संग ना...... का?

का इतका जीव लावून निघून गेलीस
का मला जवळ करून परत दुरू करून निघून गेलीस
कोणता खेळ खेळायचा होता तुला माज्याशी
जो तू जिंकून मला अर्ध्यावर सोडून गेलीस

खूप प्रेम करतो तुज्यावर हे तुला सांगून मी थकलो
खूप सुखी ठेवेन तुला हे सांगून हि मी थकलो
कोणी नाही करणार इतके प्रेम मी तुज्यावर केले
पण सल्गेल माहिती असूनही मला अर्ध्यावर सोडून गेलीस

हो माज्या कडे तुज्या इतके पैसे नव्हते 
न तुज्याइतके शिक्षण होते
हे तुला आधीच माहिती होते ना ग??
पण नंतर हि करणे सांगून का मला अर्ध्यावर सोडून गेलीस..

सगळी स्वप्ने तोडय्चीच होती तर ती बघू का दिली??
आणि तुटलेल्या या स्वप्नावरती हसून का गेलीस
हे नाते नव्हते फ़क़्त काही दिवसांचे
कितेक वर्ष जोडलेले नाते तू अर्धावर सोडून का गेलीस.

संग ना...... का?

मैत्री म्हणजे काय असतं ?

मैत्री म्हणजे काय असतं ?

मैत्री म्हणजे ,

मनाला जोडणारी Wire असतं,

अंधारात प्रकाश देणारा Light असतं.

हृदयातलं ऐकवणारा Receiver असतं,

संकटकाळी मदतीच Transmitter असतं……….

मैत्री म्हणजे ,
वार्‍यावर डूलणारा Rose असतं,

गीटारीची सुंदर Tune असतं.

जीवनाच्या प्रवासातील Mentor असतं,

योग्य वाटेवर आणणारं Steering असतं………

मैत्री म्हणजे,
विचारांच्या धाग्यांच Blanket असतं,

रंग वेगवेगळे तरी Picture एकच असतं.

जिथे रक्ताच Relation ही परकं असतं,

आणि नेहमीच बोलकं Heart असतं.…… ♥

पण धाडस होत नाहि ...

पण धाडस होत नाहि ...
ती समोरून आली तरीही शब्धान्ना बांध
फुटत नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
... धाडस होत नाहि ...
वर्षे लोटली तरी फ़क्त तिच्यावरच
मरतोय ,
शप्पथ सांगतो फ़क्त तिचाच विचार
करतोय ...
वही मागण्याशिवाय
कधी बोललो नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
धाडस होत नाहि ...
माहित नाहि , ती मरते
का नाहि मज्ह्यावर ?
का तीच ह्रदय आहे ,फ़क्त एक "सजीव
कलेवर" ?
चांदण्यात फिरण्याचा आनंद
आम्हालाही मिळणार की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
धाडस होत नाहि ...
Valentine Day ला बूके
घ्यायला जातोय ,
खिशाचा विचार करून फुलावरच
भगवतोय ,
या "गरिबाच प्रेम" ती स्वीकारणार
की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय,पण
धाडस होत नाहि ...
तिच्यासाठी घेतलेल फुल वहितच
कोमेजतय ,
माझ काळीज मात्र तिचीच आस धरतय ...
कितीही ठरवून गेलो तरी, ह्रदय मात्र
बोलत नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय,पण
धाडस होत नाहि ...
वाटतय , तिच्याही वहित असेल एखाद
फुल मज्ह्यासाठी ,
का आहे ही भोली समज
या वेड्या मनासाठी ?
आयुष्यातल पहिल - वहिल प्रेम मिळणार
की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय,पण
धाडस होत नाही

गुंतत चालले

गुंतत चालले
मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
.
.
गुंतत चालले
मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात
खूप आहे माझा तुझ्यावर प्रेम
पण कसा वेगळाच आहे ह्या फीलिंग्स
चा गेम
प्रेमाची भाषा मला कधीच नाही कळली
पण मलाच माहीत
नाही मी तुझ्या प्रेमात कशी पडली
मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस
किती वर्ष???
तुला होकार द्यायला मी कधीची आहे
रेडी
पण पायात अडकली आहे करियरची बेडी
हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू
दे
गुंतत चालले
मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात

किनारा म्हणाला लाटेला,

किनारा म्हणाला लाटेला, 

नेहमीच का ग अशी घाईतच येतेस ?

... ... तहानलेले माझे अंग चिंब भिजवून जातेस

माझ्या जवळ थांबायला तुला कधीच नसतो वेळ
का बर खेळतेस माझ्याशी असा जीवघेणा खेळ ?

तुझ्यासाठीच तर मी वाट पाहतो भरतीची
तुला मात्र नेहमीच घाई असते परतीची ?

लाट म्हणाली किनाऱ्याला

तुझ बर आहे रे काठावरती तू आरामात बसतोस
थांबत नाही तुझ्याजवळ म्हणून माझ्यावरच रुसतोस ?

तुझ्याजवळच थांबाव अस मलाही खूप वाटत
धावून धावून बघ ना माझ पाणी किती आटत ?

परतले घाईने तरी पुन्हा तुझ्याकडेच ना येते ?
कितीही थांबवलं स्वत:ला तरी मन तुझ्याकडेच धाव घेते ..

खूप अवघड असत ....................

खूप अवघड असत ....................

कोणालातरी मनात ठेवण सोप असत
पण कोणाच्यातरी मनात बसन खूप अवघड असत
कोणासाठी जगन खूप सोप असत
... पण कोणीतरी आपल्यासाठी जगन खूप अवघड असत

कोणीतरी आवडण सोप असत
पण कोणालातरी आपण मनापासून आवडन खूप अवघात असत
प्रेम तर खूप जणांवर बसत
पण कोणीतरी आपल्यावर प्रेम करण खूप अवघड असत

उजेडात कोणीही चालतो संगती
पण अंधारात कोणीतरी वाट दाखवण खूप अवघड असत

कधी येशील?????

कधी येशील?????

श्वेत नभांत निळसर आभा असेल
 कुठेतरी सूर्यास्त होताना 
रंग सांडलेले असतील
केशरी, गुलाबी, जांभळे
हळूहळू चांदण्याच्या दीप मला 
लाखलाखायला लागतील 
येशील का तू तेव्हा ???

जिथे किनारयाना धावत जाव वाटत 
किनार्यांच्या मिठीत काही क्षण 
लता जिथे विसावत असतील 
तिथे येशील का तू भेटायला???

फुलांच्या अंगावर फुलपाखरांच्या 
पंखावरचे रंग काही सांडलेले असतील
वार्यालाही जिथे बागडत रहाव वाटेल 
गवताचे गालिचे दूरवर पसरलेले असतील 
येशील का तू तिथे भेटायला ???
सांग ना कधी येशील ??
अबोल झाले मी माझ्याशीच 
पुन्हा येऊन, 
हातात हात घेऊन 
स्वप्नांच्या जगात घेऊन जाशील का???

सांग न सोने असा दिवस कधी येईल . . ?

घराच्या बाल्कनीतून उभी राहून 
सोने तू चंद्राकडे पाहत राहील . .

मग दब्या पावलाने मी मागून येऊन
तुझ्या कमरेला अलगद विळखा घालीन . . 

तू हि हळूच मग मागे वळून
माझ्या नजरेला नजरकैद देशील . . 

त्या बोलक्या अशा धुंद नजरेने
तू मला अलगद मिठीत घेशील . .

प्रसंगावधान राखून मग चंद्रही
लाजेने त्या ढगाआड लपून जाईल ...

सांग न सोने असा दिवस कधी येईल ...
कधी येईल.. कधी येईल .

का इतका जीव लावून निघून गेलीस

का इतका जीव लावून निघून गेलीस
का मला जवळ करून परत दुरू करून निघून गेलीस
कोणता खेळ खेळायचा होता तुला माज्याशी
जो तू जिंकून मला अर्ध्यावर सोडून गेलीस

खूप प्रेम करतो तुज्यावर हे तुला सांगून मी थकलो
खूप सुखी ठेवेन तुला हे सांगून हि मी थकलो
कोणी नाही करणार इतके प्रेम मी तुज्यावर केले
पण सल्गेल माहिती असूनही मला अर्ध्यावर सोडून गेलीस

हो माज्या कडे तुज्या इतके पैसे नव्हते 
न तुज्याइतके शिक्षण होते
हे तुला आधीच माहिती होते ना ग??
पण नंतर हि करणे सांगून का मला अर्ध्यावर सोडून गेलीस..

सगळी स्वप्ने तोडय्चीच होती तर ती बघू का दिली??
आणि तुटलेल्या या स्वप्नावरती हसून का गेलीस
हे नाते नव्हते फ़क़्त काही दिवसांचे
कितेक वर्ष जोडलेले नाते तू अर्धावर सोडून का गेलीस.

संग ना...... का? 

विसरू नको रे आई बापाला


  झिजवली त्यांनी काया ,
 काया झीजवून तुझ्या  चीरावर 
 धरली  सुखाची छाया  रे वेड्या 
 मिळणार नाही तुला 
 आई बापाची माया
 
 तुला मिळेल बंगला माडी 
 त्याची भारी मोटार गाडी 
 आई बाप मिळणार नाही 
 हि जाण राहू दे थोडी
 विसरू नको रे आई बापाला
 झिजवली त्यांनी काया ,
 काया झीजवून तुझ्या  चीरावर 
 धरली  सुखाची छाया  रे वेड्या 
 मिळणार नाही तुला 
 आई बापाची माया
 
 तुला मिळेल बायका पोर 
 गण गोत्र मित्र परिवार, 
 खर्चाने गुरफटलेला 
 हा मायेचा  बाझार
 विसरू नको रे आई बापाला
 झिजवली त्यांनी काया ,
 काया झीजवून तुझ्या  चीरावर 
 धरली  सुखाची छाया  रे वेड्या 
 मिळणार नाही तुला 
 आई बापाची माया
 
 आई बाप जिवंत असता 
 नाही केली त्याची सेवा 
 ते मेव्ल्यारती कश्याला 
 रे  म्हणतोस देवा  देवा
 बुन्धी लाडवाचे जेवण  करुनी 
 मग म्हणतोस जेवा जेवा
 विसरू नको रे आई बापाला
 झिजवली त्यांनी काया ,
 काया झीजवून तुझ्या  चीरावर 
 धरली  सुखाची छाया  रे वेड्या 
 मिळणार नाही तुला 
 आई बापाची माया
 
 स्वामी तिन्ही जगाचा 
 आई विना भिकारी 
 तू समजून वूम्जून  वेड्या 
 होऊ नको अविचारी,
 जीवना मधली अमोल संधी 
  नको रे घालू वाया
 विसरू नको रे आई बापाला
 झिजवली त्यांनी काया ,
 काया झीजवून तुझ्या  चीरावर 
 धरली  सुखाची छाया  रे वेड्या 
 मिळणार नाही तुला 
 आई बापाची माया

*किनारा म्हणाला लाटेला, *

*किनारा म्हणाला लाटेला, *
नेहमीच का ग अशी घाईतच येतेस ?
... ... तहानलेले माझे अंग चिंब भिजवून जातेस
माझ्या जवळ थांबायला तुला कधीच नसतो वेळ
का बर खेळतेस माझ्याशी असा जीवघेणा खेळ ?
तुझ्यासाठीच तर मी वाट पाहतो भरतीची
तुला मात्र नेहमीच घाई असते परतीची ?
लाट म्हणाली किनाऱ्याला
तुझ बर आहे रे काठावरती तू आरामात बसतोस
थांबत नाही तुझ्याजवळ म्हणून माझ्यावरच रुसतोस ?
तुझ्याजवळच थांबाव अस मलाही खूप वाटत
धावून धावून बघ ना माझ पाणी किती आटत ?
परतले घाईने तरी पुन्हा तुझ्याकडेच ना येते ?
कितीही थांबवलं स्वत:ला तरी मन तुझ्याकडेच धाव घेते ..

माझ्यापैक्षा जास्त तूच रडली होतीस ना आई....

माझ्यापैक्षा जास्त तूच रडली होतीस ना आई....
आई थंडी वाजतेय ग,
मायेचे पांघरूण,आणि त्याची उब...
डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या...
केसांवरून फिरणारा तो प्रेमळ हात...
रात्रभर माझ्यासाठी जागलेले डोळे....
मी ठीक कसा नाही होणार?
पण मी आजारी पडल्यावर,
माझ्यापैीक्षा जास्त तूच रडली होतीस ना आई....
"झोप रे बाळा" शांत झोप,
नाही आई माझी परीक्षा आहे!
वर्षभर मी अभ्यास करावा,
म्हणून माझ्यावर ऑरडलिस...
नाही बाळा परीक्षा नंतर देता येईल...
तू विचार नको करू शांत झोप...
मी परीक्षा देऊ शकलो नाही,
म्हणून माझ्या पैक्शा जास्त तूच रडली होतीस ना आई.....
खूप दिवस उलटले आहे आता ..
मी शिकून मोठा ही झालोय...
पैसा ,गाडी ,लपटोप सर्व आहे....
पण तू नाहीस.....एकट वाटत ग,
तू माज्या जवळ नाहीस,
म्हणू आता प्रत्येक दिवस माझ हृदय खूप रडत ग आई.

खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....

खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
समाजाच्या बंधनांना झुगारून बाजूला येऊन बसावी
आपणही मग तिच्या खांद्यावर हात टाकून
तिला एक गंमत सांगावी
 
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
तिच्या वाढदिवसाची तारीख आपण नेमकी विसरावी
लटकेच रागवत तिने आपल्या लक्षात आणून द्यावी
आणि आपण आणलेले सरप्राइज गिफ़्ट पाहून तीची खळी खुलावी
 
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
आपले सगळे सिक्रेट जाणणारी
जीची मैत्री आपणास मैत्रीपेक्षाही खास असावी
आई-बाबांशी ओळख करून देताना आपणास कसलीच भीती नसावी
 
खरचं अशी एक तरी मैत्रिण असावी....
अचानक एके दिवशी संध्याकाळी आपल्यासोबत फ़िरायला यावी
हातात हात धरून तिने आपल्या मनातली गोष्ट सांगावी
अन बघता बघता ती आपल्याला मैत्रिणीपेक्षाही अधिक जवळची व्हावी...

आता संपलयं ते सारं...

आता संपलयं ते भास होणे,
तू नसल्याठिकाणी तुला पहाणे,
तू समोर असल्यावर,
स्वतःलाच विसरून जाणे.....
आता संपलयं ते सारं....

आता संपलयं ते तुझे शब्द आठवणे,
तू बोलत असताना माझे गप्प होणे,
आणि,
तुला एकटक बघत रहाणे......
आता संपलयं ते सारं....

आता संपलयं तुझ्यासाठी घरी थापा मारणे,
extra-classच्या नावाखाली तुला भेटणे,
तासनतास बोलत रहाणे,
आणि, फोनचे बिल वाढवणे.....
आता संपलयं ते सारं....

आता संपलीयेत ती भांडणे,
शुल्लक गोष्टीवरून रूसणे,
थोडा वेळ अबोला धरणे,
आणि, नंतर मीच ..
sorry sorry sorry म्हणणे...
आता संपलयं ते सारं....

आता संपलयं एकटे असता तुला आठवणे,
तुला आठवून माझे हळवे होणे,
रात्रभर एकच गाणे ऐकणे,
आणि, कधी,
हळूच अलगद डोळ्यांतुन पाणी ओघळणे,
आता संपलयं ते सारं...

आता संपलयं ते तुझ्यासाठी श्वास घेणे,
तुझ्यासाठी जगणे, आणि,
तुझ्यासाठी तुझ्यावर कवितांवरकविता करणे...

आता संपलयं ते सारं...

माझे पहिले प्रेम म्हनजे

माझे पहिले प्रेम म्हनजे
जनु पोरकटपनाच होता
पन त्या दिवसामधला
त्याचा रंगच भारी होता
प्रेमाच्या त्या वाटेवर
आमची पावले पडत होती
पन त्या वाटेवर तेव्हा
गर्दी थोडी जास्तच होती
पहिल्या वेळेस पाहिले
तेव्हाच ती मनात भरुन गेली
हिच्यापेक्शा दुसरी सुंदर नसेल
अशी शंका येउन गेली
काही दिवसातच दोघांची
नजरानजर झाली
तिच्या एका नजरेने
आमची छाती धडकुन गेली
काही दिवसांनी ही गोष्ट
सगळी कडे पसरत गेली
मित्र म्हने याला अचानक
प्रेमाची हुकी कशी आली ?
रात्र रात्र तिच्या आठवनीत
आम्ही प्रेमपत्रे लिहित होतो
होकार मिळेल की नकार
एवढाच फ़क्त विचार करीत होतो
करुन धाडस जेव्हा तीला
आम्ही प्रेमपत्र दिले
मित्रानी तेव्हा सांगितले
आता तुझे नही खरे
तेव्हा कळले की हीचे आधीच
बाहेर दहा प्रकरन आहेत
मुलांना फ़िरवन्याचे हिचे
तंत्र जुने आहे
आम्हाला आवडलेली रानी
नेहमी दुसरय़ाचीच असते
आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते

एक पोट्टी.....

एक पोट्टी..... एक पोट्टी रोज माह्यासपनामंधी येतेहिचक विचक खाता पेता उचकी देऊन जातेथयथय नाचे मनामंधीमोरनी हाय जशीयेड लावुन जातेतिचे नखरे बावनमिशी
एक दिवस अशी अचानकमाह्यासमोर आलीपाहुन मले काय सांगुखुदकन हसुन गेलीम्या म्हनलं काय ती हिच पोट्टी हायकोनबी असुदे यारपन हिले तोड नाय
सपनामंधली पोट्टी पुन्हादिवसा दिसुन जाते कं दिवसा पाह्यलेली पोट्टीपुन्हा सपनामंधी येतेकाय करु चायलापुरता लोचा झालामाह्या मनाच्या डुगडुगीचा चक्का जाम झाला
एक वाटे सुंदरा मलेएक वाटे अप्सराचायला सपनातल्या पोट्टीचंरुप दिवसा आठवत नाही तिच्या नांदी दिवसाच्या पोट्टीचंरुप मनी साठवत नाहीडोये खुल्ले तवा माह्याध्यानामंधी आलंदिवसाढवळ्या सपन पाहुन कोनाचं भलं झालं....

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरून जावे,
आणि सरतानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेउन सोबतीने खुप खुप चालावे,
चालता चालता दुरवर खुप खुप थकावे,
पण थकल्यावरही आधारासाठी त्याच्याकडेच पाहावे......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुःख त्याचे अणि अश्रु माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खुप खुप रडावे,
आणि अश्रुंच्या हुंदक्यात सर्व दुःख विरून जावे.....
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच रहावे, जगतच रहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतीतल्या प्रत्येक क्षणाने सुखावावे,

उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानि मी चिंब भिजुन जावे......
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सुर त्याचा अणि शब्द मज़े असावेत,
सुरांबरोबर त्याच्या वा-यानेही झंकारावे,
आणि नकळतच गीत माझेही फुलावे.......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला सोडताना पायाने अड़खलावे ,
पुन्हा भेट म्हणुन सांगताना मागे वलून पाहावे,
आणि डोळ्यातील भावनानी एकमेकाना समजवावे......
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
डोळ्यातील भावः माझ्या त्यालाही समजावे,
हृदयातील स्पंदनांचे अर्थही कलावे,
आणि नकळतच ते त्याच्याही ओठी यावे,
आणि हे प्रेम असेच रुजावे असेच फुलावे......
...........एकदा तरी आयुष्यात.............

"कळत नाही या वाटेवर अस एकट किती वेळ चालायच?

"कळत नाही या वाटेवर
अस एकट किती वेळ चालायच?
जे नव्हतेच आपले कधीही
त्यांना का आपल मानायाच?
ज्यांना उमगलाच नाही अर्थ विश्वासाचा
त्यांवर विसंबून तरी का रहायच?
ग्रिश्माने होरपळलेल्या मनाने
पुरालाच का चांगल मानायाच?
आहेत शब्द आपणा पाशी पण
इथे नाहीत कुणालाच कान
तेव्हा मनातल्या भावनांना
फ़क्त कागदावरच स्थान द्यायच?
की आपलच कुठेतरी चुकतय
अस मानून गप्प रहायच?
नाही सापडत ना उत्तर
म्हणुन प्रश्न्नानकड़ेच दुर्लक्ष करायच?
की आपणही एक प्रश्नचिन्ह
बनुनच रहायच?"

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,

मन मोकळं, अगदी मोकळं  करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

तुमचं दु:ख खरं  आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण  आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर  पसरायचं.

सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं,
मन मोकळं,  अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आयुष्यात  काय केवळ
काटेरी डंख आहेत?
डोळे उघडून पहा तरी;
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत!

हिरव्या रानात,
पिवळ्या  उन्हात
जीव उधळून भुलायचं!
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू  होऊन पाखराशी बोलायचं.

प्रत्येकाच्या मनात एक
गोड  गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं!

आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने  चालायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी  बोलायचं.

आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो  आपला पाऊस,
न्हात रहा.

झुळझुळणार्‍या झर्‍याला
मनापासून  ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या!

इवल्या इवल्या थेंबावर
सगळं  आभाळ तोलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन  पाखराशी बोलायचं.

Syllybus जरा जास्तच आहे

Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो.. जातो

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!___$___

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!___$___
 खरे प्रेम केल्याचे हे फळ......प्रत्येक प्रेम करानार्याने जरुर वाचावे...

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!

रात्रि झोपेतून दचकून मी जागा होतो,
 अणि या अंधारात तुला शोधायचा प्रयत्न मी करतो,
 हताश होउन पुन्हा झोपायचा प्रयत्न मी करतो,
 तेवढ्यात एक अश्रु डोळ्यातून गालावर ओघलतो,

सुरु होतो आठावनिचा तो खेळ,
 नाही रहात पुन्हा झोपायचा ताल-मेळ,

असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करावे,
 त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे,
 आणि स्वप्नाच्या दुनियेत बांधलेले घर,
 खाडकन फुटावे,

कुठे कमी पडत होतो,
 प्रत्येक वेळी तुलाच तर समजुन घेत होतो,
 तुझ्यावर येणार्या संकटाना,
 परतीचा रस्ता मी दाखवत होतो,

तू केलेल्या प्रत्येक चुकावर,
 माफ़ी मी मागत होतो,
 तुझ्या चुकानी होणार्या त्रासाने ,
 वेळोवेळी मीच रडत होतो,

तुझ्याकडून झालेली चुक तुला कधीच दिसली नाही,
 माझ्या डोळ्यातून येणार्या अश्रुनाही किम्मत राहिली नाही,

कामाचा दबाव आहे असे म्हणून,
 तू माला टाळत होतीस,
 पण या कारणा खाली,
 तूच माझ्या पासून दुरावत होतीस,

काम तेव्हा मीही करत होतो,
 माझ्या कामाचा दबाव तुला दाखवत नव्हतो,
 वाटत होते तुला माझ्या साथाची गरज आहे,
 तुलाच मी समजुन घेणे हेच माझ्या नशिबात आहे,

तुझे काम हे कधी संपले नाही,
 आपल्यातील वाढत गेलेले अंतर,
 हे तर कधीच मिटले नाही,

दरोज झोपताना देवाकडे एकच गार्हने असते,
 तू सदैव खुश रहावी हेच माझे मागणी असते,

आशा आहे तू पुन्हा माझ्याकडे परतावी,
 पण तू येणार नाही हे वास्तव स्वीकारता येत नाही,

प्रेम माझे संपणार नाही मी मेल्यावर,
 पण आठवण माझीही येइल मी गेल्यावर...आठवण माझीही येइल मी गेल्यावर..........

मन माझे तुझ्याकडे आहे

मन माझे तुझ्याकडे आहे, कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.
प्रेमाच्या गोड गोष्टी करताना हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.
क्षण काही जगलोत सोबत आठवणीत त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात माझ्या बुडून बघ.
स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या तू ते माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न पाहून बघ.
जिवापाड प्रेम लावीन तु थोडे तरी लावून बघ,
मी तर वेडा झालोच आहे तुही प्रेमात माझ्या वेडी होऊन बघ.
जशी तू सामावली आहेस माझ्यात तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळी अन् मी वेगला
एकरूपता तरी जाणवेल बघ.
नाही करणार एवढे प्रेम दुसरे कोणी हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला जगी
तुझ्या मला असू दे बस्स...!!!!!!!

.........का नाही कळली मला ..कविता...

 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत

कुणाची तरी हवी असते


पण असे का घडते की जेव्हा ...ती

... व्यक्ती हवी असते तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?

असे म्हणतात की प्रेम हे शोधून सापडत नसते

प्रेम हे नकळत होऊन जाते

मग तरीदेखील प्रत्येक व्यक्ती

प्रेमाच्या शोधात का असते?

असे म्हणतात की प्रेमात पडल्यावर

सर्व काही सुंदर असते

मग तरीदेखील प्रेमात पडल्यावर

अश्रूंना का स्थान असते?

हे सर्व काही असले तरी

प्रेम हे अतिशय सुंदर असते

पण काही जणांना ते

शोधून ही सापडत नसते..

ती आवडली मला,पण मी नाही विचारले तिला .....

ती आवडली मला,पण मी नाही विचारले तिला .....


ती आवडली मला,पण मी नाही विचारले तिला .....
Delete करेल friend लिस्ट मधून ती मला, म्हणून नाही विचारले मी तिला,
नाही बोलणार माझ्याशी म्हणून नाही विचारले मी तिला, चुकीच्या नझरेने पाहिलं ती मला, म्हणून नाही विचारले मी तिला,
एक गैरसमज करून घेईल ती माझ्या बद्दलचा, म्हणून नाही विचारले मी तिला,
...समोर कसा जाणार मी तिच्या, म्हणून नाही विचारले मी तिला,
भेटून सुद्धा नाही भेटणार ती मला, म्हणून नाही विचारले मी तिला,
कोणाला सांगू हि शकणार नव्हतो, कि किती आवडते ती मला, कसा सांगणार मी तिला, किती आवडते ती मला?
भीती वाटते त्या एका नाहीची, म्हणून नाही
विचारले मी तिला, अजून किती "valentine days" निघून जातील, पण नाही
विचारणार मी तिला,
राहू दे मला या गोड अश्या गैरसमजुतीत, कि, 'मी आवडतो तिला'
'''मी आवडतो तिला'''

आणखी काही हवं असेल तर मागुन घे.........

आणखी काही हवं असेल तर मागुन घे.........

आणखी काही हवं असेल तर मागुन घे
नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.
.........
जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे

आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे

नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे...

तुझं आणि माझं जमणार तरी कसं,

तुझं आणि माझं जमणार तरी कसं,

तुला लागतो चहा मला लागते कॉफी,
तुला नाही आवडत मी उलटी घातलेली टोपी,
तुला वाटते थंडी मला होते गरम,
तु आहेस लाजाळू आणि मी अगदीच बेशरम,
तुझं आणि माझं जमणार तरी कसं.

झोपतेस तू लवकर आणि ऊठतेस पहाटे,
आवडत नाही तुला बॉक्सींग आणि कराटे,
मी माञ झोपतो बाराच्या नंतर,
रविवारी नसतं क्रिकेट शिवाय गत्यंतर,
तुझं आणि माझं जमणार तरी कसं.

फिरायला आवडत आवडत तुला शॉपिंग,
कपड्याबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग,
मला माञ खरेदीचा येतो कंटाळा,
कळत नाही रंग आहे राखाडी का काळा,
तुझं आणि माझं जमणार तरी कसं,

घालतो मी शर्ट ईस्ञी न करता,
जाऊन येतो एकटाच इतारंच ठरता,
तु माञ बघतेस मैञीणीची वाट,
बाहेर निघताना नखरे सञाशे साठ,
तुझं आणि माझं जमणार तरी कसं,
मला नसतात लक्षात बर्थडे तारखा,
जाताना बजावले तरी काम विसरतो सारखा,
तुला माञ आठवते पाचवीची मैञीण,
बारीक तुझी नजर डोळे आहेत कि दुरबिन ,
तुझ आणि माझ जमणार तरी कसं,
................................................
ऊन आणि सावली राहतात ना जसं, अगं ! तुझं माझं जमेल का तसं.......

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
सांगितले बरेच काही..
आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा परी
लावायचा तो लावून गेले..
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

पुसले डोळे.. हसून खोटे
चाचपले कितिक मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती
चढवायाचे आज राहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..

हसून आता.. विसरून सारे
वावरते जणू.. उनाड वारे
हसताना पुन्हा भरले डोळे
पापणीतून अश्रु वाहून गेले
.
लपविलेले जे दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..
.
.
थेंब अश्रुंचे दोन गालावरती..
कसे पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे
चार चेहरे पाहून गेले..    

पुन्हा एक देवदास...

पुन्हा एक देवदास...
तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..                        
           
रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले..                                   
तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही..                                   
आता आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                   
                                   
नसेल जाण, तर गेली उडत.. मी खैर करणार नाही..                                   
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                   
                                   
                                   
पहिल्यांदा CANTEEN  मध्ये पाहिलं तिला, च्यायला काय दिसत होती...                                   
अरे KATRINA सुद्धा झक मारेल मित्रा,  अप्सरा  जणू भासत होती..                                   
मी 'आ' वासून बघत राहिलो...   तसं अख्खं कॉलेजच 'चाट' पडलं होतं..                                   
माझ्या त्या BORING LIFE मध्ये, काहीतरी INTERESTING घडलं होतं..                                   
                                   
पण.. आता हा सलमान, आठवणीत तिच्या, रात्रंदिवस झुरणार नाही..                                    
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                   
                                   
SCIENCE क्लासमध्ये ओळख झाली, अन् चक्क ती माझ्या नजदीक आली,                                   
DARING करून 'मारला' PROPOSE...  ती लाजून 'इश्श' म्हणाली..                     ( ती तिकडे 'इश्श'..   आम्ही इकडे 'खुश्श'..  ;-D )                                   
अहो काय SIXER मारली होती आपण?..'युवी'ने सुद्धा सलाम ठोकला असता..                                   
पण चुकून नाही म्हणाली असती.. सांगतो.. माझा YORKER हुकला असता..                                   
अहो.. पण प्रेम म्हणजे काय .. 'T20' MATCH वाटली का तिला??.. की झटपट उरकून गेली..                                   
जन्मभराची 'कसोटी'... पण स्वतः 'RETIRED' आणि मला 'HURT' करून गेली..                                   
                                   
पण माझी HIT-WICKET पुन्हा कोणी, आता जन्मात घेऊ शकणार नाही..                                   
कारण.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                   
                                   
                                   
सारस-कात्रज बाग तर सोडाच... आम्ही Z-BRIDGE सुद्धा  सोडला नाही..                                   
खर तर वडा-पाव चे वांदे.. पण मी.. चकार शब्द सुद्धा काढला नाही..                                   
अख्ख्या CLASS ला PARTY दिली ..आता  ती, त्यांची होणारी (?) वहिनी होती...                                   
सकाळी E-SQUARE- संध्याकाळी Mc-D, साला.. तिची मात्र चैनी होती..                                   
                                   
पै-पै'चा हिशोब मागावासा वाटतोय.. पण  तसलं काही करणार नाही..                                   
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                   
                                   
काय झालं असेल हो? का सोडलं असेल मला?                                   
खऱ्या प्रेमाची किंमत कळली नसेल का तिला?                                   
खरतर अजूनही मी तिच्यावरच जीवापाड प्रेम करतोय..                                   
प्रेत्येक श्वास घेताना तिचीच आठवण काढतोय..                                   
एकदा भातुकली मोडलीय.. आता परत खेळ मांडणार नाही..                                   
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                   
                                   
म्हणतात आयुष्यात हरून जगायचं नसतं..                                   
काहीही झालं तरी निराश व्हायचं नसतं..                                   
मी सुद्धा आता तिच्याच STYLE न जगायला शिकीन..                                   
पण प्रेम या शब्दापासून चार हात अंतर राखीन                                   
                                   
या पोरींच काही सांगता नाही येत.. कधीही CHOICE बदलू शकते                                   
आणि माझ्या सारख्या देवादासांची दररोज भर पडू शकते