मी उन्हात सुद्धा

मी उन्हात सुद्धा जात 

राहिलो तुझ्याच मागे

पायाचे तळवे पोळले कधी, 

कळले नाही

ऋतू आले गेले, वाट 

पाहीली तरी तुझा  मी
...

ते वेडे वय अन् सरले कधी, 

कळले नाही

मी बेरीज करता सारे काही 

वजाच झाले

अन् शून्य फक्त हे उरले 

कधी, कळले नाही.........!!!!

- संग्रहित -

अशी कोणी असेल का?

अशी कोणी असेल का?
आयुष्याच्या नवीन वळणावर,
माझा हाथ विश्वासाने पकडणारी ,
अशी कोणी असेल का?
जीवनाच्या काटेरी रस्त्यावर,
प्रेमाचे फुल पडणारी
अशी कोणी असेल का?
पावसात भिजताना ,
पावसातून माझे अश्रू ओळखणारी
अशी कोणी असेल का?
माझ्या डोळ्यात पाहून ,
माझे अन्तः करण ओळखणारी
अशी कोणी असेल का?
माझ्यातली मी शोधून देणारी ,
आणि माझ विश्व होणारी ,
अशी कोणी असेल का ?
कळत नकळत झालेली माझी चूक,
हक्काने सांगून ती सुध्रावणारी
अशी कोणी असेल का ?


-अनामिक 

कविता अशीच असते

अडगळीच्या खोलीमधलं

-अनामिक 


असं का होत?

असं का होत?
कुणीतरी खुप आवडायला लागत...
अनं ते आवडण, एकाकी मनाला वेड लाऊ लागत...

असं का होत?
कुणाचीतरी खुप आठवण यायला लागते...
अनं ती आठवणच, आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापु लागते...

असं का होत?
कुणीतरी ह्र्दयाच्या खुप जवळ येत...
अनं ते जवळ येण, आपल्यालाच आपल्यापासुन खुप दुर घेऊन जात...

असं का होत?
कुणीतरी आधारासाठी हात देऊ लागतो...
अनं तो आधाराचा हातच जगण्याचा आधार होऊन जातो...

असं का होत?
कुणीतरी क्षणभर आनंद देऊन जातो...
अनं तो आनंदच सगळ्या दु:खांच मुळ होऊन जातो...

असं का होत?
कुणासाठीतरी जगावसवाटत...
अनं जगावस वाटतानाच, मरणाला कवटाळाव लागतं...!!!♥♥♥
 
-अनामिक 


एक मैत्रिण आहे माझी..




माझ्या सोबत हसणारी,


मी रडल्यावर मात्र माझे डोळे

पुसणारी..


एक मैत्रिण आहे माझी..


नेहमी सलवार-कमीज़ घालणारी,


साधेपणातचं सौंदर्य आहे हे सिद्ध

करणारी..


एक मैत्रिण आहे माझी...


हिशोबीपणे वागणारी,


तिच्या या सवयीमुळे माझे पैसे

वाचवणारी..


एक मैत्रिण आहे माझी..


कठोरतेने वागणारी,

जरा ओरडलो की मात्र मुसू मुसू

रडणारी..


एक मैत्रिण आहे माझी..


माझ्यावर सारखी चिडणारी,


न कळत मात्र माझं आयुष्य

फुलवणारी..


एक मैत्रिण आहे माझी..


सर्वाना हवीहवीशी वाटणारी,


माझ्याशिवाय मात्र

स्वःताला अपूर्ण मानणारी..

- अनामिक
♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥ ♥

अतूट नातं मैत्रीचं..!.

जसं अतूट नातं असतं
पाऊस आणि छत्रीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!
......
...अंगरख्याच्या आत असतं
मुलायम अस्तर जरीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं हळुवार बंधन असतं
श्रावणाशी सरीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!

जसं नातं लाटांचं
किना-याशी खात्रीचं ,
तसंच काहीसं असावं
तुझ्या माझ्या मैत्रीचं..!
 
-  अनामिक 

मनालाच फसवण्याचा ...

किती छान असतो न हा खेळ मनाचा,
स्वप्नांचा आधार घेऊन हवेत भरारी मारण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजा आहे म्हणत स्वप्नात हरवण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तुझ्या माझ्या अबोल प्रीतीचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
मी करत आलेल्या एकतर्फी प्रेमाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू जवळ नसलास कि तुला अनुभवायचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
सत्यात न उतरणाऱ्या स्वप्नाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजाच म्हणून मनाला समजावयाचा
खरच खूप छान असतो रे हा खेळ मनाचा,
सत्य माहित असूनही मनालाच फसवण्याचा.. मनालाच फसवण्याचा ........

तुझी वाट पाहताना

तुझी वाट पाहताना दिवस
संपतात...
पण वाट पाहणं संपत नाही...

आयुष्यावरील तुझी छाप पुसून
टाकणं...

मला अजूनही जमत नाही....
का तुझा सहवास दरवळत राहतो
आजही...???

का खोलवर
झालेल्या जखमा बुझता बुझाता..,

पुन्हा वाहायला लागतात... ?
का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत राहते... ?
का तुझी आठवण
नको असताना येतच. . . 

मन...


...तुझेच होऊ पहातेय ....

मनाचे काय मन चंचल
हळूवार नाजुक
हा देह सोडू पाहतेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मनात भावनांचा कल्लोळ
विचारांचे काहूर शब्दांची घालमेल
अन नात्यांचा पाऊस
ह्या सर्व त्रासातून सुटू पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मन मंदिरातील घंटा घुमटाचा कळस
कधी पवित्र तीर्थ तर परसातील तुळस
सदैव तुझीच भक्ती करू पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मन नदीसारखे अवखळ तर नभासारखे विशाल
सागरासारखे खोल तर धरणी सारखे निश्चल
त्याचा स्वभाव सोडू पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मन सूर्यासारखे प्रखर कधी चंद्रासारखे शीतल
नाक्षत्रांसारखे अचल तारकांसारखे दूर
तुझ्या अन तुझ्याच जवळ येऊ पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मन मनासारखेच गूढ देहासाराखेच नश्वर
मन अत्म्यासारखे तेजपुंज ह्या विश्वाचे अंतरंग
मन अमर होऊ पहातोय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मन हिमाचा खंड
मन पाण्यावरचा तरंग
मन वादळी वरा
मन पावसाची धारा
मन तुझ्यावरच बरसू पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मन हृदयाचा आरसा,
मनाचा वारसा
मन अभेद्य अचल
हिमालयासारखे विशाल
मन तुझ्यासाठी खुप लहान होऊ पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

मनं छिन्दन्ति शस्त्राणि
मनं दहति पावकः
न मनं क्लेदयन्त्यापो
न शोषयति मारुतः
तरीही तुझ्यात विलीन होऊ पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...

पण माझे मन म्हणजे मी नाही
मी अन मन वेगळे आहोत
मन एक जाणीव तर मी एक मुक्त आत्मा
हे तुला परत परत ते दाखऊ पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय...
मन तुझेच होऊ पाहतेय...

 

-अनामिक 

मी नाही म्हणत....

मी नाही म्हणत....
तू फक्त माझ असाव... पण माझ्या जीवनात मात्र तुझ्या खेरीज कुणी नसाव...
मी नाही म्हणत....
तू मलाच आठवावं.. पण तू मात्र दैव माझ्या स्मरणात रहाव..
मी नाही म्हणत....
तू मला मनात ठेवाव... पण माझ्या मनी मात्र तूच वसाव...
मी नाही म्हणत....
तू माझ्या साठी रडावं.... पण माझी पापणी मात्र तुझ्याच साठी भिजाव....
मी नाही म्हणत....
 तू मला प्रेम कराव... पण कधी री तुलाही माझ्याच सारखा प्रेम व्हाव...
मी नाही म्हणत....
तू कधी हसू नये.... पण माझ्या ाठी हसण्याचे कारण मात्र तूच असाव...
मी नाही म्हणत....
तू मला भेटाव.. पण माझ्या साठी ती भेट मला सुखी करून जाव...
मी नाही म्हणत....
कधी तू माझ्या साठी कविता रचावी... पण माझी लेखणी तुझ्याच आठवणीत वळावी....
मी नाही म्हणत....
कधी तुला मीच दिसव.... पण मलाडोळे बंद होताच स्मरणात तुझाच ित्र रेखाताव...
मी नाही म्हणत....
कधी तुझी भावना तुझ्या पासन दूर जावी.. पण दुख होईल मलाजर माझी भावना तुला  कळली....
मी नाही म्हणत....
तुझ जगन माझ्यासाठी बदलाव... पण माझ स्वप्न जगन माझ हे तुझ्या कुशीत पूर्ण व्हाव...
 मी नाही म्हणत....
माझ्या भावनान सोबत खेळू नको... पण माझ तुझ्यावर खरच प्रेम आहे हे तू विसरू नकोस...
मी एवढच म्हणते....
माझ्या प्रेमाची जाणीव व्हावी.... अन पुढच्या जन्मी तरी तु माझा अन मी तुझी बनून यावी...
मी एवढच म्हणते....
माझी शेवटची इच्छा तू पूर्ण करावी... या जन्मी नाही तर पुढल्या जन्मी आपली भेट व्हावी.....

फुले शिकवतात

गुलाब सांगतो, येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते, अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;
सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं, हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं, गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो, सदगुनांचा सुगंध मैलवरुन हीयेतो;
कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडवुन फुलायचं असतं........
 
- अनामिक 

काहीजण मैत्री कशी करतात?

काहीजण मैत्री कशी करतात?

उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
...कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात गोष्टी

माझा देव मुळात देवच नाही


…कारण…
माझा देव कुणाला पावतच नाही
माझा देव कुणाला श्राप सुद्धा देत नाही 
म्हणून माझा देव मुळात देवच नाही....

माझा देव कुणावर करणी करून फेडत सुद्धा नाही
माझा देव कुणाला श्रद्धेपोटी घाबरवत सुद्धा नाही
म्हणून माझा देव मुळात देवच नाही....

माझा देव कुणाच्या अंगात सुद्धा येत नाही
माझा देव कुणाची बळी सुद्धा मागत नाही
म्हणून माझा देव मुळात देवच नाही.....

पण मित्रानो ......

माझा देव माझा मित्र आहे
…कारण...
माझा देव निसर्गाशी एकरूप आहे
माझा देव विज्ञानाशी समरूप आहे
म्हणून माझा देव माझा मित्र आहे....

माझा देव आदर्शवादी-बुद्धिवादी आहे
माझा देव प्रगतीची मशाल आहे
म्हणून माझा देव माझा मित्र आहे....

माझा देव लोकशाहीचा प्रतिक आहे
माझा देव समतावादी-बंधुत्ववादी आहे
माझा देव मंगल मैत्री आहे
म्हणून माझा देव माझा मित्र आहे....

पण खर सांगतो मित्रानो...........
माझा देव मुळात देवच नाही..........


-माझी कविता -
प्रविण प्रमिला-मधुकर बल्लाळ
(१३ सप्टेंबर. २०१२)

ती वेळ

निसटून गेली ती वेळ
जी कधी तुझा मिठीत गेली होती,
हसते आता रात्र मला
जी कधी तुझा सहवासाने धुंद झालीहोती,
का छळतो हा उनाड वारा
...दिसत नाही का त्याला मी जळताना..
जो चंद्र होता आपल्या प्रेमाचा साक्षी,
तो ही दिसे आज हळहळताना..
कदाचित तू दिलेल्याप्रेमाचा शपथा
त्याने ही चोरून पहिल्या असतील,
वाळूत उमटलेल्या आपल्या पाऊल खुणा
अजूनही तशाच राहिल्या असतील..
तुझा तोंडावर वाऱ्याने उडणारे केस
कोण आता सरळ करत असेल..
कोण फिरवेल तुझा गालावरून हात,
अन कोण तुझा साठी झुरत असेल..
हरवली ती संध्याकाळ
अन हरवले ते सुंदर नाते..
परके झाले ते सारे क्षण..
जे कधी फक्त माझे होते 


-अनामिक 

काही माणसे

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.
काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.
काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.
मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात

-- अनामिक 

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही
कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
... माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही
तुझा आभासच अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा
मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते
तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल माझे तुलाही, अन होशील माझी कधी तरी ♥♥♥

-अनामिक 

मुली.......

प्रत्येक मुलीच्या मनात
एक सुंदर स्वप्न असत

चांगला जोडीदार मिळावा
अस मागण असत

विचारून तर बघा तिला
तुझ मन काय म्हणत?

ओठांवरच्या शब्दांनीच सारी
अपेक्षा व्यक्त करत मुलीच मन ते
सैरावैरा धावत असत

कधी खेड तर कधी शहर
गाठत असत
कुणाला सुंदर ,कुणाला शिक्षित
कुणाला गोरी, कुणाला उंच
प्रत्येकाच मुलीविषयीच
वेगळच मागण असत

तडजोडीची वेळ आली ,
की मुलिलाच पुढे सरकाव लागत
नविन कुटुंबात प्रवेश करतांना
नात्यांच भान ठेवाव लागत

समाज वेगवेगळ्या
प्रथा काढतच असत
ते पूर्ण करता करता
मात्र बापाच्या जिवाच रान होत

२२ वर्ष जपलेल धन हे
शेवटी परकयाला द्याव लागत
जिवापाड जपलेल्या तुकड्याला
स्वत:पासून तोडाव लागत

येणारे लोक येउन जातात
खाणारे पिणारे मजा करून जातात
उरतात ते मुलीचे आई-बाप
जी दुसर्यांची ओझी वाहत असतात

कधी वाटत मुलगी होण पाप का?
आई-बापाला ही सजा का?
या रुढी परंपरा आशा कश्या?
मुलींच्या घरच्यांनीच पाळायच्या कश्या



मलाही तुला मिठीत घ्यायचे होते

मलाही तुला मिठीत घ्यायचे होते
तुझा बाहुत डोके टेकवून झोपायचे होते
पण मला कधी जमलेच नाही

ओठ तुझे ओठात घेवून अमृत मलाही पियायचे होते
तुझा प्रेमाच्या सागरात खोलवर जायायचे होते
पण मला कधी जमलेच नाही

तुझा त्या दु:खात मलाही विरघळायचे होते
गालावरून ओघळणा-या अश्रूंना ओठांनी टिपायचे होते
पण मला कधी जमलेच नाही

पावसात तुझासोबत मलाही भिजायचे होते
हात तुझा हातात घेवून दूरवर चालायचे होते
पण मला कधी जमलेच नाही

पण मला कधी जमलेच नाही, रिती पलीकडे वागायला......
पारंपारिक रिवाज मोडून मनासारखे जगायला
 
-अनामिक 

कुणावर तरी मनापासुन प्रेम करुन बघितलं

कुणावर तरी मनापासुन प्रेम करुन बघितलं,

कुणावर तरी माझ्या आयुष्यात स्थान देऊन बघितलं..

कुणावर तरी माझं संपुर्ण जीवन समजून बघितलं,

कुणाला तरी मला आपलं म्हणताना परखं करताना बघितलं..

कुणालातरी माझ्याशिवाय जगताना बघितलं,

कुणालातरी प्रेमात टाईमपास करताना बघितलं..

कुणालातरी मला खोटी खोटी वचने देताना बघितलं,

कुणालातरी माझं आयुष्य बरबाद करताना बघितलं..

कुणालातरी माझ्या बरबादीवर मनसोक्त हसताना बघितलं,

कुणालातरी दुस-याच्या आयुष्याशी खेळताना बघितलं..

कुणालातरी माझा होता होता दुस-याचा होताना बघितलं,

आणि मी शेवटी...!

जिवंतपणी  मरण काय असते हे अनुभवतानी बघितलं..
-अनामिक 

प्रेमाचा अर्थ ..........

सकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे..♥
मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो
ते प्रेम आहे..♥


भांडून सुधा ज्याचा राग येत नाही
ते प्रेम आहे..♥

ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे..♥

ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते
ते प्रेम आहे..♥

स्वताला कितीही त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतो
ते प्रेम आहे..♥

ज्याला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही
ते प्रेम आहे..♥

कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत ज्याचा फोटो असावा असे आपल्याला वाटते
ते प्रेम आहे..♥

ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते

ते प्रेम आहे.. ....!!
 
-अनामिक 

आवडलं कुणी तर

आवडलं कुणी तर
वेड होऊन जावं
झपाटल्यासारखं
प्रेम करावं
बेधुंद होऊन
तिच्यावर मरावं
फुलासारखं
तिला जपावं
तीच सार दुखः
ओंजळीत घ्यावं
तिची ढाल बनून
आयुष्य जगावं
फक्त प्रेमासाठीच
जगण होऊन जावं
आपल्या प्रीत गंधाने
तिला फुलवावं
तिला वेड लागेल
इतकं प्रेम करावं
प्रेमानेच तिचही
मन जिंकाव
 
-अनामिक 

मैत्री !!!!

कधी ओळख अलगदपणे
मैत्रीमध्ये बदलते,
गप्पा रंगतात,
वादही होतात, नवे नाते
उमलते....
गाण्याची एखादी मैफल
जशी उत्तरोत्तर रंगत
जाते,
तशीच
ही मैत्री आयुष्याला संगीतमय
करत राहते....
...अशा मैत्रीला नियमांचे
अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले
नाही तरी मनं मात्र
नक्कीदिसतात....
मैत्री अशीच आहे कायम
मनात जपण्यासारखी,
चिरकाळ आनंद
देणाऱ्या गोड सुरेल
गाण्यासारखी!!!!

तुझा चेहरा......

सतत तुझा चेहरा दिसत 
राहतो 
सतत तुझी आठवण येत 
राहते..
कधी दिवस भराच्या
घायीत तुझा चेहरा मनाला
शांत करतो..

कधी एकांतात तुझा चेहरा
मनाचा एकांत हरवून
टाकतो..

तुझाच चेहरा तुझीच
आठवण कधी हे मला
लिहायला लावतो..

तू आणि तुझ्या साऱ्या गोष्टी
हल्ली माझ्या जगण्याच्या
हालचाली ठरवतात..

तुझे ते हास्य तुझे ते शब्द
नेहमी कानावर पडत
राहतात..

माझ्या जगण्यावरील तुझे हे
नियंत्रण कदाचित तुला हि
माहित नसेल..

जे ह्या जगात सगळ्यांनी
केलं ते प्रेम हि असंच
असेल?

 

-अनामिक 

मी रमलेलो.......

माझ्यातच धुंद मी रमलेलो
विचारांचा गर्दीत एकटाच
जमलेलो ,
मोहक हास्यात गुरफटलो मी
बाहेर निघायचा राहून गेलो ,
तुझा गोडीतच विरघळत गेलो 

अन तुझाच मध्ये वाहत गेलो...... 


काळेभोर तूझे ते मादक डोळे

इशाऱ्यात ते सारेच बोले,

जवळ येता ते गप्प अबोल

जणू मदिराच ते पाजत गेले,

तुझा डोळ्यातच हरवत गेलो

अन तुझाच मध्ये वाहत गेलो........ 


केस मखमली काळे लांब

मज अडवे म्हणे थोडे थांब,

स्पर्शली तुझी गालाला लट ती

मज अवघड झाले थांबणे लांब ,

तुझा केसातच अडकत गेलो

अन तुझाच मध्ये वाहत गेलो........ 


ओठ तुझे ते मधाचा प्याला

मुंगी सवे जीव झाला,

सुंदर गुलाबी गोड लाली ती

चाखण्याचा मोह न आवरे मला,

तुझा ओठातच मी रमत गेलो

अन तुझाच मध्ये वाहत गेलो.....


तुझी अशी हि मृगाप्रमाणे कांत

आता कसलीहि नाही भ्रांत,

तुझे अप्रतिम लावण्य असे

मी नाही माझात असा निवांत,

तुझा कांतीतच मी सारे विस्मरत

गेलो अन तुझाच मध्ये वाहत गेलो......... 


तुलाच आपली मानत गेलो

अन तुझाच मध्ये वाहत गेलो..... ♥
 
-अनामिक 

शब्दांपलीकडे हि काही भावना असतात,

शब्दांपलीकडे हि काही भावना असतात,
सगळ्याच काही बोलायच्या नसतात...

मनात खोल कुठे तरी लपवायच्या असतात,
काही पुड्या एकांतातच खोलायच्या असतात...

चंद्राकडे ही कधी तरी एकटक पहायचं असतं,
मोकळ्या आभाळाखाली कधीतरी एकटचं रहायचं असतं..

कधी कधी आपलं कुणीच नसतं,
तेव्हा स्वतःकडेच स्वत: रडायचं असतं....

कधी कधी डोळ्यांतूनच हलकं व्हायचं असतं
गुदमरण्या पेक्षा रडणं नेहमीच बरं असतं...

- अनामिक

प्रेमात पडल्यावर



प्रेमात पडल्यावर 
सारेच वेडे होतात 
नभातल चांदण
तिच्या डोळ्यांत पाहतात 
ती भेटता तिचा गंध 
श्वासात भरून घेतात 
रात्री पापण्या मिटून 
तिला पाहत रहातात
ती प्रत्यक्ष भेटल्यावर 
अबोल होऊन जातात 
बोलायचं ते राहून गेलं 
म्हणून रात्र रात्र जागतात
तिला नजरेत साठवण्यासाठी 
किती किती तडफडतात 
तिच्या एका कटाक्षासाठी 
किती किती झुरतात 
तिच्या नुसत्या दिसण्यान 
बेहोष होऊन जातात 
तिच्या नुसत्या हसण्यान 
नभात उडून जातात 
खिशात पैसे नसले तरी 
तिला बर्थडे गिफ्ट देतात 
ती म्हणेल तसं 
तिच्या तालावर नाचतात 
ती रुसून बसल्यावर 
देवदास होऊन जातात 
तिला कसं मनवायचं
याचं टेन्शन घेतात 
फक्त तीच असते मनात 
स्वतःलाही विसरून जातात 
प्रेमात पडल्यावर 
सारेच वेडे होतात .

- संजय एम निकुंभ , वसई