.....अश्रुंची कहाणी.......


एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
' आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............

दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,

उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पंदनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुळेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........

ऐकून ही अश्रुंची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी........

न चुकता करावा तुला फोन


मग, उगाच तु चेष्टा करून बोलावं
बोलता-बोलता असाच वेळ निघून जावा...
याक्षणी आठवतेस तू...
फोन हाती घेतल्यावर बघावा
तु पाठवलेला जुनाच एखादा "मेसेज"
बघून मग असाच विचार करत बसावा...
याक्षणी आठवतेस तू...
एखाद्या दिवशी पहावी वाट
करशील तू फोन म्हणून, तुझं मात्र
वेळ नाही बोलू आपण नतंर...
याक्षणी आठवतेस तू...
तुझं नेहमीच खट्याळ बोलणं
माझं मात्र नेहमीच तुला रागवणं
पण तरीही तुझं शात बसणं...
याक्षणी आठवतेस तू...
तुझा नेहमीच माझ्याकडे हट्ट
माझं मात्र नेहमीच रूबाब दाखवणं
तरीही तुझा मझ्यावर विश्वास असणं...
याक्षणी आठवतेस तू...
मित्र म्हणून काय नाही केलस तू
माझं मत्र "मी असाच आहे"
पण तरीही सागण्याचा तूझा प्रयत्न असणं...
याक्षणी आठवतेस तू...
नेहमीच तूझं प्रेमानं बोलणं
माझं मात्र नेहमीच टोचून बोलणं
तरीही तू एकून घेण्याचं मोठेपण असणं...
याक्षणी आठवतेस तू...
डोळ्यातील अश्रूही थाबेना आज
रूसलेत तेही मझ्यावर
मिही अश्रुची चादर पाघंरणार मनावर...
याक्षणी आठवतेस तू...

काल पुलावर light नव्हती,

काल पुलावर light  नव्हती,
    एका focus  ची हवा होती,
    त्यात तिची प्रतिमा soliddd होती ,
    माझ्या near ती उभी होती..

    काल पुलावर light  नव्हती,
    ढगांची चांगली trafic जॅम होती ,
    पाऊस पडायची wait  होती,
    एका थेंबाची wish होती...

    काल पुलावर light  नव्हती,
    तिला always पहायची होती,
    आस माझ्या mind  मध्ये होती,
    क्षण क्षण हृदयाची beat होती..

    काल पुलावर light  नव्हती,
    तिची style जरा भारी होती,
    माझी ringtone वाजत होती,
    आता ती set झाली होती....

    >आशिष सातकर

सुंदर तरुणी दिसल्यावर…


हाय ऐकुनी तरुणी तर ती हसून गेली
मला पाहण्या पत्नी कंबर कसून गेली!
धावत मी पत्नीच्या मागे जाता जातापरिणामांना मी डरतो की काय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!
प्रसाद शिरगांवकर

——— ‘गर्लफ्रेंड’ ———


तीन वर्षाची, कॉलेजची फी सगळी…
पहिल्याच दिवशी वसूल झाली
तिला पाहिले, तीचा जाहलो
क्षण एक ही ना, दूर राहिलो…
खळ्या गालातल्या त्या… ती कातील अदा
तीच्या लाजण्यावर, मी झालो फिदा
तीच्याच एका मैत्रीणीच्या आधारे,
लागली एकदाची माझी नैय्या किनारे
ते हसणे खिदळणे…रात्ररात्र गप्पा गोष्टी
त्या टाळ्या, गालगुच्चे….इतकी ‘फ्रॅंक’ दोस्ती ?
तीची साथ होती… मौसम ही मस्त होता
तीचा तो इशारा….. होकार स्पष्ट होता
विचारायचे…कसे? सारे ठरवून गेलो
बुजरा….जरासा मी, प्रेमात धीट झालो
गुलाबी कळी, कोवळी घेतली
ठरलेल्या ठिकाणी ती मला भेटली…
***********************
म्हणाली सरळ… मला इंटरेस्ट नाही,
ईतर मुलींसारखी, माझी टेस्ट नाही
तीला पौरुषाची हव्यास नव्ह्ती…
सखीची ‘जवळच्या’ तीला प्यास होती
बसला धक्का… कळता हकिकत नवी
स्वतः साठीच तीला एक ‘गर्लफ्रेंड’ हवी
स्वतः साठीच तीला एक ‘गर्लफ्रेंड’ हवी !!!

असा मी.............

कदाचित मी तुम्हाला...
चंचल वाटतो... पण मी तसा नाहीय.....
कदाचित मी तुम्हाला...
चिडचिडा वाटतोय... पण मी तसा ही नाहीय
भांडखोर म्हणालात तर...
थोडासा आहेच.... 
पण माझ्या पुरता मर्यादित
जगाच्या जंजाळात.. काहीतरी शोधत असतो..
पण... लोक याला वेड म्हणतात....
या वेडाला उपाय म्हणून कविता लिहितो...
पण त्याही कधी कधी साथ सोडतात..
काही चांगले मित्र आहेत...........
त्यांच्यात रमत असतो......
मी जरा वेगळाच आहे........
मनाला पटत तेच करणारा..
स्वताच्याच विश्वात.... डुंबून राहणारा......
निस्वार्थ मानाने.. स्वार्थ बाळगणारा...
शेवटी मीही माणूस आहे........
स्वताचाच खर करणारा....
पण खर्याला सलाम करणारा......
असा मी.............

पहिलं प्रेम - चौथीमधलं

पहिलं प्रेम - चौथीमधलं
पुन्हा एकदा करायचंय
पुन्हा एकदा माझ्यावर
तिला हसताना पाहायचंय
काही गोष्टी चुकून सुटतात
आणि काही सुटून चुकतात
चुकलेलं, सुटलेलं बरंच काही
पुन्हा एकदा जमवायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्ह्यायचंय

तिची हुशारी अभ्यासातली
माझी होती खोड्यांमधली
तिला मिळती शाबासक्या
मला नेहमी उठा-बश्या
पहिला नंबर दोघांचाही
तिचा वरून, माझा खालून
- एकदा तरी बदलायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्ह्यायचंय

मागल्या बाकावरची माझी
जागा होती ठरलेली
तिरका कोन साधून गुपचुप
नजर तिला भिडलेली
सर मला नेमके तेव्हाच
प्रश्न काही करायचे
- आणि नंतर झोडायचे
एकदा तरी मला त्यांना
उत्तर चोख द्यायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्ह्यायचंय


अजून पाचवीतला पहिला दिवस
मनात तसाच आहे
नवे शहर, नवी शाळा
सारं नवीन आहे
एकदाही तिच्याशी
बोललो सुद्धा नाही
आज सुद्धा त्याची
बोच मनात आहे

गाव माझे सोडण्याआधी
एकदा तिला भेटायचंय
काही करून आयुष्यात
पुन्हा लहान व्ह्यायचंय

काही करून आयुष्यात
पुन्हा लहान व्ह्यायचंय

जो खरे प्रेम करतो

जो खरे प्रेम करतो

त्याची ओंझाळ फाटकीच राहते

अन....

ज्याला वेळ घालवायचा असतो

त्याला खरे प्रेम मिळतं .... 

हे तुम्हाला कितीपत खर वाटत आपल मत स्पष्ट करा ..............!!!!

एक अनामिक

प्रेम गोजिरे गोजिरे.. त्याला सुख-दुःख साजिरे...



माया आई ची अनंत ..
त्यात कसली तुला खंत..
बाप पाठीशी रे उभा..
असुदे रावणाची सभा..

माय तुझी रे हि माती
बाप तुझा शेतकरी
उन्हा-तनात तापून
तुला ठेवलं रे जपून
हृदयाच्या अमृताचा ठेवा
तुला जीवनभर पुरावा..
म्हणून झीझविल्या रे टाचा
तुला दिली मधुर वाचा..

प्रेम गोजिरे गोजिरे
त्याला सुख-दुःख साजिरे..
माया आई ची अनंत
त्यात कसली तुला खंत ..

घागरीने पाणी शेंदून
अखंड गगनाला भेदून
 पाजविले तुला अमृत
आयुष्य केल रे सुसंस्कृत
बापाच्या देहाची सावली
जशी विठ्ठल माउली
देऊन तुला सुख त्यानं
ओढलं अंगावर ऊन
काळा पडला तुझा बाप
सोसून जगाचा रे ताप
देऊन प्रीतीचा गारवा
त्याने भरला रंग हिरवा..

प्रेम गोजिरे गोजिरे
त्याला सुख-दुःख साजिरे
माया आई ची अनंत
त्यात कसली तुला खंत

जखमेच दुःख भुलवून
तुझ आयुष्य दिल फुलवून
काट्या-कुट्यावर चालून
तुझसाठी फुलांचं अंथरून घालून..
त्यांनी सोसला रे ताप
म्हण त्यांना माय-बाप
करा आयुष्याच तप
त्यांच्या जीवानाला जप ..

प्रेम गोजिरे गोजिरे
त्याला सुख-दुःख साजिरे
माया आई ची अनंत
त्यात कसली तुला खंत
बाप पाठीशी रे उभा
असुदे रावणाची सभा

आजकालचे प्रेम . . .




प्रेम जेव्हा होते, तेव्हा काहीच माहिती नसते,
तो तिचा प्रियकर आणि ती त्याची प्रेयसी असते,

भेटतात कुठल्या वळणावर, मग पटकन नजर भिड़ते,
अगोदर मित्र बनतात आणि नंतर मांजर आडवी जाते,

मग गप्पागोष्टी आणि रुसव्या-फुगव्याचा चालू होतो खेळ,
उठल्यापासून ते झोपेपर्यंत फ़क्त होते विचारांची भेळ,

माहित असते दोघांना, की ते प्रेमात पडले आहेत,
कोण विचारेल अगोदर, पण घोड़े कुठे अडले आहे,

करून थोडीशी हिम्मत, मुलगा बाजीराव पेशवा बनतो,
मनात असुनही थोड़े झुलवत ठेवत त्याला, मस्तानीचा गेम चालू असतो,

शेवटी होकार मिळतो आणि प्रेम प्रकरण चालू होते,
प्रेमाला त्या साक्षी मानून शपथांची यादीच तयार होते,

तू नाही भेटलीस तर मी जिव देईन, असे बाण सुटतात,
तुझ्याशिवाय मी ही अधुरीच, हे ऐकून डायरेक्ट काळजात घुसतात,

हळुहळु सरकत हे प्रेम पुढे जाते,
मग लग्नाची वेळ शोधू पाहते,

जात पडताळणिचा मग, चालू होतो खेळ,
तो नाही माझ्या जातीतला, मग बसेल कसा मेळ,

दुसऱ्याच दिवशी ब्रेक अपचे, फरमान असे निघते,
बाबांना मी वचन दिले आहे, असे कारण असते,

हे ऐकून मुलाला, मोठा धक्काच बसतो,
इंटरवल नंतर मग, देवदास पिक्चर चालू होतो,

काही दिवस तिच्या आठवणीत, तो सतत रडत राहतो,
आता कोण येईल आयुष्यात माझ्या, याचीच वाट पाहतो,

परत कुठल्यातरी वळणावर, त्याला नविन धड़क बसते,
आता हीच माझी प्रेयसी, मग हृदयाची शिट्टी हळूच वाजते,

असे हे आजकालचे प्रेम, काय खोटे नि काय खरे,
कितीही लांब राहण्याचा प्रयत्न केलातरी, बळी पडतातच सारे . . .

एक मुलीच्या भावना ..........




अचानक पाने समोर येऊन
शेवटी आज तो बोलला होता
कोंदटलेल मन मोकळ करताना
किती घामाघूम झाला होता....

थोड्या वेळा पूर्वीच्या प्रसंगाने
अंगावर येतो काटा
काही क्षणातच त्यान माझ्या
मनाला शोधल्या नवीन वाटा

" अहो १ min . थांबाल का "
आर्त आवाज कानी पडला
कळलेच नाही माझे मला
पावलांचा घोडा का जागच्या जागीच थबकला ?

आता मी हि घाबरले
जणू कावळ्याने मारली चोच
गर्कन मागे वळून पाहिलं
तर जवळ येत होता तोच

पाहून त्याला मी
घट्ट पकडले मैत्रिणीचे बोट
शोधक नजर खाली गेली
तर किंचित पकडले दातात ओठ

" नाझ्याशी मैत्री कराल का "?
तो बोलला अडखळत
" मला थोडा वेळ द्या "
माझे शब्द बाहेर पडले नकळत....

तो अजून बराच काही बोलला
त्यान जुळविल्या शब्दांच्या माळा
मात्र माझा उगाचच चालला होता
रेशमी ओढणीशी चाळा

" तू तर काहीच बोलत नाहीस "
पार केला त्यान मनाचा घाट
" मला उशीर होतोय "
मी लगेचच शोधली पळवाट

निश्चल मानाने मी सोडली
त्या जागेवर एक आठवण
तो मात्र तिथेच होता
जणू करत होता त्याची साठवण....

त्या प्रसंगाच्या आठवणीने
डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले
आपण त्याला हो म्हणायला हव होत
मन उगाचच ओशाळले

आता सहन होत नव्हता
या मनाचा एकटेपणा....

आता
सहन होत नव्हता
या मनाचा एकटेपणा
चालून आलीच आहे संधी
तर पाहू त्याचा एकनिष्ठपणा ......

हेच खरे प्रेम आहे... ..... .





आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसीअसणे
म्हणजेच प्रेम नसते
रोज रोज"आय लव्ह यु"म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते........
... तर आपल्या आयुष्यात
कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे
कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..
त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...
ते केवळ"तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील...."
हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल
वाटतो तेच आहेत तुमचे"खरे सोबती... .
हेच खरे प्रेम आहे... ..... .

व्याकूळ आसवांत वाहून रात गेली

व्याकूळ आसवांत
वाहून रात गेली 
तळ मळ हृदयाची 
हृदयास कळून आली 

जे जे कोंडिले मनी 
सारेच ओठी आले
हितगुज तुज मनाचे
सारे सारे कळाले..

भावनांचा फुटला बांध
सामावून मिठीत..
बावरली लाजली तू 
चेहरा नको ओंजळीत 

व्याकूळ आसवांत 
वाहून रात गेली
विरघळ झाली मनाची 
तुझी जाणीव मज झाली

माझी आठवण येईलचं.

कधी कळ
नाही तुला,
प्रेम मला येत नाही..
अगं प्रेमच करतोय मी,
तु करावं असं मी म्हणत नाही..
प्रेम कर माझ्यावर,
मि तुला म्हणणार नाही..
मी मात्र जळत राहणार,
जोवर तुला कळणार नाही..
किती दिवस असं
वागशील,
एकदा तरी प्रेमाने बघशील..
जळलेल्या प्रेमाची
आठवण काढशील,
तुला कळून चुकेल..
माझं प्रेम खरं होतं,
तुला माझी आठवण येईलचं.

काहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले


काहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले 
जुने काही परत येऊन पुन्हा छळून गेले 
विसरलो म्हणता म्हणता काही तरी आठवून आले 
जळालेले हृदय आग आश्रूमधे बुडून गेले 
का घडावे असे ? का तिने वागावे असे 
प्रश्ना मधे या मन खरेच गडबडून गेले 
काहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले 
जुने काही परत येऊन पुन्हा छळून गेले 
संपलेले सारे पुन्हा पुन्हा उगलते मन 
पुढे जायचे तरौन ही मगेच भरकतटे मन 
नाही उत्तरे त्या साठीच तर फडते मन 
तिची बाजू ही न समजता जळत राहते मन 
कसे समजाउ त्याला ते सारे आता सारून गेले 
काहीच घडले नाही आज तरी डोळे भरूण आले 
जुने काही परत येऊन पुन्हा छळून गेले

शेवटचा निश्वास


संपला सारा खेळ् प्रेमाचा
उरले फ़क्त आठवणींचे अवशेष
दुर् गेल्या वाटा सुखाच्या
काहीच न राहीले शेष.

कधी केव्हा कुठे कसा
पण खुप जीवं लागला होता
त्यांच्या गंधाने माझ्या मनीचा
सारा आसमंत भारला होता.

प्रेम निरपेक्ष असतं
म्हणणारी लोकं भेटली
करताना मात्र असं प्रेम
माझी अघोरी तडफ़ड झाली.

वाळवंटातल्या म्रुगजळागत
होता का सारा आभास
उडुन गेले स्वप्नील रंग आयुष्याचे
उरला हवेत शेवटचा निश्वास.

तोच शब्द हवा मला

लिहिता लिहिता थकतील 
अशी पाने नकोत मला 
लाख वेळा फाडली पाने 
त्यातलं एकच पण हव मला 
ज्याने घेतला मनाचा ठाव 
तोच शब्द हवा मला 
अर्थ आला ज्यामुळे कवितेला 
तीच ओळ भावली मला 
शब्दांचा हा खेळ 
माझं आयुष्य बदलून गेला 
मनाचा कल्होळ सारा 
जनाला सांगत गेला 
गोंधळलो कधी मनात 
एकटाच हरवलो 
शब्द होते संगतीला 
म्हणून कवितेतून दिसलो 
हसलो कधी मनात 
तोच शब्द आवडला 
रुसलो, हतबल झालो 
तोच शब्द मनी रुतला 
रुतणारा असा शब्दच नकोय मला 
लिहिता लिहिता थकतील 
अशी पानेच नकोत मला

आयुष्य खूप सुंदर आहे,

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा......

वाट बघणं...

वाट बघणं...
प्रत्येक जण बघतच असतो...
कुठल्या न कुठल्या गोष्टीची...
किंवा
कुठल्या न कुठल्या व्यक्तीची...
आणि बहुतेक वेळा माणूस वाट बघत असतो आपल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीची...

चिमुकली सोनू कामावरून येणाऱ्या आपल्या बाबांची..
दमून झोपलेला चिंटू आपल्या आई च्या हाथच्या मायेची..
तिची वायफळ बडबड ऐकण्यास आतुर झालेला प्रियकर आपल्या प्रेयसीची..
आणि कधी एकदा मनात साठवलेली ती वायफळ बडबड त्याला सांगते म्हणून आसुसलेली प्रेयसी आपल्या प्रियकराची..
दिवसभर घरकाम करून थकलेली बायको ऑफिस वरून येणाऱ्या आपल्या पतीची..
तर दिवसभर ऑफिसात काम करून कंटाळलेला पती 'आपल्या' घरी पोहोचण्याची..

का बघतो माणूस इतकी वाट...
कारण त्यात 'आशा' असते...
आपल्या सगळ्यात आवडत्या व्यक्तींसोबत घालवता येणाऱ्या 'अमूल्य क्षणांची' आशा..

आणि लोकं उगाच असं समजतात की वाट बघत असतांना जो त्रास होतो, जी आतुरता वाटते ती त्या व्यक्तीच्या दूर असण्याने वाटते...
सत्य तर हे आहे की,

त्रास आपल्याला ती व्यक्ती दूर असल्याचा होत नसतो...
तर त्या व्यक्तीसोबत पूर्वी घालवलेल्या अमूल्य क्षणांच्या आठवणी ह्या खरं म्हणजे जास्त त्रास देत असतात..

एक अश्रू..

एक अश्रू..
 
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
 
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
 
तेव्हा..
 
तो अश्रू..
 
हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..

पण वाहत मात्र नाही,


एक पाऊल..

तुझ्यासाठीच अडखळणारं,

तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..

वाटेवरल्या एकटेपणात..

तुझी पाऊलखूण शोधणारं..


एक नजर..

जी सारखी तुलाच शोधते...

प्रत्येकाच्या डोळ्यात..

तुझीच छबी शोधते..

मागे वळून ..

पुन्हा पुन्हा..

तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..


एक मिठी..

तुझ्याचसाठी रिकामी..

तुझ्याशिवाय मोकळी..


एक कुंचला..

तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..

तू येऊन पुन्हा..

रंग भरशील माझ्या आयुष्यात..

अशी आस लावणारा..


एक जीव..

तडफडणारा..

असहाय्य....

तुझ्याचसाठी....

" तुझ्याशिवाय "....

विसरली तर नसशील ना मला????

कळत नं कळत,

तु माझ्या इतकी जवळ आलीस,


जाता जाता मनात माझ्या


घर करुन गेलीस.........


घरामध्ये आता या,


कोणीच राहत नाही,


खिडकीतून खुणावणाऱ्या आठवणी


हल्ली मी देखील पाहत नाही........


प्रेमा मध्ये काय ओलावा


कमी होता मझ्या?


की, मनातला दुश्काळ


लांबला होता तुझ्या?


जाता जाता म्हणालीस


विसरुन जा मला,


मनं मात्र माझ विचारतं


कुठे ठेवु तुझ्या वेड्या प्रेमाला?


जपून ठेवलयं मी ते प्रेम


भेटलीस की देइन तुला......


भीती मात्र वाटते खरच


विसरली तर नसशील ना मला????

कधी असही जगाव लागत


कधी असही जगाव लागत 
खोट्या हास्य्च्या पडद्याआड 
खर दुख लपवावं लागत 

कर्तव्याच्या नावाखाली 
स्वताला राबवाव लागत 

इतरांना आनंदी ठेवण्यासाठी 
डोळ्यातलं पाणी लपवावं लागत 

तीव्र इछ्या असून देखील 
नाही म्हणव लागत 

खूप प्रेम असून देखील 
नाही असे दाखवाव लागत 

अस इतरांना हसवता हसवता 
कधी खूप रडव लागत 

कधी असही जगाव लागत

मी तुला नक्कीच भेटेन....



मी तुला नक्कीच भेटेन,
कुठे ? कशी? माहीत नाही!

कदाचित,
तुझ्या मानसीचे चित्र होऊन कॅनवासवर उतरेन.....
आणि कदाचित,
तुझ्या कॅनव्हासवरच्या चित्रातली
एक अमूर्त रेषा बनून तुला नजरेत साठवीत राहीन!

कदाचित,
सूर्याची तिरीप होऊन तुझ्या रंगात मिसळून जाईन,
नाहीतर रंगांच्या बाहुपाशात तुझ्या कॅनवासवर विसावेल...

काय सांगू, कुठे, कधी
पण तुला नक्कीच भेटेन...

नाहीतर,
अवखळ झरा होऊन तुझ्या अंगावर तुषार उडवीन,
आणि त्या तुषारानी तुझं सर्वांग भिजवून टाकीन,
एक गार शिरशिरी होऊन तुझ्या छातीला कवटाळीन..

मला बाकी काही माहीत नाही
पण एवढं कळतय की,
काळाने काहीही केलं तरी
या जन्मी तु माझ्यासमीपच असशील...
हे शरीर नष्ट झालं,
तर सगळंच नष्ट होतं ,
पण आठवणींचे कण विश्वात विरून जातात ... 

मी ते कण गोळा करीन,
अन धाग्यात गुम्फीन...... 

ए, , मी तुला नक्की, नक्कीच भेटेन.....