बघ तिला सांगुन

बघ तिला सांगुन
कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात.
कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात.
कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही
असेच काही दुसरीकडेही होत असेल
शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच
म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन !
किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन
तो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुन
राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !
किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन
पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन
थॅंक्स!म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !
किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन
बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन
एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !
रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन
आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन
मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !
तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन
एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन
लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !
 

तुझ्या शिवाय

आज तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं,
तुझ्या बोलण्यातील राग दुखावतोय,
आणि उपासनेने मन जळतय.

एक दिवस असा होता, जेंव्हा तु माझ्या मागुन फिरायचास
माझा प्रत्येक शब्द, तु फुलासारखा जपायचास,
मला एकदा बघण्यासाठी, तासन तास वाट बघायचास
डोळ्यात डोळे घालुन माझ्या
स्वतःला त्यात शोधायचास.

पण आज का कोण जाणे, हे सारे बदललय,
माझं असं काय चुकलं की
तुझं माझ्यावरचं प्रेमचं संपलय?

मला जे समजायच ते मी समजली आहे,
आज तुला मी नको आहे,
हे तुझ्या वगण्यावरुन जाणवलं आहे

तरी त्यात तुझं सुख असेल
तर माझी काही हरकत नाही,
तु सुखी होणार असशील तर
मरणाही माझा नकार नाही.

पण तरीही मनात कुठे तरी वाटतयं,
तुला कधीतरी माझी आठवण नक्की येईल,
मला एकदा बघण्यासाठी तुझं मन अतुर होईल
पण तेंव्हा, तुला सावरायला, मी तुला दिसणार नाही,
कारण तुझ्यापासुन दुर राहुन
मी जास्त दिवस जगणार नाही.....

तु फ़क्त हो म्हण…

तुला मी स्वप्न देतो,
स्वप्नांना पंख देतो,
पंखाना बळ देतो…. तु फ़क्त हो म्हण
तुला हवी ती चांदणी देतो..
तुझ्या चांदणीचा चंद्र होतो
सारे डाग स्वतःवर घेतो…. तु फ़क्त हो म्हण….
तुला साती रंग देतो
तुझ्या हाती इंद्रधनू देतो
सारे रंग मिळूनही मी मात्र सफ़ेद रहातोतु फ़क्त हो म्हण
खर सांगायचं तर काय हवं ते दे देतो
तुझ्याकडच तुलाच कसं देणार
नाहितर म्हटलं असतं माझं काळीज देतो…. तु फ़क्त हो म्हण

सांगता येत नव्हतं माझं प्रेम

अळवाच्या पानावरचं पाणी होतं माझं प्रेम
करत असूनही सांगता येत नव्हतं माझं प्रेम
भावनेच्या ओघात वाहत चाललं होतं माझं प्रेम
आठवानींच्या सागरात बुडत चाललं होतं माझं प्रेम
पावसांच्या सरीत चिंब न्हालं होतं माझं प्रेम
थंडीच्या गारव्यात गारठलं होतं माझं प्रेम
तिच्या एकेका भेटीसाठी आसुसलं होतं माझं प्रेम
गप्पा तिच्याशी मारताना रंगून जात होतं माझं प्रेम

मनात कुठेतरी खोलवर दडलं होतं माझं प्रेम
कललच नाही मला कसं जडलं माझं प्रेम
वाटल होतं सांगुन टाकावं तिला माझं प्रेम
तिच्या मनाला पटेल असं समजवावं माझं प्रेम
सर्वांनी सांगितलं एकतर्फी प्रेम म्हणजे माझं प्रेम


सांगितल्याविना तिला झुरतं राहिलं होतं माझं प्रेम
मनातल्या मनात कुठवर लपवून ठेवावं माझं प्रेम
माझ्याच मनात द्वंद्व निर्माण करत माझं प्रेम
होकार-नकाराच्या वादलात सापडलं होतं माझं प्रेम
निश्चय केलाच तिला सांगाव माझं प्रेम

वर्षे गेली... सांगायची तयारी करायला माझं प्रेम
शोधून मुहूर्तं सापडला, तिला सांगायला माझं प्रेम
गाठलं रस्त्यातचं तिला, एकदा सांगायला माझं प्रेम
थांबवलं तिनेच मला, सांगण्यापुर्वीच माझं प्रेम
हातातली पत्रिका पाहून गोथालं तिथेच माझं प्रेम
सहकुटुम्ब, सहपरिवार लग्नाल अगत्य यायचं सांगुन गेलं माझं प्रेम

आज होऊन तमाशा मीच जगलो इथे

आज होऊन तमाशा मीच जगलो इथे
राहीलो एकटा सगळ्यास मुकलो इथे.

राहीली ताट मान त्या मोठ्या मनाची
मी तर कणा मोडलेला सदा वाकलो इथे.

आता कुठे सुरवात म्हणे झाली सुखांची
त्या सुरवाती आधीच मी तर संपलो इथे.

होती आशा मला वादळास मिठीत घेण्याची
तीच्या इवल्याशा श्वासात मी गुतंलो इथे.

ना कळाल्या तीच्या भाषा ना कळाल्या दिशा
मी वाट चुकलेला असाच भरकटलो इथे.

मागे वळून पाहता शुन्य होता सोबतीला
दमडीच्या मोलाने भगांरात विकलो इथे.

कोणी आल होत दुःखं विकत घेण्यासाठी
मी घेउन टोपली मग बाजारात बसलो इथे.

हो असच संपल जीवन उद्याच्या प्रतिक्षेत
उद्यासाठी आजचा प्रत्येक क्षण मुकलो इथे.

काल म्हणे तीला खरच माझी आठवण आली
आठवणीत तीच्या मग मीही डोळ्यातून ओतलो इथे.

मी नीवडूंग जगलो नभात.

आयुष्य होते उरलो नभात
सा-याच राती सरलो नभात.

तो मीच तारा नभि तूटलेला
तूझ्याच साठी तुटलो नभात.

तो चंद्र तुला फ़सवून गेला.
असाच मीही फ़सलो नभात.

हो आज तीही विसरून गेली
पाहून वाटा बसलो नभात.

ती एक आशा मज चादण्यांची
मी चादण्यांशी हरलो नभात.

दिला कधी ना नियतीस दोष
मी नीवडूंग जगलो नभात.

हा दगड पाझरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
हा दगड पाझरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन
कधी श्वास गुदमरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही मी त्या वाटा चुकतो कधी तरी
तेव्हा रस्ता बदलला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तेव्हां तुला पावसाची ओढ लागे सदा काळी
ग्रीष्मात मेघ बरसला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझी प्रित सदा त्या उसळत्या लाटांवरी
हा किनारा झरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही तु म्हणे लाल हात रंगवतेस कधी
तेव्हां माझा रंग उडाला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

फ़ार मोठा इतिहास तुझ्या छोट्याश्या प्रेमाचा
तो मी शब्दात कोरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

सारच मी जिकंत आलो आजवर पण
मी हा जुगार हरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझ मोठ होण्याच स्वप्नं होत म्हणूनच
हा निवडूंग बहरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी.

तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे

तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे
कीचांळत्या जखमांसाठी मी आभारी आहे.

कुठे होता खिशात रुमाल माझ्या कधी
तु दिलेल्या आसवांसाठी मी आभारी आहे.

कुणाचा हा प्रवास कधी पुर्ण झाला आजवर
तुझ्या त्या चार पावलांसाठी मी अभारी आहे.

आज रात्र जाते चादंण्या मोजण्यात माझी
कधी तु दिलेल्या स्वप्नांसाठी मी आभारी आहे.

आजवर किनाराच माझ्या नशीबात होता
तुझ्या त्या सागर लाटांसाठी मी आभारी आहे.

आयुष्य तुझे रंग पाहण्यात गेले माझे
तु बदलेल्या रगांसाठी मी आभारी आहे.

काल तो रस्ता ही म्हणाला सांग तिला
तु दिलेल्या वळणांसाठी मी आभारी आहे.

अगंण कानात कुजबुजुन गेल रात्री, म्हणे
न तुटणा-या गुलाबांसाठी मी आभारी आहे.

मी शब्दांचा सौदागर म्हणून जगलो सदा पण
तु दिलेल्या त्या शब्दांसाठी मी आभारी आहे.

आज हा निवंडूग ह्या शब्दात ळॊळतो सदा
तु दिलेल्या ह्या छदांसाठी मी आभारी आहे.

माझ सार जिवन तुझ्याच नावावर होत

तुझ्या शिवाय हे आयुष्य कुठवर होत
माझ सार जिवन तुझ्याच नावावर होत

तु गेलीस तेव्हां घरानेही श्वास रोखलेला
तुझ्या आठवणीचं वादळ माझ्या घरावर होत.

गुदमरत होता बेभान वारा अगंणात माझ्या
कधी तु माळलेल गुलाब त्या दारावर होत.

तो मेघही वेडा आज उगाच बरसुन गेला
आधीच आसंवाच पाणी माझ्या गालावर होत.

असाच कोलमडुन पडला घराचा तो कोनवासा
तुझ्या विरहाच ओझ त्याच्याही मनावर होत.

शेवटी शोधला एक कोपरा निवांत असलेला
तोही ओघळला त्याचही प्रेम तुझ्यावर होत.

मीही कसा जाउ सोडून तो घराचा पसारा सारा
निघालो तर दिसलं तुझच नाव दारावर होत.

कुपणांत म्हणे काल निवडूंग कुजबुजत होता
त्याचही खुप प्रेम त्या निर्दयी अगंणावर होत.

होऊन हिरवळ या श्रावणात ती आली

होउन गारवा आयुष्यात ती आली
घेउन सुखांची बरसात ती आली

मी तर पाकळ्यांची आस केली
बनुन सडा पारीजात ती आली

रस्ता चालत होतो काट्यांचा जेव्हां
सोडून तीची पाउलवाट ती आली

बुडता बुडता किनारा गवसला मला
होऊन माझा आधार लाट आली

आसवात होतो कधी मी चिबं भिजलेला
घेऊन मग मेघातुन बरसात ती आली

आजवर या कुट्ट काळोखात जगलो
होउन प्रकाश घरी साजंवात ती आली

आसवात कधी आभाळ पाहील नाही
उधळून चादंण्यात चादंरात ती आली

कोण म्हणे मी भगांर भगांरात जगलो
रगंवुन रांगोळी माझ्या दारात ती आली

हा एक निवडूंग वाळवटांत होता एकटा
होऊन हिरवळ या श्रावणात ती आली.

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे


कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

आले गळुन नयनात तुषार होते

तीलाच द्याव मन हेच विचार होते
तीच्या निशब्द ह्र्दयात नकार होते.

ती दोष देउन जरी नियतीस गेली
माझे तिच्याहुन नशीब सुमार होते.

कर्जात बूडुन पुर्ण जगलो असाच
आयुष्य जणु नुसतेच उधार होते.

तीला अर्थ समझला हसण्याचा जेव्हां
आले गळुन नयनात तुषार होते.

अश्या अनेक ह्रदयात निवास तीचा
माझेच ते ह्र्दय जणू चुकार होते.

काळोख तो सहज नशेत तोल गेला
झाली सकाळ तर तेच गटार होते.

आता कुठे लपवु ओघळत्या अश्रुंना
माझे अश्रुच गळण्यात हुशार होते.

शून्य

आयूश्य धुडांळत झरला शून्य होता
एका ह्र्दयावर हरला शून्य होता।

तोडून बधं मिठितुन तीच्या सूटावे
तीने मुठित जणु धरला शून्य होता।

मैफ़ील सपंवुन उपडया पेल्यातून,
काळोख धुडांळत उरला शून्य होता।

जून्या जखमा तुटुन अश्या आल्यावर
पून्हां अश्रुनी जणु भरला शून्य होता।

पाहून अखेर जिवन त्या राखेपाशी
आता सरणावर सरला शून्य होता।

तेव्हां ति जरी विसरुन गेली शून्यास
तीच्या नयनात उतरला शून्य होता।
 

नसलेलच असण तरी का शाश्वत उरल होत ??

विखुरलेल्या पायवाटेवरती
निर्जीवत्वाच बीज भिरकल होतं
पायाला काहीतरी सलत होतं
बोथट धारेच भय सुजत होत
सलत होत सलत होतं
काहीतरी खुपत होतं .........

चितेमध्ये ओल लाकूड
जळत होत जळत होतं
मातीच सोन होत होतं
सोन्याने मातीला मढवत होतं
भस्मात मन राख होत होतं
सलत होत सलत होतं
काहीतरी खुपत होतं .........

चिरडलेल्या काट्याची
चिरगुट घेत घेतच
कुणीतरी जगत होतं
जगण्याला पुकारून
मरूनही जगत होत
सलत होत सलत होतं
काहीतरी खुपत होतं .......

डसलेल्या विंचवाला दंश करीत
सावलीच सावज अंधाराला
सापडत होत सापडत होत
अन बेफिकीर उन उजाडून
छळवटून चित्कारत होत
सलत होत सलत होतं
काहीतरी खुपत होतं ........

प्रश्न खुंटीला टांगून
निवांत उत्तर दवडत होत
विटाळलेल मन मात्र
कधीच मालवल होत
सारच काही संपल होत
पण ....
नसलेलच असण तरी का शाश्वत उरल होत ??

मी येणार नाही

http://3.bp.blogspot.com/-XG21UwNIq2A/TiwjFm4Sy3I/AAAAAAAADRw/3CIiXhAVIv0/s400/Dont_Leave.jpg
 
आभाळाचा तुझा खंड अभेद्य आहे
डागाळलेल्या चंद्राची कोर तू लेवू नकोस
मी येणार नाही

आंदणाच्या जराने ओठ उष्टावला आहे
बस्स आणखी काही मला तू भरवू नकोस
मी येणार नाही

तुझ्या दारात उंबर्यापाशी येवून जाईन
तुझे मांगल्याचे चांदणे दुरून नेसून जाईन
पण घरात मला नेवू नकोस
मी येणार नाही

तुझ्या चांदण्यात मी जळून जाईन
माझ्या हृदयात तुझे हृदय वितळून जाईल
पुन्हा मला बोलावू नकोस
मी येणार नाही