" शोध तिचा लागेना ...! "

कुठे शोधू तुला एकटीला
किती शोधू तुला एकटीला
तुझा विरह असह्य होतोय
तुझ्याविना चडफडतोय !
येताजाता बाहेर फिरायला
कामाला आणि उंडारायला
तुझी साथ असायची !
लांब जवळ गेलो तरी
तू बरोबरच असायची !
दारापासून कार्यालयापर्यंत-
मंदिरापासून मद्यालयापर्यंत
तुझ्याविना बाहेर पडायला
लाज वाटते मला ,
तुझ्याशिवाय बाहेर जायला
तोंड नाही मला ,
'प्रिये'च म्हणतो आता तुला
प्रिये, जीव किती गुंतला !
किती छळणार मला
किती दुखवणार मला ,
तुझ्यासवे दूरवर
फिरायला आवडते ,
तू आता नसतांना
माझे पित्त खवळते !
कुठे आहेस कशी आहेस
शोध काही लागेना ,
एकच पायात घालू कशी
दुसरी चप्पल सापडेना !

मृगजळाचे भास...............




गोड आठवणींमागाची रहस्य हळूहळू उलगडत जातात
आणि लक्षात येतात ते मृगजळाचे भास

सत्य माहित असूनही इच्छेअनुरुप स्वप्नं पाहण्याची सवय
पण, उशिरा लक्षात येतात खडबडून जागे करणारे वास्तवि काटे

चंद्र ढगाआड गेला म्हणून रात्रीला त्या आमावस्या म्हणत नाहीत
उन्हाळ्यात पाऊस आला म्हणून त्याला पावसाळा म्हणत नाहीत
एखाद्या भेटीत कोणी जरा गोड बोललं म्हणून त्याला "प्रेम" म्हणत नाहीत

सगळं कळत असत पण मन वळत नसत
नकाराला होकारातच बदलत असत
झाले वार कितीही तरी फुलांप्रमाणे झेलत असत
खूप वेड असत
त्याला सावरणं अवघड खूप असत...............

तो क्षण

"तो क्षण निघून गेला मी पाहतच राहीलो
बोलायच खुप होत पण निशब्द झाहलो
सारे शब्द जणू रानोमाळ पळून गेले माझे
ओठ उघडलेच नाही डोळ्यात विरघळत राहीलो.

तु समोर होतीस मी कोपरा शोधत रहीलो
तु वळून पाहत होतीस मी वळत राहीलो
आज कळाल कीती कठीण असत प्रेम
काही सपंवुन गेले मी सुरु करण्यात राहीलो.

तुझे डोळे बोलत होते मी पपण्यांत राहीलो
तुझे इशारे खुणवत होते मी बघण्यात राहीलो
कोणीही त्या संधीच सोन केल असत आज
मी 'सोन्या' सोन्यासाठी संधी शोधत राहीलो.

वेळ जात राहीली मी आज वाहत राहीलो
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीलो
तु माझ्या काळजात सामावुन गेलीस सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीलो.

ब्रेकअप म्हणजे नक्की काय असतो ?????

ब्रेकअप म्हणजे नक्की काय असतो ?????

ज्याला मराठीत प्रेम भंग म्हणतात तेचं असतं,

जुळलेले अनुबंध तोडणे असतं..

कि कधी ते जूळलेचं
नव्हते हे उमगणं असतं..

कुणाचा तरी निरर्थक हट्ट असतो ?

कि दोघांनी मिळून घेतलेला कठोर निर्णय असतो..

त्रास सहन करायला जमत नाही तो क्षण असतो ?

कि त्याग करण्याची तयारी नसायचा पुरावा असतो..

दोन जीवांची घालमेल असते ?

कि कोणा एकाचं तडफडण असतं..

पुन्हा एकदा नव्याने सुरवात असते ?

कि आठवणींवर जगायची तयारी असते..

ब्रेकअप म्हणजे नक्की काय असतो ????
 
कवी: अनामिक

मी माझ मन आवरल पण.........

मी माझ मन आवरल पण त्या मनाला नाही उमगल 
खूप काही करायचं होत पण वेड्या मनाला नाही कळाल 


प्रेमात मी असं वेडा झालो हसता हसता इतरांना विसरून गेलो 
काय मन असत ना मनातल्या मनात हळूच हसवत 
पण समोरच्याला कस समजत .........................?

मी आहे एक प्रेमवेडा ...........तुझ्या प्रेमात बुडालेला 
ऐनवेळी तुझ्यासाठी दारात तुझी वाट पाहत बसलेला 
तुझ्या आठवणींना हृदयात साठवणारा 
आलीच वेळ तर डोळ्यात अश्रू आणणारा 

आजही मला आठवत तुझ मुद्दाम रुसन 
आणि मी तुला तिरक्या नजरेने पाहन 
तुझ्या प्रेमात मी स्वतःला विसरन
आणि तुझी नजर चुकून i love u म्हणन 
खरच किती सोप असत ना प्रेम करणं

तुझ्यावर कविता कारण अगदी सोप झालय
पण नको त्या वेळी शब्द भांडार संपतंय 
डोळे झाकल्यावर तुझा चेहेरा समोर येतोय 
पण तुला समोर पाहिल्यावर अंग थर थरतय

तुझ्याशी बोलताना तुझी पण साथ हवी आहे 
आपल्या प्रेमाचं प्रेमगीत आनंदाने गायचं आहे 
तुझ्या प्रेमात सर्व विसरून जायचं 
तुझ्या प्रेमात परत एकदा प्रेमवेडा व्हायचं 
म्हणून तुझ्या साठी मला प्रेमवेडा म्हणून घ्यायचं ........

कवी :- ऋषिकेश केदारी

माझ मन....

आज खूप कंटाळवाण वाटतय 
माझ मन नुसत हिरमुसलय

का कळत नाही पण नुसत भकास भकास वाटतंय 
जिकडे जाव तिकडे नुसत मन कावरबावर झालंय
जस म्हणतात तहानलेल हरीण पाण्यासाठी धावतंय 

आज खूप कंटाळवाण वाटतय 
माझ मन नुसत हिरमुसलय
जन्मलेलं बाळ आईच्या प्रेमासाठी रडतय 
तसं माझ मन तुझ्या प्रेमासाठी रडतय .....

आपल्या जीवनाची रीतच मुळात चुकीच हाय 
कधी कुठे घड्यात पडेल याचा भरवसा नाय 
प्रेमात पडलेली व्यक्ती अशीच म्हणतेय 
पण त्याला प्रेमात पडल्यावर कविता करायला सुचतेय 

कविता कारण सोप काम नसतंय 
चार शब्द वाचले म्हणून काम होत नसतय 
प्रेमात पडायला पण प्रेम हे काय हे समजून घ्यायचं असत
मग कळत प्रेम म्हणजे काय असत ?

चांदण्या रात्रीत प्रेमाच्या गप्पा मारताना कस काय वाटतय ?
अचानक आलेल्या पावसात भिजल्यावर कस वाटतय  ?
हे सर्व अनुभवायला प्रेम कराव लागतय  ...........
प्रेमाची ही भाषाच निराळी पण ते तुला कधी कळलाच नाही 

खरच आज माझ मन नुसत हिरमुसलय
का कळत नाही पण नुसत भकास भकास वाटतंय ......

तुझ्या किती आवडी सोडल्या ..


तुझ्या किती आवडी सोडल्या ..
माझ्या सुखासाठी तुझ्या न सुटना-या सवई मोडल्या ?
माझ्या एका सहलीच्या पैश्यासाठी..
रिक्शा सोडून बस ने गेलास कामाला ..
घेत होता नवे कपडे मला अन स्वत : तीच पैंट फाटेपर्यंत घालायचा ...
खर सांगशील तुझा जमाखर्च कसा रे भागवायचा ?
जमवलिस कवडी कवडी ..
दिलीस मला भेल अन रेवडी...
बाबा मी मोठा होत गेलो
अन तू म्हातारा मला येत गेली अक्कल
अन तुला पडल टक्कल
विसरलास कधी माझ्या साठी होत होता घोड़ा
आता मलाच सांगत असतो झालास न घोडा .
हे तुझ माझ अस वेगळ होत नात
खर सांगशील माझ्या सुखासाठी आईलाही तू कधी दिला नाही गजरा
पण माझ्या पु-या केल्या गरजा
बाबा आता मी झालोय मोठा
तुझ्या सुखाला नाही राहणार तोटा
तुझ्यासाठी आता इथून पुढे झिजेल
तुझ अपुर स्वप्न पूर्ण होताना दिसेल तू फ़क्त एक काम कर
आता कामावर जायच तेव्हढ बंद कर
घरी बसून आता आराम कर '
खुप दिवस आईशी निवांत बोलला नसेल
तिला घेउन लाम्ब जायचा एखादा प्लान कर
बाबा आता मी मोठा झालो...

भेटायची लावली होती आस पण न बोलता निघून जायेल

भेटायची लावली होती आस पण न बोलता निघून जायेल
त्याला भेटायचा लागला होता ध्यास 
पण आज तो मला सोडून जायेल....

काय करू त्याला थांबवण्यासाठी
काय कारण शोधू त्याला भेटण्यासाठी
का तो समजत नाही माझ्या हृदयाची वेदना
का तो असा वागतो हेच कळेना
पण आज तो मला सोडून जायेल....

फक्त त्याला एकदा मिठीत घेयाच आहे
त्याच्या माडीवर डोक ठेउन मनोसोक्त रडायच आहे
मनातल्या वेदना ओठांवर आणायच्या आहेत
त्याच्यावर किती प्रेम आहे हे शब्दाने सागायचं आहे
पण आज तो मला सोडून जायेल.....

आता परत त्याला भेटणे नाही
त्याला एकदा डोळ्यात साठावून घेणे शक्य नाही
सोडून चालला तो मला अर्ध्या रस्त्यावर
तरीही वाट पाहीन ह्याच रस्त्यावर
पण आज तो मला सोडून जायेल........

आकाशातला एक तारा आपला असावा

आकाशातला एक तारा आपला असावा,
थकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा,
एक छोटे जग प्रत्येका जवळ असावे,
जगाच्या या गर्दित कुणीच एकटे नसावे.....
क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.

आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆत.

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असतं,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असतं.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असतं
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हा ही
क्षितीजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी.......!

वर्तमानात जगण्याची कला भुतकाळातुन दाखवतात.

....तुझी आठवण.....



तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही,
तू म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही.
डोळ्यांसमोर सारखे तुझे़च चित्र
तूच दिसते सर्व जागी
अशी फीलिंग विचित्र,
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही,
तुझी आठवण आल्यावर मला काहीच सुचत नाही.
खुप गोड़ हसतेस तू,
खुप गोड़ लाजतेस,
प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते,
बोलायच असत खुप काही पण ओठ हालत नाही,
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही.
खरच.. ...
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही.

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
माणसांमध्ये जाऊन बसायचं, छान छान बोलायचं, खोटं खोटं हसायचं
आणि अजून माणसात आहे असं दाखवायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
त्या चंद्राशी गप्पा मारण्यापेक्षा मित्रांबरोबर कट्ट्यावर बसायचं
माझं सोडून त्यांचं रडगाणं ऐकायचं.. सूर कुठे जुळतात का ते पहायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
मनात आभाळ दाटून आले की बाहेर पडणाऱ्या पावसात भिजायचं
मग ह्या शरीराबरोबर मनालाही गारवा मिळतो का ते पहायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
हळवं बिळवं व्हायचं नाही..रुतलेल्या काट्यांना मलमपट्टी करायची..
दारू पेक्षा दवा काही काम करते का ते पहायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
खोलीत जाऊन दार घट्ट बंद करून घ्यायचं..खिडक्या बंद करून पडदे ओढून मिट्ट अंधार करायचा..
पोटात पाय घेऊन मनसोक्त रडायचं आणि खरंच मन मोकळं होतं का ते पहायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...