चार पावलं माझी झालीस....

चार पावलं आपण
सोबत चालत जाऊ
तुझे आणि माझे सूर
कुठवर जुळतात पाहु...
अर्थात जमत असेल तर चल
मी आग्रह करणार नाही
आज तरी, "तुला यावच लागेल,
असा हट्ट ही धरणार नाही
पण मनातल्या मनात कुढण्यापेक्षा
व्यक्त करणं बरं असतं
कारण इथून तिथून ऐकलेलं
सारंच काही खरं नसतं
कुणी कुणाला का आवडावं
हे सांगता येत नाही
चार चौघांना विचारून कुणी
हृदय देत नाही
तसंच काहीसं माझं झालं
त्याच धुंदीत propose केलं
जवळ अशी कधी नव्हतीसंच
propose ने आणखीच दूर नेलं
जे झालं ते वाईट झालं
पण झालं ते बरंच झालं
खरं सांगणं गुन्हा असतो
एव्हढं मात्र लक्षात आलं
जाऊ दे,
झालं गेलं विसरून जा
मागे न वळता चालत राहा
मला विसर असं मी म्हणणार नाही
पण तू तो प्रयत्न करून पाहा...
थांब...
इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय
पण धन्यवाद; तू इथवर आलीस...
सारं आयुष्य नसलीस तरी
चार पावलं माझी झालीस....

एक अनोळखी मुलगा येईल

एक अनोळखी मुलगा येईल,
तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.
तुझ्या सुंदरतेवर भाळुन नक्कीच,
तो लग्नाला होकार देईल.

मान्य आहे, तुझ्या चांगल्यासाठीच,
तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.
पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पेक्षा,
तू माझ्याशी लग्न करशील....

मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,
तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार..

तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्‍या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील...

यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी..
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल..
तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखय म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नास मान्यता देतील.

पण जीवनाशी तडजोड करणार्‍या श्रीमनताशी,
काय तू जीवनभराच नात जोडशिल..अग
एका हृदयाने भिकारी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील.....

तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल..
तू माझ्या हृदयात राहशील..
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल..
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..

हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील..
तरी पण..........एका अनोळखी मूलाशी लग्न करण्या पेक्षा,
तू माझ्याशी लग्न करशील....
 

नेहमी असंच घडणार आहे?

हे फक्त माझ्याचसोबत
तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट
'ते' न बोलताच संपणार आहे?
भेट-वेळ रोजची ठरलेलीच
तरी अजून काय ठरणार आहे?
बोलायचं पटकन पण वेडं मन
त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !
भेटतो तेव्हाच माहित असतं
निघायची वेळ येणार आहे
पटकन विचारावा प्रश्न हवासा
तर शब्द ओठीच अडणार आहे !
मी न विचारताच तू काय
हवं ते उत्तर देणार आहे?
हे पुरतं कळतंय तरीही
तोंड माझं का बोलणार आहे?
न बोलता बोललेले शब्द
तुला वेड्याला कळणार आहे?
मी बोलले/न बोलले तरी गप्पच
नेहमीसारखा तू राहणार आहे !
भावभावना समजून घेणं
सगळंसगळं थांबणार आहे
उष्ट्या कुल्फीची चव मात्र
जिभेवरती रेंगाळणार आहे
स्वप्न माझं हे संपलं तरीही
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसले तरी
माझ्यात तूच सापडणार आहे

आपलं नातं!

नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन
आणि सरळ आठवायला घेतले तुला


तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...

मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो

हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं
!

प्रेम केल तर अस कधी तरी होणारच,

प्रेम केल तर अस कधी तरी होणारच,

प्रेम केल तर अस कधी तरी होणारच,
तो किवा ती नको इतक्या जवळ जाउन खेटतिलच,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
दिवस valentine day चा दिवसा संधी साधणारच ना,
लाल लाल गुलाब घेउन propose प्रकरण गाजणारच,
हि नाही तर ती तरी कोणा वर chance तर नक्की मारणार,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
हसली तर फसली, आता तर नक्की पटली,
इतक्या वर थोडी थांबणार आहे तो किवा ती,
भेटा-भेटी फिरा-फेरी चिपका-चिपकी होउन रहाणार,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
पावसाचे दिवस म्हणजे आयत्या वर कोयता,
ओलाव्यात त्याच बरच काही फावल,
पावसाची भीती म्हणुन त्याला जाऊं मीठी,
अंधारी रात्रि आता काही खर नाही……
होतय ना मग होऊ दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
Traffic Jam म्हणुन टैक्सी हि थांबली,
तो किवा ती थांबनारयातले नव्हते,
त्यांचा तरी काय टाइम पास….मग काय
केला एकमेकांवर जोर …होण्याला कोण थांबवेल ?
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
निसर्गाची साथ प्रेमाची जात समुद्राची लाट,
किनारयावर कधी ना कधी आदलनारच,
ओबड दोबड़ दगडाना गुलगुलित पणा येणारच,
कोणी तरी बसल्याचे ठसे उमटनारच,
होतय ना मग होऊ दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
संध्याकाळची वेळ होती,
एकमेकांला भेटायची ओढ़ होती,
बागेत काहीतरी गड़बड़ होती,
झाडांच्या आडोश्याला एक सवाली होती,
होती तर असू दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
आमच्या तुमच्या पूर्वजानी आणखी वेगळ ते काय केल?
तुमच्या आणि माझ्या आयुष्यात एकदा तरी होणारच आहे,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!

असा कोणी माझ्यापण आयुष्यात यावा

तो येणार तेव्हा 
मन खूप बेचैन व्हावं ..
भेटायची ओढ खूप 
पण मनात खूप चलबिचल व्हावं...

घाबरून का होईना पण 
स्वतःला सजवण्याचा प्रयत्न मी करावा ..
वेळ विचार करण्यातच गेला तरी 
मी प्रेमाच्या शृंगाराने  न्हाव  ..

समोर त्याच्या जाव 
तेव्हा आणखीच घाबराव ..
त्याने बघून मग 
मला हळूच मिठीत घ्यावं ..

नसले मी सुंदर जरी 
त्याने मला वर्णाव ..
हातात माझा हात धरून 
मग ते मला ऐकवाव ..


असा  कोणी माझ्यापण 
आयुष्यात यावा ..
ओठावरच्या या शब्दांना 
त्याने पण कधी ऐकाव ..
 
 

मन

पाखरू होऊन पाखराशी बोलायचं...
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
 
तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सान्गतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं !
 
सूर तर आहेतच : आपण फक्त झुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
 
आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत?
डोळे उघडून पहा तरी :
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत !
 
हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !
 
प्रत्येकाच्या मनात एक
गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याशा कुपीत असतं !
 
आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने चालायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं

नेहमीच कसं हसवायचं…!!!

नेहमीच कसं हसवायचं…??
तूच सांग देवा असं किती दिवस चालायचं
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…??

समोरचा तो हसला........नव्हे!
हसवण्यावर माझ्या फसला!!
त्याच्या समोर रडलोच् तर
हसवणाराच् मी कसला

माणसांच्या या गर्दीमध्ये स्वतःला मात्र विसरायचं
दू: दाबून ओठांमध्ये
त्यांतच हसून दाखवायचं.
पण श्वास जड होतो जेव्हा—........
तेव्हा रे काय करायचं???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!

मी रडू लागलो जेव्हा
ते मात्र हसत होते
कारण, माझ्या रडण्यामधले
व्यंगच त्यांना दिसत होते

मनातलं सर्व मनातच ठेवून, हसून मग मी दाखवायचं,..
शिषीरा नंतर येतो वसंत, स्वप्नंच् फक्त पहायचं
पण ह्रूदयातच ढग दाटून येतो जेव्हा—........
तेव्हा रे काय करायचं….???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच कसं हसवायचं…!!!

चंद्र पौर्णिमेचा ...

कालच्या पौर्णिमेला
चंद्र आकाशात आलाच नाही
मला वाटले नक्की
विपरीत झाले काही...!

काय झाले चंद्राला ह्या कुतुहलाने
मी दुस~या रात्रीची वाट पहिली

दुस~या दिवशी तो आला खरा
चेहरा होता हिरमुसलेला जरा...!

'काय झाले रे ? काल कुठे होतास?'
विचारले मी उत्सुकतेपोटी
'काय सांगू तुला
माझी स्वप्ने ठरली सारी खोटी...!'

मी म्हणालो...
'अरे पण असं काय घडलं
ज्यामुळे तुला निसर्गचक्र मोडावं लागलं...?'

चंद्र म्हणाला-
मला नेहमी वाटायचं की,
समुद्र माझ्यावर प्रेम अपार करतो
पौर्णिमेच्या रात्री माझ्यामुळे खवळतो

येताच मी आकाशी
आनंद त्यास होतो,
नसतो जेव्हा मी गजनी
पार हिरमुसून जातो...

काल समुद्रसमोरी
माझे प्रेम व्यक्त केले
अन माझे सारी स्वप्ने
धुलिस मिळून गेले....

ऐकताच शब्द समुद्राचे
आला अंगावरी शहरा
"न चंद्र माझी प्रीति
सोबती माझा किनारा..."

किना~याला भेटण्यासाठी
मी लाखो मैल वाहतो,
तुझा उपयोग करुनी
किना~यास सुखावतो...!!!

ऐकून व्यथा चंद्राची
डोळे माझे भरले,
चंद्रामद्धे तेव्हा माझे
प्रतिबिब्म्ब मला दिसले....!!

वेड मला लावुन तु शहाणी झालीस...






वेड मला लावुन तु शहाणी झालीस...

प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस?

नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं
तर का सुरुवात केलीस?

जायचे होते सोडुन मला तर का माझ्या जीवनात आलीस?

चुक झाली माझी

चुक झाली माझी कि मी तुझ्यावर प्रेम केले...

सुख नाही तर नाही पनं हे दुःख तु मला का दिलेस?

नको ढाळुस अश्रु आत्ता

नको ढाळुस अश्रु आत्ता
ऊत्तर दे माझ्या प्रश्नांना...

बंद कर हे रडु आत्ता नाही मी फसणार तुझ्या खोट्टया अश्रुंना...

आज रहाशील गप्पं

आज रहाशील गप्पं
तुझ्या कडे ऊत्तर नसताना...

ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...

ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...

ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना... 


नाही विसरू शकत मी तुला,

नाही विसरू शकत मी तुला,
तुझ्या सहवास क्षणांना ,
तुझ्या गोड आठवणींना ...

पानगळ कधीच झालेली
तुझ्या जाण्याने...
मी बसलेय कुरवाळत त्या
पाचोळ्याला...
बघत पान विरहीत वृक्षाला....

सांज येते गारठा वाठतो
तु नसतोस शाल बनायला...
तुझी आठवण येते नकळत
आपसुकच उब जाणवते तुझ्या मिठीची....


चांदण्या हासतात... चंद्र खुणावातो...
लपंडावाच्या खेळात मला बोलावतो...
बघ... आलीच तुझी आठवण...
खेळुया कारे चांदण्या मोजण्याचा खेळ...

कित्येक ऋतु बदलले..
तरी मी तिथेच पचोळ्यांशी खेळत...
तुझ्या आठवणींशी गप्पा मारत...



नाही विसरू शकत मी तुला,
तुझ्या सहवास क्षणांना

पुन्हा एकदा भेटायचय....

कितीही वेळा तू भेटलीस,
तरी मनी एक आस असायची,
शेजारी माज्या बसलीस की
अंगात एक विज कडकडायाची.

मी भेटायला येणार म्हणुन,
नट्टापट्टा तू तासभर करायचीस,
भेटल्यावर कौतुक नाही केल म्हणुन,
किती हक्काने भांडायाचिस.

भेटायला तू येणार म्हणुन,
बघता बघता तिन वर्ष लोटले,
तुझ्यासाठी जपलेले शब्द,
मनातल्या मनातच दाटले.

दिलासा देण्यासाठी तरी,
तू पुन्हा एकदा भेटणार ना?
नाही करणार तक्रार कधीही,
मग तर सोडून नाही जाणार ना?

स्पर्शाच्या त्या तुज्या भाषेला,
पुन्हा एकदा तरी अनुभवयचय,
माज्याशी हक्काने भांडताना,
पुन्हा एकदा तरी बघायचय.

तिने मला तस समजूनच घेतले नाही

मला पण माहित आहे,
तुला भेटता येत नाही
आणि तुला पण माझ्यासाठी,
थोडा पण वेळ नाही...

किती फ़ोन कॉल्स केले
किती msg पाठवले
msg चा reply कधी आलाच नाही
नविन फ़ोन नंबर तू मला दिलाच नाही...

किती पत्रे पाठवली
किती greetings पाठवली
पत्रांचा reply कधी आलाच नाही
कारण पत्रे कधी तू वाचलीच नाही...

ठरवले की 1 दिवस भेटायचे
Company मधून वेळ काढून तिच्या घरीच जायचे
मी तिला भेटू शकलोच नाही
कारण तो दिवस कधी आलाच नाही...

तिच्या friendcircle मधे ती आनंदी होती
कारण तिच्या जीवनात ती यशस्वी होती
तिने पण मला contact कधी केलाच नाही
कारण तिच्या friendcircle मधे मी कधी आलोच नाही

एक दिवस मित्राकडून समजले की
एक मुलगा आला होता पाहिला तिला
लग्न पण झाले,लग्नात मला बोलावालेच नाही
कारण लग्नाचे आमंत्रण मला तिने दिलेच नाही...

मला माहित आहे कुठेतरी मी पण चुकलो
शेवट पर्यंत मी माफ़ी मागु नाही शकलो
माहित असुनही मी तिच्या जवळ झालोच नाही
शेवटी मीच स्वताला समजावले की
...
तिने मला तस समजूनच घेतले नाही

मी शिकावं शिकावं , नि खूप मोठ व्हाव

मी शिकावं शिकावं ,
नि खूप मोठ व्हाव ,
मनी बाळगून हे सपान ,
त्या काळीत राबणारी ,
माय तूच होतीस ना !,

मी चमकाव चमकाव,
त्या सूर्याच्या समान ,
त्या कडाडत्या उन्हात ,
राबणारी वाघिणी,
माय तूच होतीस ना !,

मी रहाव नेहमी,
त्या गार गार सावलीत ,
अंगार मातीत त्या ,
अनवाणी राबणारी,
माय तूच होतीस ना !,

सुख माझिया जीवनी ,
राहावे नेहमी नेहमी ,
उरी बाळगून हे सपान ,
दुख जन्मभर सोसणारी,
माय तूच होतीस ना !,

काटा रूतता या पायात,
अश्रू उभे तुझ्या डोळ्यात,
मजसाठी दररोज,
त्या काट्यातन चालणारी ,
माय तूच होतीस ना !,


- फिरोज मिर्झा मधून 

निशब्द...



शब्दाच्या या खेळात
डाव माडंला मी मनाचा
सागंत राहिलो शब्दातुनी तूला
भाव या प्रितीचा...!

कधी न कळली प्रित तूला
माझ्या खट्याळ शब्दाची
स्वप्ण फ़क्त एव्हढेची होते
प्रित असू दे कोवळ्या मनाची...!

शब्दातही तूला पाहत होतो

पाहून शब्दातच तूला माडंत होतो
खेळूनी खेळ शब्दाचा
पुन: शब्दातच मी राहत होतो...!

शब्दाच्या या कोड्यात
एक घरटं बाधून पाहीलं मी
घरटं बाधल्यावर मात्र
शब्दातुनीच दुर जाताना तुला पाहिलं...!

शब्दातुनी दुर गेल्यापरी तू

आज निशब्द होऊनी बसलो
तुझ्या पाठमो-या शरीराकडे बघून
मीच माझ्या शब्दातुनी हसलो...!

तू गेल्यावर आता उरला
तो फक्त ...
निशब्द.. निशब्द.. आणि निशब्द..

बर्‍याच दिवसांनी तिचा फोन आला उचलताना माझा काळजाचा ठोकाच चुकला

बर्‍याच दिवसांनी तिचा फोन आला
उचलताना माझा काळजाचा ठोकाच चुकला

"काय रे आजकाल फोन येत नाही तुझा
कुणी दुसरं भेटलं म्हणून विसरलास का मला?"


"तू असं म्हणावं याचं मला नवल वाटतं
तुझ्या मनात नेमकं काय आहे हेच कळत नाही.

फोन केला तर कधी स्पष्ट बोलत नाही
नाही केला तर म्हणते मी का तुला आवडत नाही?

ते सोड......
आज कसा फोन केला ते तर सांग."


"काही नाही रे......
जरा मन मोकळं करावसं वाटलं.
तुझ्याशिवाय दुसरं कोणी जवळचं नाही वाटलं

एक प्रश्न पडलाय.....
ज्याच्यावर प्रेम करते; त्याला कसं सांगू?
तू माझा खास मित्र ना?
मग तूच काहीतरी उपाय सुचव पाहू."


"मी काय सांगू?
माझीच व्यथा मी तुझ्या तोंडून ऐकतोय
तुझं आणि माझं घोडं एकाच ठिकाणी अडलंय."


"अरे तु काय बोलतोय मला काहीच कळत नाही आहे."


"हेच तर मी तुला पहील्यापासून सांगतोय
माझ्या बोलण्याचा अर्थ तुला कधीच नाही कळला
कळला असता तर मग असा प्रश्नच नसता पडला!!!!"

ती तुच होतीस का गं..? अंगात हिरवा शालु नेसुन...

ती तुच होतीस का गं..?
अंगात हिरवा शालु नेसुन,
हातांत हिरवा चुडा,
केसांत माळलेला गजरा,
अन भांगातलं सौभाग्यलेणं
...होय तूच ती ....

माझ्या स्वप्नांत दिसणारी,
तु... माझं बेरंग आयुष्यात रंग भरणारी,
तु... आयुष्याला नवं ध्येय देणारी,
थोडीशी लाजरी बुजरी,
माझी "गोंडस परी"
बोल होशील माझी
माझी.. ? अर्धांगीनी …..??

लावशील कुंकु माझ्या नावाचं..?
जगशील माझ्यासाठी,
अगदी माझीच बनुन...?
बस...
अन मी तुझाच...
प्रत्येक जन्मासाठी....

सप्तपदीची सात पाऊले
वचने देखील सात
संकटे सारी जातील विरुन
जर हातात असेल तुझा हात......!!

तु परत येऊ नकोस,


तु परत येऊ नकोस,
जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खुप दिवस लागलेत,
मनावरील जखमा भरायला.....


दुःख अंतरी दाबुन,
एकांतामध्ये रडत असतो,
म्हणुनच का कोणास ठावुक,
सर्वांसोबत हसत असतो.....


तु आयुष्यात परत येऊ नकोस,
तुझे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय,
त्या सर्व आठवणी विसरायला.....

पण...
काहीही असले तरी........


तुला शोधायला तरी,
नजर माझी फिरत असते,
आकाशीचा चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटुन येते......


तुला विसरण्याचा,
आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय,
पण ही कवीता लिहीता लिहीता,
पुन्हा तुलाच गं मी आठवतोय


--
आठवण माझी कधीतरी येईलच तुला,
तु कदाचीत रडशीलही,
हात तुझे जुळवुन ठेव तु,
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील,
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे,
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल.....

नवरदेवाचे उखाणे


 १) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
    साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!!
 २) दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
     ....चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!
 ३) रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा
     .....चा पायगुण शकुनी खरा !!!!!
 ४) संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
     .....चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!
 ५) सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
     .....मिळाली आहे मला अनुरूप
 ६) नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
     .....झाली आज माझी गृहमंत्री !!!!!
 ७) दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
    सौ.....सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!
 ८) वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
    सौ.....सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास !!!!!
 ९) दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
     माझी आणि सौ.....ची अखंड राहो प्रीती !!!!!
१०)जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
    सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा !!!!!
११)देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
    सौ.....ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!
१२)बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी
    सौ..... आहे माझी अर्धांगिनी !!!!!
१३)आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
     सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!
१४)दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
    सुखी आहे संसारात सौ..... च्या संग !!!!!
१५)गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
    सौ....ने दिला मला प्रेमाचा साथ !!!!!
१६)सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
    सौ.....चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!
१७)अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
     सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!
१८)चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
     सौ....चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!
१९)चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
    सौ.....चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!!
२०)इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
    सौ....चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!
२१)हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
     सौ.....चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!!

कुणाला कुणी असं सोडुन का जातं?


मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?
जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?
कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास
काट्यांतच मग खुडावं लागतं.....
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?


होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं
बरसतानाच नकळत हरवुनही जातं
भर चांदरातीही मनास मग
एकट्यालाच झुरावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये
झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये
वाळवंटी या जगात
एकट्यालाच मग जगावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मी जगुन घेतो एकटा
माझ्याशीच मी हसुन घेतो एकटा
तरी एकट्यालाच रोज रोज मला मरावचं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

आयुष्याच्या या वाटेवर

आयुष्याच्या या वाटेवर

मी माझी वाट शोधतोय,

वाहणारे अश्रु येतात जिथुन

मी तो पाट शोधतोय..

मला व्यापलं आहे जीवनाने

अन,मी माझी जागा शोधतोय,

नात्यांच्या या रेशिम बंधातुन

मी माझा धागा शोधतोय...

मनात जे भरुन आहेत कधीचे

मी त्या श्वासांना शोधतोय,

जगण्याची जे उर्मी देतात

मी त्या ध्यासांना शोधतोय....

खरं सांगायचं तर मी

माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय

दोन शब्द आईसाठी ......

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील

हा भास तुझा होताना……

मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना

नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला

स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!

वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..

झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!

पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!

ताटकळत कैक वेळा , वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा , मन उगा हताश होते !

न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!

हा भास तुझा होताना……..

एक ना एक दिवसतरी "माझा" करीन मी तुला

एक ना एक दिवसतरी "माझा" करीन मी तुला
तुझ्या नकळत मी तुझ्यावर प्रेम केलं
तुझ्या बरोबर आयुष्यभर राहण्याचं स्वप्न पाहीलं
तुझ्यामुळेच प्रेमाचा खरा अर्थ मला कळला
पण या प्रेमाची जाणीव कशी करुन देऊ तुला

जिथे जिथे पहाते तु आणि फ़क्त तुच दिसतोस

नजरेस नजर देता खट्याळ हसतोस
तुझ्याबरोबर असणं जणू स्वप्न वाटे मला
मला सगळीकडे तुच दिसतोस

पण मग मीच कशी रे दिसत नाही तुला

तु अजाण आहेस माझ्या या प्रेमाने
सांगितल नेहमी मुक्या ईशा-याने
पण तो ईशारा तुला कधीच कसां ना कळला
कधी मी सगळ शब्दात सांगु शकेन का तुला?

एकदा निश्चयच केला होता तुला विसरण्याचा
हजारदा केला प्रयत्न सगळं संपवण्याचा
पण प्रत्येक प्रयत्न माझा, माझ्याच प्रेमापुढे फ़ोल ठरला
जणु हे वेडं मन कधी विसरुच शकत नाही तुला

आता तर फ़क्त एकच स्वप्न आहे या मनाचं
तुज्यासोबत शेवटपर्यंत जगण्याचं
एक दिवस नक्कीच जिंकेल
हा वेडा जीव आज जो या खेळात हरला
एक ना एक दिवसतरी "माझा" करीन मी तुला

तू नसतानाही,तुझ्यातच रमायला शिकलो आहे,

तू नसतानाही,तुझ्यातच रमायला शिकलो आहे,

मी आता "ALL IS WELL " म्हणत,

 स्वतःच्याच  मनाला फसवायला शिकलो आहे...

गर्दीतही स्वताच्याच विचारात हरवलेला असतो,

आणि एक-एकी तिच्या दारी स्वतहाला सापडतो,

रोज चालतो ती वाट आता विसरायला लागलो आहे,

मी आता "ALL IS WELL " म्हणत,

 स्वतःच्याच  मनाला फसवायला शिकलो आहे...
कारण नसता mobile च्या बटनांशी खेळत असतो,

कविता सुचली की sms टाइप करून लगेच delet करत असतो,

कधीतरी चुकून तिच्या mobile वर कविता send करत आहे,

मी आता "ALL IS WELL " म्हणत,

 स्वतःच्याच  मनाला फसवायला शिकलो आहे...
ती समोर आली की मनाची चल-बिचल होते,

आज ती ओळख दाखवेल,की,

नजर चोरून जाइल असे प्रश्न मन विचारते,

म्हणून तर आता खिन्न- शून्य भाव चेहरयावर आणून,

मान सरळ ठेउन चालायला शिकलो आहे,

मी आता "ALL IS WELL " म्हणत,

 स्वतःच्याच  मनाला फसवायला शिकलो आहे...

कधी कळणार तुला मनात माझ्या फक्त तूच आहे,

कधी कळणार तुला मनात माझ्या फक्त तूच आहे,
पण सांगताना मात्र मन का तुझ्याशी अबोल आहे,
ओठांवर आलेले शब्द अचानक मागे खेचले जातात,
तू समोर असताना मात्र ते आवर्जून ओठांवर येतात,
तू रागवलास की मन माझच मला खात असत,
मग नंतर माझच मन मला फसवत,
तसेदोघांचे मैत्रीचे नाते अटूट आहे,
कधी कळणार तुला मनात माझ्या फक्त तूच आहे,
पण सांगताना मात्र मन का तुझ्याशी अबोल आहे,
तुझे प्रत्येक शब्द माझ्या हृदयाला चिंब भिजवून टाकतात
जणू एका जोडप्याला बघताच पावसाची सरी मुद्दामून जोरने वाहू लागतात
शब्द माझे बोलताना जरी चुकले तरी, भावना मात्रा बरोबर आहे
कधी कळणार तुला मनात माझ्या फक्त तूच आहे,
पण सांगताना मात्र मन का तुझ्याशी अबोल आहे,
चालताना तुझ्या हाताचा स्पर्श होताच, हृदयाची अवस्था सुद्धा मनासारखी होते,
मग ते सुधा निडर होऊन मनाला सांगत की माझ्या हृदयात सुद्धा तूच आहे
आपल्या भेटीचे प्रत्येक क्षण मी जपून ठेवले आहे
कधी कळणार तुला मनात माझ्या फक्त तूच आहे,
पण सांगताना मात्र मन का तुझ्याशी अबोल आहे,
क्षणात वाटत तुला सर्व सांगाव,
क्षणात वाटत नको आधी तुझ मन
जाणाव
आता तर विषय टाळण्याचे बहाने सुद्धा संपलेले आहे
खर सांग ना का मी ही तुझ्या मनात आहे :)

नसतेस घरी तू जेव्हा

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन् चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जातो

एकाकी केविलवाणा
मी घरभर भिरभिर फिरतो
घुमघुमत्या आवाजाने
भिंतींना हाका देतो

तव मिठीत विरघळणार्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविन हृदय अडावे
मी तसा आकंतिक होतो

तू सांग सखे मज काय

मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

मी देईन कधी हाक तुला प्रिया

मी देईन कधी हाक तुला प्रिया
सांग साद मला तु देशील ना ?

खूप अडखळीची आहे वाट ही
कधी काट्यांवरी पडेल टाच ही
धडपडताना ह्या खडतर वाटेवर
सांग हात मला तु देशील ना ?

तुझ्या प्रितीचा आहे ध्यास मला
तुझ्या भेटीची आहे आस मला
कधी एकटेपणाचा होईल भास मला
सांग साथ मला तु देशील ना ?

कधी रागवेन मी तुझ्यावरती
कधी भांडेन मी तुझ्या संगती
कधी येईल दडपण या मनावरती
सांग कुशीत मला तु घेशील ना ?

मी देईन कधी हाक तुला प्रिया
सांग साद मला तु देशील ना ?

त्या दिवशी मी, प्रेमात पडलो

त्या दिवशी मी,
प्रेमात पडलो,
बरंच लागलं,
पण रक्त … जखम वगैरे काही नाही दिसलं….

तिने हसून माझ्याकडे पाहिलं,
आणि मी तिच्या डोळ्यातच हरवून गेलो …
तिच्या काळ्या काळ्या केसांत ….
मी स्वतः ला गुंतून बसलो ….

तेव्हा पासून मला Newton's Law ,
चुकीचा वाटायला लागला..
force of Gravity चा law लिहिताना,
तो थोडासा चुकला ….

Apple झाडावरून सरळ….
जमिनीवरच पडलं,
पण प्रेमात पडल्यापासून….
मला हवेत असल्या सारखं वाटायला लागलं….

रात्रीच्या स्वप्नात…
तिला पाहिलंच …
पण दिवस भर उघड्या डोळ्यात,
तिचंच स्वप्नं दिसत राहिलं …

आज-काल मला पावसात भिजावंसं वाटतं …
जुहू चौपाटी च्या वाळूवार चालावंसं वाटतं,
Bandstand वर तिच्या सोबत बसावंसं वाटतं …
Hiranandani Gardens मधेय फिरावंसं वाटतं …

त्या दिवसापासून मला ….
"कुछ कुछ होता है" वगैरे वाटयाला लागलंय ….
त्यात अजून काय तर ….
मला "दिल तो पागल है" सारखं गाणं पण
आवडायला लागलंय ….

तेव्हापासून माझं मन "Rocky " मधल्या संजय दत्त सारखं …
तिच्या शिवाय कुठेपण लागत नाही आणि वेळ पण जात नाही …
मी "मोहब्बते" मधल्या जिम्मी शेरगिल सारखा …
चालता चालता थांबतो … तर बसल्या बसल्या कुठेतरी हरउन जातो …

tweeter वर पण आज-काल मी फक्त …

"Love Quotes"च tweet करतो….
माझा Facebook वरचा status पण …
असाच काहीतरी असतो ….

दिवसा गुलाबी ढगांत ….
लाल लाल सूर्य मला भासतो ….
तर रात्री … रंग बिरंगी .. तारे आणि चंद्रा सोबत ….
तिचाच चेहरा मला दिसतो …

प्रेमात पडल्यापासून मी ….
जरा विचित्रच वागायला लागलोय ….
गप्पं गप्पं बसायला लागलोय ….
पण मनातल्या मनात …
वादळांना सामोरे जायला लागलोय ….

काहितरी वेगळ करायचय........

ढगातुन थेंबाच्या सोबत बरसायचय
पाणवठा जरी गढुळ असला तरी
पुन्हा पाणवठयात येवून नहायचय.

काहितरी वेगळ करायचय........
आसमंतात वा-यासारख झाडांना झोंबायचाय
पानांच्या जाळीवर बसुन उडायचय
मिटलेल्या श्वासांना आता
अस्तित्वातात आणायचय.

काहितरी वेगळ करायचय........
स्वप्नांच्या देशात भटकायचय
प्रयोगानिशी शोधायचय
भवनेच्या पंखात बळ घेऊन
पुन्हा मायदेशी परतायचय.

काहितरी वेगळ करायचय........
चिखलातल्या कमळाला फुलवायचय
सुकलेल्या फुलांना जगवायचय
माती रुक्ष असलि तरी
मातीतल्या माणसांसाठी जगायचय.

काहितरी वेगळ करायचय........
एक स्वप्न उराशी बाळगायचय
काहि वेगळ करता नाहि आलं तरि
माणसातल्या माणूसकीला मात्र जपायचय...................

चार क्षण

मनातले दुःख माझ्या चेहरयावर का दिसले
कोणासाठी हसावे कोणासाठी रडावे ,
मनातील दुःख कोणाला सांगावे
कितीदा मनातल्या मानत आपण बोलावे .

मनातल्या मनात खुप गोंधळ झालाय,
अश्रूंनी डोळ्यात महासागर बनलाय ,
हया जीवनाचा खुप कंटाळा आलय,
जगण्याचा जणू आनंदच हरवून गेलाय.

ही दशा झाली आहे माझ्या मनाची
आता काळजी करू तरी कुणाची
आस आहे ती धावत येण्याची
वाट पाहतोय त्या चार क्षण सुखाची .....................

*मला प्रेम जमलेच नाही.......!*



*हो मला प्रेम कधी जमलेच नाही
तिच्या शिवाय मन माझ कशात रमलच नाही!१!

माझ्या मनात
सारखा तिचाच विचार
तिच्या, मात्र मित्रांशी
फोनवर गप्पाच फार!२!

तिला हसवण्यासाठी करायचो
मी जीवाचे रान,
ती म्हणते कशाला देतोस
मला फुकटचा त्राण!३!

तिला खरचटले तरी
व्हायचा हृदयावर घाव,
ती म्हणते कशाला आणतोस
चेहऱ्यावर काळजीचा आव!४!

फोन करायचो तिला
वाटायची तिची काळजी,
ती म्हणते परीक्षा असून फोनवर बोलतोस
असा कसा तू निष्काळजी!५!

तिला सांगायला गेलो
माझे आहे तुझ्यावर प्रेम,
ती म्हणते तुझे नाही का
आयुष्यात कोणते aim!६!

तिला वाढदिवसाला भेटायला गेलो
भर उन्हात तापत,
ती म्हणते, मी मित्राच्या
घरी आहे केक कापत!७!

३वर्षे झाली आज, मी
गुजरातला नोकरी करत आहे,
माझ्या प्रेमाशिवाय मी
एकाकी जीवन जगात आहे!८!

काल आठवण आली म्हणून
तिच्या घरी रिंग केली,
तिच्या आईकडून मला
वेगळीच बातमी कळली!९!

मी जायच्या दुसरया
दिवशीच ती आजारी पडली,
अन माझ्या विरहाच्या
तीव्र दुखानेच देवाघरी गेली!१०!

तिचे अव्यक्त शब्द कळलेच नाही
तिच्या मनातील भाव ओळखलेच नाही
तिच्या डोळ्यातील प्रेम जाणलेच नाही
म्हणून, मला प्रेम कधी जमलेच नाही!११!

कुणाची सोबत

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी.

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे 'मी पण' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे.

पण,पण
कुणाच्या इतक्याही दूर जावू नये
की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच नसाव
कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा.

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी.

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी.

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे.

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहीच नसावे.

शाळकरी प्रेम..


धांदरट मुलांच्या रांगेत बसायचॊ मी
अन तु बसायची हुशार मुलींच्या रांगेत
मठ्ठ होतो मी ..
पण तु किती हुशार होती...
प्रार्थनेच्या वेळी
तु पसायदान किती सुंदर म्हणायचीस
माझ्या मरगळलेल्या चेहरयावर
तु अनोखे तेज आनायचीस..
माझ नाव नेहमी ब्लकलिस्ट मधे दिसायच..
तुझ नाव मात्र शिक्षकांच्या तोंडून फेमस व्हायच...
तुझं हे सत्र असचं कायम राहील..
माझं स्वप्न असच यशापासून दुर जात राहीलं..
तु संगीतात एक नंबर असायची
खेळामधे मात्र माझीच अव्वल बाजी असायची..
मास्तरांनी माझी फजिती केली की
तु किती गालातल्या गालात हसायची...
एकदा मात्र खरोखर झाली कमाल,
एका नाटकात तु झाली प्रवासी अन मी झालो हमाल..
त्यावेळेस तुझ्या अभिनयाशी स्पर्धा करताना
खरोखर मी झालो होतो बेहाल...
भोंडला असायचा तुम्हा मुलींचा
आम्हाला मात्र सुट्टी असायाची..
पण तुला साडीत पहायचं म्हणून
माझी त्या भिंतीवरून नेहमीच डोकावणी असायची..
एकदा हिम्मत केली मी अन
सांगितल माझ्या ह्रिदयातलं,
तु म्हणालीस अरे वेड्या कसं शक्य आहे ते?
माझ घर सावलीतलं अन तुझ मात्र रखरखीत उन्हातल...
तुझ ते वाक्य मला
खुप उशीराच कळले..
स्वप्न ते माझे प्रेमजिवनाचे
खरोखरी कापरापरी विरघळले..
आता मी कलेक्टर झालोय
हे तुला सांगू तरी कसं
तुझ्या सावलीतल्या घरकूलाशेजारी..
माझं झोपडं बांधू तरी कस?
तुच समजून घे सारं काही..
अन समजून घे थोडसं मलाही..
 तुझा होऊ पाहतोय...
अजुनही तुझीच वाट पाहतोय..
शाळेतल्या त्या प्रेमाला जपत...