प्रेम...

प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आई रात्री उशापाशी येते
आणि बोलते
बाळा झोप राहिलेला अभ्यास
उद्या कर
.
... प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण
घरी उशिरा येतो आणि वडील
बोलतात
बाळा उशीर होणार होता तर
एखादा फोन तरी करायचास.
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण एखाद्या मुलीशी फोनवर
बोलत असतो
आणि वाहिनी बोलतात
ओय
हिरो एखादी मुलगी वगेरा पटवली कि नाही
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा छोटी बहिण बोलते
बघ हा दादा माझ लग्न झाल ना मग
बघते
कोण तुझ काम करेन त
.े
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपला मूड खराबअसतो
आणि तेवढ्यात आपला मोठा भाऊजवळ
येवून बोलतो
हे नाटक्या चल कुठेतरी फिरून येऊन
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा call
येतो आणि तो बोलतो
ये खजूर मेलास कि जिवंत आहेस अजून
हे खर प्रेम...
.
खरच तुमच्या जीवनात हेक्षण
वाया घालवू नका
प्रेम म्हणजे नाही कि एक
मुलगा आणि एक मुलगी
प्रेम म्हणजे हेच कि जे तुमच्या जवळ
असत नेहेमी
पण समजायला थोडा उशीर होतो
आणि राहतो तो फक्त डोळ्यांमध्ये
आसवांचा ओलावा
जो असतो कवेत
पण पाझर फुटताना
आठवणींचा नुसता बांध फुटतो...
- अनामिक 

आजही मला ते सर्व आठवतयं

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं |
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं ||
... ... अजुनही मला आठवतंय….
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो |
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो ||
Canteen वाल्याला शिव्या
घालत बाहेरच्या café मध्ये जायचो |
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो ||
Library card चा तसा
कधी उपयोग झालाच नाही |
Canteen समोरच
असल्यानेLibrary कडे
पावलं कधी वळलीच नाहीत ||
चालु तासाला मागच्या
बाकावर Assignment copy करायचो |
ज्याची copy केली आहे
त्याच्या आधीच जाउन
submit करायचो ||
खुप आठवतात ते दिवस…!!
सोबत रडलेलो क्षण आठवले
की आज अगदी हसायला येते |
पण तेव्हा सोबत हसलेलो
क्षण आठवले की डोळ्यात
चटकन् पाणि येतं...||

वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!

वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात
पडेल....
इटुकल्या - पिटुकल्या मेसेज मधून
मला वाकुल्या दाखवेल.....
हळूच एखादा MISS CALL
करून मला ती सतावेल.....
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
स्वप्नामध्ये माझ्याहळूच
कोणीतरी शिरेल.....
बोलायला "काहीच नाही" म्हणून
फोनवर तासभर बोलेल....
आणि नेमक महत्वाच बोलताना फोन
ठेवण्याची घाईकरेल.....
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
माझ्याही आठवणीत रात्रभर
कोणीतरी जागेल.....
तिच्या विरहाचे चार दिवस चार
जन्माचे अंतर
दाखवेल.....
आणि तास-दोन तासांची भेट
सुद्धाक्षणभर
वाटेल.....
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल....!
या एकाकी जीवनामध्ये
त्या परीचाप्रेमाचा स्पर्शलाभेल....­..
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात
पडेल....

- संग्रहित -

तुझ्याचसाठी,,,,,,,,,,,,,,



तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी कुणीतरी झरत आहे
गच्च निळ्यां आभाळात एक नभ संरत आहे
मनाचा डोह होतो आठवणींनी चिंब
त्या मनाच्या डोहतही पुन्हा तुझेच प्रतीबिंब

डोळ्यांनी का होईना आता बोलुन् घे प्रिये
तुला शब्द सुचतील तेव्हा कुठे असेन कुणास् ठाऊक?
तुला सुर सापडेल असे काहीतरी आत्ताच कर
तुल शब्द सुचती ल तेव्हा असेन नसेन कुणास् ठाऊक?

तु आहेस म्हनुन माझ्या आयुष्याला आहे अर्थ,
तु नसशिल् तर् माझे जिवन आहे व्यर्थ .
मेघानवाचुन नभामध्ये पाणी कधी जमेल् काय् ?
तुला वजा केल्या नतर माझ्यासाठी जगात काही उरेल काय् ?

डोळ्यांमध्ये वादळ आणी ह्रुदयामध्ये घाव् आहे,
त्या घावाच्या पाठीमागे वेदनेचा एक् गाव आहे.
तिथली लाल गुलाबे पाहुन सर्व माणसे फसतात्,
प्रेमामध्ये ह्या पडुन सर्व भान् विसरतात्.
 
-अनामिक 

मिळेल का अशी ?


मिळेल का अशी ? , ,
जी माझ्यासाठी, काहीही करणारी असेल…
मी येतोय हे कळताच,
फक्त माझीच वाट पाहणारी असेल….

मिळेल का अशी ? ,
जी अप्सरे सारखी दिसणारी असेल …
मी नाही तिझ्या इतका सुंदर,
तरीही माझ्यावरच प्रेम करणारी असेल ….
मिळेल का अशी?
जी मला पाहून गोड हसणारी असेल,
अन उशीर झाला येयला म्हणून,
लहान मुली सारखी रुसणारी असेल…

मिळेल का अशी ? ,
जी फुलेल्या कळी सारखी असेल….
पाहू लागली माझ्या कडे,
कि तिच्या नयनात, मला सारे जग दिसेल…
मिळेल का अशी?
जी लोकान समोर अबोल असेल,
पण मी भेटल्यावर,
non-stop बोलणारी असेल…

मिळेल का अशी?
जी माझ मन वाचणारी असेल,
मी न बोलताच,
सगळ काही समजनारी असेल…
मिळेल का अशी?
जी काही हि झालं,
ते फक्त मलाच सांगणारी असेल ,
रडू आल तरीही फक्त माझ्या जवळच रडणारी असेल...
 
मिळेल का अशी ? ,
जिच्या साठी मी तिचा राजा,
अन ती माझी राणी असेल…
मी बरोबर असताना,
कधी हि तिझ्या डोळ्यात पाणी नसेल…. 
 
 
-अनामिक 

तुझ्या येण्याने...

तुझ्या येण्याने...
ऋतू बदलणार नाहीत
...हे मलाही आहे माहित
पण पानगळीतही आतल्या आत
बहरत राहील झाड
तेव्हा गळणाऱ्या पानांचं पिवळं मन
त्याला विचारणार नाही प्रश्न
...कसं रे सहायचं आता हे जग उष्ण"
तू येऊनही...
ग्रीष्माचा दाह तसाच असेल टिकून,
पण गोड होईल स्वप्न
आतल्या आत पिकून ...
पिवळ्या केशर आंब्यासारखं
काळ्याभोर कोकिळेसारखं
गात राहू उन्हात
कुठेतरी बनात
असेल निवारा
परक्याचा का होईना
राहू एखाद महिना
... पुन्हा नवा ऋतू ...
तुझ्या येण्याने ...
मीही भिजून जाईन पावसात
एकाकी वाटणार नाही
कितीतरी दिवसात
तुझ्या सोबतीनं
घडत जाईल सारं
नेहमीसारखं ...
पण एक पाखरू
...एक लेकरू
वाटणार नाही पारखं
... कुणालाही ..!!


-संग्रहित 

माझे हे प्रेम तु खोटे नको समजु

माझे हे प्रेम तु खोटे नको समजु
तुटलो आहे मी
मला कमजोर नको समजू
आता हीम्मत होत नाही
कुणास जवळ करण्याची

पण..??
माझ्या चितेला पाहुन
तुझे डोळे हसतीलच हे नको समजू
मी उद्या नसेल मग आठवण माझी काढशील
माझी माफी मागायला येशील तेव्हा
माझे डोळे बंद बघशील
फोटो नाही बघणार
पण माझी आठवण नक्कीच सजवशील
माझे हे प्रेम तु खोटं नको समजू..!
मी एकटाच गेलो मला हयाचे दु:ख नव्हतेच
फक्त तुझ्या काळजीत माझा देह रडत होते
दु:ख होतं एकच तु माझी झाली नाहीस
तरी मी झोपलो
कारण..??
देवाकडे मागणे मागायचे होते
तुझ्या पदरात माझे आयुष्य टाकुन
तुझे सुख भिक मागायचे होते
मी मेलो आहे माझी तु चिता पेटताना बघणारच
हुंदके देत तेव्हा तु खुप रडणारच
माझ्या चितेवरचे पहीलं फुलही
ते नक्की तुझेच असणारच...
माझे हे प्रेम तु खोटे नको समजू....!!
 
 
-संग्रहित 

प्रत्येक संध्याकाळी ठरलेल्या वेळी

प्रत्येक संध्याकाळी ठरलेल्या वेळी
ठरल्याप्रमाने तुझी वाट बघताना....
तू उशीर करणार हे माहिती असताना...
मी उगाचच कासावीस व्हायचो...
मग तुझ्याचसाठी घेतलेल्या गुलाबाची एक एक पाकळी... she
loves me....she loves me not... असे करत तोडत जायचो... नेहमी प्रमाने पुन्हा एकदा शेवटची पाकळी loves me not
वरच अडायची...
मी उदास होउन बसताच तुझी हाक कानावर पडायची...
मी काहीही न बोलता माझ्या मनातलं तू अगदी बिनचुक
ओळखायचिस... शेवटच्या पाकळीचे दोन भाग करून I will
always love you...अस बोलायचिस...
आता तू नसताना अजुन देखिल माझी हरएक
संध्याकाळी गुलाबाच्या पाकळ्यांसवेच सरते......
अन आज ही ती शेवटची पाकळी... loves me not वरच
अडते...
फरक फ़क्त इतकाच की आता तिचे दोन भाग करायला.. I will always love you अस सांगायला तू इथे नसतेस..
 
 
-संग्रहित 

कोणीतरी असावे जीवनात


कोणीतरी असावे जीवनात
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारं
आपल्या खांद्यावर डोके टेकवून सगळं जग हिंडणार
कोणीतरी असावं जीवनात
रडताना आपली आसवं स्वताच्या आसवात बदलणारं
जगाचा सामना करण्यासाठी हिम्मत देणारं
कोणीतरी असावं जीवनात
आपल्या तोंडात प्रेमाने घास भरवणार
एक ज्यूस एकाचा स्ट्रो ने शेअर करणारं
कोणीतरी असावं जीवनात
काही चुकलं तर जीव बाहेर येईपर्यंत रागावणारं
आपल्या चुका समजून घेवून त्या सुधारण्यासाठी संधी देणारं
कोणीतरी असावे जीवनात
तास न तास फोन वर गप्पा मारणारं
battery लो झाली तरी दुसऱ्या कोणाच्या तरी मोबिले वरून कॉल करणारं
कोणीतरी असावं जीवनात
बाईक वर मागची सीट भरून काढणारं
कोणी बघेल हि भीती असली तरी बिंदास सगळं जग हिंडणार........

-संग्रहित 

ती आयुष्यात आली कसी आली कळलेच नाही

ती आयुष्यात आली
कसी आली कळलेच नाही

का मी तीला स्वतः आणले
मला खरच माहित नाही
पण ती आली आयुष्यात
एक थंड हवेची झुळूक बनून

विराण झालेले माझे
विश्व बहरले तीचे होऊन

ती एक निखळ झरा
मी एक संथ नदी

कसे जमले हे धागे
काहीच कळले नाही

पण ती आली आयुष्यात
कशी आली खरच कळले नाही..
 
- संग्रहित 

माझ्यात काय आवडतं..??

ती : माझ्यात काय आवडतं..??
तो : तुझं स्वतःचं असं काहीच
नाही आवडत मला...
पण
"तुझ्या मनातला मी"
आवडतो मला...
ती : किती प्रेम करतोस
माझ्यावर..???
तो : हे माझ्या हातातलं हिरवं पान
दिसतंय..??
त्या पानावर
जितक्या हिरव्या शिरा आहेत न
तितकंच प्रेम करतो..
जास्त नाही..
ती : मला कधी विसरशील..??
तो : एकदम सहज
विसरेन...
हा आकाशातला सूर्य
उगवायचा थांबला ना कि विसरेन..
ती : कधी आठवशील मला..?
तो : आठवण
सारखी सारखी का काढू..??
कधी तरीच काढेन...
पापण्यांची उघडझाप करतील
ना तेव्हाच काढेन..
ती : तुझ्या सोबत राहिल्याने
मला काही तोटा होईल का..?
तो : तोटा तर आहेच...
माझ्या सोबत
राहिलीस तर तुला तुझं दु:ख कधीच
एकटीला अनुभवता येणार
नाही..
त्यात
अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी काढून
ठेवावा लागेल... ♥
 
- संग्रहित 

आजकाल छोट्या छोट्या गोष्टी पण feel होतात

आजकाल छोट्या छोट्या गोष्टी पण feel होतात,
निराशेच्या दुखात सगळेच sence dull होतात,
कितीही थांबवलं तरी मन मात्र धाव घेतं,
आठवणींच्या कड्यावरून स्वतालाच झोकून देतं,
कोसळणाऱ्या सारी अन धुंद झालेली हवा,
आपसूक कोणीतरी छेडलेला पारवा,
पण चिंब भिजलं तरी अंग कोराच वाटत,
मनावर आलेला मळभ मात्र अजूच दाटत,
मोकळ्या हवेत पण कधी अडखळतो श्वास,
गर्दीत असतानाही होतो एकटेपणाचा भास,
मित्रांच्या संग्तीतही कधी मन मात्र एकटाच राहतं,
birthaday party तही एक मोकळी खुर्ची शोधत राहत,
वेड्या मनाला वाटत ते मित्रांना दुरावलय,
जणू काही काळाने त्यांचा सर्वस्व हरवलाय,
मनाला हवी फक्त मैत्रीचा कंकर,
जखमेवर मारलेली एक प्रेमळ फुंकर,
पण मनाचं दुखः हे मनालाच कळतं,
अश्रू मधून  कधी ते नकळत गळत...

- संग्रहित 

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर

मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर

सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर

सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर

शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर

भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर

पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.

झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर

कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर

कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर

तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.

आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर

पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर

तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी

पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.....

- संग्रहित -

प्रेम कर भिल्लासारखं

पुरे झाले चंद्रसूर्य
पुरे झाले तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा


मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा


शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवरती श्रावण
इंद्रधनू बांधील काय?


उन्हाळ्यात ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महीने बा‌ई राहील झुरत
नंतर तुला लागिनचिटि
आल्याशिवाय राहील काय?


म्हणुन सांगतो जागा हो
जाण्यापुर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ


प्रेम म्हणजे वणवा हो‌उन जाळत जाण
प्रेम म्हणजे जंगल हो‌उन जळत रहाण


प्रेम कराव भिल्लासारख
बाणावरती खोचलेल
मातीमध्ये उगवुनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेल…


शब्दांच्या या धुक्यामाद्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधालूं दे तूफ़ान सगळ काळजामाद्ये साचलेल


प्रेम कराव भिल्लासारख
बाणावरती खोचलेल
मातीमध्ये उगवुनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेल..

प्रेम कधी मागून मिळत नाही

प्रेम कधी मागून मिळत नाही ते आतून जाणवावं लागतं, नजरेतून कळलं तरी शब्दांतून सांगावं लागतं...
रोज तुझी आठवण येते आणि
रोज डोळ्यांत पाणी उभं राह्तं, तू जवळ हवीस असं वाटताना खूप दूर आहेस,हे सांगून जातं...
कित्येकदा तुला सांगावसं वाटतं
पण शब्द ओठातच गुदमरतात, पापण्यांची अबोल किलबिल होते आणि शब्द डोळ्यांतच उमटतात...
माझ्या नजरेचा अथॅ तुला समजावा
म्हणून मी शब्दांची वाट धरली, ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलीस या वाटेवर येऊन मी चूक तर नाही केली?
का,कोणासाठी इतके वाटावे?
का,कोणासाठी इतके झुरावे? अनोळखी,तरीही परिचित असावे, यालाच का "प्रेम" म्हणावे?
असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघाना सांगता येत नाही, मनात भावनांची गुंफण होऊनही शब्द् माञ ओठांत येत नाहीत...

- संग्रहित -

तुझी आठवण आली…

नभभर पसरल्या,दाट धुक्यांच्या ह्या शाली, पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
       तुझ्या अवखळ मनाची, श्वास श्वास सांगे कथा,
       किती बरसला तरीही, न मनमेघ होई रिता,
       कसा आवरु मनाला, या गूढ संधिकाली,
       पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
गालावरच्या बटांना, नको आवरुस सखे,
काय बोलावे कळेना, होती शब्द इथे मुके,
तुझ्या रुपवर्णनास, कमी शब्दांच्या पखाली,
पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
       कधी सरणार सये, तुझ्या माझ्यातले अंतर,
       जाणवावे सखे तुला, कधी माझेही अंतर,
       जेव्हा भेटशील मला, मी होईन भाग्यशाली,
       पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
-आदित्य चंद्रशेखर

मी ती गोष्ट शोधतोय

गोष्ट

मी ती गोष्ट शोधतोय
बर्‍यासश्या हाताला लागतायत
.
.
लहानपणी आज्जीने सांगितलेली त्या राजकन्येची,
शाळेत मस्ती करता करता मीच सांगितलेली कापूसकोंड्याची,
इतिहासाच्या सरांनी सांगितलेली आठव्या हेन्द्रीची,
आजोबांनी सांगितलेला शिवबांचा इतिहास,
आईने मांडीवर बसवून सांगितलेली ध्रुवबाळाची,
अशा किती सार्‍या गोष्टींनी वेढलंय मला
.
.
पण मला ती गोष्ट सापडत नाहीय्ये
निळ्या डोळ्यांच्या, उडणार्‍या परीची,
पर्‍यांच्या स्वप्नील नगरीत घेऊन जाणारी
.
.
कां कुणास ठाऊक, परंतु आता माझी खात्री पटलीय
ती गोष्ट फक्त तूच सांगू शकतेस,
निळे डोळे मिचकावत सांगायचीस ना…. तश्शीच
मी तीच गोष्ट शोधतोय, अजूनही


-अनामिक 

कशी असेल ती अता

कशी  असेल ती अता
असेल का ती ठीक ??
अता तिला जून सर्व आठवत असेल का??
आठवल्या क्षणामध्ये परत ती जाऊ पाहेल का??
गेलीच तरी तर ,त्या क्षणात मला पाहिलं का??
पाहिलं जरी मला तर , एकदा तरी मला परत बोलवेल का??
  बोलावले तरी माझ्यासंगे प्रेमाचे २ शब्द म्हणेल का??
माझ्यासाठी तीच मन परत,माझ्या मनाशी हितगुज साधेल का??
साधल तरी मनातले प्रश्न,सुख दुख माझ्यासमोर मांडेल का??
मांडले तरी ,मी दिलेल्या त्या  उत्तरांचा ती विचार करेल का???
  माझ्यासाठी परत ,सर्वांसाठी ती झगडेल का???
दिलेल्या आठवणीत परत मागण्याचा देवा कडे हट्ट करेल का??
प्रत्येक क्षणी नाही  पण दिवसातून एकदा तरी आठवण काढेल का???
काढलेल्या त्या वेळात फक्त मलाच ती पाहेल का??
मी नाही होऊ शकलो तिचा ,तरी ती आनंदात राहील ना???
  माझ्यापेक्षा हि जास्त प्रेम देणारा तिला मिळेल ना???
त्याच्या सहवासात राहून सर्व दिलेले क्षण विसरून ती आनंदी राहेल ना
मी दिलेले सर्व क्षण ,आठवणींची जळमट मनाच्या गाभार्यातून काढून टाकेल ना???
आयुष्याच्या तिच्या सुंदर वळणावर एकदा तरी माझी आठवण तिला येईल ना??
  आली तरी माझ्यासाठी ,तिचे डोळे  पाणावतील  ना ??

माझ्या मनात असा मग प्रश्नाचा साठा साचला
  एका तरी उत्तरासाठी तो वाट पहाट बसला :-/
 
-अनामिक 

खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???

एका छोटीचे मनोगत..
कशाला गं आईनं असं मला माललं..
ललून ललून नाक माझं लाल लाल झालं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं???

अंगणामध्ये गेले होते बिश्किट खात खात..
टॉमी तिथे बसला होता त्याचा खाऊ खात..
माझ्यातलं थोलं बिश्किट मी त्याला शुद्धा दिलं..
त्याच्या भांड्यातलं थोलं मी ही खाल्लं..
सगल्यांना देऊन खायचं असं आईनीश शांगितलं..
खलं खलं शांग आजी माझं काय चुकलं??

बाबांचा पांधला पांधला रूमाल मला मिलाला
त्याच्यावर केचपचा मी लाल सूर्य काढला..
त्यावर मग मी थोडंसं दूध सुद्धा ओतलं..
सांग आता यात माझं असं काय चुकलं..??
रूमाल सगळा लाल लाल ,होता घाण झाला..
दूध ओतून त्याला मी गोला गोला केला..
कलतंच नाही मला नेमकं काय झालं.
खलं खलं सांग आजी माझं काय चुकलं??

- प्राजु

आजीची प्रतिक्रिया:

राणी मा़झी छोटुली तू, आहेस उचापती
हसू येते मला, पाहून तुझ्या करामती
ललू नको बघ तुझे नाक झाले लाल
हस बघू, फुगवू नको गोबले गोबले गाल
हसलीस की तुला देईन गोड गोड खाऊ
संध्याकाळी फिरायला आपण दोघीच जाऊ
फुगे घेऊ, बाग पाहू, करू मस्तं धमाल
बाबांसाठी घेऊन येऊ एक पांधला रुमाल
माललं त मालू दे, आई आहेच वेडी
हसण्या रुसण्यातही अगं गंमत असते थोडी

– (खोडकर) अनामिक

खरचं मी तिच्यावर खुप प्रेम करतो


मैत्री की प्रेम?????
नेहमी तिचाचं विचार,
नेहमी तिचीचं आठवण..
का एका मैत्रिणीसाठी मी इतके
झुरतो,
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
        
        चार चौघात मित्र
        मला तिच्या नावाने चिडवतो,
        का त्याचा प्रयत्न फसतो,
        कारण ?????
        खरं तर मनात मी हसतो..
        की खरचं मी तिच्यावर खुप
        प्रेमकरतो ???
परदेशी चाललास पण मला विसरु
नको,
का तो तिचा शेवटचा sMs
मी परत
परत वाचतो..
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
         तू परत कधी येणार ?
         ती रोज रोज विचारते..
         का? नक्की नाही
         म्हणताना माझा आवाजखालावतो..
        की खरचं मी तिच्यावर खुप
        प्रेम करतो ???
तिला एक स्थळ आले,
कोणी तिला पाहून गेला
का तिने त्याचे नाव
घेता मीविषय
बदलतो..
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
         हे प्रेम नाही मैत्रीचं आहे,
         एकचं उत्तर नेहमी,
         पण ?????
         का ते खरे की खोटे असा प्रश्न
         मला पडतो..
की खरचं मी तिच्यावर खुप प्रेम
करतो ???
- अनामिक