कधी हे बोलले मला.....

सुधर सुधर…
चल ए काम कर ए
ओ भाऊ नो एण्ट्री दिसली का?
सुधार सुधार…
काही तरी कर आता
ए…अरे अस कुठे असत का?
एकदा सांगितल ना…आत्ता नाही

कधी हे बोलले मला
कधी ते बोलले मला
जीवाची सतत उलघाल चालली माझ्या
वाटचे वाटचे सार्‍या दिशाचे दिशाचे
सार्‍या जीवाचे पाखरू गेले आभाळी शोधत माझ्या

ए..एकदा संगितल ना आता नाही म्हणून
धरेची ओढ मला
नभाचे गूढ मला
कधी ना चालल्या गेल्या
वाटचे भेटणे मला
ढगाळ हवेत घेत पाऊस कवेत
नेते उधाळ पाऊल जीव रानभर दूर माझा
गारवा हा वर कसा वेगळाच सूर माझा
माझ्या तहानेच्या साठी वेगळा पाऊस माझा
वेगळे वाटणे असे वेगळे सांगणे असे
जीवातला सूर थेट ओठावर येई माझ्या

कशास कशास केले नियम बियम सारे
आखीव रेखीव रूप मनाला असते कधी
कधी मोकळ्या वार्‍याचे कधी भरते पाण्याचे
कधी हातात घेऊन कधी दूरुन पहिले कधी
वार्‍याचे झर्‍यास जसे चंदन सूर्यास जसे
माझिया मनास जसे कोंडताना येई मला
आखल्या वाटानी कधी बांधल्या ओठांनी
कधी तेच तेच गात गाणे
जमलेच नाही मला

स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावरकितीप्रेमआहेहेसांगताहीयेतनाही
पहिलेजेव्हातुलाफक्ततुलाचबघतराहिलो
फक्ततुलाचपहावेअसेचदिनक्रमकरतराहिलो
खरचतुझ्यानादानेमीस्वतालाचहरवताहिलो
कायकरूप्रेमाचाताजमहल्लासजवीताहीयेतनाही
बोलताहीयेतनाहीकीलपविताहीयेतनाही
आजनाहीतरउद्याबोलेनदिवसफक्तजातहे
कधीयेईलतीवेळत्याचीचवाटपाहतआहे
यशस्वीनक्कीहोऊहेचमनालासमजवातआह
खरचआतातुझ्याशिवायमलाजगताहीयेताही
बोलताहीयेतनाहीकीलपविताहीयेतनाही
दिवसरात्रफक्ततुझाचविचारयेतआहे.
माझीपावलेतुझ्याचमागेजातचआहे
हृदयातयामाझ्याप्रेमाचेझरेवाहातचआहे
कायकरूमाझीप्रेमाचीधारतुझ्याहृदयातवाहताहीयेतनाही
बोलताहीयेतनाहीकीलपविताहीयेतनाही
बोलताहीयेतनाहीकीलपविताहीयेतनाही
तुझ्यावरकितीप्रेमआहेहेसांगताहीयेतनाही

एवढे एक करशील ना ?




शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?

पण काहितरी बदलतयं…

मी तसा चिडणारा,
कपाळाला आठी घेउन वावरणारा
सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा
एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा
पण काहितरी बदलतयं…

तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं
तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय
तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं
तिची हसरी नजर मलाही हसवतेयं
‘सगळं छान होईल’ ती मला समजवतेयं
तिच्या भाबडेपणा, तिचा विश्वास, तिची श्रध्दा
सगळंच अपरिचित
आणि तिचं माझ्यावरील प्रेम
अगदिचं अनपेक्षित
तू काय पाहिलसं माझ्यात
हा प्रश्नही अनुत्तरीत
आणि तिच्या डोळ्यात प्रश्नच हरवतात
हा शोधही अवचित
पण काहितरी बदलतयं…
कपाळावरील आठी जाऊन स्मित हळुच फुलतयं
ती भरेलही कदाचित सगळ्या जखमा
असं उगाचंच वाटतयं
ते हरवलेले क्षण, ते हरवलेले दिवस
आणि तो अविरत झिरपणारा कडवडपणा
हे सगळं विसरता येईल असं जाणवतयं
तिच्या डोळ्यात हरवलेलं काहीतरी गवसतयं
तिच्या स्पर्शात सगळं दुःख विरघळतयं
समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं
एक वेगळंच जग दुरुनच खुणावतयं
माझ्या नकळत मीहि स्वप्नात रमतोयं
फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय
बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं
- Manish Hatwalne

तू गेल्यावर...

तू गेल्यावर...
शब्द माझे
तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात....!! 
तू गेल्यावर....
मजा मी एकटा
गप्प बसून राहतो
तू येणार्‍या क्षणांची
आतूरतेने वाट पाहतो....!! 
तू गेल्यावर....
आजही आठवते मला
तुझे-माजे ते सरते दिवस
पौर्णिमेच्या रात्री आभाळ आल्यावर
चांदण्याना वाटते जशी अमावस.....!! 

 तू गेल्यावर....
आता फक्त मी
शब्दाना चालत राहतो
जुनेच शब्द पुन्हा घेऊन
कविता करत राहतो....!! 
तू गेल्यावर.....
आता मज मला
राहत नाही स्मरण
इतका अभागी
तुझ्याशिवाय मी
वाट पाहता तुझी येतही नाही मरण....!!

पुन्हा एकदा परत ये , आणि येशील तेंव्हा फक्त ....



पुन्हा एकदा परत ये ,
आणि येशील तेंव्हा फक्त माझ्यासाठीच ये ,

जर कधी आठवण आलीच माझी ,
तर एक उचकी होऊन फक्त एकदाच ये ,

त्रास होयील मला थोडा या उचकीचा ,
पण क्षणभर मिळणाऱ्या आनंदासाठी तरी ये ,

कदाचित जमणार नसेल हि तुला आता पुंन्हा येण ,
पण सोबत पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करायला फक्त एकदाच ये ,

सोबत मिळाली आहे तुलाही तुझ्या नवीन संसाराची ,
पण असेलच ना माझ्याकरिता पण देवाने सातजल्मासाठी बांधलेली कुणी ...

जरी बांधलो गेलो असलो आपण सातजल्मासाठी,
तरी आठवा जल्म घेऊन फक्त माझ्यासाठीच ये ,

कदाचित म्हणशील हि पुन्हा मला अजून हि तू वेडाच आहेस,
पण अर्धवट आहे प्रेम अजून आपल ,ते पूर्ण करायला फक्त एकदाच परत ये....

प्रेमासाठी स्वर्ग गाठला!!!


प्रेमाचा तो मौसम होता
रान गजबजलेले सारे,
वारा आला, फांदी तुटली
अवचित विपरीत घडले रे!!!

दोन पक्षी भिन्‍न जातीचे
प्रेमात पार बुडाले, वेडे,
जिवंत असता या जन्मी
कधी न त्यांची भेट घडे!!!

एके दिवशी भेट घडता
वैरी झाला समाज त्यांचा,
करुन वार चोचीचे त्यांना
जीव घेतला त्या दोघांचा!!!
कळले प्रेम कुणास न त्यांचे
देवही तेव्हा जागा झाला,
बघुन हा प्रकार सारा
देवाचाही अश्रू सांडला!!!

मरता मरता वचन दिले
त्या दोघांनी एकमेकांना,
या जन्मी तर जमले नाही
पुढल्या जन्मी भेटु पुन्हा!!!

त्या दोघांचा आत्मा तेव्हा
अनंतात त्या विलीन झाला,
भेटीसाठी मग वेड्यांनी
देवाचा तो स्वर्ग गाठला!!!

देवाचा तो स्वर्ग गाठला!!!

आठवणीचा पाउस आज

आयुष्य असेच सरले, धावत आठवणींच्या पाठी

सबंध आयुष्य वाट पहिली, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्या येण्याची वाट पाहत, शब्द गोठले आज ओठी

हृदयात दुःखाचे भास कवळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

जगलो असा की मी, जगणे राहून गेले पाठी

डोळ्यातले अश्रू हृदयात कोंडले, मी फक्त तुझ्यासाठी.....

हर घडी तुझ्या प्रेमाची, मनात ठेवली आस मोठी

त्या आशेवर जगत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्याच समोर झुकते मन, हे मन ही आहे फार हट्टी

याच हट्टावर आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्यासाठी.....

नाशिबाशी झगडत झगडत, न तोड़ता प्रेमाच्या गाठी

त्या गाठीना सामभालून, ठेवले मी फक्त तुझ्यासाठी.....

एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा, आज माझ्या डोळ्यात दाटी

त्या क्षणानना उराशी कवटाळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

अंधार विजत उजेड यावा, भान विसरून जूळावी मीठी

याच स्वप्नांना आयुष्य समजलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझीच वाट पाहत, जळले हृदय प्रेमाकाटी

भिन्न दिशांना झुरत, राहिलो मी फक्त तुझ्यासाठी.....

तो तिला म्हणाला

२०० Watts म्हणू कि ४०० Watts म्हणू

असा कसा Glow तुझ्या चेहऱ्यावर आला

without using Fair glow bulb कसा लागला

तुला असा पाहून माझा Transformer जळाला



किती ग छान केस तुझे कुरळे कुरळे

Inductor वर wound केलेले wires मोकळे

किती ग गोड सुमधुर तुझ हे हास्य

electrons करत आहे बरसातच जणू



काय ग अशी चालतेस तोऱ्यात मोठी

circuit मधून current जातो अशी

करून Monostable माझा तू जाते

हाय न तू ग अशी Bistable होते



पुरे ग बाई पुरे झाले तुझे नखरे नाना

circuit ला swich लावून हो म्हण ना

होयील ग circuit मग पूर्ण अस सखे

बघ मग light च light च होयील सखे



Multimeter घेवून प्रेम माझे तोलू नको

flip flop ला pulse देवून नाही म्हणू नको

digital च काय linear पण येईल जोडीला

लाव ग एक conductor माझ्या प्रेमाला

काय असत प्रेमात .....? कसली असती हुरहूर...?

काय असत प्रेमात .....? कसली असती हुरहूर...?
कशी असती काळजातली धडधड....? काय मज्जा असते चोरून चोरून भेटण्यात...?
कस वाटत तेच तेच फोनवर तासनतास बोलायला....?
काहीच माहिती नव्हत.....
चला एकदा '' TRY '' घ्यावा म्हणून प्रेमात पडायचं ठरवलं....
खोट - खोटच पण तरीही त्यात शिरायचं ठरवलं....
मित्रांना फुगवून सांगायचं.....
माझी '' GIRLFRIEND '' अशी आहे..... तशीच आहे....
आणि एकदाचा तिच्या प्रेमात पडलो.....
तिला याची काहीच कल्पना नव्हती...!
आणि मी तसाच विचार करायला लागलो......
हुरहूर.......धडधड.....
जे काय असत ते सगळ मिळाल.....!!
मित्रांना फुगवून सांगितलं .....
माझी '' GIRLFRIEND '' अशी आहे..... तशीच आहे....
पण...अचानक दोन - चार दिवस ती मला भेटलीच नाही....
आणि मग माझी मनात कालवाकालव व्हायला सुरु झाली ..
अरे.. हे सगळ खोट -खोट होत मग अस का होतंय.....
मी खोट - खोट म्हणता म्हणता .....
खरच प्रेमात पडलो....अगदी मनापासून ......!!
घरामध्ये बसू वाटत नव्हत......
ऑफिस मध्ये काम करू वाटत नव्हत.....
सतत तिचाच विचार.....
प्रत्येक ठिकाणी तिचाच चेहरा दिसायचा....!
एकट एकट राहू लागलो.....
शांत शांत ....गुमसुम राहू लागलो .....
'' दोस्तो कि दोस्ती,यारो कि यारी कम लगने लगी ''
हे सुद्धा खर झाल...!!
तिला तर काहीच सांगितलं नव्हत....
इकडे माझ्याच मनाचा गोंधळ चालला होता.....
तिला सांगाव म्हणून मी एका संधीची वाट पाहू लागलो......
आणि एक दिवशी तिच स्वतःहून माझ्याकडे आली...!
अरे वा......!
मी संधीला शोधण्यापेक्षा संधीच माझ्याकडे आली होती...!!
मी जाम खुश झालो......
ती आलीच.....पण.....
येताना ती तिच्या '' प्रेमाला '' घेवून आली....
खास माझ्या भेटीसाठी......
जखमेवर मीठ चोळतात तसच काहीतरी माझ झाल.....
पण तिला तरी काय दोष देणार..... तिला तरी हे काहीच माहिती नव्हत....
आणि आमच्या प्रेमाची कळी खुलण्याआधीच सुकून गेली....
आणि अस म्हणतात कि ......
'' जब दिल तुटता हैं तो उसकी आवाज नही आती....''
मी तो आवाज ऐकला......
अगदी खरा खरा.........

तू येशील ना..

तुज़्या प्रतेक श्वासमधे मला समाउन घेशील ना ...
तू येशील ना.
तुज़्या रुध्याच्या प्रतेक ठोक्या प्रमाने मला समजुन घेशील ना .....
तू येशील ना..
प्रेमामधे तुज़्या वेडा आहे जाणीव माज्या प्रेमाची तू ठेवशील ना ......
तू येशील ना..
तुतात्य त्र्यकडे मगितालेले स्वप्ना माजे पूर्ण तू करसिल ना ....
तू येशील ना..
कधी न तुट्नारे बंधन आहे आपले ते तू जपशील ना .....
तू येशील ना..
होऊन एक कळी, अन मी फुलताना, माझ्यासंगे फूलशील ना ...
तू येशील ना ..
माहीती आहे मला काहीही जाले तरी तू येणार ...
माज्या मनामधे पण जागा फक्त ही तुज्याच साठी राहणार........

पोऽऽरगीऽऽऽऽऽऽऽ पटऽऽऽलीऽऽऽऽ रेऽऽऽऽ पटऽऽऽलीऽऽऽऽऽऽ!!!!!

मी आपल्या गल्लीचा दादा,
ती माझ्या ह्रदयाची राणी...
व्हॅलेंटाईन ला तिला एकIने छेडलं,
अन् गल्लीत सुरु झाली आणा-बाणी...

मी त्याला धू-धू-धुतला,
त्याचा माज सारा काढून टाकला...
ती हळूच गॅलरीत आली,
खांबाआड लपून बसली...
अन् माझ्याशी नजर भिडता,
ती गालात खुदकन हसली...

झाली माझी कॉलर 'टाईट',
अंगी इश्काचं भिनलयं वारं...
तिचं रोज-रोज गॅलरीत दिसणं,
मला वाटू लागलं आहे प्यारं...

एकदा गाठलं तिला मी जिन्यात,
तशी लाजून लाल-लाल झाली...
चावली बोटं तिनं दातांनी,
अन् डोळे झुकवले खाली...

मी ठसक्यात हात तिचा धरला,
डायरेक्ट मागणी तिला घातली...
ती हळूच हो म्हणाली आणि,
पोरगी पटली रे पटली...

पोऽऽरगीऽऽऽऽऽऽऽ पटऽऽऽलीऽऽऽऽ रेऽऽऽऽ पटऽऽऽलीऽऽऽऽऽऽ!!!!!

आयुष्यात प्रेम करायचय मला ........

आयुष्यात प्रेम करायचय मला ........
दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

ति माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ति नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...
तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला..............

एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला

एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला
तुझ्या नकळत मी तुझ्यावर प्रेम केलं
तुझ्या बरोबर आयुष्यभर राहण्याचं स्वप्न पाहीलं
तुझ्यामुळेच प्रेमाचा खरा अर्थ मला कळला
पण या प्रेमाची जाणीव कशी करुन देऊ तुला

जिथे जिथे पाहतोय तु आणि फ़क्त तुच दिसतेस
नजरेस नजर देता खट्याळ हसतेस
तुझं बरोबर असणं जणू स्वप्न वाटे मला
मला सगळीकडे तुच दिसतेस
पण मग मीच कसा गं दिसत नाही तुला

तु अजाण आहेस माझ्या या प्रेमाने
सांगितल नेहमी मुक्या ईशा-याने
पण तो ईशारा तुला कधीच कसां ना कळला
कधी मी सगळ शब्दात सांगु शकेन का तुला?

एकदा निश्चयच केला होता तुला विसरण्याचा
हजारदा केला प्रयत्न सगळं संपवण्याचा
पण प्रत्येक प्रयत्न माझा, माझ्याच प्रेमापुढे फ़ोल ठरला
जणु हे वेडं मन कधी विसरुच शकत नाही तुला

आता तर फ़क्त एकच स्वप्न आहे या मनाचं
तुज्यासोबत शेवटपर्यंत जगण्याचं
एक दिवस नक्कीच जिंकेल
हा वेडा जीव आज जो या खेळात हरला
एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात