तुझ्यासाठी काय पण...


एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
माझ्याशी मैत्री का केलीस म्हणून?
मी उत्तर दिला असता,
माझ्या जीवनात नवीन व्यक्तीचा प्रवेश व्हावा म्हणून...
तुझ्यासाठी काय पण...

एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
माझ्या सोबत इतका मोकळा का राहतोस?
मी उत्तर दिला असतं,
मला दुसरा जवळची मैत्रीण अशी कोणी नाही म्हणून...
तुझ्यासाठी काय पण...

एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
मी रागावले तर माझी समजूत का नाही काढत पटकन?
मी उत्तर दिला असतं,
मला हक्काचं असा रागावणारी तूच एक होतीस...
तुझ्यासाठी काय पण...

एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
माझ्यात तू इतका का सामील होतोस?
मी उत्तर दिला असतं,
तुझा सुख तेच माझा सुख असतं म्हणून...
तुझ्यासाठी काय पण...


एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
तू माझ्यासाठी इतका सारं का करतोस?
मी उत्तर दिला असतं,
मी तुझ्याशी मैत्री केलीये अन,
तुझ्या मैत्रीसाठी काय पण....

तुझ्यासाठी काय पण...
-कवी- अनामिक 

तिचा मित्र



रिमझिम पाऊस,
त्यात तिच्या भिजण्याची हौस.
मग पावसात भिजताना मला विसरणं,
कधी विसरून पावसाला मला बिलगणं.
 
पावसासोबत ती असताना मला,
आणि माझ्यासोबत ती असताना पावसाला वाटणं गैर.
आणि आणखिनच त्याच माझं वाढत गेलेलं वैर.
 
तिचं मुसमुस रुसणं ,कधी फिकटस हसणं,
तिने ये म्हणताच याने बरसणं,
मग मला येता राग मी तिला छत्रीत घेणं,
तेव्हा मला आवडतं त्याच ते तरसणं.
 
तिचं हसणं, त्याच बरसणं,
माझ्या आधी पोहचता तो, माझं ते धूसमुसनं,
माझं असं फसणं, त्याचं त्याला हसणं,
मग तिनेच उघडून छत्री, माझं राग पुसणं.
 
ती नसताना एक दिवस पाऊस आला खाली,
म्हणतो पुरे झालं धुसफूस आता बास झाली.
अरे तिची माझी जरा वेगळीच विण आहे,
ती तुझी आजकालची पण माझी तिच्या बालपणापासूनची मैत्रीण आहे.
मी दोन क्षण बोललो तर तुला वाईट वाटत.
तू उघडून छत्री तिला जवळ घेतो तेव्हा, माझ्या मनी काय दाटत.
अरे मी चार महिन्याचा पाहुणा आहे,
तरी ऋणानुबंध आमचा फार जुना आहे.
आज मला शेवटचं तिच्यामध्ये मिसळू दे,
उद्या पासून मी नसेन येईल वेगळा ऋतू,
चल जातो मी येईन पुन्हा तोवर शपथ तुला तिला सांभाळ तू.
 
तिची चाहूल लागताच हा निघून जातो,
एक हळवा आसू डोळी माझ्या रहातो,
येऊन ती विचारते "तुला काय झाले",
मी म्हणतो काही नाही "ढग बरसून गेले".
 
मग येतो पाऊस त्याची पुरवण्या हौस,
ती म्हणते उघड छत्री मी सांगतो आज नको मागुस,
ते ऐकून पाऊस आनंदात बरसतो,
डोळा मारून मला गालातल्यागालात हसतो.
 
आता आठवत राहत ते त्याचं कोसळणं,
त्याच्यासोबत  तिचं ते हसणं कधी रुसणं,
पण आता छळत राहत हि असताना ते त्याचं नसणं.
कवी - अनामिक 

तू आणि मी फक्त तू आणि मी बाकी कोणीच नाही!


तू आणि मी फक्त तू आणि मी  
बाकी  कोणीच  नाही! 
माझी  तू  नि  तुझा  मी! 
तू  दूर  जाताना  तुझा  हात  पकडून  
तुला  जवळ  घ्यावे  मी 
कडाडू  दे  सारे  आभाळ  
आणि  बरसू  दे  मेघमल्हार 
तू  घाबरशील  अन बिलगशील मला... 
तुला  घेईन  मिठीत  मी! 
तू  पाहशील  माझ्याकडे  
अन  तुझ्याकडे  पाहीन  मी 
गहिवरू  दे  श्वास...  
आणि  संपून  जावू  देत  सारे  आभास 
विसरून  जावू  जगाला  जेव्हा.... 
तुझ्या  ओठांना  स्पर्श  करतील  ओठ  माझे 
लागू दे  आग पेटू  दे  ठिणगी  जेव्हा... 
भिजलेल्या  तुला  पाहतील  डोळे  माझे 
वारा सोसाट व्हावा  अन 
पानाफुलांची  बरसात व्हावी 
मी  तुला  उचलून घ्यावे
अन तू  लाजावे 
मग तू  आणि मी प्रेमरसात भिजून 
चिंब ओले व्हावे... 
कवी- अनामिक 

ते तुझे हसणे नव्हते


ते तुझे  हसणे  नव्हते 
ते नशिबीच  पडले होते 
दारिद्र्य लाभले मज 
आयुष्यही दुखांनेच घेरले होते ....

खरेच शोना माझ्या ह्या दारिद्र्यात  
तुझा ही हाथ सुटणारच आहे ....

तू   जाशीलही  निघून 
ही वेळच  तशी आहे 
सगळे  सोडून  गेल्यावर 
मला तूच किती वेळ सांभाळणार आहे ......

तुझे सुख तुला मिळावं 
आजवर दुसरं काहीच  स्वप्नी नव्हतं
आजही देवाकडे हाथ जोडून 
तुला सुखी ठेवच म्हणणार आहे .......

खरेच शोना माझ्या ह्या दारिद्र्यात  
तुझा ही हाथ सुटणारच आहे
एकटा आलो  इथवर  अन  मी 
आता एकटाच  विरहात जाळणार आहे  ....

खरेच शोना माझ्या ह्या दारिद्र्यात  
तुझा ही हाथ सुटणारच आहे....
-
©प्रशांत डी शिंदे


उगाच मी उन्हातली फ़ुले मनात आणली


उगाच मी उन्हातली फ़ुले मनात आणली
क्षणात गारव्यातली सुखे उन्हात आणली ..

पुरेल हीच पानगळ पुढे मला हयातभर
फ़ुलायची उमेद तू अशा वयात आणली !..

नसेन मांडली कथेत वेगळी व्यथा जरी 
तिला न कोणत्याच मी कथानकात आणली !..

बघून पारिजातका दवातला सडा तुझा 
कधी न आर्जवे पुन्हा तुझ्या पुढ्यात आणली !..

नको विचार एवढा करू मना मनातला
तुझी न कल्पना कधी कुणी मनात आणली !..

अता कसे लढायचे पराभवा तुझ्या पुढे ?
तहातलीच जिंदगी रणांगणात आणली !..

निमूट भोगली तुझ्या समोर जन्मठेप मी 
कधी न कोणती सजा तुझ्या गुन्ह्यात आणली..
कवी - अनामिक 

कुणाचेच नसतात हक्क

कुणाचेच नसतात हक्क
कोणावर पण तरीही डोळे
भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा
पण तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडायचा सारा तर आकडे
पडतील कमी,
तरीही सुख
मोजताना पापण्या भिजतातच ना?
लाख झाला असेल
मनाचा दगड ,तरीही आठवणींनी त्याला पाझर
फुटतोच ना?
तोडताना जोडलेली नाती मनात
वेदना होतातच ना ?
या सगळ्यातनं हाती उरायचे शून्य,
पण तरीही जीव जडतातच ना ?.
कवी- अनामिक 

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझेमाझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
कवी- अनामिक 

!​​! ​वाळलेल्या झाडाची गोष्ट ​!!

काही दिवसांपूर्वी एक झाड पाहिलं
भर पावसाळयात वाळलेलं
सगळीकडे हिरवं हिरवं असतांना
आपली सगळी पान गाळलेल
विचार करत होतो
काय म्हणून अस याला बोचलं
असं काय जिव्हारी लागणारं असेल टोचल
की हे जगण्यावर असं रुसलं
सृष्टिचा उत्सव ऋतू सुरु असताना
हे त्याच्याकडे पाठ करून का बसलं ?
त्या झाडाखाली एक म्हातारी
भाजी विकत बसायची
सगळी बहरलेली झाड सोडून
ती या वाळलेल्या झाडाखालीच असायची
बहुधा तिला या झाडाबद्दल
मनोमन जिव्हाळा वाटायचा
त्याच्या वाळलेल्या खोडावरून हात फिरवताना
तिला जसा जवळचा नातलग भेटायचा
एकदा तिला भेटून बोललोच
म्हणाली, पोरा , आधी पासूनच इथेच बसायचे
वाळल, सुकलं, म्हणून सोडून दिल्यावर
कस वाटता तुला नाही रे कळायचं
दाट सावलीच होत आधी हे ही झाड
दिवंसोदिवस पडत होती याच्या पण सौंदर्यात वाढ
कुठून काय माहित एक जुईची वेल याच्या पायथ्याला उमलली
आधाराला म्हणून याच्या खोडाला बिलगली
दिवसा मागून दिवस जात होते
जुई जशी बहरत होती
फांद्याना मिठी मारून
कशी शेंड्याला लहरत होती
जुईच्या सुगंधाने
सगळं झाडच कसं मोहरलं होत
झाडाचा आधार घेता घेता
त्यांच प्रेम बहरलं होतं
एके दिवशी कोणी तरी
जुई मुळातूनच उपटलेली
जीव जात असताना
ती तशीच झाडाला लपेटलेली
उन-पावसापासून वाचवलेली जुई
झाडाच्या अंगा-खांद्यावर गेली
तिची पान-फूल गळतांना पाहून
झाडाची पण जगण्याची इच्छा मेली
अश्रू ढळावेत तसं मग
झाडानेही एक एक करून पान गाळल
अन पाहता पाहता एक दिवस
भर पावसाळ्यात झाड वाळल
~ दीपक इंगळे

प्रेम हे असे का असते..

प्रेम हे असे का असते..
कि सारे उमजुनही न उमजण्यास भाग पाडते
प्रेम हे असे का असते..
ज्यात कोणाची वाट पाहणे अगदी हवे हवेसे
वाटते
प्रेम हे असे का असते..
कधी आठवणीच्या गर्दीने पूर्ण रात्र
व्यापून टाकते
प्रेम हे असे का असते..
जे
अडचणींशी सामना करण्याची उर्मी देऊन
जाते
प्रेम हे असे का असते..
जे भर उन्हात सुद्धा एक वेगळाच
थंडावा देते
प्रेम हे असे का असते..
-अनामिक 

नवीन वर्ष म्हणजे शेवटी काय असतं.?

नवीन वर्ष म्हणजे शेवटी काय असतं?
चार ऋतूंचा नवीन खेळ असतो..
नवीन कॅलेंडरचा सेल असतो
आणि लिहिताना नवीन नंबरचा घोळ असतो
एका प्रमोशनची वाट असते
त्याची वर्षभराची साथ असते
टैक्स रिटर्नची कटकट असते
आणि मिळालाच, तर बोनसची चैन असते
कोणाचं दुक्ख तर कोणाचं सुखं असतं
कोणाचं सोयर तर कोणाचं सूतक असतं
कोणी यशस्वी तर कोणी फेल असतं
दिवस आणि रात्रीचं फक्त एक चक्र असतं ..
(..
वर्ष म्हणजे शेवटी काय असतं?)
तरीही नवीन वर्ष, ही एक आशा असते
जणू एक नवी सुरुवात असते
तशी रोजच येणारी, पण एक नवी सकाळ असते
आणि परत मिळणाऱ्या संधीची, हलकी आणि थोडी फसवी, चाहूल असते.....
नववर्षाचा क्षण शेवटी काय असतो?
एक क्षण फसवणुकीचा असतो
एक क्षणाचा जल्लोष असतो वेगळा नसूनही, त्याचा भाव मात्र जास्त असतो
आकडे बदलतात, पण बाकी चक्र तेच असतं
नवीन रात्रंदिवस, पण सूर्य चंद्राचं नाट्य तेच असतं
शाळा, कचेरी, रस्ते आणि पब्लिक, सारं सारं तेच असतं
पण हे मन मात्र या सर्वाकडे, नवीन आशेने बघत असतं ....
कवी - अनामिक 

ते पञ

काल सापडलं गँलरीत पञ मला
मनात म्हटलं !
असल जून्या कूठल्यातरी सामनांच
मी लवकर ऊघडून पाहिलं त्यात
तर काय.?
नाव बाजूच्या बिल्डींग मधल्या कामनांच

.
.

म्हटल बाजूच्या बिल्डींग ची हि पोरगी
आता ?
हिला आपल्याशी काय ओ घेणं
वाचता पहिला पञातला प्यँरेग्राफ
बापरे !!
खूपच प्रेमाच दिल होत हो तिन देणं

.
.

भावना पञात काय छान ऊतरवलेल्या
तिने !
त्यात अक्षर काय हो तिचे ते सुंदर
वाचून एक एक शब्द नी शब्द प्रेमाचा
माझ
मन म्हटल हो तिला एकच नंबर

.
.

नूसतच प्रेम भरून ठेवलं
त्यात
स्वत:च मन ऊतरवून ठेवलं
अनं
एक एक शब्दात तिने तिचे
संपूर्ण जगच ऊतरवून ठेवलं

.
.

पञ अर्धावर वाचनात असतानां
अवटाळून घेतलं मी ते छातीशी
म्हटले
बाजूच्या बिल्डींग मधील मूलगी
कसे काय बिलगली माझ्या मनाशी

.
.

वाचता मचकूर शेवटचा पञातला
माझे ¡
मन तिथच घायाळ झाले
वरच्या मजल्या वरच्या निनाद चे
स्पष्टपणे !
नाव त्या पञातच कि हो आले

.
.

फोनवर राँग नंबर यावा
तसा
पञातून आज प्रत्यय मला आला
दाखवून प्रेमाचे शूभ्र अकाश
नंतर
दूखा:चा काळा ढगच तेथ तो आला

.
.

मग आला आवाज वरच्या निनाद चा
तो
म्हणे पञ माझ तूमच्या गँलरीत काल पडलं
हळव्या आवाजात त्याला सांगावे
बाबा ईतक्यातच मला ते सापडलं

.
.


चायला चंचल भावनांना खेळ
आज
पून्हा सोबत माझ्या झाला
देऊन अनूभव नविन क्षणांचा
आत्मा पून्हा तृप्तच माझ झाला
-कवी - अनामिक