तिच्या' लग्नाचं 'इनविटेशन"




तिच्या' लग्नाचं 'इनविटेशन"
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला,
नाव ख़राब होइल, म्हणुन पुसनारा हात अडला...,
दोन-चार थेम्बं तिच्या बापाच्या नावावरही पडली होती,
ज्याच्याकड े पदर पसरवून ,'ती' माझ्यासाठी रडली होती,
एक थेम्ब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती,
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भीती वाटली होती.,
'आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं'..,
यावरही एक थेम्ब पडला,
'ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..
तो भाबडा बोल आठवला...,
काही घसरलेली आसवं, लग्नस्थळ दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची भेटायचीजागा होती,
'अहेर आनु नये' यावरही थोडा ओलावाहोता,
तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता...... .,
सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.,
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली..... ..,
आज घरी दिसली..... .......!

"अनुरागी " झालयं जिणं..................

काहीतरी बोलावं म्हणुन म्हटलं त्याने
वारा फार छान सुटलायं.......
तिच्याही लक्षात आलं इतकं बोलताना
त्याला किती घाम फुटलायं.......
सागायचं होतं जे त्याला कधीपासु
तिलाही तेचं ऐकायचं होतं......
आधी कोण मौन तोडतो ते खरंतर
दोघांनाही बघायचं होतं.......
त्याला होकाराच्या खुषी पेक्षा ही
नकाराचं होतं भयं........
तिच्या नंतर ही जपुन ठेवली असती
त्याने काळजात सयं.....
भीत भीतचं त्याने विचारलं सांग
होशील का माझी.........
आयुष्यभरासाठी हवीयं ग राणी
मला साथ तुझी.........
ती काहीचं न बोलता नेहमी सारखी
गोड खळ्यांनी हसली........
नकार तर नाहीय तिचा निदान
एवढी तरी खात्री पटली.........
पण होकार ही स्पष्ट त्याला अजुन
नव्हता दिला तिनं............
एकचं सुख पहील्यापेक्षा आता थोडं "अनुरागी " झालयं जिणं..................

बर्फाचे हिरे


काल पावसाबरोबर देवाने
बर्फाचे लहान खडे वाटले
जणू धरतीपर्यंत पोचण्या आधी
आभाळाचे रडे गोठले
मी पण उगीच उडास मी
पावसातही माझे दु:ख मांडले
खरंतर ढगांच्या ओंजळीतून
देवाचे अनमोल हिरे सांडले
माझ्यावर आपटत ते
बर्फाचे हिरे पडत होतो
मी हातात घेतलं की
विर्घळून गायब होत होते
देणारा देतोय आभाळातून
घेणाऱ्याला घेता येत नाही
नीट घेता न येणाऱ्याला
काही पण देता येत नाही
पावसात भिजता भिजता
माझं दु:ख विर्घळून गेलं
देवाच्या हिऱ्यांचं मला
महत्त्व कळून गेलं
हिरे पडतात सगळीकडे
ते मला बघता आले पाहिजेत
स्वत:ला घेता आले नाहीत तरी
दुसऱ्यांना देता आले पाहिजेत

होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?

होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?
वाटतं नशीब करतंय आपलंच हसं..
नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस,
सर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉस

नुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातं उतू
क्रिकेटात तुमची ट्यूब फोडतो लेल्यांचा नातू

लवकर गेलात स्टॉपवर की बस येते लेट
एरवी वेळेवर धावलात तरी चुकते तिची भेट

विकेंडला जोडून कामवाली मारते दांड्या
आणि नेमका जेवायला येतो सहकुटुंब बंड्या

रस्त्यावरचा मोठा खड्डा तुमच्याच वाट्याला
पंक्चरायला तुमचंच चाक पडलेल्या काट्याला

निवांत येऊन टीव्हीसमोर बसता तेव्हाच वीज जाते
देवळात चप्पल नेमकी तुमचीच चोरीला जाते

'व्हाय मी' हा प्रश्न देवाला विचारून तुम्ही थकता..
रुद्राक्ष आणि ग्रहाच्या अंगठ्या वापरता न चुकता

मग 'लकी शर्ट' आणि लकी दिवस हेरून कामं करता
'आजचे भविष्य' पाच पेपरातून जमा करून वाचता..

'सालं नशीबच कंडम' म्हणून पुन्हा पुन्हा रडता
साध्या साध्या कामात शंकाकुशंकाना ओढता

पण गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही 'पार्शालिटी'
देण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची 'इक्वॅलिटी'

आपल्या आयुष्याची स्टोरी आपण जगत जायची

म्हणूनच मुली मला आवडत नाहीत...........

मैत्रीसाठी जीव देतात
कटू घटना सोडून देतात
मुलांपासून हे शिकत नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत...........
हेवा, असूया ओसंडून वाहे
एकमेकींना पाण्यात पाहतात
जय वीरू सम उदाहरणे नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत............
बाहेरचे तर सोडून द्या हो
घरामधे ही या असेच करतात
उखाळ्या पाखाळ्या थांबवत नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत..........
मुलं बोलली कि या भाव खातातनाही बोलली कि नावे ठेवतात विक्षिप्तपणा काही सोडत नाहीत म्हणूनच मुली मला आवडत नाहीत........
मनात एक आणि ओठावर एक
टोमण्यातून बोलणे असते
म्हणणे यांचे सरळ सांगत नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत........
कशास उगारता बोटं कुणावर
केलय का आत्मपरीक्षण सत्वर
एकमेकींना आधार देत नाहीत
म्हणूनच मुली मला आवडत नाहीत........

वेळ असेल तुला तर

वेळ असेल तुला तर

एकदाच मला भेटशील का....

दोन शब्द बोलायचे होते

थोडं ऐकून घेशील का...?

... पूर्वी तू माझ्याशी

खुप काही बोलायचीस

वेळ नसला तरी

माझ्यासाठी खुप वेळ काढायचीस

तासन तास माझ्याशी

खुप गप्पा मारायचीस

नसले विषय तरी

नविन विषय काढायचीस...

काही ही बोलूंन

मला खुप खुप हसवायचीस

माझा फ़ोन एंगेज असला की

खुप खुप रागवायचीस

आता कशाला आमची गरज पडेल

असं म्हणून सारख चिडवायचीस,

माझा चेहरा पडला तर

खुप नाराज व्हायचीस

मग जवळ घेऊन sorry ही म्हणायचीस...

आज ही मला तुझा

प्रत्येक क्षणी भास होतो

का गं अशी वागतेस

का देतेस त्रास

नाही पुन्हा भेटणार

एकदा बंद पडल्यावर माझा श्वास

शेवटचं एकदाच भेट मला

पुन्हा नाही देणार त्रास...

वेळ असेल तुला तर

एकदाच मला भेटशील का

दोन शब्द बोलायचे होते

थोडं ऐकून घेशील का...

शेवटचं एकदाच मला भेटशील का...?

गरज आहे आज मला………

गरज आहे आज मला………
त्या तुझ्या आधाराची
अडखळनारे पाऊल माझे
सावरणाऱ्या तुझ्या
 हातांची
… … गरज आहे आज मला………..
त्या तूझ्या मोहक मिठीची
दडपण असता या मनी
तुझ्यात स्वतःला सामावून टाकणाऱ्या त्या बाहूंची
गरज आहे आज मला…………..
त्या तुझ्या कोमल प्रीतीची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची
गरज आहे आजहि मला……….
माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची
सारे जग असुरक्षित वाटताच
तू जवळ आहेस या जाणिवेची
गरज आहे मला
खूप गरज आहे….

किती करशील जगताना तळमळ माणसा !

किती करशील जगताना तळमळ माणसा !

समाधानी ठेव आयुष्यातली वर्दळ माणसा !इथे नशिबास जिंकाया कष्ट झेलतो तुही !

का विसरतोय प्रारब्धातील अटकळ माणसा !



हा समुद्र स्तब्ध आज लाटांच्या मग्नतेत!

का नदीत शोधतो सागरातली खार्वळ माणसा !जरी फाटक्या झोळीत तुझिया संसार आता !

घेता कवेत स्वप्नांना लाव ठिगळ माणसा !लोक नशिल्या हलाहलास आयुष्य अर्पून आता !

कुठवर धसशील तू चैनीत हे पाताळ माणसा !हाच पुरुषोत्तम सारे भूलोकीतले नियम पाळून !

कुठे कलियुगात शोधसी तू स्वर्गीचे आभाळ माणसा !

एकदा माझ्या सारखं तु पण जगुन बघ

एकदा माझ्या सारखं तु पण जगुन बघ,



काट्या वरुन चालताना एकदा हसुन बघ..



आपल्या विरहातील गेलेले क्षण एकदा मोजुन बघ,



खरचं एकदा माझ्यासारखं तु पण जगुन बघ..



गळुन पडलेल्या झाडाच्या एका-एका पाना कडे

बघ,



जीव लावून

जगवलेल्या झाडाला एकदा मरताना बघ..



खरचं एकदा माझ्यासारखं तु पण जगुन बघ,



जीवनात मिळालेल्या सुःख-दुःखाची बेरीज करुन

बघ..



बाकी काहीचं उरले नाही याचा अंदाज घेऊन बघ,



खरचं एकदा माझ्यासारखं तु पण जगुन बघ..



मुसळधार पावसात विस्कटलेल्या घराकडे बघ,



माझ्या जीवनरुपी आकाशात

दुःखाच्या विजेचा तांडव एकदा बघ..



खरचं एकदा माझ्यासारखं तु पण जगुन बघ..



स्वतःच्या जिवंतपणी मॄत्युला डोळ्यांसमोर बघ,



तो ही लवकर येत नाही म्हणुन खंत,



करणाऱ्या माझ्या मनाकडे बघ..



खरचं एकदा माझ्यासारखं तु पण जगुन बघ,



खरचं तुझ्या प्रेम भंगाने मी किती तुटुन

पडलो आहे..



हे समजण्या साठी,



एकदा माझ्यावर मनापासुन खरे प्रेम करुन बघ,



खरचं एकदा माझ्यासारखं तु पण जगुन बघ..



प्रेम भंगाने मला लागलेल्या झळा एकदा तु पण

अनुभवून बघ,



खरचं एकदा माझ्यासारखं तु पण जगुन बघ..



खरचं एकदा माझ्यासारखं तु पण जगुन बघ..

काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!

तुझ्या लपलेल्या आठवणीना


परत कधी शोधणार नाही

तुझ्या जपून ठेवलेल्या

त्या अनमोल शिदोरीला

आता कधी सोडणार नाही

काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!



ती देलेल्या प्रत्येक क्षणांना

परत कधी डिवचणार नाही

तू उराशी बाळगलेल्या

त्या जिरकाल क्षणांना

आता कधी छेडणार नाही

काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!

तू भेटलेल्या स्थळांना


परत कधी भेटणार नाही

त्यांच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या

आपल्या त्या गोड गाठी-भेटीना

आता कधी कडवठ करणार नाही

काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!



तू जागवलेल्या भावनांना

परत कधी झोपवणार नाही

त्यांनी भरून आणलेल्या

दोघा मधल्या अतुठ प्रेमाला

आता कधी तोडणार नाही

काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!


तू जाणवलेल्या जीवनाला

परत कधी विसरणार नाही

त्याने भोगायला लावलेल्या

त्या नियतीच्या सत्वपरीक्षेत

आता कधी नशीबवान ठरणार नाही

काही बोलायचं आहे पण बोलणार नाही !!!

.

पहिल प्रेम

पहिल प्रेम

पहिल प्रेम कोणी
कधीच विसरू शकत नाही
कारण त्याच तर असतात
त्याच्यासाठी सुखद आठवणी

माणुस किती जरी
आनंदी असला तरी
कधीच विसरू शकत
त्या जुन्या आठवणी
कारण तीच असते
त्याची कहाणी
माणुस स्वत:तर
तर कधीच बदलत नाही
कारण त्याला बदलावे लागते
जशी असेल परिस्तिथी
परिस्थितीच खर तशी असते
माणसाला त्या पुढे नमावेच लागते
परिस्थितीनुसार माणसाला बदलावेच लागते

एक विनंती आहे.......

एक विनंती आहे........
दूरच जायचे असेल तर
जवळच येऊ नको,
... ...
busy आहे सांगुन टाळायचचं
असेल तर
वेळच देऊ नको .....

एक विनंती आहे.....
साथ सोडुन जायचचं असेल तर
हाथ पुढे करुच नको  .....
मनातुन नंतर उतरवायचचं असेल
तर
मनात आधी भरुच नको ....

एक विनंती आहे....
चौकशी भरे,call,काळजी वाहू,sms
यांचा
कटांळाच येणैर असेल तर
कोणाला नंबर
देऊ नको ,....
Memory full झालिये सांगून
delet च करायचा असेल तर
नंबर save च करु नको ...

एक विनंती आहे......
मौनर्वत स्वीकारायचं असेल
तर
आधी गोडगोड बोलूच नको...
Secrets share करायचीच
नसतील तर
मनाचं दार उघडूच नको.......

एक विनंती आहे......
माझ्या काळजी करण्याचा ञासच
होणार
असेल तर......
अनोळखी होऊनचं वागायचं
असेल तर
माझ्याबद्दल सगंळ जाणून घेऊचं
नको.........

एक विनंती आहे......
अर्ध्यावर सोडून जायचचं असेल
तर.....
आधी डाव मांडूच नको...
रागावून निघून जायचचं असेल
तर........
आधी माझ्याशी भांडूच नको....

एक विनंती आहे.....
सवयीच होईल म्हणून तोडायच
असेल
तर...
कृपया  नातं जोडू नको 
फाडून फेकून द्यायचं असेल तर....
माझ्या मनाचं पान उलगडूच
नको....!

तुझ्या आठवनिनी पापणी ओली केली …

तुझ्या आठवनिनी पापणी ओली केली …कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली … ॥१॥
आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,
मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,
रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली …॥२॥
वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,
क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या,
वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली …॥३॥

घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,
मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,
याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली …॥३॥

संध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,
मित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,
चौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली …॥३॥

किती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,
तुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,
जाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच झाली,
माझ्या आठवणीने, तुझी सुद्धा पापणी ओली केली …॥४

उध्वस्त...!!!

दु:ख विसरण्या आता,

तू मला टाळत गेलीस,
विरहाच्या अघोरी सलांना,
उराशी कवटाळत गेलीस..

चांदण्यांच्या गाव वसताना,
तू वेस लांबवत गेलीस...
रंगता डाव पटावरी,
तू पटले उधळत गेलीस...

मैफिलीचे कळता पडघम,
चाळ पायी तुडवत गेलीस,
दोन फुले मुठीत धरूनी,
माळ सारी विस्कटत गेलीस..
अडवण्यास माझ्या तू,
खोटेपणा ठरवून गेलीस,
हट्टी स्वभावास तुझ्या,
तू का आज गिरवून गेलीस?

उध्वस्त आता दुवे अंतरी,
भविष्य माझे लिहून गेलीस,
तळहाती ठेवूनी हात असा,
हस्तरेषा हळूवार खोडून गेलीस...
हस्तरेषा हळूवार खोडून गेलीस...

तू बरोबर असतोस तेव्हा..

तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप बोलावसं वाटत,
नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत
तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुलाच पाहावस वाटत,
नाहीतर डोळे मिटून शांत बसावस
वाटत
तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप हसावसं वाटत,
नाहीतर उदास रहावस वाटत
तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत,
नाहीतर मनात सगळं दुखं, दाबून
ठेवावस वाटत
तू बरोबर असतोस तेव्हा,
तुझ्याबरोबर पावसात भिजावस
वाटत,
नाहीतर खिडकीतूनच, पडता पाऊस
पाहावस वाटत
तू बरोबर असतोस तेव्हा,
जगावसं वाटत,
नाहीतर जग सोडून जावस वाटत
तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,
नाहीतर फक्त तुलाच आठवावस
वाटत
नाहीतर फक्त तुलाच आठवावस
वाटत 

मला शाह रुख सारखे i love you म्हणता येणार नाही ..

मला शाह रुख सारखे i love you म्हणता येणार नाही ..
पण अगदी मनापासून माझे तुज्यावर प्रेम आहे हे नक्की सांगेन 
माझ्याकडे सलमान सारखी body ,किंवा तशी crez हि नाही.
पण अगदी ताकदीने मी तुज्या दुष्मनाना मार्गी लावेल
मला हृतिक सारखे नाचता हि येत नाही
पण अगदी तू म्हणशील तसे आयुष्यभर तुज्या तालावर नाचेल..
माझ्याकडे शाहीद सारखे लुक्स नाहीत कि पोरी फिदा होतील..
पण अगदी प्रेमळ हृदय आहे ज्याचावर तू फिदा होशील.
मला आमीर सारखे प्रत्येक गोष्टीत perfection जमणार नाही..
पण अगदी perfect असा जोडीदार होण्याचा नक्की प्रयत्न करेल..
मला इमरान सारखे रोमान्स करता येणार नाही
पण अगदी तुला रोज मधुचंद्र असल्यासारखे भासेल …..
मला जॉन सारखे कोणी super hot म्हणत नाही
पण अगदी super lover म्हणून जरूर ऐकशील

मित्रांनो जाणून घ्या काही

मित्रांनो जाणून घ्या काही

प्रत्येक मुलीच्या मनात
एक सुंदर स्वप्न असत
चांगला जोडीदार मिळावा
अस मागण असत

... विचारून तर बघा तिला
तुझ मन काय म्हणत?
ओठांवरच्या शब्दांनीच सारी
अपेक्षा व्यक्त करत
मुलीच मन ते
सैरावैरा धावत असत
कधी खेड तर कधी शहर
गाठत असत

कुणाला सुंदर ,कुणाला शिक्षित

कुणाला गोरी, कुणाला उंच
प्रत्येकाच मुलीविषयीच
वेगळच मागण असत
तडजोडीची वेळ आली ,
की मुलिलाच पुढे सरकाव लागत
नविन कुटुंबात प्रवेश करतांना

नात्यांच भान ठेवाव लागत

समाज वेगवेगळ्या
प्रथा काढतच असत
ते पूर्ण करता करता
मात्र बापाच्या जिवाच रान होत


२२ वर्ष जपलेल धन हे
शेवटी परकयाला द्याव लागत
जिवापाड जपलेल्या तुकड्याला
स्वत:पासून तोडाव लागत

येणारे लोक येउन जातात
खाणारे पिणारे मजा करून जातात
उरतात ते मुलीचे आई-बाप
जी दुसर्यांची ओझी वाहत असतात

कधी वाटत मुलगी होण पाप का?

आई-बापाला ही सजा का?
या रुढी परंपरा आशा कश्या?

मुलींच्या घरच्यांनीच पाळायच्या कश्या? — —

मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

दिवस रात्र २४ तास फक्त तिलाच पुजयाच असत
तिच्याच आठवणीने स्वताला विसरायच असत
कॉलेज रूम रास्ता यात फक्त तिला शोधयाच असत
अन देवाकडे फक्त तिच्या दर्शानाच साकड़ घलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

जळी तळी आभाळी अन आरश्यात तिचे प्रतिबिम्ब बघायच असत
बघता बघता तिला आपण स्वताला हरवायच असत
कधी चुकून नजर भिडली तर नजरेला खाली झुकवायाच असत
अन चोरून फक्त तिला एकटक बघत बसयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती रोज स्वप्नात येते म्हणुन रोज सजुन लवकर झोपायच असत
अन स्वप्नात सुद्धा तिला फक्त बघून दुरून हसयाच असत
रोज सकाळी हातांच्या ओंजाळीत तिला पहयाच असत
देवाच्या आधी चुकून तिचेच नाव वदयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती समोर नसतांना तिच्यावर सिंहा सारख काव्य म्हणयाच असत
ती वर्गात येताच मग सश्या सारख बेंच खाली लापयाच असत
आपण स्वत मुद्दाम चुकून आपल्या चुकान्वर तिला हसवायाच असत
ती हसताना तिच्या हास्य मोतिंना हळूच हृदयावर झेलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

तिला सांगायला घाबरत असंलो तरी एकदा आवसान एकवटायच असत
भले ती स्वीकारो व ना स्वीकारो पाहिले प्रेम तिलाच अर्पायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

गुलाबी थंडीत

मारव्याचे एकाकी स्वर, मावळतीला सूर्याचा अस्त
बावरलेली संध्याकाळ, गारवा लपेटण्यात व्यस्त

पुन्हा उदास रात्र, थंडीने लागते बहरू
लाजत धुके हळूच, लागते फेर धरू

आखडलेले शरीर, प्रफुल्लित मन
पुन्हा एकाकी मी, सोबत तुझी आठवण

रक्त गोठवणारी थंडी , हातात हात तुझा
घातलेली तु शपथ "तु राहशील फक्त माझा"

कुड्कुडना-या थंडीतली, उबदार तुझी मिठी
उष्ण तुझे श्वास ,फुललेले माझ्यासाठी

दाट पांघरलेले धुके, दवबिंदूची आसवे
थंडीची प्रत्येक रात्र, मी जगतो तुझ्यासवे

आज नाहीस तु, फक्त तुझेच भास
गुलाबी थंडीत तुझ्या, आठवणींचा सहवास....

संपलो नाही कधीचं मी पुरून उरलो होतो..



संपलो नाही कधीचं मी पुरून उरलो होतो,

विझलो नाही पुन्हा मी विझुन पेटलो होतो..

तुझ्या श्वासाने झालो मी पुन्हां निखारा,

त्या राखेत कोळसा मी बनुन पडलो होतो..

तुला वाटले माझी राख झाली ती कधीची,

धुरावाटे त्या आभाळास मी भिडलो होतो..

कोसळला नाही तो पहिला पाऊस तेव्हां,

पावसाआधी ढगातुन
त्यावेळी मी बरसलो होतो..

स्वःखुशीने तुही भिजलिस सरीत आसवाच्यां,

तुझ्या खुशीसाठी मी डोळ्यांत साठलो होतो..

तुला जाण नाही आसवाच्यां चवेची आजही,

तो सागर नव्हता त्यात मी विरघळलो होतो..

गंध होता हवेत माझ्या अस्तित्वाचा नेहमी,

श्वासावाटे तेव्हां तुझ्या मी काळजात शिरलो होतो..

तुला वाटले मी दुर गेलो आता भेट नाही,

मनात डोकावलं नाहीस मी मनात मुरलो होतो..

जेव्हां ओघळलीस तु डोळ्यावाटे मीही मुक्त झालो,

इतके दिवस तुझ्या मी डोळ्यांत उरलो होतो..

नेहमीचं राहीन जिवंत असा तुझ्या आठवणीत,

देह संपला तरी तुझ्या मी देहात साठलो होतो..

तु कणा कणात शोधलस मी क्षणा क्षणात होतो,

अगं कुठेचं गेलो नव्हतो मी तुझ्यात सरलो होतो..

वाटा

कळत नाहीत वाटा,
तिकडे कशाला जायचं..?
आपले नव्हते जे,
त्यांना का आठवायचं..?

ज्यांना विश्वास कधी,
समजला नाही..
त्यांना का आपण,
खास काही सांगायचं..?

आहेत आपल्याकडे 
शब्द मांडायला,
न ऐकनार्यांसाठी,
का ओरडायचं..?

भावना आहेत मनी,
त्यांना फक्त मांडायचं,
आपला काही चुकतं,
म्हणून गप्प का राहायचं..?

नाही सापडलं उत्तर,
तर प्रश्नांना नाही टाळायचं,
जगासमोर एक,
आपलं उदाहरण ठेवायचं..!!

मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?

कधी न संपणारी
फक्त मैत्रीच असत्ते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
... कधीच न संपणारे

मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन फसवा असतो
मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
प्रेम कीतीही नाजूक पण टूटतेच कधीतरी

प्रेम ह्याने केले प्रेम त्याने केले
प्रेम करणारा एकटाच असतो ना
मैत्री मी केली का त्याने केली
मैत्री तिधेही निभावतात....

मैत्रीनेच प्रेमाला सुरूवात होते
ऐकल होते पण खरच आहे की..
माझ्या मैत्रीत प्रेम आहे...
पण माझ्या प्रेमात मैत्री कधीच नसणार...
फक्त प्रेम आणि फक्त प्रेमच असेल..

तुम्हाला कोणते प्रेम आवडते...
प्रेमात मैत्री असते मैत्रीनंतर प्रेम असते
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की प्रेमापेक्षा जास्त मैत्री?
मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?

चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार

एक होता चिमना आणि एक होती चिमणी
चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार
तरीही एकमेकांचे जिवलग यार.
वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे,
एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे .
चिमणीच्या मनात एक खुलत होते गुपित,
चिमण्या बद्दलचे प्रेम तिच्या मनाच्या कुपीत
रोज रोज कारे देवाकडे प्रार्थना ,
त्याच्याही मनात असू देत अशाच काहीशा भावना
एक दिवस धीर करून तिने सगळे सांगितले
पण तिला त्याने अगदी सहज नाकारले
त्याला म्हणे असे काहीच वाटत नव्हते,
त्याच्या डोळ्यात प्रेम आहे हे अगदी झूठ होते
का नाहीह्याची बरीच कारणे सांगितली
पण चिमणीच्या मनाला ती अजिबात नाही पटली
चिमणी तशीच घरी गेली, तिकडे जाऊन खूप रडली
काय करावे कळेना,रडू तिच्याने आवरेना
चिमणीला एक उपाय सुचला , तिने चीमन्याशी अबोला धरला
चिमण्याला मात्र ह्याचा सुधा काहीच फरक नाही पडला
चिमना अगदीच खुशीत होता , नवीन स्वप्ने पाहत होता
कदाचित तो थोडा जास्तच प्रक्टीकॅल होता
चिमणीने सुद्धा आता हसत जगायचे ठरवले
पण एकांतातले अश्रू तिला कधीच नाही आवरले
एकतर्फी असले तरी चिमणीचे चीमन्यावर अगदी खरे प्रेम होते
पण कदाचित खरे प्रेम चिमण्याच्या नशिबी नव्हते
एक प्रश्न मात्र तिला आयुष्यभर सतावत राहिला
चिमण्याच्या डोळ्यात तिला दिसलेले प्रेम हा नुसता "आभास" कसा ठरला?

डोळ्यांचे भरणेही किती भावनाप्रधान असते ...

डोळ्यांचे भरणेही किती
भावनाप्रधान असते ,
समजणाऱ्या शब्दांचा
अर्थ सहज समजून जाते ……
******************************
******************************
रडतरडत माणूस
जीवनाच स्वीकार करत असतो ,
येणाऱ्या सुख -दु:खाना
तो प्राधान्य देत असतो ….
*******************************
********************************
दु: म्हणजे
काय असते ?
मनावर अपेक्षांचे
एक प्रकारचे वजन असते
*******************
*******************
मनाला लागलेली सवय
मी तिथेच मोडत असते ,
कारण, मन आपले असते
सवय मात्र दुसऱ्याची असते
*******************
*******************
मनावरील नियंत्रणाने
माणूस काहीही साध्य करू शकतो
सरळ वाटेतील डोंगर पोखरून
वाकडी वाट टाळू शकतो
********************
*******************
नसतो माणसाचा आठवणीवर ताबा
हे आज मला कळले होते ,
सगळे असूनही जवळ जेव्हा
आठवणीनी मला वाळवंटात नेऊन फेकले होते …………
***********************
*********************

मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?

कधी न संपणारी
फक्त मैत्रीच असत्ते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
... कधीच न संपणारे

मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन फसवा असतो
मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
प्रेम कीतीही नाजूक पण टूटतेच कधीतरी

प्रेम ह्याने केले प्रेम त्याने केले
प्रेम करणारा एकटाच असतो ना
मैत्री मी केली का त्याने केली
मैत्री तिधेही निभावतात....

मैत्रीनेच प्रेमाला सुरूवात होते
ऐकल होते पण खरच आहे की..
माझ्या मैत्रीत प्रेम आहे...
पण माझ्या प्रेमात मैत्री कधीच नसणार...
फक्त प्रेम आणि फक्त प्रेमच असेल..

तुम्हाला कोणते प्रेम आवडते...
प्रेमात मैत्री असते मैत्रीनंतर प्रेम असते
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की प्रेमापेक्षा जास्त मैत्री?
मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?

एकदा प्रेम करून बघ...

सगळ काही पाहिल असशीलच मग
एकदा प्रेम करून बघ...

एकटच काय जगायच..?
आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..

खुप वेळ असेल तुझ्याकडे..
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..

कविता नुसत्याच नाही सुचणार...
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..

खुप छान वाटत ग ..
सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ...

नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..
ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..

नुसतच काय जगायच..
जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..

एक जखम स्वतः करून बघ..
स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ..

नुसत सुखच काय अनुभवायचे..
दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..

विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..
थोड्या जखमा स्वतः करून बघ..

रिकाम काय चालायच..?
आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..

रडत असलेले डोळे लपवत..
एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..

सोपं नसत ग ...एकदा रडून बघ..
तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..

सांगण्याचा हेतु एवढाच की..
एकदा का होइना प्रेम करून बघ...

खोवशील ना मला माझ्याही नकळत

खोवशील ना मला माझ्याही नकळत
तुझ्या वेणीतलं मोगर्याचं फ़ुल व्हायचंय मला

भिजशील ना माझ्या अंगणात मनसोक्त
तुला आवडणारी सुखद श्रावणसर व्हायचंय मला

झेलशील ना मला हळूवार अलगद
तुझ्या अळवावरचा टपोरा थेंब व्हायचंय मला

देशील ना मला प्रेमानं आलिंगन
तुझ्या कुशीतली कापसाची ऊशी व्हायचंय मला

सावरशील ना मला नेहमी भरकटताना
तुझ्या साडीचा ढळणारा पदर व्हायचंय मला

शोधशील ना मला नितळ सागरकिनारी
तुला सापडणार्या शिंपल्यातला मोती व्हायचंय मला

पुसशील ना मला तुझ्या रुमालाने
तुझ्या गालावरुन ओघळणारा अश्रू व्हायचंय मला

घालशील ना हळुवार प्रेमाची फ़ुंकर
तुझ्या नाजूक तळहातावरला फ़ोड व्हायचंय मला

परडीत वेचशील ना मला तुडवता
तुझ्या परसदारातल्या प्राजक्ताचा सडा व्हायचंय मला

बाळगशील ना मला नेहमी बरोबर
तुझ्या गळ्यातला लाडका ताईत व्हायचंय मला

पहाशील ना माझ्याकडे साश्रू नयनांनी
तुझ्या पाणिदार डोळ्यातलं काजळ व्हायचंय मला

झुलशील ना माझ्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर
तुझ्या कानातलं झुबकेदार डूल व्हायचंय मला

न्याहाळशील ना मला रात्रभर एकटक
तुझ्या शयनगृहातील आरसा व्हायचंय मला

नाचशील ना माझ्या सप्तसुरी तालावर
तुझ्या पायातलं रुणझुणतं पैजण व्हायचंय मला

धरशील ना मला ह्रदयाशी कौतूकानं
तुझ्या पायात घोटाळणारं इवलसं पिलू व्हायचंय मला

पहाशील ना मला सारखं मागे वळून
तुझ्या पाठीवरला दिसणारा तिळ व्हायचंय मला