शपथ सुटली म्हण



शपथ सुटली म्हण!
गोष्ट फिटली म्हण!
मला ओळखू दे आधी
मग म्हणायचे ते म्हण!!
आभाळ भरलं आहे
वारा पडला आहे
आधी उपचार म्हणून मल्हार
मग मरवा म्हण!!
शिळेवर बसलो आहे
शिळेसारखा सारखा बसलो आहे!
शिळेवर गुणगुणतो जुनीच दुख्खे
तू काही नवीन म्हण!!
थोड़े म्हणायचे म्हण
थोड़े ना म्हणायचे म्हण!
गाणे संपताना तरी
सम गाठली म्हण!!
- मौनाची भाषांतरे, संदीप खरे

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही


बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो
...फक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलो
खरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलो
काय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

आज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहे
कधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहे
यशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहे
खरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.
माझी पावले तुझ्याच मागे जातच आहे
हृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहे
काय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही.....

साले हे मित्र असतात बाकी मस्त

साले हे मित्र असतात बाकी मस्त

"काय आयटम चाललीय बघ......!!!!!!!!"
"वहीणी आहे तुझी साल्या,दुसरीकडे बघ...."

...हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त

"नडला कि फोडला" असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त

पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं
निर्लज्ज असतात ते,त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं,
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त

शाळेचा result असो या प्रेमाचा,ह्यांचाच धिंगाना जास्त
तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं
पण काहीही म्हणा,
साले हे मित्र असतात बाकी मस्त

प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं
उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं.
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.

शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं
breakup नंतर "अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं,
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.

प्रेमाचे नाही वाजले तरी मैत्रीच नाणं नक्की वाजतं,
तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी
दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं
पण काहीही म्हणा
साले हे मित्र असतात बाकी मस्त.

मित्रांनो,जीवाला जीव देणारे मित्र खूप नशिबाने भेटतात,
खरे मित्र ओळखा आणि आयुष्यभर त्यांची मैत्री जपून ठेवा...

किती सुंदर आहे ना हा पाऊस!!

किती सुंदर आहे ना हा पाऊस!!
स्वत:बरोबर प्रेमाचा स्पर्ष घेउन फिरणारा,
दूर मैल न मैल प्रेमाची बौछार करणारा..
किती सुंदर आहे ना हा पाऊस!!


गडगड गडगड आवाज करत मिरवत येतो मोठा अक्बारासारखा,
पण वेड लावून जातो त्या तानसेनाच्या माल्हारासारखा,
किती खुळा आहे न हा पाऊस!


माणूस तर काय कुठेही नाचतो आज काल...
बारमध्ये, डिस्को पब मध्ये, लग्नाच्या वरातीमध्ये,
पण झाडांना फुलांना नाचवणारा
किती वेडा आहे ना हा पाऊस!!


हं तसा कठोरही आहे बरंका आमचा हा पाऊस!
तोंड वर करून जगणार्यांना डोळे मिटून उभा राहायला लावतो..
आणि मन खाली घालून जगणार्यांना सुधा तोंड वर करून उभा राहायला लावतो...
किती बेभान आहे ना हा पाऊस!!

का?

का? नाही घेतलं तिने मला समजून,

का? नाही आलं तिच्या हृदयाला उमजून,

केलं तिच्यावर मी प्रेम जीवापाड,

असं काय आलं तिच्या प्रेमाआड,

हो.... हो.... !!!!म्हणत अचानक तिने दिला नकार,

तिच्या नकाराने दिला माझ्या आयुष्याला उकार,

अजून हि नाही गेली वेळ,

अजून ही आयुष्याचा खूप काही राहिलाय खेळ,

मला असं वाटतंय कि,

अजून हि होऊ शकतो आपला मेळ.......... :(

किती ग फसवशील तू स्वतःला ?


किती ग फसवशील तू स्वतःला ?
तो म्हणाला एक सांगशील का ग मला?
किती फसवशील रोज स्वतःच्या मनाला?
वाहू दे एकदा डोळ्यातून त्या आसवाला,
रडू दे एकदा मनभरून तू तुझ्या या मनाला,
...वाहू दे काळजात लपवून ठेवलेल्या त्या तुफानाला,
सोडून दे तू या स्वार्थी जगाच्या बोलण्याला,
फुलू दे हसू तुझ्या ओठांच्या पाकळ्यांवर,
नको ग हरवून तू तुझ्यातल्या तुझ्या अस्तित्वाला,
सांगशील का एकदा तरी मला,
का ग फसवतेस तू स्वतःला?
त्याच्याकडे बघून तिने केले एक स्मितहास्य आणि म्हणाली
खरे उत्तर मिळेलच लवकर तुझ्या या प्रश्नाला..
माझ्या स्वतःला फसवल्याने,माझ्या रडण्याने खुशी मिळत असेल या जगाला,
तर रोजच स्वतःला फसवणे मंजूर आहे मला

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेन

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेन

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेन

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेन

दूरावा एक कविता !



मी एकटा असतानाही

मला एकटेपणा जाणवत नाही

कारण तूझ्या आठवणीत

मला वेळेचे भाणच रहात नाही


रंगवून रंगवून किती स्वप्ने रंगवीणार मी

एक दिवस तर तू सोडून जाणार

मी रंगविलेली सारीच स्वप्ने

आरशासारखी तूटून जाणार

स्वप्न हे स्वप्नचं असतं

एक दिवस तरी तुटणार ते

पण मना-मनाने जोड्लेले भावनांच नात कसं तूटणार ते

तु दूर गेली होतीस आणखी दूर जाणार

आणि हा दूरावा कायम असाच राहणार....

त्या प्रेमाची आठवण...!

मी बरसलो आज शब्दांतुन ,
तीला एकही शब्द ना कळला कधीमी ओघळलो आज डोळ्यांतुन ,
तीचा थेबंही ना गळला कधी.
सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले मी कोसळलो दरड होऊन ,
तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.
तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्यामी बसलो बाजार मांडून ,
तीने भाव माझा ना विचारला कधी.
आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याचीमी राहीलो कुंपण बनुन ,
तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.
सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या मी जगलो काजवा होऊन ,
तीला उजेड माझा ना दिसला कधी.
आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठीमी राहीलो शिपलं बनुन ,
माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी
मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी मी जळालो पाखरु बनुन ,
तिला एकही चटका ना लागला कधी.
मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावीमी मला दिले आगीत झोकून ,
तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.
आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापामी चाललो स्वप्न मोडुन ,
तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी।

राहून गेलंय आपलं नातं!


नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन
आणि सरळ आठवायला घेतले तुला
तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...
मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो
हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!

थोडक्यात, न विचारलेला विचार..


"सुख जवापाडे दुःख पर्वता एव्ह्डे"
यालाच,
"जीवन ऐसे नांव " असं म्हणतात.
जीवनात,
"कधी खुषी कधी गम"
असतं,
बालपण,तरूणपण आणि म्हातारपण हे शेवट पर्यंत जगल्यावर आयुष्यातल्या ह्या अनुभवायच्या पायऱ्या आहेत असं वाटतं.
वसंत,ग्रीष्म वगैरे आयुष्यात ऋतु येतच राहणार.
"नाचरे मोरा आंब्याच्या वनांत "
असं म्हणता,म्हणता
"कां नाही हंसला नुसते मी नाही म्हटले नसते"
असं म्हणे पर्यंत,
"मोहूनीया तुज संगे नयन खेळले जुगार"
असं म्हणताना

"जीवनात ही घडी अशीच राहूदे"
असं म्हणावसं वाटत नाही असं मुळीच नाही.
आणि,नंतर
"थकले रे नंदलाला"
असं म्हणायला काहिही वाटत नाही.
"जन पळभर म्हणतील हाय,हाय "
म्हणण्याची वेळ केव्हां येऊन ठेपली हे ही कळे पर्यंत
"आम्ही जातो अमुच्या गांवा"
म्हणावं लागतं,
थोडक्यांत काय
"फिरून जन्मेन मी"
असं धडधडीत म्हणावं असं शेवटी शेवटी वाटतं.
असं जाणकार म्हणतात.

नसेल जर का, तुला भरवसा, श्र्वासांची तू, झडती घे



नसेल जर का, तुला भरवसा, श्र्वासांची तू, झडती घे
रूप तुझेही, भरून उरले, डोळ्यांची तू, झडती घे

दुसरा तिसरा, विचार नाही, अविरत चिंतन, तुझेच गे
कधी अचानक, धाड टाकुनी, स्वप्नांची तू, झडती घे

तेल, वात अन्‌, ज्योत दिव्याची, तुझी आठवण, आणी मी
कसे तुला, समजावू वेडे, प्राणांची तू, झडती घे

क्षणाक्षणावर, तुझाच ताबा, तुझीच सत्ता, सभोवती
वाटल्यास मम, रोजनिशीच्या, पानांची तू, झडती घे

कळेल तुजला, कळेल मजला, भाकित अपुल्या, प्रीतीचे
तुझ्या नि माझ्या, तळहातांच्या, रेषांची तू, झडती घे

या ह्रदयाचा, अथांग सागर, नभी चंद्रमा, रूप तुझे
काठाची तू, झडती घे अन्‌, लाटांची तू, झडती घे

अजुन कोणता, हवा पुरावा सांग `इलाही' सांग तुला
तुझ्याच रंगामध्ये रंगलो, ग़ज़लांची तू, झडती घे

आकाशाला, भास म्हणालो



आकाशाला, भास म्हणालो, चुकले का हो?
धरतीला, इतिहास म्हणालो, चुकले का हो?

चिरंजीव वेदना, अंतरी, दरवळणारी
जखमांना, मधुमास म्हणालो, चुकले का हो?

कलेवराला, जगण्यासाठी, काय लागते?
आठवणींना, श्र्वास म्हणालो, चुकले का हो?

मरण्याआधी, नाव सांग त्या, हत्याऱ्याचे
मी त्याना, विश्र्वास म्हणालो, चुकले का हो?

निंदानालस्तीही, केवळ, मिळवत गेलो
प्रीतीला, हव्यास म्हणालो, चुकले का हो?

लिहिल्या कविता, लिहिल्या ग़ज़ला, गीते लिहिली
सरस्वतीचा, दास म्हणालो, चुकले का हो?

चौदा वर्ष, पतीविना, राहिली उर्मिला
हाच खरा, वनवास म्हणालो, चुकले का हो?

घात आप्त, आघाता सगे, अपघात सोयरे
ह्रदयाची, आरास म्हणालो, चुकले का हो?

चुकले का हो? चुकले का हो? म्हणणाऱ्यांनो!
याचनेस, गळफास म्हणालो, चुकले का हो?

जन्मठेप, आत्म्याला कोणी, दिली `इलाही'?
कुडीस, कारावास म्हणालो, चुकले का हो?

प्रवास


दवाचे थेंब अजून सुकले नाहीत
पहाट अजून पुरती उगवली  नाही
पूर्वेला असते रोजच केशरी किरणांची  प्रभा
पण आज तरी पाहून घेईन सगळे
पुन्हा पाहीन ना पाहीन कधी...
थोडेसे थांबशील ना
जरा मनाला सावरून घ्यायचे आहे
थोडी वाट बघशील ना
थोडासा भूतकाळ आवरून घ्यायचा आहे
तेवढी  उसंत देशील ना....
खंत तरी कशाची करू
आयुष्यात सुख बनून आले
भर दुपारच्या सावलीसारखे
पायाशी घोटाळले अगदी जवळ
पण अगदी इवलेसे दिसेल ना दिसेलसे  ......
खरच का रे
प्रेम देते आयुष्य अन 
प्रेमच  देते जीवनात मुक्ती?
एकच क्षण असावा प्रेमाचा 
अन बाकी असावा का प्रवास मरणाचा?....

दोन थेम्ब............. गालावर उतरले


तू जाणार म्हटल्यावर उगाच मन कासाविस झाले
जणू शुभ्र आकाश काळ्या मेघांनी ग्रासले

तू जातांना आज तुला डोळ्यात साठावावेसे वाटले
अन ते क्षण डोळ्यातच बंदिस्त करावेसे वाटले
तू थाम्बनार नाहीस, मागे फिरणार नाहीस माहित होते
तरी तु मागे फिरशील असे का मला वाटले?

तू आज जताना जिवाच्या आकाग्शाने थाम्ब म्हटले
तुझ नाव घेउन तुला शंभर वेळा पुकारले
तुला माझा आवाज एईकुच गेला नहीं का ?
की ... तेव्हा मी नाहीं माझे मन आक्रन्दले होते का ?

तू जाताना माझे डोळे बरच काही बोलून जातात,
मनातले अलगुज़ हळूच उघडून देतात,
तुला कधीच काही कळल नाही याची खंत आहे,
अन हाच माझ्या अवद्न्याचा अंत आहे........................

मी तुझ्या सोबतच आहे ....




काल पर्यंत मी तुझ्या सोबतच होतो....


आत्ताही मी तुझ्या सोबतच आहे ....

आणि नंतरही मी तुझ्या सोबतच राहील ....



उन्ह्याळ्यात तुझी तहान बनून,

पावसाळ्यात ढगांतून पडणार्या पाण्यात मी असेन,

आणि हिवाळ्यात थंडी बनून मी तुझ्या सोबत असेन...



उजेडात तुझी सावली बनून,

तर अंधारातल्या काळोखात मी असेल,

आणि एकटेपणात तुझ्या मनातला विचार बनून मी तुझ्या सोबत असेन...



हसताना तुझ्या गालावरची खळी बनून....

रडताना तुझ्या प्रत्येक अश्रूत मीच असेन...

आणि रागावशील तेव्हा लाल रंग बनून तुझ्या डोळ्यांत मीच असेन ....


बोलताना तुझ्या आवाजात,

तर लिहिताना तुझ्या प्रत्येक शब्दात मी असेन,

आणि नेहमीच तुझा श्वास बनून ....मी तुझ्या सोबत असेन ....



तुझ्या तळ हातांच्या रेषांत,

tension मध्ये कपाळाच्या आटयात ....

आणि तू गुनगुनत असलेल्या त्या प्रत्येक गाण्यात .... मी तुझ्या सोबतच असेन ....

तुझ्या बंद डोळ्यांतल्या स्वप्नात ...

उघड्या डोळ्यातली आशा बनून ....

आणि मनातली इच्छा बनून मी तुझ्या सोबतच असेन ...


तुझ्या ट्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात ....

तू विसरलेल्या त्या प्रत्येक आठवणीत ....

आणि तुझ्या प्रत्येक प्रवासात तुझी ..."Destination" बनून मी तुझ्या सोबत असेन ....


काल पर्यंत मी तुझ्या सोबतच होतो....

आत्ताही मी तुझ्या सोबतच आहे ....

आणि नंतरही मी तुझ्या सोबतच राहील ....

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,


एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,
तिला पाहताच त्याला तीच वेड लागल ,
वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल,
पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल,
वेळ मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,
ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,
काही दिवसाने वेळ मात्र जमिनीवर पसरू लागली ,
ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली ,
वेळ म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे ,
तू मला आधार देशील का ??
यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का
ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली ,
ते पाहून झाडाची निराशा झाली ,
हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले ,
विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले ,
वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली ,
अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली ,
आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला ,
कारन …. तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला ..

मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी

मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी
मी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.

सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.

तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्या
मी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.

आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.

सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या
मी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.

मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी
मी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा
मी चाललो स्वप्न मोडुन , तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी.

कॉलेजमध्ये असताना

कॉलेजमध्ये असताना
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..
वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति
कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली
आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास
मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?
तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.
मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..
ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु…?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु
अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास
युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास

सहज एक दिवस विचारल तिला

सहज एक दिवस विचारल तिला
सखे मी तुला काय आणु ?
थोडीशी फुल,थोडेसे मोती
आणि चांदण आण ओंजळ्भरून

मनात म्हणालो स्वतालाच
प्रेम भलतच महाग असत
जमल तर वार्‍याची झुळुक
नाहीतर जाळणारी आग असत

ओंजळभरून फुल
एक दिवस तिला नेउन दिली
काय सांगू आनंदाने
सखी मझी हरकून गेली

आज फुल दिली
उद्या मोती देइल
ओंजळ्भरून चांदण
माझ्यासाठी घेउन येइल

शेवटी एक दिवस सांगितल तिला
चांदण तर खूप दूर आहे
मी तुला मोतीही देउ शकत नाही
तुझी एवढीशी इच्छा माझ्याकडून
पूर्ण होउ शकत नाही

क्षणभराच्या शांततेनंतर
सार आभाळ भरून आल
माझ चांदण माझ्या समोर
रीमझीम रीमझीम बरसून गेल

किती रे वेडा आहेस तू
प्रेम कधी काही मागत का?
प्रेमाला प्रेमाशिवाय
दुसर कधीकाही लागत का?

स्वतालाच विसरून स्वतालाच
प्रेम म्हणजे देण असत
आयुष्याला सुरात बांधेल
प्रेम अस गाण असत
मोती काय चांदण काय
प्रेम कधी कोणी मोजत का?
चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का???

** एक छोटीशी पणती खिडकीच्या कोप-यात.. **




एक छोटीशी पणती ,
खिडकीच्या कोप-यात..

खोलीचा कोपरा न कोपरा उजळवणारी..

जगाचा प्रकाश पाहून
दिपणारी..
स्वत:च्या ज्योतीची धग
जपणारी..

तमाच्या गमनाने
दुखावणारी..
प्रकाशाच्या आगमनाने
सुखावणारी..

पतंगांना जीवापाड
लुभावणारी..
पतंगांच्या वेडाला
स्वीकारणारी..

वा-याच्या फुंकरींनी
लाजणारी..
वादळात अस्तित्वासाठी
झगडणारी..

पणतीखालच्या तमाने
मंदावणारी..
वातीच्या टोकावरून सूर्य
शोधणारी..

तेल संपत आलय
जाणवणारी..
म्हणून अधिकच तेजाने
प्रकाशणारी..

ती छोटीशी पणती ,
खिडकीच्या कोप-यात..

मनाचा कोपरा न कोपरा उजळवत विझणारी..

तिने कित्ती सुंदर दिसावं..

तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..

कोणाच्याही नजरेत भरावं..

तासन तास पाहत रहावं..!!!!


तिने कित्ती गोड बोलावं..

ऐकणाऱ्याने विरघळून जावं..

हरवूनच जावं ..

सोबत तिच्या..!!!!


तिने कित्ती साधं रहावं ..

त्यातही रूप तिचं खुलावं..

कोणीही फिदा व्हाव ..

अदांवर तिच्या..!!!!


तिचं उदास होणं..

कसं हृदयाला भिडावं..

कोणालाही वाईट वाटावं..

अश्रूंनी तिच्या..!!!!


तिचं हसणं ..

कोणालाही सुखवावं..

कोणीही घसरून पडावं..

गालावरल्या खळीत तिच्या..!!!!


तिच्या नजरेने मलाच शोधावं..

अचानक नजरेने नजरेला भिडावं ..

मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..

लाजेने चूर चूर व्हावं..!!!!


ती समोर असताना ...

मी सारं काही विसरावं..

तिने इश्य करत लाजावं..

मी 'हाय हाय' करत घायाळ व्हावं ..!!!!


तिने फक्त माझंच रहावं..

मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..

साथ देऊ जन्मोजन्मी ..

विरहाचं दुख कधीही न यावं..

कधीही न अनुभवावं..!!!!


मला आवडणारी मैना मेला कावळाच घेऊन गेला

रात्र रात्र जागून खूप अभ्यास केला

बऱ्याच EXAM मध्ये साला TOP ही केला

पण एका दिवशी घडलं आक्रीत ............
...
प्रेमाच्या EXAM मध्ये माझा पुरता पोपटच झाला!!!

बोलू बोलू तिच्याशी घाबरून दिवस दवडताना

मला आवडणारी मैना मेला कावळाच घेऊन गेला

आणि मित्रानो.......प्रेमाच्या EXAM मध्ये माझा पुरता पोपटच झाला!!!

पावसाचे दोन थेंब...मराठी कथा

पावसाचे दोन थेंब ढगातुन निघाले.वार्याच्या प्रवाहाशी झुंजत, ढगाच्या तुकड्यांना चुकवत, पृथ्वीच्या दिशेने.दोघेही गप्प होते.एकाला रहावल नाही, त्यान संवाद सुरु केला-"आता पृथ्वीवर एकत्र प्रवास करायचाच आहे, बोल ना काहीतरी."
मग दूसरा बोलला,"मी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतोय."
"आता काही मैलांचा प्रवास उरलाय, आता अंतर्मुख होउन काय करणार आहेस?" 



"आयुष्याच्या शेवटीच तर अंतर्मुख व्हाव लागत.आपला वेग आपल्या हाती नाही, आपली दिशा आपल्या नियंत्रनात नाही आणि कपाळमोक्ष तर ठरलेलाच आहे!""मग आपल्या हाती काहीच नसताना विचार करुन आणि अंतर्मुख होउन काय करणार आहेस?त्यापेक्षा छान गप्पा मारू आणि वेळ आली, की अनंतात विलीन होउन जाऊ." 

"त्याने काय होणार? कपाळमोक्ष टळणार आहे का आपला?"
"अच्छा, म्हणजे तुला काळजी लागुन राहिली आहे ती तुझ अस्तित्व संपून जाण्याची!"
"का?तुला नाही लागुन राहिली आहे काळजी?"
"नाही.आपला ढगात जन्म होतो, त्याच क्षणी आपल भवितव्य ठरलेल असत.ढगाला आपला भार असह्य झाला, की तो आपल्याला सोडून देणार.मग गुरुत्वाकर्षणाच्या ताब्यात जाउन खाली डोक वर शेपुट असा आपला प्रवास सुरु होतो.यात आपण काय करू शकतो?"...
"पृथ्वीवर पाण्याला जीवन म्हणतात आणि जीवनाच्या थेंबाला  स्वताचा जीव राखन्याच स्वातंत्र्य नाही,हे अजबच."
"हे बघ, आपला कपाळमोक्ष होतो म्हणजे काय? तर थेंबाच अस्तित्व संपत.आपला जीव जात नाही,फ़क्त रूप बदलत!"


"मी  थेंब आहे आणि पडल्यावर थेंब राहणार नाही, एवढ मला कळत."
"तू पाणी आहेस आणि पाणीच राहणार आहेस,एवढ समजुन घे.तू म्हणजे Hydrogen चे दोन रेणू आणि Oxigen चा एक! तलावातही आणि समुद्रातहि!"
"बरा भेटलास,बोल,काय गप्पा मारणार होतास माझ्याशी?"


"अरे,गप्पा मारायला काय हजार विषय आहेत.मी तुला प्रश्न विचारतो, आपण का पडतो?"
"हा काय प्रश्न झाला?""म्हणजे अस बघ, बेडूक घसे फुगवून त्यांच्या प्रेयासिला बोलावतात आणि आपली आराधना करतात म्हणुन आपण पडतो, की एखादी आजी देव पाण्यात बुडवून बसते म्हणुन आपण पडतो..."
"अरे तुला काय खूळ लागल का? आपण पडतो त्याच्याशी यापैकी कशाचाही संबंध नाही.निसर्गचक्र म्हणुन पडतो आपण."
"चूक!"
"हे बघ, आपण पडतो त्याला उगाचच काहीतरी महान अर्थ चिकटवत पडू नकोस."


"पण, समज आपण स्वताचा असा समज करुन घेतला, की आपण त्या बेडकांसाठीच पडतो आणि आपल्या वर्षावात भिजुन बेडूक-बेडकी प्रनयात धुंद होतात......मादी अंडी देते.हजारो बेडूक जन्मतात, ते किड्यांना  खाऊन पृथ्वी स्वच्छ ठेवतात. त्या बेडकांना खाऊन साप जगतात..."
"बापरे, मी हा असा विचारच केला नव्हता कधी..."


"समज, कुणीतरी पर्जन्यदैन्य  होता म्हणुन आपण पडलो.पाउस पडून काही कोणाचा व्यक्तिगत फायदा नाही.मग यांच्यामुळे आपण पडलो, अस समजायला काय हरकत आहे?"
"खरच, काहीच हरकत नाही आणि एखादी प्रेमळ आजी जगासाठी देवाला पाण्यात बुडवून ठेवणार असेल, तर तेवढ्यासाठीच मी पडतो म्हणायला तर मला आनंदच वाटेल!"


"आता कस बोललास? नाही तरी आपण पडणार तर आहोच,मग त्या पडण्याला असा अर्थ दिला तर पडण्याला आणखी गम्मत नाही का येणार? आता आणखी एक गम्मत.तुला जर choice दिला आणि विचारल, की बोल तुला कुठे पडायचे  आहे, तर तू कुठे पडशील?"
"हे काय भलतच?"

 
"अरे गम्मत! ज़रा विचार तर करुन बघ.कुठेतरी दोन धुंद जीव एकमेकांना लगटून समुद्राकाठी फिरत असतील तर नेमक जाउन तिच्या ओठांवर पड़ाव,भेगाळलेली जमीन तहानेन व्याकुळ  होउन आकाशाकडे पाहत असते तिच्या तृप्तीचा  पहिला थेम्ब व्हाव,एखाद अवखळ मूल खिडकित बसून तळहात गजातुन बाहेर काढत असेल तर त्याच्या इवल्या हातांवर जाउन विसावाव.....एखाद नक्षिदार फुल पाखरू पंख पसरून फुलावर बसल असेल तर त्याचे रंग भिजवून टाकावेत...काहीही!" दूसरा थेम्ब ऐकता ऐकता हरखून गेला होता.पहिल्यान बोलन संपवल तेव्हा तो  भानावर आला आणि म्हणाला,"अरे आपले  आयुष्य  पण एवढे रोमांटिक,छान असू शकत, असा विचारच नव्हता केला मी कधी!"
 

एक आजोबा हातात पिशवी सांभाळत, वाऱ्याने उलटी होत असलेली छत्री सावरत कसेबसे चालत होते.पहिला थेंब त्यांच्या छत्रीवर पडला आणि मग घरंगळत जमिनीवर पडला.चाफ्याच डौलदार झाड़ दुधाळ फुल अंगावर लेवून हिरवी वस्त्र नेसून सजल होत.भार सहन न होउन पान वाकल आणि थेंबन जमिनीवर उडी घेतली.तितक्यात पहिल्यान दुसर्याला मिठीत झेलल.दूसरा म्हणाला,"आता मी वाट बघतोय, वाफ होउन ढगात जाण्याची आणि पुन्हा थेम्ब होउन बरसन्याची.थेम्ब होउन पडण्यात किती मजा असते, ते मला आज कळल!".

पहिला पाऊस पडतो तेंव्हा :)



पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं! 

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्‍या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा 

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ 



पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्‍यापाशी
तळं होऊन साचायचं! 


आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील 


ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे 

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं! 

म्हणून...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

उत्तर एकाचे तरी देशील का ?

उत्तर एकाचे तरी देशील का ?
जीतकी ओढ मला तुझी
तितकीच तुलाही आहे का ?
जीतके प्रेम माझे तुझ्यावर तीतकेच तुझही
तीतकेच तुझही आहे का ?

मी समोर नसतानाही
मला कधी पाहतेस का ?
उत्तर रात्रि शान्तसमयी
स्वप्नात मला पाहतेस का ?

ऎक क्षण मी दिसाव,
म्हनुण व्याकुळ होतेस का ?
तो क्षण सम्पुच नये,
असा विचार कधी करतेस का?

एकान्ती आपल्या गुजगोष्टी,
आठवुन कधी पाहतेस का ?
त्यातल्या प्रत्येक शब्दाने,
मोहरुन कधी जातेस का ?

माझा वेडेपना आठवुन,
स्वत:शी कधी हसतेस का ?
माझ्या सोबत वेडे व्हावे,
असे कधी ठरवतेस का ?

काळही सगळा सम्पुन जायील,
विचारणे माझे सम्पनार नाही
प्रश्न माझे अनेक आहे,
उत्तर एकाचे तरी देशील का ?

तुझे प्रेम म्हणजे असे




तुझे प्रेम म्हणजे असे
उत्तुंग शिखरावर उभे राहणे
तुझे प्रेम म्हणजे असे
खोल खोल दरीत स्वत: ला झोकून देणे जसे
तुझे प्रेम म्हणजे
पहाटे पहाटे फ़ुलावरच्या दवाला टिपणे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
नदीच्या अवखळ पाण्याबरोबर वाहत जाणे
जसे तुझे प्रेम म्हणजे असे
भर पावसात भिजणारे पारिजातक जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
कुडकुडणार्‍या थंडीत शेकोटीतले कोळसे जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
वार्‍यासंगे उडणारे पतंग जसे
तुझे प्रेम म्हणजे असे
उन्हाळ्याच्या रोहीणीत तापणारा सुर्यप्रकाश जसे...

दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला

दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला
चेहरा कंटाळवाणा पण अबाधित राहिला
मी सिनेमाला जरी सुरुवातीला कंटाळा लो
फक्त पैसे वसूल व्हावे म्हणून शेवट पाहिला
चार मिळता चार लिहिली ना कमी ना जास्त ही
प्रेमपात्रा ना ही कागद रद्धीचा मी शोधला
नामस्मरणाला सुद्धा दिधली ठराविक वेळ मी
मी किलो आन् ग्रॅम वरती मोक्ष मोजून घेतला
लाल हिरवे दीप येथे पाप पुण्याचे उभे
सोयीचा जो वाटला मी तोच सिग्नल पाळला
मी धुके ही पाहिले आन् धबधबे ही पाहिले
पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला
मी पिझा ही चापतो आन् भाकरी ही हाणतो
घास जो पडला मुखी मी तो रवन्थत ठेवला
भोगताना योग स्मरला योगताना भोग रे
राम ही ना झेपला मज कृष्ण ही ना झेपला
मी मला दिसलो असा की ना जसा दिसलो कुणा
कुरूपतेचा आळ कायम आरशावर ठेवला

विवाह सोहळा म्हणजे,

विवाह सोहळा म्हणजे,
वधू - वर  मिलन,
सनई चौघड्यांच वादन 
पाहुण्या मंडळींचं आगमन,

नवरदेवाची मिरवणूक,
पिऊन तर्र असणाऱ्यांची,
सगळ्यांनाच हसवणूक,
कंटाळलेल्या बापड्यांची मात्र 
उगाचच पिळवणूक,    

पुरोहिताची मंगलाष्टकाला सुरुवात, 
वधू-वराची नव्या आयुष्याची रुजवात, 
मध्यंतरात सत्कारांचीच बरसात, 
नसते मात्र मान्यवरांची खबरबात, 

वरमाला घालताना देवाचे नमन,  
सप्तपदीत मनातून दिलेले वचन,
वधूच्या डोळ्यातले पाणी,
सांगते माहेरच्या प्रेमाची कहाणी, 

भोजन पंगतीत वधू -वर ही वाढतात,
प्रेमाच्या मायेन आग्रह ही धरतात,
वरमाया थोड्या धुसफूस करतात,
मान असताना पण उगाचच भाव खातात,  
   
वधू मातेची मात्र घालमेल खूप काही सांगते,
हे बघून पापणीची कडाही ओलावते, 
बिदायीला वधू पिता धाय मोकलून रडतो,
लहानपणीची लाडाची लेक आठवतो,