चंद्रावरती बांधलाय बंगला ..!!


चंद्रावर जमीन मिळतेय
तेव्हाच घेऊन ठेवलीय
दहा रुपये एकरने
चक्क वीस एकर घेऊन ठेवलीय
माझ्याकडे कागद पत्र आहे
कालच चंद्राचा सेल आला
बंगला बांधून तयार आहे
कधी येताय राहायला ..?
हुरळून गेलो कसा असेल बंगला
चंद्राने "ई"मेल केलाय .
मस्त बंगला..! छान बांधलाय ...!!
फळांची झाडे लावलीत
आंबा, पेरू ,सफरचंद द्राक्षे
काय म्हणाल ते
बंगला एस्पैस नि खोल्या छान
सूर्य टांगून ठेवलाय आवारात
मस्त गाभूळ्लेला
तुम्हाला हवां तसा ...!!
खरेच कंटाळा आलाय येथला
रहायला धड जागा नाही
झोपायला धड खोली नाही
राहायला येथे ..
नि कामाला तेथे ......
नुसती धडधड नि नुसती वणवण
शरीर गेलेय थकून
नि हाडे लागलीत बोलू
चला चंद्रावरच जाउया ..
चंद्र म्हणतो येथे छान आहे
हात उभारले कि त्याचे पंख होतात
"हू !!"म्हणाले की
तुम्ही मस्त उडू लागता
येथे गाडीचा खर्च नाही
उडालाकी बुडण्याचे भय नाही
चांदण्याची नाणी येथे खूप आहेत
आणि मुठभर उचला
येथे सगळे फुकट आहे
येथे खायला लागते काय
प्यायला अमृत दुसरे काय ..?
यायचे तर लवकर या
येथे आल्यावर एक होईल
तुमाचा मात्र अडाम होईल
येताना मात्र ईव आणा
मग चंद्राची पृथ्वी होईल
त्याला वेळ लागणार नाही
येथे तारुण्य भरपूर आहे
हे चंद्राचे अंगण आहे ...!!

आई हा शब्द आहे का ?




I
एकटीच आहे मी अता...
पण कोणाशी बोलू मी काही,
भेटतात लोक येता जाता..
पण तू भेटत नाहीस मला आई. . .

आतुरतेने वाट बघते मी तुजी अता,

घरट्यात अता एक चिमनी आली,
डोळ्यात भरला आहे पाण्याचा साथा,
पण तुजी परतीची वाट आहे का आई. . .


आली मला उचकी अता,
असे वाटे की तू आली..
अंधाराला एकटक पाहता,
माजा उजेड आहेस तू आई. . .

काही गोष्टी कलू लागले आहे अता,

विनाकारण देवाने खुपच केली घाई..
देवाकडे निरागसपने पाहता,
देवाने का हिरावून घेतली माझी आई. . .

थांबू लागली आहे मी चालता चालता,
एकटीच चालत आहे मी पायी,
बाकीच्या पालकांना पाहता,
वाटे, असेल का त्यात माझी आई. . .

घरात जेवत आहे मी अता,
पण माझ्या पोटात भूकच नाही..
प्रत्येक ख़ास खाता खाता वाटे,
मला प्रेमाने जेवण भरव ना आई. . .

पूर्ण केले मी माझे GRADUATION अता,
पण नाही आली मी पहिली..
कुठे कुठे चुकते मी अता,
मला प्रेमाचे धपाटे देऊन एकदा शिकव ना आई. . .

एक मुलगा आवडतो मला अता,
तो दिसतो एकदम सही..
लग्न करणार आहे मी अता,
वरुनच आशिर्वाद देशील ना आई. . .

या जगात नाहीस तू अता,
पण तुझी आठवन मला सतत आली..
आयुष्याचे गोड गीत गाता,
तू नसण्याचे खुप दुःख आहे आई. . .

तुला मी माफ़ नाही करणार मी अता,
देवा कड़े जायची का केलीस तू घाई..
निघून गेलीस तू अचानक काही न कलवता,
ये सांग ना कशी दिसतेस तू फ़क्त माझी आई. . .

घाबरू नकोस तू अता..

छानपने संभाळते जीजू आणि ताई,
तू हळूच आम्हाला पाहतेस ना..
स्वर्गातुन सुट्टी घेउन आम्हाला भेटायला ये ना आई. . .

प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं

प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं
बायको झाल्यापासून
भांडणे खुप वाढली आहेत,
संसाराच्या वृक्षावरील
हिरवी पाने पार झाडली आहेत,,
उरला आहे तो फ़क्त पालापाचोळा…
प्रेयसी असतांना,
“तू म्हणशील तसंच होणार”
असं सारं नेहमी म्हणायची,
आता मात्र माझ्यावरंच
वेळ आली आहे रडायची,,
उरलं आहे ते फ़क्त अश्रुत बुडायचं…
प्रेयसी असतांना,
वेळ देत नाही म्हणायची
बायको म्हणुन सोबत असतांना
काय दिवे लावतेय,
“आमचं किती प्रेम आहे”
असं सा-या जगाला उगीचं दाखवतेय,,
उरला आहे तो फ़क्त बिनपैश्याचा तमाशा…
प्रेयसी असतांना,
माझ्याकरीता तुला
खुप गोष्टी कराव्याश्या वाटायच्या,
बायको झाल्यानंतर मात्र
कणिक तू मळायचीस
अन पोळ्या मी लाटायाच्या..?
उरलं आहे ते फ़क्त पूर्ण वेळ स्वयंपाकी व्हायचं…
प्रेयसी असतांना,
तुला सोडुच नये असं वाटायचं
बायको झाल्यानंतर
कधी एकदाचं सोडतो असं झालंय,
कामे दोघांनी करायची असतात
पण तू माझं ओझ्याचं गाढव केलंय,,
उरलं आहे ते फ़क्त ओझं वाहता-वाहता जीव सोडायचं…
- अनामिक

राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!

स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफङाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी
राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!
- ग्रेस

निषेध !!

आम्ही कधीच पेटून उठत नाही
आम्हाला कुणीतरी चिथवावं लागतं.
आमच्यातल्या विवेकाला
धर्माचं नाहीतर अस्मितेचं
गाजर दाखवून फितवावं लागतं.
मग कुठेतरी
आतून भ्याड आणि बुळे असणारे आम्ही पेटुन उठतो.
अन्‌ स्वत:च्या षंढत्वाबद्दल वाटणा-या घृणेला
कुठल्यातरी निषेधाचं लेबल लावून
मिळेल ते जाळत सुटतो.
कुठला धर्म? कुठल्या भावना?
कुठली अस्मिता? कुठल्या विटंबना
आम्हाला नसतो विधीनिषेध
आम्ही फक्त नोंदवत असतो
आमच्या लाचार कृतीशून्यते विरुद्धचा आमचा निषेध !!
-गुरु ठाकूर

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांग बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी
अभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा??
कोणी नसताना काही कळताना येशिल का जरा??
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
- संदिप खरे

जखमा जुन्या (गझल )

का मोगरा उशाला, तू माळतेस आता
काळीज आठवांनी, का जाळतेस आता
मोडून स्वप्न सारी ती रात रंगलेली
त्या काजळी सुखांना का भाळतेस आता
गेला निघून गेला तांडा नव्या दिशेला
त्याच्या खुणा कशाला सांभाळतेस आता
काळास दोष नाही वेळाच थांबलेल्या
का जाहल्या चुकांना मग चाळतेस आता
सारे तुझेच होते झोळीत जे मिळाले
डोळ्यातले झरे का ते गाळतेस आता
आक्रोश या ‘मनी’चा कोणास ना कळाला
जखमा जुन्या कशाला तू पाळतेस आता

जीवन त्यांना कळले हो…

जीवन त्यांना कळले हो…
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो
चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो
सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो
दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो
पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो
सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो
उरीच ज्या आढळले हो!
- बा. भ. बोरकर

मुके केले ओठ…

ओट्यावर चाळीत मी पुस्तकाची पाने
मला तसे तुला सुचू लागले बहाणे
घासायला भांडी आली तुही अंगणात
एकदाच फुटे हसू दोघांच्या गालात
कधी भेटायचे माझे बोलायचे डोळे
आज नको उद्या भेटू तुझे ठरलेले
दुपारच्यावेळी तुझं चालायचं धुणं
धाब्यावर मीही उभा उन्हाला झेलून
पाहून तू मला जेव्हा हसायची सखे
ऊन मला वाटायचे पावसासारखे
कधी भेटायचे माझे हलायचे ओठ
उद्या उद्या वार्‍यावर लिहायची बोटं
असावीस चुलीपुढे भाकरी थापत
वाटायचे खिडकितल्या धुराला पाहत
कशी माझी मुकी हाक कळायची तुला
दारामधे यायचीस मला बघायला
खांद्यानं तू पुसायची कपाळाचा घाम
आज नको उद्या भेटू उद्या नाही काम
खोल खोल निजेमधे बुडालेलं खेडं
तुझ्या माझ्या देहावर चंद्राचा उजेड
चेहर्‍याभोवती तुझ्या लपेटले हात
मुके केले ओठ उद्या म्हणायच्या आत….
- वैभव देशमु

किती स्थित्यंतरे करशील साध्या राहणीमध्ये?

जगाला भावली असतील का? या काळजीमध्ये
किती स्थित्यंतरे करशील साध्या राहणीमध्ये?
जरी प्रत्येक बी ला हक्क असला झाड होण्याचा
कशी रुजणार ती, जी पेरली नापिक भुईमध्ये?
निकालालाच आहे भाव हे माहीत असताना
उगाचच गुंततो का मी परीक्षा पद्धतीमध्ये?
घरी एकाच असतो राहण्या आम्ही तिघे भाऊ
तरीही वाटणी होतेच धान्याची सुगीमध्ये
तुझे सांगून झाले की मला सांगायचे आहे
मलाही दु:ख आहे ह्या विलासी जिंदगीमध्ये
कितीही होउ द्या हल्ले, कुणीही डगमगत नाही
कुठुन येतो असा ‘कणखर’ पणा ह्या मुंबईमध्ये?
———–
विजय दिनकर पाटील ‘कणखर’

** माझा Facebook Status **



Facebook Status ने विचारले....What's on your Mind ?
तुझ्या मनात काय आहे ?

माझ्या मनात ?
मनात ?
खुप खुप सारं आहे
आकाशावर लिहलं तरी मावणार नाही इतकं
अन एका अश्रूतनं देखील ओघळेल इतकं आहे..

गोळा केले कवितेत..
चंद्र सूर्य
तारे वारे
तुझे खट्याळ स्पर्श सारे

Keyboard बडव बडव बडवले
दया आली
अन माझे विमान खाली उतरले

Status सेव्ह करायला घेतलं तर
ते म्हणे..
Status Too Long
शब्दंमर्यादा ४२०

कसा मावेल ?
माझा रुसवा
तुझा फुगवा
झाडांचा बहर
आठवांचा कहर
नवीन मुख्यमंत्री
आश्वासनांची जुनी जंत्री
मी झेललेली संकटं
तुझी सिगरेटची थोटकं
सरकारी धोरण
दारावरचं तोरण
तुझा व्हिस्कीचा घोट
माझ्या भावनांचा कडेलोट
तुझ्या so called मैत्रिणी
माझ्या जीवाचं होणारं पाणी पाणी
फक्तं ४२० शब्दांत ?

वाईट वाटलं..
मनात आलं
शब्दांना Facebook ने असं का वाळीत टाकलं ?

Facebook च्या नावाने मी कडाकड बोटं मोडली
प्रयत्न केला
पण,भावनांची काटछाट करणं मला पटलं नाही

म्हणून जरी कधी माझा Status Blank असतो
लक्षात घ्या,कवीला शब्दांचा कधीच दुष्काळ नसतो

खुप उचंबळून आले
तरच
मी Facebook शी जुळवून घेते
Status मध्ये कविता जरी नाही
शायरी किंवा चारोळी तरी लिहते

तसे,मनात माझ्या खुप काही असते
माझे Status तरंगते हिमनग असते

माझे Status तरंगते हिमनग असते..

तू गेल्यावर

आठवणींचा धसका आणिक भय स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे
चिंब भिजावे मनी वाटते शहारतो मी
व्याकूळ होऊन मेघ सावळे चितारतो मी
परी विसरतो कधी न झरती ढग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे
जाळून जाते दुपार धुमसत सांज वितळते
मिठीत गहि-या अलगद जेव्हा रात्र कवळते
चहुबाजुंनी मला भेदिती शर स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे
तसाच ढळतो दिवस आणखी रात्री सरती
तसेच आहे जग हे सारे अवती भवती
तरी वाटते उलटून गेले युग स्वप्नांचे
तू गेल्यावर नको वाटते जग स्वप्नांचे
-गुरु ठाकूर

तुम्ही ऐका हा अभंग..माझा झाला प्रेमभंग..

तुझे रूप पाहण्यात
होतो मी दंग..
तंद्री उडाली ऐसी
झाला रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग..
माझा झाला प्रेमभंग..

तुझे स्मित हास्य  I  मला 'गुगली' होता...II
अन तिरपा कटाक्ष I तो 'दुसरा' होता...II

स्वप्नात तूच असशी..
ध्यानी मनी तूच दिसशी...
मी तुला पहिले असता...
तुझ्या मागे मागे आलो..
डोळ्यावर येत किरणे..
जरा जागा जागा झालो..
होता स्वप्नाचा त्या भंग..
होतो रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग..
माझा झाला प्रेमभंग..

तुझी मोरचालकरती माझे हाल .II
तुझे ओठ बंद  I करती लाखो सवाल ...II

तुज बघणे अन तुज पूजणे
हा नित्यक्रम रोजचा..
तू समोर येत माझ्या
माझी बंद होते वाचा..
तुला लावे मी जेव्हा फोन
तू उचलत नाहीत त्याला..
नुसतीच वाजते रिंग
होतो रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग

मनाचिये दारी I किती संकल्प केले II
तू येत समोरी I ते गोंधळून गेले II

तू मनात 'घर' या केले
मी मनात 'पक्के' केले..
तुज गाठून सांगावेसे
ओठात अडकुनी गेले..
योगायोग काय असावा
तू म्हणालीस मज सॉरी
तेव्हा तिकडून आली तुझ्या
प्रियकराची स्वारी
तंद्री उडाली ऐसी
झाला रंगाचा बेरंग..
तुम्ही ऐका हा अभंग..
माझा झाला प्रेमभंग..

मनाशी बांधली खुणगाठ I तुझ्याशीच बांधावी लग्नाची गाठ...II
जेव्हा तू फिरवलीस पाठ I तोच माझा प्रेमभंग क्रमांक आठ...II

** अंतर **




आपल्यातलं अंतर
वेळेआधीच
कमी होईल
ह्या भीतीने मी
रात्रंदिवस आपल्यांत अंतर ठेवायचे..

वेळेतच मग
देवाकडे आंतरपाट मागितलं
तर,
त्याने आपल्यालाच अंतर दिलं

अशी वेळ आली की,
आता..
भीती संपली
रात्र जळाली
दिवस विझले
नयन भिजले

आणि , उरलंय फक्त अंतर..
फक्त अंतर
कायमचं..
आपल्यात..

** उंबरठा **




भय अनामिक असे आज दाटून आले..
मेघ अभावित जसे आज दाटून आले..

ओलांडू कशी मी उंबरठा ?

किलकिले दार उघडता
सुख देत हाकारे बाहेरुन आले..

ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

घुसमट सोसवेना मनीची
तडफड साहवेना कधीची
कोंडू कशी वेदनेला ?
मारु कशी जाणीवेला ?
सुख देत हाकारे बाहेरुन आले..
ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

आहे,जग भयाण आहे
आहे,मीही तयार आहे
माघार घेऊ कशाला ?
दार लावू कशाला ?
सुख देत हाकारे बाहेरुन आले..
ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

ना ओलांडू कशी मी उंबरठा ?

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल
आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा
माझ्यासाठी अश्रू दाटतील….
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील…!
 

आज मी निशब्द

आज मी निशब्द 
काहीच का नाही सुचेना 
लिहायला घेतलं काही 
तर जमतच नाही 
आज मी निशब्द.........

काय माहित काय झालंय 
पण दोन दिवस झाले 
माझा मुडच गेलाय
का?.. काहीच माहित नाही 

सर्व निरभ्र वाटत 
डोक्यावर कसलं तरी 
ओझ घेवून चालल्यासारख 
मी खरच निशब्द झालो का?...
लिहायला शब्दच सुचत नाहीत 

माहित नाही.... माहित नाही...नुसत माहित नाही..
निशब्द  मन... निशब्द मन.... निशब्द मन..
खायला उठतय.... मलाच...
काहीच सुचत नाहीय...
काय लिहू.... मी काय लिहू...........
काय बोलू... मी... काय बोलू...

** अंतर **




आपल्यातलं अंतर
वेळेआधीच
कमी होईल
ह्या भीतीने मी
रात्रंदिवस आपल्यांत अंतर ठेवायचे..

वेळेतच मग
देवाकडे आंतरपाट मागितलं
तर,
त्याने आपल्यालाच अंतर दिलं

अशी वेळ आली की,
आता..
भीती संपली
रात्र जळाली
दिवस विझले
नयन भिजले

आणि , उरलंय फक्त अंतर..
फक्त अंतर
कायमचं..
आपल्यात..

तू आणि मी भेटलो........



तू आणि मी भेटलो 
कधी नव्हे ते बोललो
तसे नजरानजर तर नेहमीच व्हायची पण जाणूनबुजून चोरायचो
शब्दही तसे मनात नेहमीच बोलायचो
तू काही सांगितलेस  मी दुसरेच काही ऐकले!!
मी जे मनात बोलले ते मात्र तू नक्कीच ऐकले
माहित नाही कसे पण बोलले मी
हसलास तू लाजले  मी
नजरेचा खेळ बदलला क्षणात
दिखावा गळून पडला क्षणात
तुझी कुशी म्हणजे झाली माझी मऊ उशी
का आणि कधी..... माहितच नाही कशी
तेव्हाच कळाले मी आणि तू काही वेगळे कधीच नव्हतो
फक्त जाणीव त्याची अजून आपण घेतच नव्हतो
तू आणि मी भेटलो ..... हो आता खरेच भेटलो ..

एक अनामिक

" नि:शब्द प्रीत..... ♥♥♥"



वळुन पाहिले प्रत्येक वळणावर

कधी तरी तुझी साद येईल...

ना वाटले कधी प्रेम तुझे

इतक्या लवकर कच खाईल...


ना केली मी पर्वा स्व:ताची ,
ना मला तमा या जगाची...
तुझ्या सहवासात आयुष्य जावं
हीच एक इच्छा मज वेडीची...

तु मात्र कधी जाणली नाहीस
किंम्मत त्या प्रेमाची...
मायेच्या नात्यांपुढे जळु दिलीस
स्वप्न आपल्या प्रीतीची..

सांभाळु ना शकलास तु
नात्यांचा हा डोलारा...
ना उरले हाती माझ्या काही,
विस्कटत गेला डाव सारा...

अजुनही वेड्यागत मी
तुझ्यावर प्रेम करते...
सहवासातले क्षण सोबतीला
आयुष्याची नाव हाकते..

जाणते आता कधीच न येणार
तुझी ती प्रेमळ साद...
पण शेवटच्या श्वासापर्यंत असेल
तुझ्या आठवणींशी संवाद...

~~ जीवन रीत ~~



संकटांना कधी कंटाळायचं नसतं,

त्याला सामोरच जायचं असतं

कोणी नावे ठेवली तर थांबायच नसतं

आपलं चांगलं काम करायचं असतं

अपमानाने कधी खचायचं नसतं
जिद्दीने बळ वाढवायचं असतं
नाराज मुळीच व्हायचं नसतं
चैतन्य सदा फ़ुलवायचं असतं
पाय ओढले म्हणुन परतायचं नसतं
पुढे अन पुढे जायचं असतं
लोक निंदेला कधी घाबरायचं नसतं
आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं

हे जीवन सुंदर आहे. आणि हे सुंदर आयुष्य तितक्याच सुंदरपणे जगण्याचा प्रयत्न करणे. बाकी काय


रक्ताच्या नात्याची गोष्ट निराली असते . पण मित्र ,मैत्रिन हे नात सर्वात जिव्हाल्याच , आपुलकीच , सर्वाना हव हवस वाटणार, प्रत्येकाच्याच जीवनात एक महत्वाची भूमिका बजावनार आस असत, ......
शेवटी , आपल्या वाट्यातील सुद्धा अर्धी करवंद कुणी तरी घ्यावी , असे प्रत्येकालाच वाटत असते नाही का ?.............................
..................
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं....!!!!

♥♥ एक अनामिक ♥♥

** जमेल का रे **




हरखले मी हरखले, भान ही हरपले
अचंभित मी , स्तंभित मी

ऐकूनी हरी वाणी
कृष्ण मुरारी बनवारी
अवतरेल राम अवतारी ?
हरखले मी हरखले, भान ही हरपले..

रस रसाळ बोल तुझे रे , असे पण मन चंचल
जमेल का रे , जमेल का तुज हे महा कठीण व्रत ?

फुटी तांबडे , यमुनेला येशी
फोडी घागर , वस्त्रं पळविशी
गोपांसंगे माखन लुटशी
जमेल का रे , जमेल का अता ना करणे बरजोरी
वनी तरुतळी , ना छेडणे मुरली ?
कृष्ण मुरारी बनवारी अवतरेल राम अवतारी ?

अनाहताचे सूर घुमले, थरथरले पाणी
जमेल का रे , जमेल का तुज गाणे मूक गाणी ?

नको दुष्ट बोलणी , नको निर्वाण वाणी
मन रंगीत करतो , तन संगीत बनतो
पर असू दे ना हे सारे फक्त मजसाठी
जमेल का रे , जमेल का अता ना रंग उधळणे ?
जनी वृंदावनी , ना रास रचणे ?
कृष्ण मुरारी बनवारी अवतरेल राम अवतारी ?

कशास दूजे नाम स्मरणे, नको उध्दाराचे बहाणे
जमेल का रे , जमेल का तुज राधाकृष्ण होणे ?

कृष्ण मुरारी बनवारी अवतरेल राम अवतारी ?

** मनमंदिर **




दूर नसे मी तुला कधी
दुरावा नसे कधी उरी
बघ सये तू मन्मंदिरी
हासे,बोले नीत श्रीहरी

निशा कसली नि प्रभात केव्हा
तू दिशा नि तुच रस्ता
येते जेव्हा समीप सये
बासरीत माझ्या सूर तेव्हा

साद कोणती नि हाक केव्हा
तू आवाज नि तूच भाषा
घेते जेव्हा श्वास मंदसे
बासरीत माझ्या प्राण तेव्हा

स्वर्ग कुठला नि धरती केव्हा
तू आसरा नि तूच निवारा
गाते जेव्हा गीत अबोलसे
बासरीत माझ्या जीव तेव्हा

अधर काय नि ओंजळ केव्हा
तू तन नि तूच आत्मा
होते जेव्हा मिलन अपुले
बासरीत माझ्या सॄजन तेव्हा
a