जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं -


आम्ही म्हणालो, “आजकाल पँट होत आहे टाईट”
सारे म्हणाले, “अरे अरे बाबा, हे हार्टला फार वाईट”
यात नवीन काही नाही हो, लोकांच ज्ञान हे असंच उतू लागतं…
जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं!
कोणी म्हणे “बटाटे बंद आणि भात करा कमी”
“जॉग्गिंग करा रोज, पोटवाढबंदीची देतो मी हमी”
“सल्ला” ज्याला म्हणतात, असं बरंच काही लोकांना सुचू लागतं…
जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं!
कोणी म्हणतं, “रोज जिम ला जा, करा योगा”
ही म्हणते, “आधी दुर्लक्ष केलं ना… आता भोगा!”
यात नवीन काही नाही हो, बायकोचं डोकं हे असंच तापू लागतं…
जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं!
जीवनपद्धती साधी माझी, साधा सोप्पा व्यवहार…
रोज घरचंच खातो आणि नाही हो राक्षसी आहार!
हे आमचं सत्यवचनही सर्वांनाच केवळ एक “पळवाट” वाटू लागतं…
जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं!
- चंद्रजीत अशोक कांचन

स्पर्श

जिथे शब्द संपतात तिथे स्पर्श काम करते...
ही भाषा शिकावी लागत नाही...
अंतरमनाचे धागे जुळले ना की स्पर्शाची भाषा
आपोआपच येते...
भांडता भांडता तिला जवळ ओढून तिच्या
कपाळावर हळूच
विसावलेले त्याचे होठ... अन त्याक्षणी एका
अनामिक ओढीने त्याला बिलगून
तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी तिची
मिठी...
ह्या सगळ्या गोष्टींना पूर्णत्व द्यायची ताकद
शब्दांत नाही...
तिथे फक्त स्पर्शाचीच भाषा लागते...
शब्द या सर्व भावनांना फक्त जन्म देतात...
पण त्या खऱ्या अर्थाने "जगायला" ते स्पर्श
अनुभवावेचं लागतात.. ...!!

-अनामिक

फक्त तुझी साथ हवीय

कधी नकोय काही तुझ्याकडून 
फक्त तुझी साथ हवीय 


तुझ्या प्रत्येक पावलासाठी 
तुझं पाऊल बनायचयं 
तुझ्या प्रत्येक श्वासासाठी 
तुझा श्वास बनायचयं 

कधी नकोय काही तुझ्याकडून 
फक्त तुझी साथ हवीय 

तुझ्या गालावर खिळण्यासाठी 
तुझं हास्य बनायचयं 
तुझ्या प्रत्येक स्वप्नासाठी 
मला तुझच  बनायचयं 

कधी नकोय काही तुझ्याकडून 
फक्त तुझी साथ हवीय 


श्वासांपलीकडच्या गावातही 
तुझी सावली बनायचयं 
माझ्या आंधळ्या प्रेमाला 
फक्त तुझी साथ हवीय 

कधी नकोय काही तुझ्याकडून 
फक्त तुझी साथ हवीय 

-आशापुञ

मदिरेचे अभंग


वाटते जे जे प्यावे , ते ते दुसर्‍यासी द्यावे
धुन्द करूनी सोडावे , सकळजन
म्हणो नये आपली, फक्त उघडावी बाटली
लाज कोणा वाटली, वाटो द्यावी
व्हिस्की असो वा रम, काही नसावा नियम
दोन पेगांनंतर संभ्रम, नाहीसा होतो
कधी प्यावे एकचित्ति, कधी दुसर्‍याच्या साथी
गुंग परि मति, होवो नये
मारी चिवड्याचे खकाणे, तैसेचि काही चकणे
शेवटी पिऊन टिकणे, महत्त्वाचे
चालता चालता प्यावे, कधी ‘घेऊन’ चालावे
नशापाणी व्हावे, मनासारखे
ज्यांना कळे मूलमंत्र, त्यांनाची आकळे तंत्र
स्कॉच अथवा संत्रं, परिणाम देई
- अमेय

डोळ्यात माझ्या

डोळ्यात माझ्या
तुझाच चेहरा
.
मनात माझ्या
तुझेच विचार
.
हृदयात माझ्या
आहेस फक्त तुच
.
श्वास माझा
फक्त तूच
.
भावना माझ्या
तुझ्याच प्रेमासाठी
.
मरण माझे
माझ्यासाठी
.
पण माझे जगणे ...
फक्त तुझ्यासाठी..

-अनामिक

एक विनंती आहे .....

एक विनंती आहे .....
दुरच जायच असेल तर
जवळच येऊ नका,
busy आहे सांगुन टाळायच असेल
तर वेळच देऊ नका......
एक विनंती आहे .....
साथ सोडून जायचच असेल तर
हाथ पुढे करुच नका ,
मनातून नंतर उतरायचच असेल तर
मनात आधी भरूच नका.........
एक विनंती आहे .....
चौकशी भरे call काळजीवाहू sms यांचा
कंटाळाच येणार असेल तर misscall च देऊ
नका,
memory full झालिये सांगुन delet च
करायचा असेल तर नंबर save च करू
नका.......
एक विनंती आहे .....
मौनव्रत स्वीकारायच असेल तर
आधी गोड गोड बोलूच नका ,
सीक्रेट्स share करायचीचनसतील तर
मनाच दार उघडूच नका.....
एक विनंती आहे .....
माझ्या काळजी करण्याचा त्रासच होणार
असेल
तर मला आपल म्हणुच नका ,
अनोळखी होउनच वागायच असेल तर
माझ्या बद्दल सगळ जाणुच नका ....
एक विनंती आहे .....
अर्ध्यावर सोडून जायचचं असेल तर
आधी डाव मांडूच नका,
रागावून निघून जायचच असेल तर
आधी माझ्याशी भांडूच नका .....
एक विनंती आहे .....
सवयीच होइल म्हणुन तोडायच असेल तर
कृपया नातं जोडूच नका ,
फाडून फेकून द्यायच असेल तर
माझ्या मनाच पान उलगडूच नका ..

-अनामिक

काही प्रश्न प्रश्नच राहतात..

काही प्रश्न प्रश्नच राहतात,

त्यांची उत्तर कधीच सापडत नाही...

विचार करण्यात आयुष निघून जात,

पण विचार कधीच संपत नाही...

का घडल ते त्या वेळी,

ते कधीच कळत नाही...

अन देवाने घातलेल हे कोड,

का कधी सुटत नाही...

का कधी सुटत नाही...

-अनामिक

...तर आयुष्यांत आलीच का होतीस?

जायचंच होतं आयुष्यांतून निघून  तर आयुष्यांत आलीच का होतीस?

माझ्या वेड्या मनात एक 
वेगळीच आशा मग तू जागवूनच का
गेलीस?

स्वंप्न पाहिली होती जी
आपण एकत्र
चुराडा त्यांचा तू असा का
केलास?

जन्मभराची साथ माझी तू
अशी अर्ध्या वाटेवरच सोडून का
गेलीस?

सांग माझा असा काय गुन्हा
होता ज्याची
अशी भयंकर शिक्षा तू मला
देवून का  गेलीस?

-अनामिक

मैत्रि तुझी अशी असवी,

मैत्रि तुझी अशी असवी,

आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,

नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,

सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,

एकमेकांना समजुन घ्यावे,

मैत्रि आपण अशी जगवी,

एकमेकांचा आधार असावी,

सुख दुखात नेहमी सोबत असवी,

असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,

तुझी मझी मैत्रि अशी असावी

- अनामिक

तिला सहज विचारलं

तिला सहज विचारलं
माझ्यावाचून जगशील का..?

ती म्हणाली
माशाला विचार पाण्यावाचून
राहशील का...?

हसून पुन्हा तिला विचारलं
मला सोडून कधी जाशील का...?

ती म्हणाली कळीला
विचार देठा वाचून फुलशील
का..? ...

गंमत म्हणून
तिला विचारलं तू माझ्यावर खरच प्रेम
करतेस का...?

ती म्हणाली, पाणावलेल्या डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाच
सागराकडे धावते का??
-अनामिक

मैत्री म्हणजे काय असतं?

मैत्री म्हणजे काय असतं?
एकमेकांचा विश्वास असतो?
अतूट बंधन असत? की
हसता खेळता सहवास असतो?
मैत्री म्हणजे मैत्री असते,
व्याख्या नाही तिच्यासाठी;
अतूट बंधन नसत,
त्या असतात रेशीमगाठी

मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी;

मैत्री करावी सोन्यासारखी,
तावुन-सुलासुलाखून चमचमणा;
मैत्री करावी हिर्या सारखी,
पैलू पडताच लख-लखणारी;
मैत्री असावी पहाडासारखी,
गगनाला भिडणारी;
मैत्री असावी समुद्रासारखी,
तलाचा थान्ग नसणारी;

मैत्री म्हणजे समिधा असते,
जीवन यद्न्यात अर्पण झालेली;
स्वताच्या असन्याने सुद्धा
मन पवित्र करणारी;
मैत्री हे नाव दिलय
मनाच्या नात्यासाठी;
अतूट बंधन नसत त्या असतात ...

-अनामिक

आज मी आज मी तिला खूप miss करतोय


कुठे हरवली काय माहित
आज मी
स्वतः स्वताशीच बोलतोय
जायचं तर सांगून तरी जायचं होत
अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय
आज मी तिला खूप miss करतोय
आली कि नुसती बडबड
आज जणू शांतता पसरलीय
कुठे गेली रे ही…..
तिला खूप miss करतोय
येईल या आशेवर
आज मी इथेच बसून राहणार
तहान भूक मेलीय माझी
तिला कधी कळणार
आज कसं वेगळंच वाटतंय
रोजच्या गर्दीपासून अलग झाल्यासारखं वाटतंय
कुठे गेली रे ही…..
तिला खूप miss करतोय
लवकर ये ग
मी वाट पाहतोय…

कुठे हरवली काय माहित
आज मी
स्वतः स्वताशीच बोलतोय
जायचं तर सांगून तरी जायचं होत
अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय
आज मी तिला खूप miss करतोय
आली कि नुसती बडबड
आज जणू शांतता पसरलीय
कुठे गेली रे ही…..
तिला खूप miss करतोय
येईल या आशेवर
आज मी इथेच बसून राहणार
तहान भूक मेलीय माझी
तिला कधी कळणार
आज कसं वेगळंच वाटतंय
रोजच्या गर्दीपासून अलग झाल्यासारखं वाटतंय
कुठे गेली रे ही…..
तिला खूप miss करतोय
लवकर ये ग
मी वाट पाहतोय…
- अनामिक

एक वेडी मैत्रीण होती माझी..


एक वेडी मैत्रीण होती माझी ,
बोलायला लागली कि आपलंसं करून टाकणार ,
तिचं मन म्हणजे नितळ पाण्याचा झरा ,
स्वतःचा असा रंगच नाही त्याला ,

जो रंग मिसळला त्याच रंगात न्हाऊन निघणारं ,
नकळतपणे त्याच्याशीच एकरूप होणारं ,
तिला एक दिवस विचारलं,
यातले चांगले मित्र कोण कसं ग तुला ओळखता येतं,

तर म्हणे ,
हे रंग तर प्रवाहाबरोबर वाहून जातात ,
त्यांना माझ्यापासून वेगळं करता येतं ,
खरे मित्र तर ते आहेत, जे माझ्याच सारखे असतात ,
माझ्यात एवढं मिसळून जातात कि ,
त्यांना माझ्याहून वेगळं सांगता येणार नाही ,
जसा पाण्याच्या दोन थेंबामधला फरकच करता येत नाही ....

-अनामिक

ते पण एक वय असतं

ते पण एक वय असतं दिवसभर पाळण्यातझोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं
ते पण एक वय असतं हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं
ते पण एक वय असतं मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं
ते पण एक वय असतंघरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्हीपहायचं
ते पण एक वय असतं तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं
ते पण एक वय असतं आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत Carrier ची स्वप्नं पहायचं .......
- अनामिक
 

कॉलेजमधील जीवन

असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं
पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच college बोअर वाटतं

अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो
आणि अख्खी college life बदलवून जातो

मग पकाऊ लेक्चर असले तरी वर्गात बसावेसे वाटते
Result येत नसला तरी practical करावेसे वाटते

लायब्ररीमध्ये तासन् तास भुर्रकन उडून जातात
पुस्तकातली नाही तरी मनातली चार पाने वाचुन होतात

Extra lecture ठेवले तरी आपली त्याला ना नसते
आता तर रविवारी पण college मध्ये यायची तयारी असते

असे करता करता......
College ची वर्षे निघून जातात
जाता जाता डोळ्यामध्ये मात्र
विरहाची आसवे देऊन जातात 
अनामिक

उन्हं थोडी वाढली.....

उन्हं थोडी वाढली आणी सावल्या पांगतच गेल्या
या मोसमांनी मला वावटळी फार दिल्या

माझ्या अंगणाला सोडुन धारा चोहिकडे बरसल्या
धुंद त्या पावसात माझ्या वाटा वाहुन गेल्या

वसंतातही शिशीराने सावल्या दुर नेल्या
माथ्यावर उन्हातल्या काही छटा राहुन गेल्या

ऋतु बदलावा म्हणुन तिन्ही सांजा जागविल्या
कुठ्ल्याशा कातरवेळी दिशा अंधारुन आल्या

रात्रीही जेव्हा नभी चांद्ण्या जमा झाल्या
काळ्याकुट्ट अंधारात सगळ्या झाकोळल्या गेल्या

पहाटेच्या कळ्या कधी फुल ना झाल्या
माझ्या अंगणात सगळ्या कोमजुन गेल्या

उन्हं थोडी वाढ्ली आणी सावल्या पांगतच गेल्या
या मोसमांनी मला वावटळी फार दिल्या

♥ काल्पनिक प्रेम कहाणी .... "३० दिवस" ♥

मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात,
मुलगा :- मला वाटते आता आपण दोघेच
ह्या जगामध्ये राहिलो आहोत ... कारण
माझे सारे मित्र प्रेमात आहेत !!
मुलगी :- मलाही हेच वाटते कारण
माझ्याही सा-या  मैत्रिणी प्रेमात आहेत.
मुलगा :- आता काय करायचे ?
मुलगी :- आपण एक खेळ खेळूया !!
मुलगा :- खेळ ... कोणता खेळ ?
मुलगी :- ३० दिवसांसाठी आपण एकमेकांचे
गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड बनुयात !!

पहिले १ ते  ५ दिवस :- ते
सिनेमा पाहतात , भरपूर फिरतात !!

६ ते १५ दिवस :- सर्कस मध्ये असलेल्या भूत
हवेली मध्ये ते जातात, ती खूप घाबरते
आणि त्याचा हाथ पकडते पण नंतर लक्षात
येते कि तिने चुकून दुस-याचाच  हाथ
पकडला आहे ...... दोघेही हसतात.बाहेरच एक
ज्योतिषी बसलेला असतो ते आपले भविष्य
त्याला विचारतात, 
तो म्हणतो " तुम्ही लवकरात लवकर लग्न करून घ्या,
आणि आनंदात रहा ....
आणि तो ज्योतिषी रडायला लागतो ........"

१६ ते २८ दिवस :- ते दोघे एका टेकडीवर
बसले असता चांदणी पडताना त्याना दिसते .....ती मुलगी काहीतरी पुटपुटते .....
२९ वा दिवस :- पुन्हा ते दोघे त्याच
बागेत त्याच जागेवर येउन बसतात
मुलगा :- मी तुझा एपल जूस घेऊन येतो असे
म्हणून तो तेथून जातो !!२० मिनिट नंतर
एक अनोळखी माणूस तेथे येतो :-
तो मुलगा तुम्हा बॉयफ्रेंड आहे का ?
मुलगी :- हो ! का ? काय झाले ?
अनोळखी माणूस :- त्याला एका गाडीने
उडविले आहे व तो खूप गंभीर अवस्थेत आहे !!
हरणाच्या गतीने ती अतिशय दुखित होऊन
त्याला भेटण्यासाठी तेथून पळ काढते ......

२९ वा दिवस रात्री ११ वाजून ५७
मिनिटांनी :-डॉक्टर बाहेर येतात व
त्या मुलीच्या हाथात एपल जूस व पत्र
देतात !!
ती ते पत्र वाचते :- हे २९ दिवस जे
मी तुझ्या बरोबर घालविले ते
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस
होते .. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे,
आणि हा खेळ आपण आयुष्यभर
खेळावा हि माझी इच्छा होती !!
मुलगी आक्रोश करून रडू लागते :- नाही,
मी तुला मरून देणार नाही ......
चांदणी पडल्यावर मी तुलाच मागितले
होते, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते ........
आता मला कळाले
कि तो ज्योतिषी का रडला होता, पण
मी तुला मरून देणार नाही ..... प्लीज
मला सोडून नको जाउस प्लीज ...... 
I Love You, I Love You, I Love you very very much !!
........ तेवढ्यात रात्रीचे १२ वाजतात ......
मुलाचे हृदय पुन्हा श्वास
घ्यायला लागते ....... तो ३० वा दिवस
होता !!!

जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं -


आम्ही म्हणालो, “आजकाल पँट होत आहे टाईट”
सारे म्हणाले, “अरे अरे बाबा, हे हार्टला फार वाईट”
यात नवीन काही नाही हो, लोकांच ज्ञान हे असंच उतू लागतं…
जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं!
कोणी म्हणे “बटाटे बंद आणि भात करा कमी”

“जॉग्गिंग करा रोज, पोटवाढबंदीची देतो मी हमी”

“सल्ला” ज्याला म्हणतात, असं बरंच काही लोकांना सुचू लागतं…

जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं!
कोणी म्हणतं, “रोज जिम ला जा, करा योगा”

ही म्हणते, “आधी दुर्लक्ष केलं ना… आता भोगा!”

यात नवीन काही नाही हो, बायकोचं डोकं हे असंच तापू लागतं…

जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं!
जीवनपद्धती साधी माझी, साधा सोप्पा व्यवहार…

रोज घरचंच खातो आणि नाही हो राक्षसी आहार!

हे आमचं सत्यवचनही सर्वांनाच केवळ एक “पळवाट” वाटू लागतं…

जेव्हा कधी कोणाचं पोट जरा सुटू लागतं!
- चंद्रजीत अशोक कांचन

ती.....

माझी खुशी जिच्या  
खुशीत आहे.
तिच्या  खुशीचे कारण मी 
नाही.

जिच्या  एका miss call ने
माझ्या face वर smile
येते
तिच्या  smile चे कारण मी
नाही.

कधीतरी मी होतो 
तिच्यासाठी  त्याचे सर्व
काही.
आत्ता तर फक्त ती  आणि तो
आहे
मी तर तिला  आठवत पण
नाहि.

का सोडुन गेली ती  मला हे
पण तिने  कधी सांगितले
नाहि.

सावरले आहे मी आत्ता
स्वताला तरी माझे
स्वताचे असे काहि उरलेच
नाहि.

काळिज होते जीवंत पण
आत्ता जीवंत असुन पण
जीवंत नाही.

hurt तर इतके केले
जाताना कि आत्ता hurt
व्हायला heart च उरले
नाही.

जिच्यासाठी डोळे अजुन हि
रडतात तिला  अजुन माझी
care च नाही.

आज खुश आहे ती त्याच्या
बरोबर माझ्या दुखाची तर
तिला  जाणिव पण नाही .

इतकी बदलली ती कि माझे मन
अजुन हे  मानत नाही .

कारण????

फक्त एकच फक्त मी
केले प्रेम तिच्यावर तिने
माझ्यावर कधी प्रेम केलेच
नाही.
 

आई....

आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
आई म्हणजे साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड,
आई म्हणजे मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली,
आई म्हणजे दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ
शिकवणारी,
जे कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून,
चालायला शिकवणारी..
आईचं आपले,
अस्तित्व घडवणारी..

मैत्री म्हणजे ..

ध्यानी मनी नसताना.... आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते....
हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी....
आयुश्यभर आठवत रहाते....
मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं.....
मैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....

घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....
हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......
मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....
प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोष्ट !......

मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......
मैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी........
इन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....
हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....

मैत्रीचा शोध ......

मैत्रीचा शोध .........

जन्माला येतो तेव्हा, नात्याचे जाळे तयार असते ,
तरी प्रत्येक जण जीवनात, खऱ्या मैत्रीच्या शोधात असते ,

मैत्री" , शब्द उच्चारताच, आपलेपणाची जाणीव होते,
मनही मग दुख, पेलला हसत-हसत तयार होते,

गरज नसते पुराव्याची , जेथे मैत्रीचा विश्वास असतो ,
मैत्रीच्या या नात्याला, समजूतदारपणा हवा असतो,

इतर नात्यापेक्षा, हे नाते काहीतरी वेगळे असते,
या नात्यात एक गुप्त धन लपलेले असते ,

न बोलता मनातील वेदना एकमेकांना कळत असतात ,
न कळत डोळ्यात, त्या पाणी भरत असतात,

स्वावलंबन घडविणाऱ्या विचारांची , जाणीव मैत्री करून देते ,
चुकताना कटू शब्दांचा, ती अर्थ समजून जाते ,

दुखाच्या क्षणी, ती धीर बनत असते ,
तर सुखामध्ये, आनंद द्विगुणीत करत असते ,

भाग्यवान आहे मी , मला खऱ्या मैत्रीचा सहवास लाभला ,
आणि .......... मैत्रीचा शोध माझा इथेच संपला .

प्रिये रडशील ना ? ........

जेंव्हा आठवेल तुला तो दिवस ..
गुलाबाचे फुल देऊन मी केलेला प्रोपोस ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
तेंव्हा तरी प्रिये रडशील ना ? ..

जेंव्हा आठवतील तुला ती सोबत घालवलेली संध्याकाळ ..
समुद्राच्या किनार्यावर मिठीत घालवलेला तो काळ ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..


जेंव्हा आठवेल तुला सोबत घालवलेला प्रत्येक क्षण..
प्रेमात तुझ्या होणारे वेडे माझे मन ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
तेंव्हा तरी प्रिये रडशील ना ?

जेंव्हा कोणीच नसेल तुझी साथ देणारा..
मनापासून तुझ्यावर प्रेम करणारा ..
तेंव्हातरी आठवण काढशील ना ..
तेंव्हातरी प्रिये रडशील ना ? 

उगाचच

एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...

प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं

शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...

जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...

हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...

नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!

पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो ....

पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो ....
विचाराच्या कलमाने मी काही शब्द लिहीतो
कोणी त्याला कवीता तर कोणी काव्य समजतो ,
स्वतःच त्या शब्दांशी आपले नाते जमवतो
अन 'वाह उस्ताद' अशी दाद देऊन जातो ,
पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो........

डोळ्यांच्या अश्रू ऐवजी शब्द खाली उतरवतो
दुखला हसवण्याचा प्रयत्न तो तेवढा असतो,
जा माफ केले तूला म्हणून मनाला समजवतो
अन हसून शेवटी मी दुखाला मुर्ख बनवून जातो ,
पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो .......

ती रचना अन त्याच्या शब्दाने कोणी सुखावतो
वाचकही त्याला आपली चाल लाऊन जातो,
तो शब्दच मला लोकांचा जवळ नेतो
अन तेवढ्यातच 'विरह कविता' म्हणून कोणी हीणवतो,
पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो........

मी सच्चा आहे हे दाखवण्याचा प्रयास असतो
तुम्हाला सांगण्याचा व्यर्थ ध्यास तो ,
ज्याला कळावा त्याला त्याचा अर्थ कळत नसतो
अन तो तू ' एक कलाकार ' म्हणून चिडवतच असतो ,
पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो .........

जो तो मला कवी म्हणून मिरवत असतो,
पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो .........

पण मी तर फक्त आपले मन मांडत असतो .........


.…… मंदार बापट 

नको रडू इथे,इथे कोणी नाही

नको रडू इथे,इथे कोणी नाही
अश्रुना तुझा इथे मान नाही.......
पुरे तुझे दुखणे गाऱ्हाणे आतांही
ऐकाया इथे कोणा कान नाही.......

हसाया तुला मिळतील सोबती
लागेल रडाया तुला इथे तू एकटाच आहे......
कोवळे हृदय तुझे नाही ते दगडी
नाही दुसरे कारण एक ते हेच आहे.........

नको संपवू हि आसवे अशी ही
भासेल गरज त्याची पुढेही काही.....
दुखासोबत अन सुख येती दारी
सोबत तुझा असुदे आनंदाश्रूही काही.......

पुसून डोळे बघ असे सभोवती
स्वच्छ आकाश अन तशा दिशा दाही...
पसरवूनी त्याचे पुढे असे हात दोन्ही
समोर उभे सुख तुझी वाट पाही......

नको रडू इथे,इथे कोणी नाही
अश्रुना तुझा इथे मान नाही.......

- संग्रहित -

आपलीच मानसं आपल्याशी अशी का वागतात,

आपलीच मानसं आपल्याशी अशी का वागतात,
सारं काही कळणारच असतं, तरी का लपवतात.
त्यापेक्षा परकेपणा असलेला बरा............,
लपवलेल्याच दुख त्यांच्याकडना होतं नाही,... आपल्यानकडनाच होतं.
त्यांनी परक्यासारखंच वागायचं नेहमी वेळ आल्यावर,
आपणच आपलं जपायचं नातं.

रोज समोर भेटतात तेव्हा उगाच हसत राहतात,
काय माहित लपवतात किती काय मनात,
इतरानकडून एक दिवस उलगडतात गुपितं,
आणि मग वाटायला लागतं आपणच का जपायचं नातं.

आपल्याकडचा साधा अंकुरही साऱ्यांना कळतो,
पण त्यांना कसा काय त्यांचा बहरही लपवता येतो ?,
तेव्हा कळते केवळ तोडता येत नाही म्हणून जपातायेत ते नातं.

नात्यात सुद्धा त्यांना परतफेडीची आस असते,
पण याला खरंतर व्यवहार असं म्हणतात,
या व्यवहारामुळेच नाती कमकुवत बनतात,
आणि आपलेपण हि तसंच कमी होत जातं.
मग कठीण असतं टिकवणं नातं.

नात्यात खरंतर मोकळीक हवी मनाची,
पण आपल्याच माणसांकडना वाटते भीती तरी कशाची ?
याच भीतीपोटी बऱ्याच गोष्टी लपवल्या जातात,
"वेळ येईल तेव्हा कळेल सारं" हि पळवाट असते.....
खरंतर त्यांना सारं काही लपवायचं असतं,
समजून घ्यावं तेव्हा, त्यांना जड झालंय नातं.

समोरच्याच्या आनंदात आपलाही आनंद असतोच कि,
पण कधी कधी त्यांनाच आनंद वाटायचा नसतो,
दुख कधी त्यांच्या आनंदच होतं नाही,
दुख होतं खरं लपवल्याच.............आणि,
वाईट वाटतं आपल्याच माणसांच्या गोष्टी इतरांकडून कळल्याच,
.
.
.
असो आनंद आहे त्यांच्या आनंदात,
आणि त्यांनी जरी परकं केलं तरी जपणार मी नातं,
पण कळत नाही हेच कि माझं काही चुकलं नसतांना,
आपलीच मानसं अशी का वागतात

- संग्रहित -

एक मुलगी...

म्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥

ति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते,
कधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते..♥

हसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥

ति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी,
राग, द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..♥

सगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥

निळे डोळे, लाल ओठ, पाठीवर रुळती बटा,
गौर गुलाबी चर्येवर, उष:कालची छटा..♥

ति अशी, ति तशी, जणु ती सोनसळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥


म्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥

ति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते,
कधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते..♥

हसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥

ति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी,
राग, द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..♥

सगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥

निळे डोळे, लाल ओठ, पाठीवर रुळती बटा,
गौर गुलाबी चर्येवर, उष:कालची छटा..♥

ति अशी, ति तशी, जणु ती सोनसळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...♥
--अनामिक 

नाती

असतात काही नाती अशी
शब्दात कधी न सांगता येणारी...♥♥

असतात काही नाती अशी
कळून सुधा कधी न कळणारी...♥♥

असतात काही नाती अशी
फुल सुकल्यावर हि सुगंध सोडून जाणारी...♥♥

असतात काही नाती अशी
न विसरता आठवणीत राहणारी...♥♥

असतात काही नाती अशी
अमृता सारखा गोडवा जपणारी...♥♥

असतात काही नाती अशी
दुख विसरुनी प्रेम शिकवणारी...♥♥

दूर जाऊ नकोस



मला जगता येणार नाही,


उदास होऊ नकोस

मला हसता येणार नाही,


हृदय तोडु नकोस

मला जोडता येणार नाही,


आठणीँन मध्ये छलु नकोस

मला सावरता येणार नाही,


साथ कधी सोडु नकोस मला

तुला कधी सोडता येणार नाही,


रूसवा धरु नकोस

मला शब्द सापडणार नाही,


एकटं मला सोडु नकोस

आपल असं मला कोणी नाही,


गुंतलेल हृदय मोडू नकोस

मला परत गुंतता येणार नाही,


तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही...... 



असं मी म्हणतं नाही कारण....





तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणार नाही ...

आठवणी

आठवणी येतात,
आठवणी हसवतात,
आठवणी रडवतात,
काहीही न बोलता
आठवणी निघून जातात,
तरीही आयुष्यात
आठवणीच राहतात।
याना सांभाळून ठेव,,,
कारण जेव्हा कुणीहीनसतं,
तेव्हा आपल्या जवळ फक्त
या आठवणीच उरतात....
अन् असे म्हणतात ना की....
" गेले ते दिवस " "
राहील्या त्या फक्त आठवणी "



उगाचच...

एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...

प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं

शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...

जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...

हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...

नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!

प्रेम म्हणझे नेमके काय ?

मला माझ्या मित्राने विचारले कि प्रेम म्हणझे नेमके
काय ?

मी त्याला सागितले की,कितीही जवळ जाणार
असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर
फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम....

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला- मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स
आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम....

कितीही
मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न
सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे
प्रेम....

कितीही वाद झाले तरी दादा जेवलास
का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम...

पगार कितीही कमी असेल
तरी दिवाळी भाऊभीजला बहिणीच्या पसंतीचे
घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे
प्रेम....

आणि या सर्वांची काळजी घेवून
स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून
जेवणाचा डबा बनवणारी बायको म्हणजे प्रेम....

नजरेतल प्रेम

तुझ्या डोळ्यातलं टिपूर चांदण
माझ्या मनास वेड लावत

तुझं ते चोरून बघणं
माझं ऊर खाली वर करतं

तुझं ते लाजून हसणं
माझ्या काळजात घर करतं

तुझी ती नजर झुकवणं
माझ्या मनास खूप आवडतं

तुझं ते अबोल राहणं
माझ्या मनात प्रीत फुलवतं

तुझ्या नजरेन मला खुणावण
तुझा गुलाम करून टाकत

तुझ्या मनातही आहे प्रीत
माझ्या मनास कळून जातं

जेव्हा तुझ्या नजरेतल प्रेम
माझ्या नजरेला कळून जातं .

तुझ्या डोळ्यातलं टिपूर चांदण
माझ्या मनास वेड लावत

तुझं ते चोरून बघणं
माझं ऊर खाली वर करतं

तुझं ते लाजून हसणं
माझ्या काळजात घर करतं

तुझी ती नजर झुकवणं
माझ्या मनास खूप आवडतं

तुझं ते अबोल राहणं
माझ्या मनात प्रीत फुलवतं

तुझ्या नजरेन मला खुणावण
तुझा गुलाम करून टाकत

तुझ्या मनातही आहे प्रीत
माझ्या मनास कळून जातं

जेव्हा तुझ्या नजरेतल प्रेम
माझ्या नजरेला कळून जातं .

का होतं मन असं हळवं

का होतं मन असं हळवं
कोणाच्या तरी आठवणीने ?
एक एक क्षण का वाटे युगासमान,
तिच्या  दूर जाण्याने ?

भेटीनंतरही का .....
भेटण्याची आस असते ?
तिच्याच गोड स्वप्नांमध्ये
का रात्र सारी हरवते ?

तिने फक्त आपल्यालाच पहावं,
आपल्याशीच बोलावं..
असं काही वाटू लागतं
प्रत्येक छोटी गोष्ट ही
तिलाच  सांगावी म्हणून मन आतुरतं

कळलं का तुम्हाला, अचानक
असं वेड्यासारखं का होतं ?
दुसरं काही नाही .........
यालाच तर  " प्रेमात पडणं " म्हणत नसतील?
--अनामिक 

ओठ च नव्हते बोलत, नुसते डोळेही सांगत होते

सायकलच्या चाकात, ओढणी अडकून राहिली
तिच्या चेहर्यावरची काळजी, मीही पहिली

म्हणाली नाही ती, की मदत हवी म्हणून
मीच गेलो विचारायला, मदत हवी का म्हणून?

खूपच घट्ट अडकून बसली होती, ती त्या चाकात
माझ्याकडे पाहून, हसत होती गालात

ओठ च नव्हते बोलत, नुसते डोळेही सांगत होते
ओढनिचे शरीरही, माझ्या स्पर्शाने थरथरत होते

हळूवार हातांनी तिला, बाहेर त्यातून काढले
तिनेही हसत हसत, माझे आभार मानले

परत जेव्हा ती तिच्या, खांद्यावर ओढणी गेली
माझ्या स्पर्शाचा अनुभव, तीही तिला देत गेली

आई....

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे
आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील……..!!

असे वाटते

असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
आपण असतो आपले कोणी आपला म्हणू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये

कळीचे होते गुलाब ,गुलाब कोणी मागू नये 
ठेवा आठवणीच्या पाकळ्या,काटे कोणी टोचू नये
असे वाटते आजकाल ,कोणासाठी जगू नये

कल्पनेचा खेळ सारा,काव्य कोणी मागू नये
गोंदा मनी अक्षरे सारे,कागद कोणी फाडू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये

जन्म-मृत्यूचा हा खेळ,जन्म कोणी मागू नये
जिंकून घ्या विश्व सारे,जीवनरेषा कोणी खोडू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये

मी तिचा ती माझी,तीचासाठी कोणी जगू नये
वेगळे तिचे जग सारे,प्रेमामध्ये कोणी पडू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये

आपण असतो आपले, कोणी आपला म्हणू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये

सवय..

सवय...आहे...
तुझी वाट पहाण्याची...
तू येणार नसतानाही...

सवय... आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची...
तू ऐकत नसतानाही....

सवय... आहे...
तुला पहात बसण्याची..
तू समोर नसतानाही..

सवय...आहे...
रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट
बघण्याची...
तो येणार नसतानाही....

सवय...आहे...
मन मारून झोपण्याची....
झोप येणार नसतानाही...

सवय...आहे...
अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची...
तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसतानाही..

कुणी असावं....

हातात हात धरून निशब्द चौपाटीवर फिरणारं
मधेच क्षणभर थांबून प्रेमाने मिठीत घेणारं
कधीतरी वाटत आपलंही कुणी असावं

न चुकता भेटावया नेमाने रोज येणारं
जाताना डोळ्यात मोती अश्रुचे आणणारं
कधीतरी वाटत आपलंही कुणी असावं

माझ्या हि आठवणीत कुणीतरी रात्रभर जागणारं
तिच्या चंदेरी स्वप्नांच्या दुनियेतून मलाही बाहेर न पडू देणारं
कधीतरी वाटत आपलंही कुणी असावं

स्वःताचे सुखं विसरून आपल्या दुखात साथ देणारं
माझ्या खचलेल्या मनाला पुन्हा नव्याने जगण्याला आधार देणारं
कधीतरी वाटत आपलंही कुणी असावं

माझ्या खांद्यावर डोके ठेवून तिला रडावस वाटावं
लहान मोठ्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव
कधीतरी वाटत आपलंही कुणी असावं

कुणीतरी माझ्याही प्रेमात आकंठ बुडाव
येवूनिया माझ्या कुशीत सार जग विसरावं
कधीतरी वाटत आपलंही कुणी असावं

कुणीतरी माझ्यासाठी तासनतास वाट बघावं
येताना मला पाहून उगाच फुगवून बसावं
कधीतरी वाटत आपलंही कुणी असावं

रात्रभर फोनवर्ती रोम्यांटिक गप्पा मारणारं
माझा ब्यालेन्स संपला म्हणून तू फोन कर सांगणारं
कधीतरी वाटत आपलंही कुणी असावं