थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
सांगितले बरेच काही..
आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा परी
लावायचा तो लावून गेले..
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे.. हसून खोटे
चाचपले कितिक मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती
चढवायाचे आज राहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

हसून आता.. विसरून सारे
वावरते जणू.. उनाड वारे
हसताना पुन्हा भरले डोळे
पापणीतून अश्रु वाहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

एक साथ अशी हवी..

एक साथ अशी हवी..

एक साथ अशी असावी..

आयुष्यात खूप मोलाच काहीतरी देऊन जाणारी..

आठवणीत नेहमीच राहणारी..


आठवणी अशा असाव्यात..

जेव्हा कधी दुरावा येईल ..

मैलांच अंतर जरी असेल..

तरी नुसत्या आठवणींनेच भेट व्हावी..


एक साथ अशी असावी..

शब्दांवीनाच सगळं काही सांगणारी..

शब्दांचे अर्थ फिके व्हावेत..

ह्रदयातलं सारकाही न सांगताच समजून घेणारी..

एक अशी सोबत असावी..


एक साथ अशी असावी..

रोज नव्या दिवसात नवा जन्म घेणारी..

आयुष्यातले क्षण सुगंधीत करुन टाकणारी..

अशी एक संगत असावी..


एक साथ अशी असावी..

अचानक बरसणार्‍या सरीसारखी..

हिवाळयातल्या गोठ्वणार्‍या थंडीत..

हळूच डोकाऊन ऊब देऊन जाणार्‍या सुर्यकिरणांसारखी.

आता राहू दे दुरावा

आता राहू दे दुरावा
काही काळ सोबतीला
आता ओळख स्वतःची
शोधू दे ग एकट्याला

गुंतताना तुझ्यामध्ये
स्वत्व हरवले माझे
गेलो बदलून असा
विश्व बदलले माझे

ऋतू नेहमी सभोती
फक्त तुझेच राहिले
वेचताना तुझी फुले
माझे फुलणे राहिले

ग्रीष्म लादून घेतला
वसंताला शोधावया
पाहातो ग तुझ्याविना
येतसे का मोहराया

फांदी जुनी आहे तरी
हवा मोहर तिलाही
श्वास तुला द्यावयाला
श्वास हवा ना मलाही ?

भासू दे ग तुला माझी
थोडी उणीव नव्याने
आपलेसे आहे कुणी
ह्याची जाणीव नव्याने

थोडे दूर राहूनिया
आणू नजिक मनाला
जे जे अप्राप्य तयाचे
वाटे अप्रूप मनाला......................

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
सांगितले बरेच काही..
आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा परी
लावायचा तो लावून गेले..
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे.. हसून खोटे
चाचपले कितिक मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती
चढवायाचे आज राहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

हसून आता.. विसरून सारे
वावरते जणू.. उनाड वारे
हसताना पुन्हा भरले डोळे
पापणीतून अश्रु वाहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला

दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला
चेहरा कंटाळवाणा पण अबाधित राहिला
मी सिनेमाला जरी सुरुवातीला कंटाळा लो
फक्त पैसे वसूल व्हावे म्हणून शेवट पाहिला
चार मिळता चार लिहिली ना कमी ना जास्त ही
प्रेमपात्रा ना ही कागद रद्धीचा मी शोधला
नामस्मरणाला सुद्धा दिधली ठराविक वेळ मी
मी किलो आन् ग्रॅम वरती मोक्ष मोजून घेतला
लाल हिरवे दीप येथे पाप पुण्याचे उभे
सोयीचा जो वाटला मी तोच सिग्नल पाळला
मी धुके ही पाहिले आन् धबधबे ही पाहिले
पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला
मी पिझा ही चापतो आन् भाकरी ही हाणतो
घास जो पडला मुखी मी तो रवन्थत ठेवला
भोगताना योग स्मरला योगताना भोग रे
राम ही ना झेपला मज कृष्ण ही ना झेपला
मी मला दिसलो असा की ना जसा दिसलो कुणा
कुरूपतेचा आळ कायम आरशावर ठेवला

आपल्या बाबतीत हे असच चालायच ! चायला हे नहमी आपल्याच बाबतीत का होत?

आपल्या बाबतीत हे असच चालायच !


चायला हे नहमी आपल्याच बाबतीत का होत?


लहान भावने चिडवायचं
मी फक्त त्याला ओरडायचं
आईने ऐकल की मलाच दणकवायचं
सालं आपल नशिबच फुटकं
आपल्या बाबतीत हे असच चालायच...

मोठ्या बहिणिला लाड लाड लाडवायचं
हव नको ते सगळ पुरवायचं
आम्हाला मात्र थोडक्यातच भागवायचं
सालं आपल नशिबच फुटकं
आपल्या बाबतीत हे असच चालायच...

नवीन बाईक साठी बाबांना कटवायचं
निकाल लागल्यावर सगळच बोंबलायचं
जुन्या सायकलवरुनच मग फिरायचं
सालं आपल नशिबच फुटकं
आपल्या बाबतीत हे असच चालायचं...

सिग्नलला बाईक वरच्या युगुलाला बघायचं
त्यांनी खिदळत टाटा करुन खिजवायचं
सायकलला सिटच नाही म्हणत आतुन आतुनच जळायचं
सालं आपल नशिबच फुटकं
आपल्या बाबतीत हे असच चालायचं...

स्टेशनवर एक फुलपाखरु बस मधे चढायचं
आमच्या शेजारी बसता बसता उठायचं
शेजारी मात्र बोजड ओंडकं येवुन बसायचं
सालं आपल नशिबच फुटकं
आपल्या बाबतीत हे असच चालायचं...

धाडस करुन तिला विचारयचं
नाही म्हणत तिनं चांगलच ठुकरायचं
आमच्याच हाताने आम्ही गाल चोळतच बसायचं
सालं आपल नशिबच फुटकं
आपल्या बाबतीत हे असच चालायचं...

वर्गात कुणी तरी मुद्दाम ओरडायचं
मीच तो असं सरांना वाटायचं
नाचक्की करुन मला बाहेर हाकलवायचं
सालं आपल नशिबच फुटकं
आपल्या बाबतीत हे असच चालायचं...

कधीतरी कुणाला पटवायचं
आमच्या कडुनच तिनं पैसे उखळायचं
आम्हला 'थर्ड' लावुन कुणा दुसऱ्याच बरोबर हिंडायचं
सालं आपल नशिबच फुटकं
आपल्या बाबतीत हे असच चालायचं...


हवं तसं कधीच नाही घडायचं
मागतो ते कधीच नाही मिळायचं
नशिबालाच दोष देत आम्ही फक्त म्हणायचं
सालं आपल नशिबच फुटकं
आपल्या बाबतीत हे असच चालायचं.
..

तुझ्या आठवनिनी पापणी ओली केली ...

तुझ्या आठवनिनी पापणी ओली केली ...

कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ... ॥१॥

आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,
मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,
रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥२॥

वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,
क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या,
वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥
घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,
मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,
याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥

संध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,
मित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,
चौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥

किती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,
तुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,
जाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच झाली,
माझ्या आठवणीने, तुझी सुद्धा पापणी ओली केली ...॥४

हा एक हिशोब करुन तर बघा!

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

मैत्रि तुझी अशी असवी,


मैत्रि तुझी अशी असवी,


आयुश्यभर सोबत राहावी,


नको कधि त्यात दुरावा ,


नेहमीच नवा फ़ुलोरा,


मैत्रि अपुली अशी असावी,


सर्वांना एकत्रित अनावी,


हसने रुसने चालत राहवे,


एकमेकांना समजुन घ्यावे,


मैत्रि आपण अशी जगवी,


एकमेकांचा आधार असावी,


सुख दुखात नेहमी सोबत असवी,


असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,


तुझी मझी मैत्रि अशी असावी!!!