संकटाना कधी कंटाळायच नसत

संकटाना कधी कंटाळायच नसत
त्याला सामोरे जायच असत !
कुणी नाव ठेवली तरी थांबायचं नसत
आपल काम चांगलच करायच असत !
अपमानान कधी खचायच नसत,
जिद्दीने बळ वाढवायच असत .
निराश मुळीच व्हायच नसत .
चैतन्य सदा फुलवायच असत
पाय ओढले म्हणून परतायचं नसत
पूढे आणि पुढेच जायचं असत
लोकनिंदेला कधी घाबरायच नसत
आपल सामर्थ दाखवायच असत
जीवनात खूप करण्यायोग असत !
पण आपल तिकडे लक्षच नसत
रागाने कोणाला बोलायचं नसत
प्रेमाने मन जिंकायच असत !
प्रेमाने लहान थोर पहायच नसत
एकमेकांना आधार देऊन, मार्गदर्शन करायचा असत !
-अनामिक 

घरापासून दूर



घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे |

तुझ्या मायेचा छायेत बिनधास्त होतो,

आता राख्राखत उन आहे ||

 

प्रत्येकजन इथे फक्त स्वतःपुरता विचार करतो |

दुसऱ्याचा मनाचा विचार न करता बेधडक टीका करतो |

दूर जाऊन कळले मला हे जग खूप स्वार्थी आहे |

घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||.

 

स्वप्नांच्या ह्या नगरीत सगळे लाखोनमध्ये एकटे असतात |

स्वतःला पुढे जायचे म्हणून दुसऱ्याला मागे खेचत असतात |

मी मात्र प्रतेकाला मदतीचा आधार देत आहे |

घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||

 

ठरवलेले नियम कोणी मनापासून पाळत नाही |

शिकण्यासाठी donetion चे रेट कधीच ढळत नाही |

भ्रष्टाचाराची कीड आज चांगुलपणाला पोखरत आहे |

घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||

 

खरच वाटत आता तरी मनुष्याने सुधरायला हव |

स्वतः साठी थोड, थोड दुसऱ्यांसाठी जगायला हव |

निस्वार्थी असा संस्कारांची या जगाला खूप गरज आहे |

घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||

 

स्वतःपुरता विचार करण्याचा तसा प्रतेकाला अधिकार आहे |

पण दुसऱ्याला मारून जगन, हा कुठल्या जगाचा न्याय आहे?

स्वतःपुरत जगुनही दुसऱ्यांना जीवन शिकवायचं आहे |

घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||

जग खूप वेगळ आहे |

तुझ्या मायेचा छायेत बिनधास्त होतो,

आता राख्राखत उन आहे ||

प्रत्येकजन इथे फक्त स्वतःपुरता विचार करतो |

दुसऱ्याचा मनाचा विचार न करता बेधडक टीका करतो |

दूर जाऊन कळले मला हे जग खूप स्वार्थी आहे |

घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||.

स्वप्नांच्या ह्या नगरीत सगळे लाखोनमध्ये एकटे असतात |

स्वतःला पुढे जायचे म्हणून दुसऱ्याला मागे खेचत असतात |

मी मात्र प्रतेकाला मदतीचा आधार देत आहे |

घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||

ठरवलेले नियम कोणी मनापासून पाळत नाही |

शिकण्यासाठी donetion चे रेट कधीच ढळत नाही |

भ्रष्टाचाराची कीड आज चांगुलपणाला पोखरत आहे |

घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||

खरच वाटत आता तरी मनुष्याने सुधरायला हव |

स्वतः साठी थोड, थोड दुसऱ्यांसाठी जगायला हव |

निस्वार्थी असा संस्कारांची या जगाला खूप गरज आहे |

घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||

स्वतःपुरता विचार करण्याचा तसा प्रतेकाला अधिकार आहे |

पण दुसऱ्याला मारून जगन, हा कुठल्या जगाचा न्याय आहे?

स्वतःपुरत जगुनही दुसऱ्यांना जीवन शिकवायचं आहे |

घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||

 -अनामिक







तू आहेस...

माझ्या प्रत्येक कल्पने
मध्ये तू आहेस...
.
संपलेल्या गाण्याच्या
कंपना मध्ये तू आहेस..
.
बरसून गेलेल्या पावसाच्या
श्वासात तू आहेस
.
संध्या काळच्या संधी
प्रकाशात तू आहेस..
.
नुकत्याच काडलेल्या
चित्राच्या हास्यात तू
आहेस..
.
मी गेलो आहे संपून पण
माझ्या नसण्यातही तू आहेस

-अनामिक

मी....

मी हसणारा, मी हसवणारा...
मी खेळणारा, मी खेळवणारा...
मी बोलणारा, अन बोलायेला लावणारा...

मनातल सगळ काही जाणणारा,
अन मनात घर करून राहणारा...
मी ....

स्वतःच दुखः न विसरणारा ...
डोळ्यात साचलेल्या आश्रुना, कधीही न पुसणारा...
फक्त तिलाच आठवणींत शोधणारा...
अन कोणाच्याही नकळत खूप खूप रडणारा...
मी...

कोणालाही न कळणारा...
त्यांचात असून हि,
वेगळा असा राहणारा..
तिझ्याच आठवणीत झुरणारा,
अन तिझ्या परत येण्याची,
रोज वाट पाहणारा...
रोज वाट पाहणारा...
मी....

-अनामिक

किती ...

किती क्षनाचं हे आयुष्य असत,
आज असत तर उद्या नसतं,
म्हणुनचं ते हसत हसत जगायचं असतं,
कारण इथे कोणीच कुणाच नसत,
जाणारे दिवस जात असतात,
येणारे दिवस येत असतात,
जाणारांना जपायचं असत,
येणारांना घडवायच असत,
आणि जिवनाच गणित
सोडवायच असत,
म्हणुनच
कधी कुणासाठी तरी जगायचं
असत,
कुणासाठी तरी जगायचं असत...
- अनामिक
 

तुझे प्रेम

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
ह्या एकाच ओळीने मनात प्रश्नांचे काहूर माजते
आयुष्यात परत मिळणारे प्रेम कधीच का खरे नसते???

तू माझ्यावर केलेले प्रेम खूप निस्वार्थी होते
मनाला हळुवार स्पर्शिणारे जणू मोरपीस होते
मग खरच का तुझे प्रेम माझ्यासाठी शेवटचे होते
मैत्रीच्याही पुढे पाऊल टाकण्यास मी होते नेहमीच घाबरले
तू पुढे केलेला प्रेमाचा हात हाती घेण्यास सदैव नाही म्हंटले
तू माझ्या मनातील भाव समजून घेशील याचीच वाट पाहत राहिले..

तुझे प्रेम माझ्यासाठी खरच खूप मौल्यवान होते
तुझ्या हितापाई तुझ्यापासून दुरावण्याच्या प्रयत्नात मी होते
पण खरच रे वेड्या मी हि तुझ्यावर तेवढच  प्रेम करत होते

मग  खरच का रे तुझे प्रेम माझ्यासाठी अखेरचे होते
नव आयुष्याच्या सुरवातीस नव प्रेमाची चाहूल असेल
माहित आहे कदाचित ते प्रेम तुझ्या एवढे  अनमोल नसेल
पण मग काय ते प्रेम माझ्यासाठी कधीच खर नसेल???

खरच का रे तुझ प्रेम माझ्यासाठी आखेरंच असेल

एक छोटीशी लव्ह स्टोरी ...

एक मुलगा तिच्या GF च्या रोजच्या SMS ( I LOVE YOU ,I MISS YOU ) ने त्रासला होता .

 एके दिवशी तो एक SMS RECIVE करतो पण न वाचताच झोपतो......

 दुसर्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन येतो ...♥♥♥ कि काल रात्री तिची मुलगी कार 

अपघातात मरण पावली .... ..

तो गोंधळतो आणि तो मुलगा फोन मधील SMS वाचतो.....

"DEAR PLEASE तुझ्या घरासमोर ये ,माझा अपघात झाला आहे........

 ♥♥♥ आणि मला तुला शेवटचा पहायचा आहे ....

PLEASE ..." पण तो कमनशिबी मुलगा तिच्या प्रेमाला कायमचा मुकतो.............♥♥♥ 

यावरून मला तुम्हाला एवढाच सांगावेसे वाटते कि आपल्या जवळच्या , 

आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE करू नका..... कारण ती व्यक्ती आपल्यावर 

मनापासून प्रेम करत असते.........♥♥♥

- संग्रहित -

माझ्यासाठी ती....!!!!




आज ती असती तर खूप बर झाल असत 
माझं हृदय मोकळ राहील नसत 
प्रेम आहे माझ तिच्यावर 
पण ते शब्दात व्यक्त करता येत नव्हत ....

आज तिची खूप आठवण येत 
पण तिला विसरण मात्र शक्य नव्हत 
तिच्या डोळ्यात माझं रूप पहायचं होत 
पण त्यासाठी तिने जवळ असण गरजेच होत ....

तीच अबोल वागण मला पहायचं होत 
बस तिन अस आनंदात राहताना पहायचं होत 
दोघांच्या प्रेमाचं एक छोटस घर बांधायचं होत 
पण त्यासाठी तिने जवळ असण गरजेच होत .... !!!! With - My Love ♥♥♥

@ एक उनाड पाखरू ....!!!! ( ऋषी ) ♥♥♥
    २०/ ०७ / २०१२ 

प्रिये तू थोडा उशीर केलास !



काल रात्रीच तुझ्या प्रेमाचा अश्रू,
भिजलेल्या मनातून निघून या नयनी आला,
रोखला त्याला मी भरपूर,पण तो मोठा रगील झाला होता,कधी नव्हे ती त्याला संधी मिळणार होती बाहेर पडायलाबराच काळ पापणीतच अडकून राहिलामी त्याला दमच तसा दिला होता!

......आज तू आलीस
काय चुकले नी काय बरोबर 
हिशोब हा मांडायलाम्हणतेस, एवढ्या लवकर विसरलास सगळं!
पण, प्रिये आज तुझी हि वाक्येमनाला
शीवत नाहीयेत, भावत नाहीयेत!!

होय.....कारण.... 
काल रात्रीच तुझ्या प्रेमाचा अश्रू
भिजलेल्या मनातून निघून या नयनी आलाखूप प्रयत्न केला त्याला मी रोखायचापण तोही मोठा शिगेला पेटला होता..... सरळ एक ठोसा देऊन या गालावर आला!!! 

आणि.....त्या गाळलेल्या अश्रू बरोबरच
तुझे सारे प्रेमही वाहून गेले
होय, सगळंच्या सगळं धुवूननिघाले

प्रिये तू थोडा उशीर केलास गं !!! 
जराशी लवकर आली असतीस.............

जाण्याचा प्रयत्न करतेय..!!


ती मी दिलेल्या सर्व आठवणी,
पुसण्याचा प्रयत्न करतेय..
माझ्या पासुन खुप लांब,
जाण्याचा प्रयत्न करतेय..!! ♥

पण मला माहीत आहे,
ती मला मनातुन काढुचं शकत नाही..

कितीही प्रयत्न केले तरी,

ती मला कधीचं विसरु शकत नाही..!! ♥


मला माहीत आहे,

मी तीच्या डोळ्यात फक्त आश्रुंच दिलेय..

तीला आश्रुं देताना,

मी पण खुप रडलोय..!! ♥


तीला मात्र हे कधीचं,

मी समजुचं दिले नाही..

तीच्यावर माझे खुप प्रेम आहे,

हे मी कधीचं जानवू दिले नाही..!! ♥


कारण मी असा मुद्दाम वागत होतो,

तीला त्रास होऊ नये म्हणुन काळजी घेत होतो..

कारण मला माहीत आहे,...!! ♥


ती माझ्याशिवाय कधीचं राहू शकत नाही..

पण माझ्यामुळे तीला झालेला त्रास,

मी कधीचं पाहू शकत नाही..!! ♥


म्हणुन आजही मी तीच्यासाठी गप्प आहे,

कारण तीच्यावर माझे निस्वार्थ निस्सम

जिवापाड प्रेम आहे..!! ♥

फक्त तुलाच हवा म्हणून

फक्त तुलाच हवा म्हणून,
मी आज तो चंद्र शोधाया निघालो...

आभाळातून तो,
चांदण्यांच्या नकळतच चोराया निघालो...
तुझ्या एका हास्यासाठी,
आज मी सार्या जगाशी भांडया निघालो... 

अन प्रत्येकाला हवा हवासा,
तोच चंद्र... आज मी फक्त,
तुझ्याचसाठी आणाया निघालो...

फक्त तुझ्याचसाठी...
... आणाया निघालो..

कळून चुकल तुला माझी काळजीच नाही

कळून चुकल तुला माझी काळजीच नाही,
ठरवलं खूप काही तर काहीही अवघड
नाही,

पण तुला विसरण एवढ सोपही नाही,
कल्पना केल्या होत्या मनाने खूप काही,

पण प्रत्यक्षात काही घडलच नाही,
म्हणून स्वप्नही आता कसली उरलीच नाही,

तुझ्याबरोबरच आयुष्य सुरु कराव मनात अस कधी येत नाही,
कारण माहित आहे तू माझ्यासाठी बनलेलीच
नाही,

का मी तुझी वाट नेहमीच पाहतो ?
का मी विनाकारण तुझ्याकडून अपेक्षा ठेवतो ?
शेवटी हेच कळत नाही...

जीवन हे एक रम्य पहाट....!!!!



जीवन हे एक रम्य पहाट

संकटांनी गजबजलेली एक वादळवाट !

सोनेरी क्षणाची एक आठवण !

सुख दुःखाचं ते एक गोड कालवण !

प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरीता !

नात्याच्या अतुट शब्दांनी गुंफलेली एक कविता !

जाणिवेच्या पलीकडचं एक जगावेगळं गांव !

यालाच आहे जीवन हे नांव !

- संग्रहित -

आजकाल छोट्या छोट्या गोष्टी पण feel होतात,

आजकाल छोट्या छोट्या गोष्टी पण feel होतात,
निराशेच्या दुखात सगळेच sence dull होतात,
कितीही थांबवलं तरी मन मात्र धाव घेतं,
आठवणींच्या कड्यावरून स्वतालाच झोकून देतं,
कोसळणाऱ्या सारी अन धुंद झालेली हवा,
आपसूक कोणीतरी छेडलेला पारवा,
              पण चिंब भिजलं तरी अंग कोराच वाटत,  


मनावर आलेला मळभ मात्र अजूच दाटत,
मोकळ्या हवेत पण कधी अडखळतो श्वास,
गर्दीत असतानाही होतो एकटेपणाचा भास,
मित्रांच्या संग्तीतही कधी मन मात्र एकटाच राहतं,
birthaday party तही एक मोकळी खुर्ची शोधत राहत,
वेड्या मनाला वाटत ते मित्रांना दुरावलय,
जणू काही काळाने त्यांचा सर्वस्व हरवलाय,

मनाला हवी फक्त मैत्रीचा कंकर,
जखमेवर मारलेली एक प्रेमळ फुंकर,
पण मनाचं दुखः हे मनालाच कळतं,
अश्रू मधून  कधी ते नकळत गळत...

गोष्ट अशी एका भेटीची ....




तिची अन् माझी अशी अचानकच पडली गाठ
दर्शनी पाहता तिला माझी लागली पुरती वाट

हृदयाचे ठोके जसे ढोल वाजत होते
लटपट लटपट पाय तालावर नाचत होते


डावी भुवई उंचावून तिने एक कटाक्ष टाकला
प्रथमदर्शी प्रेमाचा मिळाला मला दाखला

तिचे लुकलुकले डोळे अन् गुलाबही उमलले
प्रीतीच्या फुलांचे गंध माझ्या मनी दरवळले


क्षणभर सर्वत्र स्तब्ध निरव शांतता पसरली
नजरेने नजरेला दिलेली साद मात्र समजली

सावरून बावरून तिने परतीची वाट धरली
दोन क्षणांची साथ, पण मनात कायमची भरली


एकदा मागे वळून पहावे मनाने केला अट्टाहास
आहे हे सत्य का होतोय मज हा भास

तिची धावती पावले माझ्या रोखाने येत होती
हात पसरून मी मिठीत घेण्याची दुरी होती


मला दूर  सारून ती तशीच पुढे गेली
बिलगून
त्या व्यक्तीच्या दुचाकीवर स्वार  झाली
अशाप्रकारे माझ्या मनाचा झाला होता पचका

प्रथमदर्शी प्रेमाचा बसला मनाला धसका.................!!!!

असा का शेवट दिला....

BREAK UP नंतर पहिल्यांदाच त्यांची भेट झाली,

ती पण अचानक घडून आली....

त्याला पाहून तिचे डोळे पाणावले

पण ते अश्रू डोळ्यातून खालीनाही ओघळले.

बर झाल तू भेटलीस खूप दिवसापासून काही सांगायचे होते,

त्याच्या या बोलण्याने तिलाआपले पणा वाटला होता.

माझ आता लग्न ठरलय हे तुला सांगायचे होते,

त्याच्या या शब्दांने तिला क्षणात परक केल होते.

जड अंतकरणाने त्याला अभिनंदन केल,

नक्की येईल लग्नाला हे वचन पण दिल.

निरोप घेऊन तो निघून गेला

इथे अश्रूंचा पूर आला,

कस विसरला हा प्रेमाला हाच प्रश्न वारंवार निर्माण झाला.

कस विसरू शकला

कस पत्थर दिल झाला

सुंदर अशा प्रेमाला

असा का शेवट दिला

असा का शेवट दिला....

आठवतं तुला...??





आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं .
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं .

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता .
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता .

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो .
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो .

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती .
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं ?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं

तेव्हा माझी आठवण कर...

तेव्हा माझी आठवण कर...

जेव्हा काही चुकत असेल.....तेव्हा माझी आठवण कर......
तुला आठवेल बरोबर असलेल....
जेव्हा कधी संकटात असेल.........तेव्हा माझी आठवण कर........
तुझ्या मनात असेल तुला सावरायला.....
जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असेल.....तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल वाऱ्‍याची झुळूक बनून तुझे अश्रू पुसायला........ ..
जेव्हा तू झोपला असेल.........तेव्हा माझीआठवण कर........
मी येईल जवळ तुझ्या तुला निजवायला....... ..
जेव्हा तू एकटा असशील तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल तुझ्या एकांतात तुझ्याशी गप्पा मारायला........ .
जेव्हा तू मला आठवशील तेव्हा माझी आठवण कर.......
मी येईल एक आठवण बनून तुझ्या आठवणीत रमायला......
कारण प्रत्यक्षात तर मी येऊ शकत नाही.....
माझ तस अस्तिव हि नाही......
पण जेव्हाही तुला माझी गरज लागेल....
तेव्हा माझी आठवण कर........मी येईल....नक्की येईल....
तुझे अश्रू बनून......
तुझ्या वेदना घालवायला.......

एक दगडाच मन दे...



आजवर काही मागीतल नाही
पण आज एक वर दे
हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . .

हजार वार होतात
आज या काळजावर
जवचेच सोडून जातात
अनोळखी वळनावर
नाती जशी तुच देतोस
त्यांना थोड आयुष्य दे
हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . .

आठवनी जवळ राहतात
त्यांच्या आनखी काही नाही
सावली सारख्या पाटलाग
करतात आनखी काही नाही
दिलास आता दुरावा तसेच
सहनशीलतेच बळ दे
हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . .

एकांताला आपल मानतो
आता मला कोणीच नको
मीच स्वत:ची समजूत घालतो
आता दुस~याला ञास नको
पण ज्यांनी दिल दु:ख मला
त्यांना भर-भरुन सुख दे
हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . .

ते दुर आहेत खुप माझ्या
तरी का ही ओढ आहे ?
सुखात असतील माझ्यावीना
हीच जानिव गोड आहे
त्यांच्या जीवनात आनंद
आणि हवतर मला दु:ख दे
हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . .

खरच का ग आई

खरच का ग आई
सात जन्म असतात का ?
आवडत्या माणसा बरोबर
पुढचा जन्म मागतात का?
प्रत्येक सातव्या जन्मी मी
सात जन्म मागणार आहे ,
तुमच्याच पोटी येण्यासाठी मी
एक तरी तप करणार आहे………
प्रत्येक पुढचा जन्म माझी
तूच आई व्हाविस ,
अणि जन्म घेण्याआधीच मला
त्याची माहिती असावी………
तुझ बोट धरून मी
इवली पवल चालेन,
इवली इवली पावल म्हणत
प्रत्येक जन्म तुझ्याबरोबर चालेन…..
ह्या जन्मात तुझ्या डोळ्यात
पाणी मी बघितल आहे,
पण तुला हसवान्या साठी मला
परत जन्मा घ्यायचा आहे……..
देता असता आला तर
माझ उरलेला आयुष्य दोघाना देइन,
अणि पुढचा जन्म घेई पर्यंत
तुमच्या मनामधे रहिन….
खरच आई …….

लाटेला माहीती असत

लाटेला माहीती असत

कीनार्‍याशी नात आपल

तरीसुधा भेटायला येते ती

निसर्रगाची कीमया सारी

मेल होन अशक्य

तरी सुधा प्रीत आपली

नीभवते ती..

प्रेमाच हे असच असत

उगच प्रेम आंधळ नसत

एकमेकाना भेटल्याशीवाय

कोनालाच करमत नसत

लाटेलाही कदाचीत

कीनार्‍याशीवाय जमत नसेल

त्याला पाहील्याशीवाय

तीचाही दीवस जात नसेल

म्हणून न चुकता ती

भेटायला त्याला येते

माहीत असुन तीला

ती प्रीत आपली नीभवते

चंद्रावरती बांधलाय बंगला ..!!


चंद्रावर जमीन मिळतेय
तेव्हाच घेऊन ठेवलीय
दहा रुपये एकरने
चक्क वीस एकर घेऊन ठेवलीय
माझ्याकडे कागद पत्र आहे
कालच चंद्राचा सेल आला
बंगला बांधून तयार आहे
कधी येताय राहायला ..?
हुरळून गेलो कसा असेल बंगला
चंद्राने "ई"मेल केलाय .
मस्त बंगला..! छान बांधलाय ...!!
फळांची झाडे लावलीत
आंबा, पेरू ,सफरचंद द्राक्षे
काय म्हणाल ते
बंगला एस्पैस नि खोल्या छान
सूर्य टांगून ठेवलाय आवारात
मस्त गाभूळ्लेला
तुम्हाला हवां तसा ...!!
खरेच कंटाळा आलाय येथला
रहायला धड जागा नाही
झोपायला धड खोली नाही
राहायला येथे ..
नि कामाला तेथे ......
नुसती धडधड नि नुसती वणवण
शरीर गेलेय थकून
नि हाडे लागलीत बोलू
चला चंद्रावरच जाउया ..
चंद्र म्हणतो येथे छान आहे
हात उभारले कि त्याचे पंख होतात
"हू !!"म्हणाले की
तुम्ही मस्त उडू लागता
येथे गाडीचा खर्च नाही
उडालाकी बुडण्याचे भय नाही
चांदण्याची नाणी येथे खूप आहेत
आणि मुठभर उचला
येथे सगळे फुकट आहे
येथे खायला लागते काय
प्यायला अमृत दुसरे काय ..?
यायचे तर लवकर या
येथे आल्यावर एक होईल
तुमाचा मात्र अडाम होईल
येताना मात्र ईव आणा
मग चंद्राची पृथ्वी होईल
त्याला वेळ लागणार नाही
येथे तारुण्य भरपूर आहे
हे चंद्राचे अंगण आहे ...!!

आई हा शब्द आहे का ?




I
एकटीच आहे मी अता...
पण कोणाशी बोलू मी काही,
भेटतात लोक येता जाता..
पण तू भेटत नाहीस मला आई. . .

आतुरतेने वाट बघते मी तुजी अता,

घरट्यात अता एक चिमनी आली,
डोळ्यात भरला आहे पाण्याचा साथा,
पण तुजी परतीची वाट आहे का आई. . .


आली मला उचकी अता,
असे वाटे की तू आली..
अंधाराला एकटक पाहता,
माजा उजेड आहेस तू आई. . .

काही गोष्टी कलू लागले आहे अता,

विनाकारण देवाने खुपच केली घाई..
देवाकडे निरागसपने पाहता,
देवाने का हिरावून घेतली माझी आई. . .

थांबू लागली आहे मी चालता चालता,
एकटीच चालत आहे मी पायी,
बाकीच्या पालकांना पाहता,
वाटे, असेल का त्यात माझी आई. . .

घरात जेवत आहे मी अता,
पण माझ्या पोटात भूकच नाही..
प्रत्येक ख़ास खाता खाता वाटे,
मला प्रेमाने जेवण भरव ना आई. . .

पूर्ण केले मी माझे GRADUATION अता,
पण नाही आली मी पहिली..
कुठे कुठे चुकते मी अता,
मला प्रेमाचे धपाटे देऊन एकदा शिकव ना आई. . .

एक मुलगा आवडतो मला अता,
तो दिसतो एकदम सही..
लग्न करणार आहे मी अता,
वरुनच आशिर्वाद देशील ना आई. . .

या जगात नाहीस तू अता,
पण तुझी आठवन मला सतत आली..
आयुष्याचे गोड गीत गाता,
तू नसण्याचे खुप दुःख आहे आई. . .

तुला मी माफ़ नाही करणार मी अता,
देवा कड़े जायची का केलीस तू घाई..
निघून गेलीस तू अचानक काही न कलवता,
ये सांग ना कशी दिसतेस तू फ़क्त माझी आई. . .

घाबरू नकोस तू अता..

छानपने संभाळते जीजू आणि ताई,
तू हळूच आम्हाला पाहतेस ना..
स्वर्गातुन सुट्टी घेउन आम्हाला भेटायला ये ना आई. . .

प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं

प्रेयसी असेपर्यंत सारं ठीक होतं
बायको झाल्यापासून
भांडणे खुप वाढली आहेत,
संसाराच्या वृक्षावरील
हिरवी पाने पार झाडली आहेत,,
उरला आहे तो फ़क्त पालापाचोळा…
प्रेयसी असतांना,
“तू म्हणशील तसंच होणार”
असं सारं नेहमी म्हणायची,
आता मात्र माझ्यावरंच
वेळ आली आहे रडायची,,
उरलं आहे ते फ़क्त अश्रुत बुडायचं…
प्रेयसी असतांना,
वेळ देत नाही म्हणायची
बायको म्हणुन सोबत असतांना
काय दिवे लावतेय,
“आमचं किती प्रेम आहे”
असं सा-या जगाला उगीचं दाखवतेय,,
उरला आहे तो फ़क्त बिनपैश्याचा तमाशा…
प्रेयसी असतांना,
माझ्याकरीता तुला
खुप गोष्टी कराव्याश्या वाटायच्या,
बायको झाल्यानंतर मात्र
कणिक तू मळायचीस
अन पोळ्या मी लाटायाच्या..?
उरलं आहे ते फ़क्त पूर्ण वेळ स्वयंपाकी व्हायचं…
प्रेयसी असतांना,
तुला सोडुच नये असं वाटायचं
बायको झाल्यानंतर
कधी एकदाचं सोडतो असं झालंय,
कामे दोघांनी करायची असतात
पण तू माझं ओझ्याचं गाढव केलंय,,
उरलं आहे ते फ़क्त ओझं वाहता-वाहता जीव सोडायचं…
- अनामिक

राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!

स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफङाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी
राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!
- ग्रेस

निषेध !!

आम्ही कधीच पेटून उठत नाही
आम्हाला कुणीतरी चिथवावं लागतं.
आमच्यातल्या विवेकाला
धर्माचं नाहीतर अस्मितेचं
गाजर दाखवून फितवावं लागतं.
मग कुठेतरी
आतून भ्याड आणि बुळे असणारे आम्ही पेटुन उठतो.
अन्‌ स्वत:च्या षंढत्वाबद्दल वाटणा-या घृणेला
कुठल्यातरी निषेधाचं लेबल लावून
मिळेल ते जाळत सुटतो.
कुठला धर्म? कुठल्या भावना?
कुठली अस्मिता? कुठल्या विटंबना
आम्हाला नसतो विधीनिषेध
आम्ही फक्त नोंदवत असतो
आमच्या लाचार कृतीशून्यते विरुद्धचा आमचा निषेध !!
-गुरु ठाकूर

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांग बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी
अभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा??
कोणी नसताना काही कळताना येशिल का जरा??
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
- संदिप खरे

जखमा जुन्या (गझल )

का मोगरा उशाला, तू माळतेस आता
काळीज आठवांनी, का जाळतेस आता
मोडून स्वप्न सारी ती रात रंगलेली
त्या काजळी सुखांना का भाळतेस आता
गेला निघून गेला तांडा नव्या दिशेला
त्याच्या खुणा कशाला सांभाळतेस आता
काळास दोष नाही वेळाच थांबलेल्या
का जाहल्या चुकांना मग चाळतेस आता
सारे तुझेच होते झोळीत जे मिळाले
डोळ्यातले झरे का ते गाळतेस आता
आक्रोश या ‘मनी’चा कोणास ना कळाला
जखमा जुन्या कशाला तू पाळतेस आता

जीवन त्यांना कळले हो…

जीवन त्यांना कळले हो…
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो
चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो
सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो
दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो
पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो
सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो
उरीच ज्या आढळले हो!
- बा. भ. बोरकर

मुके केले ओठ…

ओट्यावर चाळीत मी पुस्तकाची पाने
मला तसे तुला सुचू लागले बहाणे
घासायला भांडी आली तुही अंगणात
एकदाच फुटे हसू दोघांच्या गालात
कधी भेटायचे माझे बोलायचे डोळे
आज नको उद्या भेटू तुझे ठरलेले
दुपारच्यावेळी तुझं चालायचं धुणं
धाब्यावर मीही उभा उन्हाला झेलून
पाहून तू मला जेव्हा हसायची सखे
ऊन मला वाटायचे पावसासारखे
कधी भेटायचे माझे हलायचे ओठ
उद्या उद्या वार्‍यावर लिहायची बोटं
असावीस चुलीपुढे भाकरी थापत
वाटायचे खिडकितल्या धुराला पाहत
कशी माझी मुकी हाक कळायची तुला
दारामधे यायचीस मला बघायला
खांद्यानं तू पुसायची कपाळाचा घाम
आज नको उद्या भेटू उद्या नाही काम
खोल खोल निजेमधे बुडालेलं खेडं
तुझ्या माझ्या देहावर चंद्राचा उजेड
चेहर्‍याभोवती तुझ्या लपेटले हात
मुके केले ओठ उद्या म्हणायच्या आत….
- वैभव देशमु

किती स्थित्यंतरे करशील साध्या राहणीमध्ये?

जगाला भावली असतील का? या काळजीमध्ये
किती स्थित्यंतरे करशील साध्या राहणीमध्ये?
जरी प्रत्येक बी ला हक्क असला झाड होण्याचा
कशी रुजणार ती, जी पेरली नापिक भुईमध्ये?
निकालालाच आहे भाव हे माहीत असताना
उगाचच गुंततो का मी परीक्षा पद्धतीमध्ये?
घरी एकाच असतो राहण्या आम्ही तिघे भाऊ
तरीही वाटणी होतेच धान्याची सुगीमध्ये
तुझे सांगून झाले की मला सांगायचे आहे
मलाही दु:ख आहे ह्या विलासी जिंदगीमध्ये
कितीही होउ द्या हल्ले, कुणीही डगमगत नाही
कुठुन येतो असा ‘कणखर’ पणा ह्या मुंबईमध्ये?
———–
विजय दिनकर पाटील ‘कणखर’

** माझा Facebook Status **



Facebook Status ने विचारले....What's on your Mind ?
तुझ्या मनात काय आहे ?

माझ्या मनात ?
मनात ?
खुप खुप सारं आहे
आकाशावर लिहलं तरी मावणार नाही इतकं
अन एका अश्रूतनं देखील ओघळेल इतकं आहे..

गोळा केले कवितेत..
चंद्र सूर्य
तारे वारे
तुझे खट्याळ स्पर्श सारे

Keyboard बडव बडव बडवले
दया आली
अन माझे विमान खाली उतरले

Status सेव्ह करायला घेतलं तर
ते म्हणे..
Status Too Long
शब्दंमर्यादा ४२०

कसा मावेल ?
माझा रुसवा
तुझा फुगवा
झाडांचा बहर
आठवांचा कहर
नवीन मुख्यमंत्री
आश्वासनांची जुनी जंत्री
मी झेललेली संकटं
तुझी सिगरेटची थोटकं
सरकारी धोरण
दारावरचं तोरण
तुझा व्हिस्कीचा घोट
माझ्या भावनांचा कडेलोट
तुझ्या so called मैत्रिणी
माझ्या जीवाचं होणारं पाणी पाणी
फक्तं ४२० शब्दांत ?

वाईट वाटलं..
मनात आलं
शब्दांना Facebook ने असं का वाळीत टाकलं ?

Facebook च्या नावाने मी कडाकड बोटं मोडली
प्रयत्न केला
पण,भावनांची काटछाट करणं मला पटलं नाही

म्हणून जरी कधी माझा Status Blank असतो
लक्षात घ्या,कवीला शब्दांचा कधीच दुष्काळ नसतो

खुप उचंबळून आले
तरच
मी Facebook शी जुळवून घेते
Status मध्ये कविता जरी नाही
शायरी किंवा चारोळी तरी लिहते

तसे,मनात माझ्या खुप काही असते
माझे Status तरंगते हिमनग असते

माझे Status तरंगते हिमनग असते..