली गोजिरी.

तुझा सहवास जणू

तुझा सहवास जणू
चंद्राची शीतल छाया,
नशिबान मिळाली मला
तुझी अगणित माया,
...
नसतेस जवळ जेंव्हा
तुझेच भास मला,
श्वास उरी भारतात
तूच आहेस खास मला,

नको दूर जाऊ कधी
प्रीत ठेव माझ्यावरी,
सांझच्याला थांबशील का
आडवी माझ्या वाटेवरी,

कधी कधी भेटीगाठी
सहज करू नदीकाठी,
तूच माझी रातराणी
होशील का या राज साठी.

तिची ती नजर

तिची ती नजर 
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची

शब्द उमटत नसले तरी,डोळे बोलायचेच
डोळे बोलले तरी, ओठ रुसायचेच
बोलता बोलता कळून चुकलेली
तिची ती नजर 
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची !!१!!

पावसाच्या वाटेवर ती, डोळे लावून रस्त्याकडे पाहायची
मी दिसलो की खिडकीवरची सावली अलगद सरकायची,
तिची ती नजर 
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची!!२!!

तिच्या नजरेला भिडलेली, माझी ती नजर
तिची नजर घट्ट पकडून ठेवायची
ठेवलेली ती नजर तिच्याकडून, अलगद मिटायची आणि,
तिची ती नजर 
मला बर्‍याच दा होकार कळवुन जायची !!३!!

मी हसलो की तीची नजर मला रागाने रोखायची
गालावर पडलेली खलि मात्र, तिचा मोह तो सांगायची
तिची ती नजर 
मला बर्‍याचदा होकार कळवुन जायची !!४!!

सवय.


तुझी वाट पहाण्याची...
 तू येणार नसतानाही... 
सवय... आहे... 
तुझ्याशी गप्पा मारण्याची... 
तू ऐकत नसतानाही.... 
सवय... आहे...
 तुला पहात बसण्याची..
 तू समोर नसतानाही..
 सवय...आहे...
 रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट बघण्याची... 
तो येणार नसतानाही....
 सवय...आहे... 
मन मारून झोपण्याची.... 
झोप येणार नसतानाही... 
सवय...आहे... 
अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची... 
तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसतानाही..

तुझे माझे कधी पटतच नाही


तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसला तर मला करमत नाही,
दिव्याच्या वातीने जळतो तो पतंग,
तरी दिव्याजवळ घुटमळने तो सोडत नाही,

तसच तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसलास की मला करमत नाही 
एक दिवस जरी नाही भांडलो आपण तर तो दिवस
मला दिवस वाटत नाही

माझ्या रागातही तुझ्याबाद्दलाचे प्रेम असते हे
का तुला दिसत नाही,
सवय झाली आहे तुझी तुझ्याशिवाय मला आता ते जगण
जगणंच वाटत नाही..!!!

तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं..

तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..तासन तास पाहत रहावं..!!!!

तिने कित्ती गोड बोलावं..ऐकणाऱ्याने विरघळून जावं..

हरवूनच जावं ..सोबत तिच्या..!!!!
...
तिने कित्ती साधं रहावं ..त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..अदांवर तिच्या..!!!!

तिचं उदास होणं..कसं हृदयाला भिडावं..

कोणालाही वाईट वाटावं..अश्रूंनी तिच्या..!!!!

तिचं हसणं ..कोणालाही सुखवावं..

कोणीही घसरून पडावं..गालावरल्या खळीत तिच्या..!!!!

तिच्या नजरेने मलाच शोधावं..अचानक नजरेने नजरेला भिडावं ..

मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..लाजेने चूर चूर व्हावं..!!!!

ती समोर असताना ...मी सारं काही विसरावं..

तिने इश्य करत लाजावं..मी 'हाय हाय' करत घायाळ व्हावं ..!!!!

तिने फक्त माझंच रहावं..मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..

साथ देऊ जन्मोजन्मी ..विरहाचं दुख कधीही न यावं..

कधीही न अनुभवावं..!!!!

कधीही न अनुभवावं..!!!!

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,

आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,

दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............

दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,

आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,

सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,

उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी.........

आत्ताच डोळ्यात गळून गेली

आत्ताच डोळ्यात गळून गेली
जी आठवांना विसरून गेली.

होते अश्रू नीकट काळजाच्या
डोळ्यात सारे भिजवून गेली.

मी जागुन आयुष्य काढलेले
ही रात्र झोपेत गिळून गेली.

होतो मि तीथेच समोर तीच्या
ती मान मागे वळवून गेली.

हा दोष मी आज कुणास द्यावा
दोषी मला ती ठरवून गेली.

शब्दास आता रडु आवरेना
काव्यास माझ्या रडवून गेली.

झालो मि आता निवडूंग वेडा
तीही गुलाबात दगूंन गेली.

आयुष्य होते उरलो नभात

आयुष्य होते उरलो नभात
सा-याच राती सरलो नभात.

तो मीच तारा नभि तूटलेला
तूझ्याच साठी तुटलो नभात.

तो चंद्र तुला फ़सवून गेला.
असाच मीही फ़सलो नभात.

हो आज तीही विसरून गेली
पाहून वाटा बसलो नभात.

ती एक आशा मज चादण्यांची
मी चादण्यांशी हरलो नभात.

दिला कधी ना नियतीस दोष
मी नीवडूंग जगलो नभात.