मैत्री

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
काय चिज असते नाही ही मैत्री........................

पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते...

तेन्हा पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते...
कोण ग तो तुझा म्हटल्यावर
झुकलेली नजर आणि गुलाबी झालेले गाल बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....

रोज निरोप घेताना
पुन्हा कधी भेटशील म्हणताना
पाणावलेले डोळे आणि
कपकपनारा कंठ बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....

कारण नसताना तासभर फोनवर भांडायचा
स्वतः राग करून फोनही ठेवायचं
फोन ठेवल्यानंतर मिनिटात आलेला
आय लव यु चा म्यासेग बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटते....

नकळत स्पर्श झाल्यावर
तिच्या हृदयाचा  चुकणार ठोका
आणि थरथरणारे ओठ बघून
पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटत....

माझे बाबा....

तिने चांगला मेकअप केला होता
व तिचा आवडता ड्रेस घातला होता
तिच्या शाळेत आज दिवस होता खास
सगळे आपल्या बाबांना घेऊन येणार होते आज

पण तिची आई तिला थांबवत होती
तिला शाळेत जाऊन देत नव्हती
तिला वाटलं दुसरी मुलं नाही समजणार
जेव्हा ती एकटीच शाळेत जाणार

पण तिला नव्हती कसली भीती
शब्द बोलायचे होते तिला किती
तिने ठरवलेलं काय बोलायचं
बाबा का नाही आज, हे सांगायचं

तिच्या आईला तिची काळजी होती
म्हणून तिला एकटी जाऊन देत नव्हती
तिने तिला थांबव्याचा खूप प्रयत्न केला
पण तिने आईचा एकही शब्द नाही ऐकला

तिला आज शाळेत जायचच होतं
खरं काय ते सगळ्यांना सांगायचं होतं
आपल्या बाबां बद्दल, जे कधी तिला दिसत नाहीत
व तिला कधी फोन ही करून तिच्याशी बोलत नाहीत

बहुतेक मुलांचे बाबा आले होते
एक मेकांशी बोलत बसले होते
सगळी मुलेही खूप उत्सुक होती
बाबां बद्दल बोलायला तयार होती

शिक्षिकेनी केली सुरवात बोलवायला
एक एक करून प्रत्येक मुलाला
सगळे आपल्या बाबां बद्दल बोलू लागले
घड्याळाचे काटे पुढे सरकू लागले

शेवटी त्या लहान मुलीची वेळ आली
सर्वी मुले तिच्या कडे पाहू लागली
प्रत्येक जण शोधत होता
त्या माणसाला जो तिथे नव्हता

'तिचे बाबा गेले कुठे?'
एक मुलगा ओरडला तिच्या पुढे
'कदाचित तिचे बाबा नसतील'
ओरडली एक मुलगी कोपऱ्यातील

नंतर हळूच तिच्या पाठून
कुणाचे तरी बाबा म्हणाले हसून
'आजून एक पैसा लोभी बाप
ज्याच्या कडे मुली साठी वेळ नाही आज'

हे कटू शब्द तिच्या मनाला बोचले नसतील
म्हणून आई कडे बघून तिचे ओठ हसले असतील
तिने शाळेतल्या बाई कडे पाहिलं
बाईने पुढे जायला तिला सांगितलं

हात मागे घेऊन ती थोडी वाकली
आणि हळू हळू ती बोलू लागली
तिच्या कडून असे शब्द निघाले
जे कधीच कोणी नव्हते ऐकले

'माझे बाबा इकडे नाही आता
कारण ते खूप लांब राहतात.
मला माहित आहे त्यांना खूप याचा होता आज
कारण आजचा दिवस एकदम आहे खास.

जरी तुम्हाला भेटता नाही आलं त्यांना
मला सांगायचा तुम्हा सगळ्यांना
सगळं काही माझ्या बाबां बद्दल
आणि किती प्रेम करतात ते माझ्या वर

त्यांना आवडायचं मला गोष्ट सांगायला
त्यांनी शिकवलं मला सायकल चालवायला
मला गुलाबी गुलाब देऊन चकित करायचे
मला चोपाटी वर फिरायला नयाचे

आम्ही एकत्र पाणी पुरी खायचो
आईसक्रीम कोनही शेर करायचो.
जरी तुम्ही माझ्या बाबांना बघू शकत नाही
मी इकडे काही आज एकटी उभी नाही.

कारण बाबा आहेत माझ्या बरोबरी
आम्ही कितीही लांब असलो जरी,
हे मला माहित आहे कारण मला बाबा म्हणाले होते
मी तुझ्या हृदयात आहे, मला शोधू नकोस बाकी कोठे."

हे बोलताच तिने आपला चिमुकला हात उचलला
आणि हळूच आपल्या छाती पाशी आणला.
त्या धक धक आवाजात तिला ऐकू येत होतं
आपल्या बाबांनी ऐकवलेले प्रेमाचे शब्द.

आणि कोठे तरी त्या गर्दीत बाबांच्या
तिची आई होती गर्दीत अश्रूंच्या धारांच्या
बघत आपल्या मुली कडे अभिमानाने
जी म्हणत होती शब्द मोठे तिच्या वयाच्या मनाने

आणि जेव्हा तिने आपला हाथ छाती वरून खाली आणला
त्या गर्दी कडे टोक पाहून मनात विश्वास आणला
तिने आपले शेवटचे शब्द म्हंटले
जे सगळ्यांचा हृदयाला टोचले.

'मी माझ्या बाबांवर खूप प्रेम करते
आणि ते आहेत माझ्या साठी खूप मोठे.
जमलं असतं तर ते आले असते नक्की
पण स्वर्गलोक येथून लांब आहे किती

ऐका, माझे बाबा एक कमांडो होते
जे मागच्या वर्षी आम्हाला सोडून गेले
जेव्हा अतिरेक्यांनी मुंबई वर हल्ला केला
आणि मुंबईला भयाचा धक्का दिला.

पण कधी कधी जेव्हा मी डोळे मिटते
असं वाटतं ते कधी गेलेच नव्हते.'
आणि मग तिने आपले डोळे मिटले
आणि बाबांना आपल्या समोर बघितले.

तिच्या आईचे डोळे एकदम चकित झाले
जे तिने तिच्या समोर पाहिले
खोली भरून असलेली बाबा आणि मुले
डोळे मिटून राहिले होते उभे

कोणाला ठाऊक त्यांनी काय बघितलं
कोणाला ठाऊक त्यांनी काय अनुभवलं
कदाचित एका क्षणाभरा साठी
बघितलं असेल तिच्या बाबांना तिच्या पाशी

'बाबा तुम्ही माझ्या बरोबर आहात'
ऐकला आला होता तिचा हा आवाज
नंतर जे झालं तो एक चमत्कारच असावा
त्या लोकांच्या डोळ्यांवर विश्वास कसा बसावा

कोणीच नाही हे समजवू शकत होते
कारण सगळ्यांचे डोळे मिटलेले होते,
पण तिच्या जवळ असलेल्या बाकडावर सगळ्यांनी पाहिलेलं
एक तर तरीत गुलाबी गुलाब ठेवलेलं.....