अनामिका - मुलींच्या नावावर कविता

कवितेला मी माध्यम बनवून
एकच अर्चना माझी जाणून
कोणासमोर आणू दर्शना
प्रकट करतोय माझी भावना.

प्रेरणा कुठे दिसत नाही
स्वप्नासाठी जगतोय
मीच माझी प्रतिमा पाहून
जगी स्नेहाची ओळख देतोय

रेशमाचे जुने नाते
अभिलाषा मनात आणते
आठवून ती निवेदिता
प्रचिती रसिका येते

प्रीतिने मज फूल द्यावे
तृप्तीने नयनात झुलावे
कोमल सरोज सुन्दर असुनही
प्रजक्ताला जवळ घ्यावे

कल्पना कल्पिता मानसी
चांदण्यात कृतिका हसली
संगीताशी इतकं नातं जुळलं
की सीमा सोडावी लागली

विणाने वेडं केलं
मैफिलीत शोभा आली
मग मेघाने घोळ घातला
आणि रुचा निघून गेली

श्रद्धा आलो घेउन
ओढ़ लागली भक्तीची
मनात माझ्या पूजा ठेवून
वाट पाहिली आरतीची

अमृताचा शोध घेतांना
संजीवनी जीवनी आली
समृद्धीच्या नादात
शांती विसरावी लागली

आधी विद्या मग किर्ती
निशानंतर उषा जाशी
आधी माया मग मोहिनी
छायानंतर ज्योति जशी..... छायानंतर ज्योति जशी...
- कवी - अनामिक

कशी झोकात चालली...

कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर

फेसाळ दर्याचं पाणी खारं
पिसाट पिऊनी तुफान वारं
ऊरात हिरव्या भरलं हो सारं
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर

टाकून टाकशील किती रं जाळी
मेघाची सावली कुणाला घावली
वार्‍यानं अजुनी पाठ नाही शिवली
वाटेला बांग दिली हिच्या समोर

केसांची खुणगाठ चाचपून पाहिली
फुलांची वेणी नखर्‍यानं माळली
कुणाला ठावं रं कुणावर भाळली
प्रीतिचा चोर तिचा राजाहून थोर
-अनामिक 

जेव्हा मी

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो चंद्र आठवतो .
उगाच चांदण्यांच्या गराड्यात एकटा भासतो ,
एकटा असूनही प्रकाश मात्र देतच राहतो .
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो समुद्र आठवतो ,
खारट असूनही किती जीव सांभाळतो ,
लोक म्हणतात भरती आली ,
पण का कुणास ठाऊक मला मात्र
तो किनाऱ्याला भेटल्याचा भास होतो .
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो अथांग वाटेवरचा वाटसरू दिसतो ,
लोक म्हणतात तो दूर जातोय ,
पण मला मात्र तो इच्छित ध्येयाच्या जवळ भासतो.
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
भूतकाळात कुठेतरी मी हरवून जातो ,
तू म्हणतेस मी मुमताज नाही तुझी ,
पण का कुणास ठाऊक,
मी मात्र शहाजानच असल्याचा भास होतो ….
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ………
-अनामिक 

नाती ही अशीच असतात

कधी रुसतात कधी हसतात
तरी सर्वांच्या मनी वसतात
नाती ही अशीच असतात... ♥♥
.
कुठे जुळतात कुठे दुरावतात
ईथे मिळतात तिथे हरवतात
नाती ही अशीच असतात... ♥♥
.
काही फ़ुलतात काही कोमेजतात
आठवणी देतात विसरुन जातात
नाती ही अशीच असतात... ♥♥
.
वर्षानू वर्षाची अनोळखी वाटतात
काही क्षणात आपलीसीहोतात
नाती ही अशीच असतात.. ♥♥
 
- अनामिक

"आम्ही आमुच्या मनाचे राजे"



हसेल कुणी
रुसेल कुणी
कुणी गायील
आमचे गोडवे
आम्हा कुणा
काय त्याचे
आम्ही आमुच्या
मनाचे राजे.......
स्वप्नात रंगतो
मस्तीत दंगतो
कुणा न आम्ही
उगाच हिणवतो
कुणास मात्र
काय वाटते
आम्हास सुतक
काय त्याचे
आम्ही आमच्या
मनाचे राजे.......
वाटते पावसात
बेधुंद भिजावे
कुणाच्या गलवरील
थेंब टिपावे
डोळ्यात तिच्या
क्षणभर हरवावे
पण त्यांच्या नजरेच्या
तिराने घायळचे मरण
आम्ही मरतो
कुणाला मात्र
काय त्याचे
जो तो त्यांच्या
मनाचे राजे
जसे आम्ही
आमच्या मनाचे राजे........

-अनामिक

" माफ कर देवा ………. "




तूच दिली हि सुंदर धरणी , अमुल्य अक्षय ठेवा

कसे करंटे आम्ही निपजलो , दोष तुझा ना देवा

सागर जंगल नदी नी नाले , जे जे होते छान

विकास करुया म्हणता म्हणता, केले आम्ही घाण

तुझ्याच सुंदर आकाशात , आमचा काळा धूर

हद्दपारही पक्षी झाले , गेले मंजुळ सूर

उधळत लाखो गाडी फिरते, अडकून पडती श्वास

माथेफिरू हा मानव झाला, त्याचमुळे हा त्रास

प्लास्टिकचे तर पर्वत झाले , हीच खूण नाशाची

विनाशरूपी जुगलबंदी ही , ढोल आणि ताशाची

ओरबडूनी घेता घेता , आलेच संकट माथी

बेफिकीर जर असे राहिलो , उरेल शून्यच हाती

आम्हास भवली आमची वृत्ती, देवा करशील माफ ?

की उघडोनी तिसरा डोळा , करशील पृथ्वी साफ ?
 
-अनामिक 

आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे

आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे
 
म्हणजेच प्रेम नसते..
 
रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
 
म्हणजेच प्रेम नसते...
 
तर आपल्या आयुष्यात
 
कोणी तरी अशी व्यक्ती असणे
 
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे
 
कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..
 
त्यांचे मन किती हि दुखावलेत...
 
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत.....
 
ते केवळ " तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील.... "
 
हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल
 
वाटतो तेच आहेत तुमचे " खरे सोबती "
 
हेच खरे प्रेम आहे.

- अनामिक 

तुझासंग प्रीतीची पाऊले

गुणदोष ठेवा सावरुनी
द्या प्रेमभाव बहरूनी
सरते आयुष्य शेवटी
राही मनी प्रीत उरूनी ..
तुझासंग प्रीतीची पाऊले
सांग ना मज वेड का लावले ….

काटेरी आठवण तरी
मनी सदैव ती परी
एकटा जीव हुंडाळी
नेत्री काळोख जरी ....

रवि नयनात मावळे
सांग ना मज वेड का लावले ….

मनी कळीही फुलली
तिथ रात दिन डुलली
वाट काढली त्यातुनि
जरी होती काट्यातुनि ……

तिथ प्रेमफुल फुलले
सांग ना मज वेड का लावले ….

किती तुझे बहाणे
माझ्या प्रीतीचे तराणे
गुलाबही लागला कराया
गुलाबी ओठाचे गाऱ्हाणे …

त्यालाही बेरंगी वाटले
सांग ना मज वेड का लावले ….

मज वेड का लावले ….
तुझासंग प्रीतीची पाऊले

-अनामिक 

मैत्रीतले प्रेम....की प्रेमातली मैत्री


मैत्रीतले प्रेम....की प्रेमातली मैत्री

कधी न संपणारी
फक्त मैत्रीच असत्ते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
कधीच न संपणारे

मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन फसवा असतो
मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
प्रेम कीतीही नाजूक पण टूटतेच कधीतरी

प्रेम ह्याने केले प्रेम त्याने केले
प्रेम करणारा एकटाच असतो ना
मैत्री मी केली का त्याने केली
मैत्री तिधेही निभावतात....

मैत्रीनेच प्रेमाला सुरूवात होते
ऐकल होते पण खरच आहे की..
माझ्या मैत्रीत प्रेम आहे...
पण माझ्या प्रेमात मैत्री कधीच नसणार...
फक्त प्रेम आणि फक्त प्रेमच असेल..

तुम्हाला कोणते प्रेम आवडते...
प्रेमात मैत्री असते मैत्रीनंतर प्रेम असते
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की प्रेमापेक्षा जास्त मैत्री?
मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?

-अनामिक

अश्रू..

तुला नको असला तरी
मला शेवटचं भेटायचं आहे

तू कधीच न दिसण्याच्या
आधी डोळे भरून पहायचा आहे

ठरवलं आहे दोघांनीही कि भेटल्यावर
डोळ्यांत आणायचं नाही पाणी

पण माहिती आहे भेटल्यावर
अश्रुन्शिवाय बोलणार नाही कुणी

खूप काही बोलायचा आहे
खूप काही सांगायचं आहे

मनात साठवलेल्या शब्दांना
ओठावर आणायचं आहे

तुझा शेवटचा चित्र
मनात रंगवायचा आहे

हा चेहरा परत दिसणार नाही
म्हणून मनाला समजवायचा आहे

जाता जाता फक्त
माझी एवढीच अपेक्षा आहे

एकदा मिठीत घेऊन तुला
अश्रूंमध्ये चिंब भिजायचा आहे...

- अनामिक 

एक गरीब माणूस

एकदा एक गरीब माणूस थकून

उशीरा घरी येतो. आई नसलेले त्याचा ५

वर्षाचा मुलगा त्याची दारात वाटचं पाहत

असतो...

मुलगा - बाबा तुम्हाला एका तासाचे

किती मिळतात हो?

बाबा - त्याचं तुला काय करायचंय.

मुलगा - सांगा ना बाबा ...

बाबा - २० रुपये

मुलगा.- मला १० रु हवेयत !

बाबा - चल जा झोप गपचुप...

मुलगा कोमेजुन गपचूप वाकळ अंथरतो..

आणी उशी खाली डोक... टाकतो. .

बाबांचा राग शांत होतो ते मुलाकडे जातात

आणी, "बाळा हे घे तुझे १० रु"

मुलगा ते पैसे घेतो आणी त्याच्या उशीत

लपवलेली काही चिल्लर काढून मोजतो

मुलगा - बाबा माझ्या जवळ २० रु... आहेत

मला तुमचा एक तास विकत

घ्यायचाय, उद्या मला तुमच्या सोबत

जेवण करायचंय, उद्या लवकर याल

ना...!!!!!..
 
- अनामिक