भयानक अपघात.........

काल रात्री श्रीरामपूर येथे आमच्या घराशेजारी राहणाऱ्या श्री. जग्गी यांच्या इथे लग्न होते. पंजाबी असल्याने लग्न रात्री ९.३० चे होते (लागले १०.३० ला तो भाग वेगळा). श्रीरामपूर राहुरी पासून फक्त २५ किलोमिटर असल्याने गल्लीतल्या मित्रमंडळींनी बाईक वरच जाण्याचा प्लॅन केला होता. दिवसभर प्रत्येकाने प्रत्येकाला फोन करुन वेळ ठरवली, साडेसातला निघायचे ठरले. त्याप्रमाणे सुहास, अतुल, मिल्या वगैरे वगैरे जमले. गल्लीतले लग्न असल्याने ऐन वेळी मी पण येतो म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली. बाईकस कमी, इच्छूक जास्त असल्याने व रात्री उशीर होणार असल्याने सर्वांच्या घरचे ओरडले. मग अतुलने ट्रक्स काढली, जास्त गर्दी होवू नये म्हणून आमच्या मर्जीतले व ग्रुप (टोळी नव्हे) मधले सदस्य घेवून बाकीच्यांना कल्टी मारुन पुढे निघुन गेलो (त्यांना काय डोक्यावर बसवता काय?). अर्ध्या-पाऊन तासांचा रस्ता एकमेकांचे राहुरी स्टाईल मध्ये 'माप' कढता कढता पाचच मिनीटांत श्रीरामपूर आले असे वाटले. कार्यस्थळी उतऱ्यावर लग्नाला वेळ आहे असे समजल्यावर थोडं फीरुन आलो. लग्न लागल्यावर जेवणंही (महत्वाचे) आटोपले. निघायच्या तयारीत असतांना एकचा मोबाईल खणख़णला, त्यावरुन राहुरी कॉलेजच्या पुढे पल्लवी ढाब्याजवळ 'ऍक्सिडेंट' मध्ये ४ जण जागेवर गेल्याचे समजले. दोनच दिवसांपूर्वी राहुरी कारखान्याजवळ झालेल्या अपघातातहि ४ जण मरण पावले होते, दोनच दिवसांत पुन्हा त्याच रस्त्यावर अपघात झाल्याचे समजताच सर्व हळहळले. नाहि म्हणता म्हणता ब्रेकिंग न्यूज सगळिकडे पसरली, राहुरीलाही पोहोचली.
ज्याच्यात्याच्या घरून काळजीचे फोन्स येवू लागले. आम्ही परतीच्या मार्गाला लागलो, त्या दरम्यानही काहिजण आमच्या गाडित घुसखोरी करण्याच्या टाऊकवर होती, परंतु आमची मित्रमंडळी 'थर्ड' मारण्यात तरबेज असल्याने जेवढे जाताना होतो तेवढेच येतांना निघालो. 'काळजीचे' फोनं चालुच होते. राहुरी तुन प्रेसचे प्रत्येक वर्तमानपत्रास फोटो ई-मेल माझ्याकडूनच होत असल्याने मला पत्रकारांचे फोन्स येवू लागले. मरण पावलेल्यांचा आकडा ९ वर गेला होता.
१५-२० मिनीटांत आम्ही घटनास्थळी पोहोचलो. नुकत्याच 'बॉडीज हलविण्यात आलेल्या होत्या. फोटोग्राफर्स ची फ्लॅशींग चालू होती, गर्दी ही मदत करुन मोकळी झाली होती, प्रत्येक जण तावातावाने 'अनुभव' सांगत होता. दोन्ही गाड्यांचा चुराडा झालेला होता, आसपास रक्ताचा थारोळा पडला होता, प्रवाश्यांचे सामान विखुरलेले होते... रक्त बघुन एकाला भुरळ आली तर एकाला 'उल्टी' झाली. आसपास गाड्यांच्या काचेचा खच पडलेला होता... आम्ही नियतीचा खेळ बघुन खिन्न होवून गाडित बसून घरी आलो. सार्वमतला व लोकसत्ताचे फोटो जात नव्हते, ते मी रात्री १२.१० ला पाठविले, सार्वमतला कंफरमेशन फोन चालू असताना सुहास कॉलवेटींग मधे होता, त्याला माझा फोन झाल्यावर फोन केला, त्यानी ई-टि व्ही ला फोन करुन माहिती दिली होती, ती ब्रेकींग न्यूज बघण्यासाठी त्यानी फोन केला होता. त्या दिवशी लवकर झोप लागलीच नाहि. घटनास्थळावरची द्रुश्ये डोळ्यासमोर येत होती......... निलेश.

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील.............

म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं

म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं
ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

दहावी पर्यंत अभ्यास,
अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

आता थोड तरी कळायला लागलं होत
की प्रेम म्हणजे काय असतं,
पण बारावी म्हणजेआयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

शाळेत असताना मुलीशी
जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

आता मैत्रीनीही खुप आहेत,
पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला,
नाही म्हणाली तरकदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.

कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल
सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!...
पण तेकधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं

फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पावपैसे
कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्तापुन्हा
नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

लव्ह लेटर

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं,
थेट जाउन बोलण्या पेक्शा इझी आणि बेटर असतं,
गोड गुलाबी थंडीतल गुलाबी स्वेटर असतं,
घुसळ घुसळ घुसळलेल्या मनातल बटर असतं.

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे एक सॉंग असतं,
ज्यातल कंटेन्ट राईट आणि ग्रामर रॉंग असतं,
सुचत नाही तेंव्हा तुमच्या हार्ट मधलं पेन असतं,
आणि जेंव्हा सुचतं तेंव्हा नेमक खिचात पेन नसतं,
पटलं तर पप्पी आणि खटकल तर खेटर असतं.

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं,
वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं,
शे की, शे की हातामधून थरथरणार वर्ड असतं,
नुकतचं पंख फ़ुटलेल क्युट क्युट बर्ड असतं,
होप फ़ुलं डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं.

लव्ह लेटर लव्ह लेटर म्हणजे ऍग्रीमेंन्ट असतं,
५० परसेंट सर्टनं आणि ५० परसेंट जजमेंन्ट असतं,
ऑपोनंटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं,
सगळा असतो थेट सौदा,काही सुध्दा लेंन्ड नसतं,
हार्ट देउन हार्ट घ्यायचं सरळ साध बार्टर असतं

अजून काय हवे आहे मला ?

मला आवडलेली व महाजालातून फिरत फिरत आलेली एक कविता -
एकच चहा, तो पण विभागून.....
एकच पिक्चर, तोही पिटात बसून....
एकच साद, ती पण मनापासून...
अजून काय हवे असते मित्राकडून ?

एकच राखी, ती ही घाईत आणून...
एकच चुगली, ती ही खोटे सांगून...
एकच गुपीत, ते ही मोठ्याने बोलून....
अजून काय हवे असते मोठ्या बहिणीकडून ?

एकच कटाक्ष, तोही तिरका बघून....
एकच होकार, तो पण लाजून लाजून...
एकच स्पर्श, तो पण थरथरुन....
अजून काय हवे असते प्रियेकडून?

एकच भुताची गोष्ट, ती पण रंगवून.....
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून....
एकच जोरदार धपाटा, तो पण शीवी हासडून....
अजून काय हवे असते आजीकडून?

एकच मायेची थाप, ती पण कुरवाळून....
एकच गरम पोळी, ती पण तुप लावून....
एकच आशिर्वाद, तो पण आसवे आणून....
अजून काय हवे असते आईकडून?

एकच नकार, तो पण ह्दयावर दगड ठेवून.....
एकच उपदेश, तो पण घोग-या आवाजातून....
एकच नजर अभिमानाची, ती पण मुलाची प्रगती पाहून....
अजून काय हवे असते वडिलांकडुन ?

एकच मिठी, तीही चॉकलेट बघून....
एकच हट्ट, तोही खोटे रडून...
एकच बंधन, तेही मग जाते तुटून ....
अजून काय हवे असते कन्येकडून ?

सगळ्यानी खुप दिले, ते पण न मागून....
स्वर्गच जणू मला मिळाला, तो पण न मरुन....
फ़ाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन...
अजून काय हवे आहे मला आयुष्याकडून ?

ऑरकुटा मुलगा आणि त्याचा बाप

आजच्या ऑरकुटच्या जगात आपण आपल्या दुरदेशीच्या मित्रांसोबत अगदी आरामशीर संपर्कात राहू शकतो. मात्र आपल्या घरच्यांसोबत मात्र आपला संपर्क व संवाद बराच विसंवाद होत चालला आहे. हीच कथा आणि व्यथा विनोदाच्या माध्यमातून आपल्या समोर आणली आहे मुकुंद टाकसाळे यांनी सकाळ या वर्तमानपत्राद्वारे.जे लोक हा अंक वाचू शकले नाहीत त्यांच्यासाठी हे प्रयोजन
अशीच एक जूनमधल्या रविवारची भिजकी सकाळ. बाहेर पाऊस नुसता कोसळतोय! सकाळची आठची वेळ. मी गुडूप पांघरूण घेऊन साखरझोपेत. मला मधुमेह असूनही डॉक्‍टरांनी या झोपेवर बंदी आणलेली नाही, हे नशीबच म्हणायचं! नाही तर ("पहाटेची सॅकरिन झोप घ्या', असं म्हणायलाही हे डायबेटिसचे स्पेशालिस्ट डॉ. गोडबोले कमी करायचे नाहीत.) या साखरझोपेत असताना "एखादा रेडा आपल्या शिंगांनी मला ढुसण्या देऊन उठवतो आहे,' असा भास मला झाला. नंतर लक्षात आलं, की हा "भास' नसून "वास्तव'च आहे. कारण त्या रेड्याची शिंगं मला टोचल्याचं स्पष्ट जाणवत होतं. मी दचकून जागा झालो आणि ताडकन अंथरुणावर उठून बसलो, तर काय आश्‍चर्य! साक्षात विकीच मला एका काठीनं ढोसून जागा करत होता. विकी हा आमचा एकुलता एक मुलगा. सध्या दहावीला आहे. पण अभ्यासाच्या नावानं बोंब! मी मॅट्रिकला होतो तेव्हा आमचे वडील पहाटे पहाटे आमच्या पार्श्‍वभागावर लाथ घालून अभ्यासाला उठवायचे. सध्याच्या आधुनिक मानसशास्त्रात ही आदिम पद्धत बसत नसल्यानं मी मनावर संयम ठेवून त्याला गोड बोलून अभ्यासाला बसवण्याचा प्रयत्न करतो. पण जे मानसशास्त्र मला ठाऊक आहे, ते विकीला ठाऊक नसल्यानं तो माझ्या प्रेमळ स्वभावाचा फायदा घेऊन अभ्यास करायचं टाळतो. नंबर एकचा हूड! कुणाची काय खोडी काढेल, सांगता यायचं नाही. परवा दुपारी माझे सासरे श्रीखंडाचं जेवण करून दुपारचे डाराडूर झोपले होते, तर यानं बाजूला पडलेल्या वर्तमानपत्राच्या कागदाचा तुकडा फाडला आणि त्याची बारीक सुरळी करून सासरेबुवांच्या नाकात घातली. छप्पर कोसळून पडेल अशा शिंका देत बिचारे घाबरून उठले, तर हा फिदीफिदी हसतोय नुसता! माझा "संवादा'वर विश्‍वास असल्यानं मी त्याला समजावून चार चांगले संस्कार त्याच्यावर करण्याच्या प्रयत्नांत असतो. पण तो मी बोलू लागलो की एक तर जांभया देऊ लागतो, नाही तर खिडकीतून बाहेर बघू लागतो, नाही तर सरळ उठून कॉम्प्युटर सुरू करतो आणि तासन्‌तास ऑरकुटवर बसून राहतो. "ऑरकुट' हे काय प्रकरण आहे, ते आजतागायत माझ्या लक्षात आलेलं नाही. एखाद्याला "मारकुटा' जसं म्हणतात तसं गमतीनं त्याला मी "ऑरकुटा' हे विशेषण बहाल करतो. म्हणजे "माझा ऑरकुटा मुलगा- विकी' असं संबोधतो. एखाद्या वैतागवाण्या गोष्टीकडं विनोदानं बघितलं की आपोआपच त्याची तीव्रता कमी होते, असा माझा आजवरचा अनुभव आहे.
तर अशा या विकीनं आठवड्यातून एकदाच येणाऱ्या रविवारी मला माझ्या साखरझोपेतून काठीनं ढोसून उठवल्यामुळे मी त्याच्यावर जोरात खेकसलोच, ""विक्‍या, हा काय आचरटपणा आहे?'' त्याच्या पाठीत धपाटा घालायला माझे हात शिवशिवत होते. दोष माझा नाही. सकाळी झोपेतून उठत असताना आपल्या अबोध मनाला मानसशास्त्र वगैरे आठवत नाही. यावर खीःखीःखीः हसत तो कवायत करणाऱ्या पोलिस शिपायाप्रमाणे हातात काठी घेऊन ताठ उभा राहिला आणि म्हणाला, ""सरप्राइज! सरप्राइज!'' मी काठीवरून माझ्या नजरेचा कॅमेरा टिल्ट-अप करत वरच्या टोकाला नेला आणि आनंदाश्‍चर्यानं थक्कच झालो. काठीच्या वरच्या टोकाला एक बोर्ड होता आणि त्यावर लिहिलेलं होतं, ""हॅप्पी फादरज्‌ डे!'' नंतर त्यानं हेही कमी म्हणून की काय, खिशातून गुलाबाचं एक फूल काढलं आणि कमरेत मोठ्या नम्रपणे वाकून ते एका भेटकार्डाबरोबर माझ्या हातात दिलं. भेटकार्डावर "आय लव यू, डॅडी' असं लिहिलेलं होतं. खाली "देअर इज नो बडी/लाइक यू डॅडी' असली काही तरी कविताही होती. माझ्या डबडबलेल्या डोळ्यांना पुढच्या काव्यपंक्ती वाचताच आल्या नाहीत. शिवाय चष्माही डोळ्यावर नव्हता. तसाही विकी मला "डॅडी' म्हणत नाही, "बाबा' म्हणतो. खरं तर "बाबा' तरी कुठं म्हणतो म्हणा! तो नेहमी मला "पॉप्स' असंच म्हणतो. सुरवातीला तो गमतीनं हे म्हणायचा. नंतर त्याच्या जिभेला तसं वळणच पडलं."पॉप्स, हॅप्पी फादरज्‌ डे!'' सुहास्य वदनानं विकी उद्‌गारला.""थॅंक्‍यू- थॅंक्‍यू.'' मी तत्परतेनं म्हणालो, ""पण हा सण कुठला काढलास?''"तुम्ही मागं मला आपल्या कल्चरची माहिती देताना बैलपोळ्याबद्दल सांगितलं होतं, आठवतंय? हा तसाच सण आहे; पण परदेशी. जसं आपण बैलांशी एक दिवस चांगलं वागतो, त्यांना प्रेमानं वागवतो, तसं या दिवशी...'""आलं लक्षात. मग असाच मदरज्‌ डेही असणार.'' मी आपलं तर्कानं म्हणालो.""असतो ना. मदरज्‌ डे, ब्रदर्ज डे, सिस्टरज्‌ डे... असे तिकडं डेच डे साजरे करतात. प्रत्येकाचा वर्षातून एकेक दिवस. एव्हरी डॉग हॅज हिज डे...'""अरे! अरे, माणसं वेगळी, डॉग वेगळा. "युवा, श्‍वा, मध्वा' हे तिन्ही तू एकत्र गुंफतोयस.'' मी त्याला माझा मुद्दा थोडा अवघड करून सांगितला.",
तर अशा या विकीनं आठवड्यातून एकदाच येणाऱ्या रविवारी मला माझ्या साखरझोपेतून काठीनं ढोसून उठवल्यामुळे मी त्याच्यावर जोरात खेकसलोच, ""विक्‍या, हा काय आचरटपणा आहे?'' त्याच्या पाठीत धपाटा घालायला माझे हात शिवशिवत होते. दोष माझा नाही. सकाळी झोपेतून उठत असताना आपल्या अबोध मनाला मानसशास्त्र वगैरे आठवत नाही. यावर खीःखीःखीः हसत तो कवायत करणाऱ्या पोलिस शिपायाप्रमाणे हातात काठी घेऊन ताठ उभा राहिला आणि म्हणाला, ""सरप्राइज! सरप्राइज!'' मी काठीवरून माझ्या नजरेचा कॅमेरा टिल्ट-अप करत वरच्या टोकाला नेला आणि आनंदाश्‍चर्यानं थक्कच झालो. काठीच्या वरच्या टोकाला एक बोर्ड होता आणि त्यावर लिहिलेलं होतं, ""हॅप्पी फादरज्‌ डे!'' नंतर त्यानं हेही कमी म्हणून की काय, खिशातून गुलाबाचं एक फूल काढलं आणि कमरेत मोठ्या नम्रपणे वाकून ते एका भेटकार्डाबरोबर माझ्या हातात दिलं. भेटकार्डावर "आय लव यू, डॅडी' असं लिहिलेलं होतं. खाली "देअर इज नो बडी/लाइक यू डॅडी' असली काही तरी कविताही होती. माझ्या डबडबलेल्या डोळ्यांना पुढच्या काव्यपंक्ती वाचताच आल्या नाहीत. शिवाय चष्माही डोळ्यावर नव्हता. तसाही विकी मला "डॅडी' म्हणत नाही, "बाबा' म्हणतो. खरं तर "बाबा' तरी कुठं म्हणतो म्हणा! तो नेहमी मला "पॉप्स' असंच म्हणतो. सुरवातीला तो गमतीनं हे म्हणायचा. नंतर त्याच्या जिभेला तसं वळणच पडलं. ""पॉप्स, हॅप्पी फादरज्‌ डे!'' सुहास्य वदनानं विकी उद्‌गारला.""थॅंक्‍यू- थॅंक्‍यू.'' मी तत्परतेनं म्हणालो, ""पण हा सण कुठला काढलास?''"तुम्ही मागं मला आपल्या कल्चरची माहिती देताना बैलपोळ्याबद्दल सांगितलं होतं, आठवतंय? हा तसाच सण आहे; पण परदेशी. जसं आपण बैलांशी एक दिवस चांगलं वागतो, त्यांना प्रेमानं वागवतो, तसं या दिवशी...'' ""आलं लक्षात. मग असाच मदरज्‌ डेही असणार.'' मी आपलं तर्कानं म्हणालो.""असतो ना. मदरज्‌ डे, ब्रदर्ज डे, सिस्टरज्‌ डे... असे तिकडं डेच डे साजरे करतात. प्रत्येकाचा वर्षातून एकेक दिवस. एव्हरी डॉग हॅज हिज डे...'' ""अरे! अरे, माणसं वेगळी, डॉग वेगळा. "युवा, श्‍वा, मध्वा' हे तिन्ही तू एकत्र गुंफतोयस.'' मी त्याला माझा मुद्दा थोडा अवघड करून सांगितला.
""पॉप्स, धिस इज रॉंग. मध्येच संस्कृतमध्ये बोलायचं नाही. बॅड मॅनर्स.""तसं नाही. पण माणसांचे दिवस आणि प्राण्यांचे दिवस सारखेच?''""पॉप्स, आम्ही फ्रेंड्‌स "पेट्‌स डे' पण सेलिब्रेट करतो. त्या दिवशी प्रत्येकाच्या पेटला विश करतात. मानसीनं तर बैलाप्रमाणे तिच्या डॉगीला ओवाळलंसुद्धा... किती छान नं....? "हो हो.'' मी मान हलवत म्हणालो.फादरज्‌ डे, मदरज्‌ डे अशा डेजमागची कन्सेप्ट अशी आहे, की वर्षभर आपण ज्यांच्याशी वाईट वागतो, त्यांच्याशी एक दिवस का होईना, पण चांगलं वागायचं. ते आपल्यासाठी जे काही करतात, त्याबद्दल त्यांना "थॅंक्‍स' द्यायचे. माझं मन मुलाविषयीच्या प्रेमानं भरून आलं. एक दिवस का होईना, पण वडिलांविषयी कृतज्ञता दाखवायची. आपल्या संस्कृतीत हे बसत नाही. आपण वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस बापाबद्दल मनात संतापच वागवत असतो. एखाद्या दिवशी का होईना, पण ही अशी प्रेमाची झुळूक किती छान वाटते! विकीबरोबर संवाद साधण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. मी मनात म्हटलं, आज त्यानंच त्याच्याकडून बर्फ फोडलेला आहे, तर आज ही संधी घेऊन त्याच्याशी संवाद साधू या.""विकी बेटा।-'' मी आवाजात गोडवा आणून सुरवात केली. "प्लीज पॉप्स. आता बोअर मारू नकोस. नाही तर मी जातो.'' विकी उठलाच एकदम."अरे, थांब, थांब. हे बघ, आज तू फादरशी चांगलं वागणार आहेस ना? मग माझ्याशी दोन शब्द गोड बोल तरी. एकमेकांत संवादच नव्हे, तर सुसंवाद हवा. डायलॉग.''\n""म्हणजे तुम्ही डायलॉग मारणार आता? प्लीज...'' असं म्हणून तो उठला आणि कॉम्प्युटरपाशी जाऊन त्यानं ऑरकुटमध्ये डोकं खुपसलं.""विकी, ऑरकुटवर जाऊन तू काय करतोस? तिथल्या मित्रांशी गप्पा मारतोस, बरोबर? अरे, मग मी तुझा मित्रच आहे. माझ्याशी गप्पा मार. माझ्याशी दोन शब्द बोल.'' मी त्याला कळवळून म्हणालो. "पॉप्स, ऑरकुटवर काय गंमत असते ते तुला नाही कळणार.'' विकी कॉम्प्युटर स्क्रीनवरची नजर न हटवता म्हणाला.मुलांना समजावून घ्यायचं तर आपण मूल व्हायला पाहिजे, हे आम्ही साने गुरुजींकडून शिकलो. ऑरकुटची गंमत समजावून घेण्यासाठी मी स्वतःच ऑरकुटचं मेंबर व्हायचं ठरवलं. तसं मेंबर होण्यासाठी कुणी तरी आपल्याला आमंत्रण द्यावं लागतं. माझे सगळे समवयस्क मित्र साधं चहाचं आमंत्रण देणार नाहीत, तिथं ऑरकुटवर कुठलं बोलवायला? शिवाय ते ऑरकुटचे मेंबर नव्हते, हा तांत्रिक भागही महत्त्वाचा होता. पण "इच्छा तिथं मार्ग' म्हणतात, तसं झालं. माझ्या कॉलेजमधील एक वर्गमैत्रिणीनं माझा ई-मेल आयडी कुठून कुठ ून शोधून मला ऑरकुटचं आवातन दिलं. माझ्या डोळ्यासमोर तिचं कॉलेजमधलं रूप तरळत होतं. प्रत्यक्षात ऑरकुटवरल्या फोटोंमध्ये ती त्या काळात तिची आई जशी आणि जेवढी दिसायची, तशी दिसत होती. त्यामुळे तिच्याशी सततचा संवाद साधण्याचा माझा उत्साह काहीसा मावळलाच.\
""पॉप्स, धिस इज रॉंग. मध्येच संस्कृतमध्ये बोलायचं नाही. बॅड मॅनर्स.'' ""तसं नाही. पण माणसांचे दिवस आणि प्राण्यांचे दिवस सारखेच?''""पॉप्स, आम्ही फ्रेंड्‌स "पेट्‌स डे' पण सेलिब्रेट करतो. त्या दिवशी प्रत्येकाच्या पेटला विश करतात. मानसीनं तर बैलाप्रमाणे तिच्या डॉगीला ओवाळलंसुद्धा... किती छान नं....?'' ""हो हो.'' मी मान हलवत म्हणालो.फादरज्‌ डे, मदरज्‌ डे अशा डेजमागची कन्सेप्ट अशी आहे, की वर्षभर आपण ज्यांच्याशी वाईट वागतो, त्यांच्याशी एक दिवस का होईना, पण चांगलं वागायचं. ते आपल्यासाठी जे काही करतात, त्याबद्दल त्यांना "थॅंक्‍स' द्यायचे. माझं मन मुलाविषयीच्या प्रेमानं भरून आलं. एक दिवस का होईना, पण वडिलांविषयी कृतज्ञता दाखवायची. आपल्या संस्कृतीत हे बसत नाही. आपण वर्षाचे तीनशेपासष्ट दिवस बापाबद्दल मनात संतापच वागवत असतो. एखाद्या दिवशी का होईना, पण ही अशी प्रेमाची झुळूक किती छान वाटते! विकीबरोबर संवाद साधण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. मी मनात म्हटलं, आज त्यानंच त्याच्याकडून बर्फ फोडलेला आहे, तर आज ही संधी घेऊन त्याच्याशी संवाद साधू या.""विकी बेटा।-'' मी आवाजात गोडवा आणून सुरवात केली. ""प्लीज पॉप्स. आता बोअर मारू नकोस. नाही तर मी जातो.'' विकी उठलाच एकदम."अरे, थांब, थांब. हे बघ, आज तू फादरशी चांगलं वागणार आहेस ना? मग माझ्याशी दोन शब्द गोड बोल तरी. एकमेकांत संवादच नव्हे, तर सुसंवाद हवा. डायलॉग.'' ""म्हणजे तुम्ही डायलॉग मारणार आता? प्लीज...'' असं म्हणून तो उठला आणि कॉम्प्युटरपाशी जाऊन त्यानं ऑरकुटमध्ये डोकं खुपसलं.""विकी, ऑरकुटवर जाऊन तू काय करतोस? तिथल्या मित्रांशी गप्पा मारतोस, बरोबर? अरे, मग मी तुझा मित्रच आहे. माझ्याशी गप्पा मार. माझ्याशी दोन शब्द बोल.'' मी त्याला कळवळून म्हणालो. ""पॉप्स, ऑरकुटवर काय गंमत असते ते तुला नाही कळणार.'' विकी कॉम्प्युटर स्क्रीनवरची नजर न हटवता म्हणाला.मुलांना समजावून घ्यायचं तर आपण मूल व्हायला पाहिजे, हे आम्ही साने गुरुजींकडून शिकलो. ऑरकुटची गंमत समजावून घेण्यासाठी मी स्वतःच ऑरकुटचं मेंबर व्हायचं ठरवलं. तसं मेंबर होण्यासाठी कुणी तरी आपल्याला आमंत्रण द्यावं लागतं. माझे सगळे समवयस्क मित्र साधं चहाचं आमंत्रण देणार नाहीत, तिथं ऑरकुटवर कुठलं बोलवायला? शिवाय ते ऑरकुटचे मेंबर नव्हते, हा तांत्रिक भागही महत्त्वाचा होता. पण "इच्छा तिथं मार्ग' म्हणतात, तसं झालं. माझ्या कॉलेजमधील एक वर्गमैत्रिणीनं माझा ई-मेल आयडी कुठून कुठ ून शोधून मला ऑरकुटचं आवातन दिलं. माझ्या डोळ्यासमोर तिचं कॉलेजमधलं रूप तरळत होतं. प्रत्यक्षात ऑरकुटवरल्या फोटोंमध्ये ती त्या काळात तिची आई जशी आणि जेवढी दिसायची, तशी दिसत होती. त्यामुळे तिच्याशी सततचा संवाद साधण्याचा माझा उत्साह काहीसा मावळलाच.
पण त्या निमित्तानं मी ऑरकुटवर भरपूर भ्रमंती केली. एक अभ्यासाचा भाग म्हणून अर्थात. आपला मुलगा तिथं जाऊन काय करतो, कुणाशी गप्पा मारतो, त्याचे मित्र कोण, मैत्रिणी कोण, तो त्यांच्याशी काय बोलतो.... या वयात मुलाला एवढे मित्र आणि मुख्य म्हणजे मैत्रिणी आहेत, हे पाहून मन थक्क झालं.\nहे सारे मित्र पुण्यातलेच, आसपास राहणारे, रोज भेटणारे, असे असताना हा त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद न साधता ऑरकुटवर जाऊन काय गप्पा मारतो? "दोन डोळे शेजारी- भेट नाही संसारी' असा सगळा प्रकार. मुलाला ""बाबा रे, ही सारी व्हर्च्युअल रिऍलिटी आहे. खऱ्या हाडामांसाच्या माणसांना भेट. त्यांच्याशी थेट बोल. त्यांना समजावून घे. खरी "माणसं' वेगळीच असतात रे बाळा...'' असं कळवळून सांगावंसं वाटलं. पण हे सांगण्यासाठी तरी तो समोर भेटायला हवा ना?\nमुलाला ऑरकुटवर "सरप्राइज! सरप्राइज!! सरप्राइज पॉप्स!!!' असा गमतीशीर मेसेज ठेवला. म्हटलं, संवादाचा हा मार्ग अवलंबू या. संवादाचं "माध्यम' महत्त्वाचं नाही, "संवाद' महत्त्वाचा.दुसऱ्याच दिवशी विकी गंभीर चेहऱ्यानं माझ्याशी बोलायला आला, ""बाबा, हे काय लावलंय तुम्ही?''\nविकी रागावला की मला "बाबा' म्हणतो. त्यामुळे प्रसंगाचं गांभीर्य माझ्या तत्क्षणी लक्षात आलं. ""तुम्ही ऑरकुटवर का आलात? आणि माझी, माझ्या फ्रेंडचे अकाउंट उघडून वाचलेत ना? लाज- लाज आणलीत बाबा तुम्ही. एखाद्याचे वडील मेंबर होणं हे फार लाजिरवाणं मानतात....''\n""अरे, पण तुझ्याशी संवाद साधावा म्हणूनच हे सारं...'' मी खुलासा करू लागलो.""बाबा, मी फायनल वॉर्निंग देतो... क्वीट ऑरकुट! एक तर तुम्ही तरी बाहेर व्हा, नाही तर मी तरी होतो. ऑरकुटवर आपल्या दोघांपैकी कुणी तरी एकच राहील.'' त्यानं निर्वाणीच्या सुरात सांगून टाकलं. विकीचा त्याच्या मित्र-मैत्रिणींशी असणारा संवाद ?ुटायला नको म्हणून मीच ऑरकुटमधून बाहेर पडायचं ठरवलं.\nपूर्वीचे बाप मुलांना बडवायचे, वाट्टेल तसे बोलायचे, शिव्या घालायचे. मुलांशी संवाद साधण्याची ही रासवट पद्धत आता मागं पडली. मी प्रेमानं विकीला समजावून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचं भावविश्‍व जाणून घेण्याचा, त्याच्याशी गोडीगुलाबीनं संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याला बापाशी बोलण्याचीच इच्छा नव्हती. किंबहुना तो मी त्याच्यासमोर आलो रे आलो की मांजराला पाहून उंदरानं पळून जावं तसा लगेचच तो काढता पाय घ्यायचा.\
पण त्या निमित्तानं मी ऑरकुटवर भरपूर भ्रमंती केली. एक अभ्यासाचा भाग म्हणून अर्थात. आपला मुलगा तिथं जाऊन काय करतो, कुणाशी गप्पा मारतो, त्याचे मित्र कोण, मैत्रिणी कोण, तो त्यांच्याशी काय बोलतो.... या वयात मुलाला एवढे मित्र आणि मुख्य म्हणजे मैत्रिणी आहेत, हे पाहून मन थक्क झालं. हे सारे मित्र पुण्यातलेच, आसपास राहणारे, रोज भेटणारे, असे असताना हा त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद न साधता ऑरकुटवर जाऊन काय गप्पा मारतो? "दोन डोळे शेजारी- भेट नाही संसारी' असा सगळा प्रकार. मुलाला ""बाबा रे, ही सारी व्हर्च्युअल रिऍलिटी आहे. खऱ्या हाडामांसाच्या माणसांना भेट. त्यांच्याशी थेट बोल. त्यांना समजावून घे. खरी "माणसं' वेगळीच असतात रे बाळा...'' असं कळवळून सांगावंसं वाटलं. पण हे सांगण्यासाठी तरी तो समोर भेटायला हवा ना? मुलाला ऑरकुटवर "सरप्राइज! सरप्राइज!! सरप्राइज पॉप्स!!!' असा गमतीशीर मेसेज ठेवला. म्हटलं, संवादाचा हा मार्ग अवलंबू या. संवादाचं "माध्यम' महत्त्वाचं नाही, "संवाद' महत्त्वाचा.दुसऱ्याच दिवशी विकी गंभीर चेहऱ्यानं माझ्याशी बोलायला आला, ""बाबा, हे काय लावलंय तुम्ही?'' विकी रागावला की मला "बाबा' म्हणतो. त्यामुळे प्रसंगाचं गांभीर्य माझ्या तत्क्षणी लक्षात आलं. ""तुम्ही ऑरकुटवर का आलात? आणि माझी, माझ्या फ्रेंडचे अकाउंट उघडून वाचलेत ना? लाज- लाज आणलीत बाबा तुम्ही. एखाद्याचे वडील मेंबर होणं हे फार लाजिरवाणं मानतात....'' ""अरे, पण तुझ्याशी संवाद साधावा म्हणूनच हे सारं...'' मी खुलासा करू लागलो.""बाबा, मी फायनल वॉर्निंग देतो... क्वीट ऑरकुट! एक तर तुम्ही तरी बाहेर व्हा, नाही तर मी तरी होतो. ऑरकुटवर आपल्या दोघांपैकी कुणी तरी एकच राहील.'' त्यानं निर्वाणीच्या सुरात सांगून टाकलं. विकीचा त्याच्या मित्र-मैत्रिणींशी असणारा संवाद ?ुटायला नको म्हणून मीच ऑरकुटमधून बाहेर पडायचं ठरवलं. पूर्वीचे बाप मुलांना बडवायचे, वाट्टेल तसे बोलायचे, शिव्या घालायचे. मुलांशी संवाद साधण्याची ही रासवट पद्धत आता मागं पडली. मी प्रेमानं विकीला समजावून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचं भावविश्‍व जाणून घेण्याचा, त्याच्याशी गोडीगुलाबीनं संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याला बापाशी बोलण्याचीच इच्छा नव्हती. किंबहुना तो मी त्याच्यासमोर आलो रे आलो की मांजराला पाहून उंदरानं पळून जावं तसा लगेचच तो काढता पाय घ्यायचा.
वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमध्ये सारे जण "मुलांशी संवाद साधा' असं कानीकपाळी ओरडून सांगत असतात. पूर्वी म्हणायचे, निदान जेवणाच्या टेबलावर तरी सारे जण एकत्र गप्पा मारत जेवण घ्या. म्हणून मी आणि शुभा (माझी धर्मपत्नी), आम्ही दोघांनाही रात्रीचं जेवण न चुकता विकीबरोबरच घ्यायचं, असं ठरवलं. पण तो त्याची प्लेट उचलून सरळ बाहेर टीव्हीसमोर जाऊन बसायचा आणि एकता कपूरची "कौन करता है प्यार?' ही हिंदी मालिका पाहत बसायचा. (त्या वेळी हे ऑरकुटचं फॅड नव्हतं.) तो काय बघतो हे बाप या नात्यानं जाणून घेणं हा माझ्या कर्तव्याचाच भाग होता. त्यामुळे तो बाहेर येऊन टीव्ही पाहू लागला की मीही त्याच्यापाठोपाठ माझी प्लेट घेऊन येऊन बसायचो. रोज बघून बघून मलाही "कौन करता है प्यार?' मालिकेची गोडी लागली. मग बिचारी शुभा एकटीच आत जेवत का बसेल? तीही आमच्या मालिकानंदात सहभागी झाली.\nआमच्यात संवाद जर झालाच तर "कौन करता है प्यार?' या मालिकेविषयीच व्हायचा. म्हणजे आता कम्मो कुणालशी लग्न करणार की रोहितशी? परमिंदरनंच कम्मोच्या डॅडींना मारलं असणार. चॉंदनी नेमकी कुणाची मुलगी?.... या गंभीर प्रश्‍नांवर आमच्यात गंभीर चर्चा व्हायची. विकीच्या जरी नाही तरी मालिकेतल्या पात्रांच्या भवितव्याविषयी (का होईना, पण) आमच्यात संवाद व्हायचा. संवाद व्हायचा, हे महत्त्वाचं. मोठा मजेचा काळ होता तो. ऑरकुट सुरू झालं आणि आमचं तेही सुख हरपलं.\nअसेच एका संध्याकाळी गावाकडं माझे काका वारले. तसं त्यांचं वय झालेलंच होतं. संध्याकाळी सहाला ते गेले, तेव्हापासून रात्री बारापर्यंत विकी ऑरकुटवर बसला होता. त्यामुळे चुलतभावाचा फोन आमच्यापर्यंत पोचू शकला नाही. त्यामुळे आमचं अंत्यदर्शन हुकलं. हे फार मोठं नुकसान झालं, अशातला भाग नाही. जिवंत असतानासुद्धा त्यांचं तोंड फार पाहण्यासारखं होतं, अशातला भाग नाही. पण या प्रसंगानं "लॅंडलाइन दीर्घकाळ अडून राहणं बरोबर नाही,' हा साक्षात्कार आम्हाला घडला.\nब्रॉडब्रॅंड घेणं हा एक त्यावरचा उपाय होता. पण त्याचं कनेक्‍शन सहजी मिळत नव्हतं. तशात विकीचा सोळावा वाढदिवस मध्येच आला आणि ते निमित्त साधून मी त्याला नोकियाचा एक झकास मोबाईल सेट भेट दिला.""वौ!'' विकीचे डोळे लकाकले. ""पॉप्स, यू आर ग्रेट!'' तो प्रेमाचं भरतं येऊन म्हणाला.\n""आता तुझ्याजवळ, आईजवळ आणि माझ्याजवळ सेलफोन आलेला आहे. तेव्हा आता रोजच्या रोज पॉप्सला, आईला भरपूर फोन करायचे, काय?'' मी कौतुकाच्या अंगानं त्याला इष्ट तो मेसेज दिला आणि त्याचबरोबर लॅंडलाइनचा फोन आमच्या नातेवाइकांसाठी खुला करून दिला. प्रत्यक्षात एकमेकांशी बोलायला तर सोडाच, पण आमनेसामने यायलाही आम्हा तिघांनाही वेळ व्हायचा नाही. एक तर दहावीचे क्‍लासेस करता करता विकीचा पार पिट्ट्या पडायचा. त्यामुळे नाही म्हटलं तरी मोबाईल फोनमुळे आमच्यातला संवाद वाढला, यात शंकाच नाही. आता घरी येण्याला उशीर होणार असेल तर आम्ही एकमेकांना सेलफोनवर मेसेज देऊ लागलो. एखादा चुटका आवडला तर विकी तो लगेचच आम्हाला फॉरवर्ड करायचा आणि मग तो चुटका वाचून आमची हसता हसता पुरेवाट व्हायची. आता फादरज्‌ डेचा, मदरज्‌ डेचा मेसेज विकी मोबाईलवरूनच आमच्याकडे धाडू लागला. मित्रमैत्रिणींशी मोबाईलवरून तो खुशाल दीड दीड- दोन दोन मिनिटं गप्पा मारत बसायचा. पण आम्ही आई-बाप मात्र दोन ओळींच्या मेसेजचे धनी. मेसेज तर मेसेज. तुका म्हणे त्यातल्या त्यात....
वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमध्ये सारे जण "मुलांशी संवाद साधा' असं कानीकपाळी ओरडून सांगत असतात. पूर्वी म्हणायचे, निदान जेवणाच्या टेबलावर तरी सारे जण एकत्र गप्पा मारत जेवण घ्या. म्हणून मी आणि शुभा (माझी धर्मपत्नी), आम्ही दोघांनाही रात्रीचं जेवण न चुकता विकीबरोबरच घ्यायचं, असं ठरवलं. पण तो त्याची प्लेट उचलून सरळ बाहेर टीव्हीसमोर जाऊन बसायचा आणि एकता कपूरची "कौन करता है प्यार?' ही हिंदी मालिका पाहत बसायचा. (त्या वेळी हे ऑरकुटचं फॅड नव्हतं.) तो काय बघतो हे बाप या नात्यानं जाणून घेणं हा माझ्या कर्तव्याचाच भाग होता. त्यामुळे तो बाहेर येऊन टीव्ही पाहू लागला की मीही त्याच्यापाठोपाठ माझी प्लेट घेऊन येऊन बसायचो. रोज बघून बघून मलाही "कौन करता है प्यार?' मालिकेची गोडी लागली. मग बिचारी शुभा एकटीच आत जेवत का बसेल? तीही आमच्या मालिकानंदात सहभागी झाली. आमच्यात संवाद जर झालाच तर "कौन करता है प्यार?' या मालिकेविषयीच व्हायचा. म्हणजे आता कम्मो कुणालशी लग्न करणार की रोहितशी? परमिंदरनंच कम्मोच्या डॅडींना मारलं असणार. चॉंदनी नेमकी कुणाची मुलगी?.... या गंभीर प्रश्‍नांवर आमच्यात गंभीर चर्चा व्हायची. विकीच्या जरी नाही तरी मालिकेतल्या पात्रांच्या भवितव्याविषयी (का होईना, पण) आमच्यात संवाद व्हायचा. संवाद व्हायचा, हे महत्त्वाचं. मोठा मजेचा काळ होता तो. ऑरकुट सुरू झालं आणि आमचं तेही सुख हरपलं. असेच एका संध्याकाळी गावाकडं माझे काका वारले. तसं त्यांचं वय झालेलंच होतं. संध्याकाळी सहाला ते गेले, तेव्हापासून रात्री बारापर्यंत विकी ऑरकुटवर बसला होता. त्यामुळे चुलतभावाचा फोन आमच्यापर्यंत पोचू शकला नाही. त्यामुळे आमचं अंत्यदर्शन हुकलं. हे फार मोठं नुकसान झालं, अशातला भाग नाही. जिवंत असतानासुद्धा त्यांचं तोंड फार पाहण्यासारखं होतं, अशातला भाग नाही. पण या प्रसंगानं "लॅंडलाइन दीर्घकाळ अडून राहणं बरोबर नाही,' हा साक्षात्कार आम्हाला घडला. ब्रॉडब्रॅंड घेणं हा एक त्यावरचा उपाय होता. पण त्याचं कनेक्‍शन सहजी मिळत नव्हतं. तशात विकीचा सोळावा वाढदिवस मध्येच आला आणि ते निमित्त साधून मी त्याला नोकियाचा एक झकास मोबाईल सेट भेट दिला.""वौ!'' विकीचे डोळे लकाकले. ""पॉप्स, यू आर ग्रेट!'' तो प्रेमाचं भरतं येऊन म्हणाला. ""आता तुझ्याजवळ, आईजवळ आणि माझ्याजवळ सेलफोन आलेला आहे. तेव्हा आता रोजच्या रोज पॉप्सला, आईला भरपूर फोन करायचे, काय?'' मी कौतुकाच्या अंगानं त्याला इष्ट तो मेसेज दिला आणि त्याचबरोबर लॅंडलाइनचा फोन आमच्या नातेवाइकांसाठी खुला करून दिला. प्रत्यक्षात एकमेकांशी बोलायला तर सोडाच, पण आमनेसामने यायलाही आम्हा तिघांनाही वेळ व्हायचा नाही. एक तर दहावीचे क्‍लासेस करता करता विकीचा पार पिट्ट्या पडायचा. त्यामुळे नाही म्हटलं तरी मोबाईल फोनमुळे आमच्यातला संवाद वाढला, यात शंकाच नाही. आता घरी येण्याला उशीर होणार असेल तर आम्ही एकमेकांना सेलफोनवर मेसेज देऊ लागलो. एखादा चुटका आवडला तर विकी तो लगेचच आम्हाला फॉरवर्ड करायचा आणि मग तो चुटका वाचून आमची हसता हसता पुरेवाट व्हायची. आता फादरज्‌ डेचा, मदरज्‌ डेचा मेसेज विकी मोबाईलवरूनच आमच्याकडे धाडू लागला. मित्रमैत्रिणींशी मोबाईलवरून तो खुशाल दीड दीड- दोन दोन मिनिटं गप्पा मारत बसायचा. पण आम्ही आई-बाप मात्र दोन ओळींच्या मेसेजचे धनी. मेसेज तर मेसेज. तुका म्हणे त्यातल्या त्यात....
एकदा तो असाच नेटवर गुंगलेला असताना मध्येच माझ्याकडं वळून म्हणाला, ""पॉप्स, सी... आता अमेरिकेत ना प्लॅंचेट करणारे आत्म्यांना थेट मोबाईलवरच बोलवतात.''""काय सांगतोस काय तू?'' मी आश्‍चर्यानं उद्‌गारलो.""हे पाहा, इथं म्हटलंय, आता आत्म्यांना प्लॅंचेट बोर्डावर बोलावणं ही कन्सेप्ट जुनी झाली. आता थेट मोबाईलवरच आत्मे बोलावण्याचा शोध तिकडल्या एका एक्‍झॉरसिस्टनं लावलेला आहे. साधारणपणे आयएसडीच्या रेटमध्ये आपण मृतात्म्यांशी वाट्टेल तितका वेळ संवाद साधू शकतो. ग्रेट ना?"ग्रेटच! प्रश्‍नच नाही.'' मी उत्तरलो.""ही टेक्‍नॉलॉजी इंडियात यायला आता फार टाइम लागणार नाही, नाही का?'' विकीनं विचारलं.""मुळीच नाही. एक-दोन महिन्यांतच ती इथं येईल.''\n""ती इंडियात आली आणि सपोज तुम्ही वारलात ना पॉप्स, तर मी मोबाईलवरून तुमच्याशी खूप खूप गप्पा मारीन.'' विकी निरागसपणे म्हणाला.माझे डोळे आनंदानं डबडबून वाहू लागले. म्हणजे मेल्यानंतर का होईना, पण हे भाग्य माझ्या वाट्याला येणार होतं तर!
एकदा तो असाच नेटवर गुंगलेला असताना मध्येच माझ्याकडं वळून म्हणाला, ""पॉप्स, सी... आता अमेरिकेत ना प्लॅंचेट करणारे आत्म्यांना थेट मोबाईलवरच बोलवतात.''""काय सांगतोस काय तू?'' मी आश्‍चर्यानं उद्‌गारलो. ""हे पाहा, इथं म्हटलंय, आता आत्म्यांना प्लॅंचेट बोर्डावर बोलावणं ही कन्सेप्ट जुनी झाली. आता थेट मोबाईलवरच आत्मे बोलावण्याचा शोध तिकडल्या एका एक्‍झॉरसिस्टनं लावलेला आहे. साधारणपणे आयएसडीच्या रेटमध्ये आपण मृतात्म्यांशी वाट्टेल तितका वेळ संवाद साधू शकतो. ग्रेट ना?'' ""ग्रेटच! प्रश्‍नच नाही.'' मी उत्तरलो.""ही टेक्‍नॉलॉजी इंडियात यायला आता फार टाइम लागणार नाही, नाही का?'' विकीनं विचारलं.""मुळीच नाही. एक-दोन महिन्यांतच ती इथं येईल.'' ""ती इंडियात आली आणि सपोज तुम्ही वारलात ना पॉप्स, तर मी मोबाईलवरून तुमच्याशी खूप खूप गप्पा मारीन.'' विकी निरागसपणे म्हणाला.माझे डोळे आनंदानं डबडबून वाहू लागले. म्हणजे मेल्यानंतर का होईना, पण हे भाग्य माझ्या वाट्याला येणार होतं तर!

"नशा शराब मे होता तो नाचती बोतल!!"




लग्नानंतर बदलणाऱ्या सवयींमधली सर्वात महत्वाची म्हणजे दारुची सवय. हवी तेव्हा हवी तशी पिणारे, बरेचदा पासधारक बनतात. काही महिन्याचे असतात, काही आठवड्यावाले होतात, मला अजुन वार लावुन पास मिळवणारे भेटायचे आहेत. ऐकुन आहे की लग्नाला वर्षे उलटल्यावर पासाची मुदत वाढते, आणि बसमध्ये जशी "जेष्ठ नागरीक" सुट मिळते तशी मिळु लागते. कितीही झाले तरी जुन्या मित्रांबरोबर ढाब्यावर बसण्याची (अर्थातच प्यायला) मजा वेगळीच. "सुखमे पियो, दुःख मे पियो, दोनोभी नही इस लिये पियो" असे असणाऱ्यांना दारुडा/बेवडा/पेताड असे अनेक शब्द आहेत. त्यांच्याविषयी मी बोलत नाहीये. मला म्हणायची आहे सर्वसामान्य जनता, जी मित्रांबरोबर सामाजीक बांधीलकी अशा आदरजन्य नावासाठी पिते. दारु पिणे वाईट आहे हे माहीत असुनही फक्त मित्रांबरोबर चांगला वेळ घालवताना उर्जाद्रव्य (Energy Drink) म्हणुन पिते. असे लोक दारुच्या आहारी कधीच जात नाहीत. यांना फार कमी गोष्टीची चिंता करावी लागते, आज बील कोण देणार? आणि आज रात्री झोपायची व्यवस्था कोठे आहे? घर वर्ज असते, मग मित्राची गच्ची, रिकामा फ्लॅट, होस्टेलचा बंक असा सारासार विचार करुन प्लान बनायचा. काहीजण असतात जे फक्त सावरकर म्हणुनच जन्माला आलेले असतात, डोलकर होण्यात त्यांना अजिबात रस नसतो. माझे काही मित्र तर असे आहेत की चेहऱ्यावरुन पक्के लावाडी कामगार दिसतात, पण त्यांनी दारु कधीही प्यायलेली नसते. कॊणालाही सांगा ते पीत नाहीत, विश्वास बसणे अशक्य, आरश्यात बघता त्यांचा पण बसत नाही. म्हणजे असे लोक जे जन्मजात काळे ओठ घेऊन आले, आणि विना धुरकांडीचे धुराडे झाले. अशा सर्व बांधवांना साष्टांग दंडवत. ह्यानी फक्त धुंदी ठेवायची आणि वाईट सवयी न लाऊन घेता मजा घ्यायची...अर्थात जर शिकत असाल तर असे प्लान फक्त होस्टेल मध्येच होतात आणि होस्टेल मध्ये अमलात येतात, बाटलीसाठी वर्गणी असते आणि फुकटे जीव एकदम निषिद्ध असतात. कधीतरी बकरा असेल तर, आमंत्रणे "आईजीच्या जीवावर... " या नियमाने वाटली जातात. पण जर थोडे फार कमवत असाल तर बाहेरची चंगळ असते. कितीही कमवत असला तरी ज्याला वर्गणीची पुर्ण चिंता असते, पुर्ण प्यायल्यावर ज्याला जुनी उधार पण आठवते, ज्याला बारमधुन बाहेर पडताना बील चेक करता येते, असे मित्र जगात फक्त मलाच आहेत का? अगोदर दारु न पिणारे पण मजेसाठी येणारे मित्र यायचे, चकणा खाण्यासाठी सगळ्यात पुढे असायचे, मग नियम आले, शिस्त आली, टेबलावर असणाऱ्या साऱ्यांनी समान वर्गणी द्यावी असे ठरल्यावर नेहमीचे चकणे सुधारले. चीज, शेंगदाणे, किंवा बारमध्ये मिळ्णारे फुकटचा चकणा आता आवडेनासा झाला. मग चीज-पाईनॅपल किंवा शेझवान सॉस-नान असे येऊ लागले. कारण न पिता वर्गणी द्यावी लागत असेल तर चकण्यात वसुली करावी हा भोळाभाबडा विचार हे सावरकर करू लागतात.त्यात भारतात शराबी गाणी न पिता पाजतात. अशी अनेक गाणी आहेत जी दारू बरोबर चकण्यासारखी जातात. महाविद्यालयीन दिवसात मिळेल ते पिणारे लोक हळुहळु "ब्रॅन्ड" धारक होतात. मग रॉयल स्टॅग, जोहनी वोकर परवडु लागते. काहीजण अजुनही बीअरच चाखत असतात. फक्त त्याचे नंबर वाढु लागतात, Cannon 5000, 10000.... जीन, रम, व्हिस्की आणि बीअर यातच लोक अदलाबदल करतात. इतर ग्लासांच्या गर्दीत आपला ग्लास ओळखणे हे पण एक कौशल्य असते. ते फक्त सरावाने जमते. टेबलावरचा एखादा पोटातले पाणी कमी करायला गेला की त्याच्या ग्लासात इतर प्रकारची दारु मिसळली जाते, तुम्हाला काय मी सांगणार की याला कॉकटेल म्हणतात. सराईत असणाऱ्याला ग्लासातला फरक समजतो, पण नवा मात्र मित्रविश्वासावर हे नवे सरबत घशाखाली उतरवतो, आणि भसाभस ओकतो. त्याला सावरकर प्रेमात सांभाळतात. पाठीवरुन हात फिरवताना आपण जगातले सर्वात प्रेमळ पात्र असल्याचा भाव तोंडावर असतो. असे सावरकर ही कथा स्वतःच्या प्रेमकथेपेक्षा जास्त चवीने ओकतात, म्हणजे कथन करतात. जमले तर लिंबु सरबत, कॉफी असे घरगुती उपचार पण होतात. ओकणारा परत कधी पिणार नाही असे ठरवतो. असे कधीच होत नाही, एकंदरीत दारु प्यायल्यावर तुमची स्मरणशक्ती कमी होते, दुसऱ्या दिवशीच तो हा प्रण विसरतो आणि लवकरच अशा स्नेह-संमेलनात हौशी कलाकार म्हणुन सामील होतो.अमेरीकेत जर आल्यावर तर मात्र सगळे बदलते. बाटलीतल्या पाण्यापेक्षा कुपन लावुन मिळालेली कॅनवाली बीअर स्वस्त असते. नेहमीच्या जेवणाखाण्यातच मदिरा असते, येथे सामाजीक जीवनात दारुचे फार महत्व आहे. अगदी रुळलेली "Pick-up line" म्हणजे, "Can I buy you a Drink?" अशी आहे. शॅम्पेनचे नाव घेताच सुखाची भावना येते.... किंवा तकीला म्हणतात जल्लोष आठवतो कारण येथे दारुला चवीचा अंतरा आहे, निरनिराळ्या ग्लासांचा मुखडा आहे, प्रत्येकीला जन्मगांव आहे, आणि गांवावर तीचे नाव आहे. येथे दारु आणि प्रसंग यांचे नाते आहे, त्यात प्रत्येक प्रकाराची आपली आपली ओळख आहे. बाटलीतुन ग्लासात येण्या अगोदर तीला नटवण्याची प्रथा आहे. त्यात वेगवेगळ्याप्रकारे चढवण्याची लकब आहे. काही ठिकाणी जर ती मनोरंजनाचे साधन असेल तर, काही थंड ठिकाणी ती जीवनावश्यक पण आहे. सर्वात महत्वाचे येथे पिण्याच्या प्रमाणाला पण चवी एवढीच किम्मत आहे आणि येथे दारुच्या आहारी जाणाऱ्याला जगात इतर ठिकाणी मिळते तेवढीच किम्मत आहे. शॅम्पेन, रम, व्हिस्की, ब्रॅन्डी, तकीला, व्होडका, बीअर अशा अनेक प्रकारच्या दारुंपासुन बनवलेले हजारो कॉकटेलस मिळतात. दारु बरोबर दुध, मध, फळांचे रस, फळे, मलाई, काही मसाले, सोडापाणी, काही फुले अशा नानाप्रकारच्या साधनांपासुन बनवली जातात. ती नुसती प्यायला नव्हे तर दिसयला पण मोहक असावीत यावर भर असतो. त्याशिवाय काही लोकांची आवडती कॉकटेलस, शॉट्स म्हटली जातात. मार्टीनी, यीगर बाम, स्क्रु-ड्रायव्हर अशा अनेक प्रकारांनी अमेरीका वेडी आहे. बरेचदा काय प्यावे हा प्रश्न पडावा अशी मायानगरी म्हणजे बार. अमेरीकेत सलान-हाऊस हा प्रकार कित्येक पिढ्या करत आहेत. Jack-Daniels, Johney Walker, Chiva's Regal अशा अनेक कंपन्या जगप्रसिध्द आहेतच. सर्वात महत्वाची शौकीन दारू म्हणजे, वाईन, लाल-पांढरी, बनवण्याची पद्धत, चव, रंग, द्राक्षाचे प्रकार, द्राक्षे होणारी जागा, वय आणि बनवणारी वाईनरी अशा अनेक प्रकारे हीचे वर्गीकरण होते. वाईनच्या बाटल्या जमा करणे हा अनेकांचा छंद असतो. लोक वाईन मुरवुन पितात, त्यासाठी त्यांच्या पोटमाळ्यावर साठवण्याची सोय करुन ठेवतात. वाईन-चाखण्याचे वेगळे कार्यक्रम होतात, फक्त वाईनचे बार असतात. देसी भारतात जाताना प्रियजनांसाठी येथुन दारु अवश्य घेऊन जातात. जमली तर युरोपात खरेदी करतात. पण फार कमी देसी बायकोच्या संमतीने पितात. भारतीय स्त्रीजनांमध्ये दारू शौकीन फार कमी आहेत, पण ते प्रमाण नक्कीच वाढते आहे. त्यांना पण समजते आहे की, "नशा शराब मे होता तो नाचती बोतल!!" अमिताभचा शराबी बघताना हे वाक्य कोणीच विसरु शकणार नाही, जे अगदी खरे आहे, नशा दारुत नसते, मित्रांच्या संगतीत असते, प्रसंगाच्या महत्वात असते, पाजणाऱ्याच्या डोळ्यात असते, पिणाऱ्याच्या मनात असते, चकण्याच्या थाळीत असते, बील देणाऱ्याच्या पाकीटात नसेल तर फुकट पिणाऱ्याच्या समाधानात असते, फक्त टेबलावर बसला म्हणुन बीलाची वर्गणी देणाऱ्या मित्राच्या चिडचिडीत असते. ज्यांना ही आंतरीक नशा कमी पडते ते दारू पिऊन त्याची गोडी चाखतात, धुंद होऊन वेळेची किम्मत राखतात. प्यावी, मी म्हणतो पिण्यात काही गैर नाही, त्याचा अतिरेक वाईट आहे. उगाच न पचेल एव्हढी पिऊन इतरांच्या नशेत कमी आणणारे पेताड/बेवाडे ही धुंदी कधी समजलेच नाहीत .. आणि त्यांना ती कधी समजणारही नाही....

माझ्याकडील एक छान संग्रहित कविता.

एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच
ती देऊन हात, घेऊन गेली

होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत

गोड गप्पा नव्हत्या थांबत
सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत

हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची

तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात

काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !
-------निलेश

माझे आगमन!!!!!

ब्लॉग वरचे आज माझे पहिलेच लिखान. खूप दिवसांपासुन ब्लॉग वर खाते उघडायचे चालले होते, आज ते उघडले, माझे ब्लॉगवर आगमन झाले. आता काय लिहावे बरे???????????? जाउद्या परत ऑनलाईन आल्यावर लिहू. आज सुरुवात तर झाली, आता माझ्या बोरिंग पणाला झेलायला सज्ज व्हा.