मैत्रीच नात

संकट हि आयुष्याला जगण्याच बळ देतात,माणस सुद्धा संकटातच आपली खरी ओळख दाखवतात !
नातीगोती फक्त रक्ताचीच नसतात,
त्या हि पलीकडे हि मैत्रीची नाती असतात !!

सूर्य ढगाआड गेला कि सर्व काही बदलत,
आपली माणस सुद्धा कधी परक्या सारखी वागतात !
आपल्या डोळ्यातून आसव ढळत असतानाही,
कधी - कधी ती बेधुंद आनंदाने नाचतात !!

दोन पावलं एकट चालल्यावर मला कळाल,
स्वतःची सावली सुद्धा अंधारात साथ सोडत असते !
किती हि मोठा झाला माणूस तरीही,
शेवटी माणुसकी शिवाय शिल्लक काहीच उरत नसते !!

दोन सेकंदात आता हृदय जग सोडणार होत,
तेवढ्यात एका हाताने मला पुन्हा सावरल होत !
मी तर पूर्णतः स्वतःला संपवलाच होत,
थांबलेल्या श्वासाला त्याने पुन्हा का जाग केल होत ?

मैत्रीच्या नात्याला न रक्ताची गरज असते,
नाही त्याला कोणत्या गोष्टीची हाव असते !
हे नात फक्त दोन हृदयाचा ठाव असते,
खरंच जग संपेल हे कधी ,
पण मैत्रीच नात हे कधीच संपणार नसते !!
- संग्रहित

फक्त तुझ्यासाठी.....



ही अखेरची तुझी आठवण

यापुढे माझ्या मनात

तुझे येणे जाणे असणार नाही....

यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं

माझ्या मनात बरसणार नाही...

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस माझ्या मनाच्या अंगणात

रिमझिमणार नाही....!

तुझा हळवा प्रेमळ आपलेपणा

जसा स्वीकारला होता

तसाच तुझा माझ्यावरचा रागही मंजूर...!

म्हणूनच हे अखेरचे काही अश्रू,

फक्त तुझ्यासाठी....

पण यापुढे माझ्या आसवांच्या मैफिली

तुझ्यासाठी जमणार नाहीत.......

आणि हे अखेरचे काही शब्द

फक्त तुझ्यासाठी.....

यापुढे माझ्या कविता

तुझ्या आठवणी मागणार नाहीत....

यापुढे कधीही माझ्या कविता

तुझ्यासाठी असणार नाहीत....

ही अखेरची तुझी आठवण....

यापुढे माझ्या मनात

तुझे येणे जाणे असणार नाही....

- संग्रहित -

............!!आई !!............

............!!आई !!............
एक फुल असते आई चाफा गुलाब
मोगरा जाई एक सुगंध असते आई
अस्मिता भरुन नेइ ऐक औषध असते
आई सुख
...
दुःखात तिच दवाई ऐक दैवत असते आई तीच राम साई एक पर्वत असते
आई नद्या झरयांना जिवन देइ एक
आभाळअसते
आई सारया विश्वाला पोटात घेइ एक
चंदन असते
आई स्वता झिजुन नष्ट हॅइ एक विर असते
आई दुःखात आधार देई एक कंदिल
असते
आई प्रकाश देउनवाट दावि एक रिम
झिम असते
आई तापले त्याला शांति देइ ....... ``अशि असते आई`

कवी- अनामिक 

एक पोरगी भरली लई-लई या मनात

एक पोरगी भरली लई-लई या मनात
म्हणलं ईलाच सून म्हणून नेणार घरात

पहिल्या दिवशी भेटायला गेलो
भाजपच कमळ भेट देऊन आलो
दुसऱ्यादिवशी जरा हटके केलं
राष्ट्रवादीच घड्याळ हातात बांधलं

तिसऱ्या दिवशी जरा विचार केला
अपक्ष जाण्याचा निर्णय घेतला
आज मी काही नाही नेल म्हणून तिनेच पुढाकार
घेतला अन कॉंग्रेसचा पंजा जोरात कानावर मारला

कळलच नाही दुसऱ्या दिवशी
कशी काय जादू झाली
स.पा च्या सायकलवर बसून ती माझ्याकडे
आली अन सॉरी म्हणून निघून गेली 

कदाचित माझ्या आधीच्या राजकीय
खेळीने कमाल केली होती
अन प्रेमाची निवडणूक मी बिनविरोध
जिंकली होती

कवी- अनामिक

तेव्हा कुठं प्रेम कळतं


कुणीतरी मनाला मनापासून आवडतं
तेव्हा मन गुंतून मनास प्रेम कळतं

कधी केव्हा कुठे कोण
भेटेल माहित नसतं
कधी केव्हा कसं कोण
आवडेल ठाऊक नसतं
नकळत आयुष्य वळण घेत जातं

कुणीतरी मनाला मनापासून आवडतं
तेव्हा मन गुंतून मनास प्रेम कळतं

तो चेहरा बघताच
मन नभी उडून जातं
उत्साहाचा वारा होऊन
मन वाहू लागतं
तो दिसताच मन त्याच होऊन जातं

कुणीतरी मनाला मनापासून आवडतं
तेव्हा मन गुंतून मनास प्रेम कळतं

कळत नाही कधी
त्याच्यासाठी मन झुरतं
रात्र रात्र त्याला आठवून
नवं स्वप्न बघतं
फक्त त्याची धुंदी स्वतःलाही विसरतं

कुणीतरी मनाला मनापासून आवडतं
तेव्हा मन गुंतून मनास प्रेम कळतं

मनास हवा वाटतो
फक्त त्याचा सहवास
तोच श्वास होऊन जातो
त्याचाच मनास लागतो ध्यास
तोच जगण्याचं कारणं होऊन जातं

कुणीतरी मनाला मनापासून आवडतं
तेव्हा मन गुंतून मनास प्रेम कळतं

उगीच नाही वेडं मन
तेव्हा कळतं जातं
हेच खंर प्रेम आहे
मनास उमजून जातं
जुळून मनाच्या तारा मन त्याचं होतं

कुणीतरी मनाला मनापासून आवडतं
तेव्हा मन गुंतून मनास प्रेम कळतं . 

कवी- अनामिक 

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...
शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती
जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...
ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे , ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...
मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...
गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...
मज न आता थोडकी आशा कुणी की म्हणा
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...
काय हे आयुष्य माझे , काय हे जगणे तरी
मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो...
-- संदीप खरे...

अजून जगावस वाटत...!!!!!

तुझ्याशी बोलून बर
वाटत...
तुझ्या सहवासात
खेळावस वाटत...♥♥
तुझ्या विचारांच्या
समुद् डुबावस
वाटत....♥♥
तुझ्याशी विनाकारण
भांडावस वाटत....♥♥
तू रुसलीस का मुद्दाम
तुला चीडवावस
वाटत...♥♥
पण खरच तू दररोज
आनंदी राहवस
मनाला वाटत....♥♥
नको जाऊस
मला कधी सोडून...♥♥
कारण....,..????
तुला बघुन
अजून जगावस वाटत...!!!!!

प्रेम कधी कुणावर ठरवून करता येत नाही

प्रेम कधी कुणावर ठरवून करता येत नाही
कुणी कितीही आवडलं तरी ते प्रेम असत नाही
प्रेम मनाच्या गाभाऱ्यातून
नकळत उमलून येतं
कुणीतरी मनाच्या डोहात
खोलवर दिसायला लागतं
उठता बसता दिवसा ढवळ्या
त्याचं स्वप्न पडायला लागतं
प्रत्येक क्षण त्याच्याच विश्वात
मन नकळत हरवायला लागतं
त्याच्या नुसत्या दिसण्यान
मन वेड व्हायला लागतं
त्याची भेट होता क्षणी
उंच नभात उडायला लागतं
त्याच्या थोडाश्या दुराव्यान
मन व्याकूळ होऊ लागतं
भेटल्यावरही भेटीसाठी
प्रत्येक क्षण झुरू लागतं
नाही राहू शकत त्याच्याशिवाय
मनास सारखं जाणवू लागतं
त्याच्या विरहाच्या क्षणी
मन बेचैन होऊन जातं
अन येतो तो मधुर क्षण
जेव्हा मनास कळून जातं
हे फक्त प्रेम आहे
हृदय बरोबर ओळखून घेतं ....
- संग्रहित 

तुला आवडणारा पावसाळा आता जवळ आलाय ...

तुला आवडणारा पावसाळा आता जवळ आलाय ...
पण तू ... तू मात्र दूर गेलीस ...
गेल्या वर्षी कोरडी ठेवलेली छत्री,
यंदा भिजवावी लागणारं ...
आणि गंमत म्हणजे ती छत्री आता मिच सांभाळणार ...
.......... ..........!
आठवतय ?...
आठवतय तू छत्री पकडायचीस ...
आणि मी .. मी तूला पकडायचो अगदी घट्ट !...
त्या इवल्या छत्रीचही
झूकतं माप तू मलाचं द्यायचीस ...
आणि स्वतः मात्र भिजत चालायचीस ..
त्या पावसाही तुझ्यावर तेवढंच प्रेम
जणू तुझ्यासाठीच तो यायचा
भिजलेल्या कमरेवर हात गेला की
त्या ढगांच नुसता गडगडाट व्हायचा !...
.......... ............!
गेल्या वर्षी पाऊस गेला
आणि पाठोपाठ तुही गेलीस ......
आता आलिच आहेस पण तो येण्या आधीच निघालिस !...
तुला जायचय तर जा मी नाही म्हणत थांब ...
पण त्या पावसाला काय उत्तर देऊ ते तरी सांग ...
घाबरू नकोस
तू मला फसवलसं हे मी त्याला नाही सांगणार
पण या डोळ्यातला पाऊस
तो कोसळल्या शिवाय कसा थांबणारं !.....
यंदाच्या पावसाळ्यात...
छत्री असली तरी नसली तरी ,
मला मात्र भिजावच लागणारं
मला मात्र ... भिजावचं लागणारं ......!!
................ ............!
पावसाळा जवळ आला की तुझ्या आठवणी
अगदी सरींसारख्या कोसळू लागतात ...
मग ह्र्दयाचे काही ठोके हरवून बसतो मी
आणि मनात विरहाचे ढग आदळू लागतात !.....
काळजात कुठेतरी खोलवर ...
आठवणींचं एक तळं साचत ...
आणि दगड झालेलं काळीज
पुन्हा पाझरू लागत !.....
कोसळणाऱ्या पावसात डोळ्यांना
आधार असतो ...
डोळे का ओले अशा प्रश्नाचां भडीमार नसतो !...
कोसळणा-या पावसात अश्रू लपवता येतात
कोण म्हणतो काळजाला ..
कधी कधी ढंगानाही वेदना होतात .....!
......... .........!

ओल्या पायांनी जखमा तुडवत,
मग निघून जातो पाऊस...
मी म्हणतो थांब ना रे इतक्यात नकोना जाऊस ....
पण तोही तुझ्यसारखाचं !....
माझं कुठे ऍकतोय ...
आजही त्या वळणावरं
प्रत्येक छत्रीखाली तो तुलाच शोधतोय ...

आता दर वर्षी चार महिने
तो तुझी वाट पाहतो..
आणि बारा महिने ....
बारा महिने माझ्या डोळ्यातून वाहतो !..........
- अनामिक 

मित्र मोठे होऊ लागलेत

मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
कामाच्या SMS शिवाय,
एकही विनोदी SMS येत नाही.
मित्रांच्या Callसाठी आता,
मिटींगही मोडता येत नाही.
बहुतेक कामाचा व्यापच आता,
सर्व जागा व्यापायला लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
फालतू विनोदावरही हसण्याची
सवय आता मोडायला लागलीय.
चेष्टेने केलेली चेष्टाही आजकाल,
भुरटेगिरी वाटायला लागलीय.
आणि वाटतय की आता,
धिंगाणाही कमी होऊ लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
पुर्वी वेळ सर्वांसाठी असायचा,
आता स्वता साठीच वेळ वाढायला लागलाय.
पझेशनचा वेळ येईल तसा,
रूम मधला कालवा दडायला लागलाय.
ट्रिपचा रविवार आता,
नविन जोडीदार पाहण्यात जाऊ लागलाय.
मित्र मोठे होऊ
लागलेत,आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय
मान्य आहे स्वतासाठीही,
जीवन जगायचं असतं,
मग त्यासाठी कुणाला,
खरच का दुखवायचं असतं?n
पण हे मात्र खरं आहे की,
मित्राबरोबर मैत्रीचा अभिमानही वाढु
लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
- अनामिक 

अनामिका - मुलींच्या नावावर कविता

कवितेला मी माध्यम बनवून
एकच अर्चना माझी जाणून
कोणासमोर आणू दर्शना
प्रकट करतोय माझी भावना.

प्रेरणा कुठे दिसत नाही
स्वप्नासाठी जगतोय
मीच माझी प्रतिमा पाहून
जगी स्नेहाची ओळख देतोय

रेशमाचे जुने नाते
अभिलाषा मनात आणते
आठवून ती निवेदिता
प्रचिती रसिका येते

प्रीतिने मज फूल द्यावे
तृप्तीने नयनात झुलावे
कोमल सरोज सुन्दर असुनही
प्रजक्ताला जवळ घ्यावे

कल्पना कल्पिता मानसी
चांदण्यात कृतिका हसली
संगीताशी इतकं नातं जुळलं
की सीमा सोडावी लागली

विणाने वेडं केलं
मैफिलीत शोभा आली
मग मेघाने घोळ घातला
आणि रुचा निघून गेली

श्रद्धा आलो घेउन
ओढ़ लागली भक्तीची
मनात माझ्या पूजा ठेवून
वाट पाहिली आरतीची

अमृताचा शोध घेतांना
संजीवनी जीवनी आली
समृद्धीच्या नादात
शांती विसरावी लागली

आधी विद्या मग किर्ती
निशानंतर उषा जाशी
आधी माया मग मोहिनी
छायानंतर ज्योति जशी..... छायानंतर ज्योति जशी...
- कवी - अनामिक

कशी झोकात चालली...

कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर

फेसाळ दर्याचं पाणी खारं
पिसाट पिऊनी तुफान वारं
ऊरात हिरव्या भरलं हो सारं
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर

टाकून टाकशील किती रं जाळी
मेघाची सावली कुणाला घावली
वार्‍यानं अजुनी पाठ नाही शिवली
वाटेला बांग दिली हिच्या समोर

केसांची खुणगाठ चाचपून पाहिली
फुलांची वेणी नखर्‍यानं माळली
कुणाला ठावं रं कुणावर भाळली
प्रीतिचा चोर तिचा राजाहून थोर
-अनामिक 

जेव्हा मी

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो चंद्र आठवतो .
उगाच चांदण्यांच्या गराड्यात एकटा भासतो ,
एकटा असूनही प्रकाश मात्र देतच राहतो .
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो समुद्र आठवतो ,
खारट असूनही किती जीव सांभाळतो ,
लोक म्हणतात भरती आली ,
पण का कुणास ठाऊक मला मात्र
तो किनाऱ्याला भेटल्याचा भास होतो .
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो अथांग वाटेवरचा वाटसरू दिसतो ,
लोक म्हणतात तो दूर जातोय ,
पण मला मात्र तो इच्छित ध्येयाच्या जवळ भासतो.
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
भूतकाळात कुठेतरी मी हरवून जातो ,
तू म्हणतेस मी मुमताज नाही तुझी ,
पण का कुणास ठाऊक,
मी मात्र शहाजानच असल्याचा भास होतो ….
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ………
-अनामिक 

नाती ही अशीच असतात

कधी रुसतात कधी हसतात
तरी सर्वांच्या मनी वसतात
नाती ही अशीच असतात... ♥♥
.
कुठे जुळतात कुठे दुरावतात
ईथे मिळतात तिथे हरवतात
नाती ही अशीच असतात... ♥♥
.
काही फ़ुलतात काही कोमेजतात
आठवणी देतात विसरुन जातात
नाती ही अशीच असतात... ♥♥
.
वर्षानू वर्षाची अनोळखी वाटतात
काही क्षणात आपलीसीहोतात
नाती ही अशीच असतात.. ♥♥
 
- अनामिक

"आम्ही आमुच्या मनाचे राजे"



हसेल कुणी
रुसेल कुणी
कुणी गायील
आमचे गोडवे
आम्हा कुणा
काय त्याचे
आम्ही आमुच्या
मनाचे राजे.......
स्वप्नात रंगतो
मस्तीत दंगतो
कुणा न आम्ही
उगाच हिणवतो
कुणास मात्र
काय वाटते
आम्हास सुतक
काय त्याचे
आम्ही आमच्या
मनाचे राजे.......
वाटते पावसात
बेधुंद भिजावे
कुणाच्या गलवरील
थेंब टिपावे
डोळ्यात तिच्या
क्षणभर हरवावे
पण त्यांच्या नजरेच्या
तिराने घायळचे मरण
आम्ही मरतो
कुणाला मात्र
काय त्याचे
जो तो त्यांच्या
मनाचे राजे
जसे आम्ही
आमच्या मनाचे राजे........

-अनामिक

" माफ कर देवा ………. "




तूच दिली हि सुंदर धरणी , अमुल्य अक्षय ठेवा

कसे करंटे आम्ही निपजलो , दोष तुझा ना देवा

सागर जंगल नदी नी नाले , जे जे होते छान

विकास करुया म्हणता म्हणता, केले आम्ही घाण

तुझ्याच सुंदर आकाशात , आमचा काळा धूर

हद्दपारही पक्षी झाले , गेले मंजुळ सूर

उधळत लाखो गाडी फिरते, अडकून पडती श्वास

माथेफिरू हा मानव झाला, त्याचमुळे हा त्रास

प्लास्टिकचे तर पर्वत झाले , हीच खूण नाशाची

विनाशरूपी जुगलबंदी ही , ढोल आणि ताशाची

ओरबडूनी घेता घेता , आलेच संकट माथी

बेफिकीर जर असे राहिलो , उरेल शून्यच हाती

आम्हास भवली आमची वृत्ती, देवा करशील माफ ?

की उघडोनी तिसरा डोळा , करशील पृथ्वी साफ ?
 
-अनामिक 

आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे

आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे
 
म्हणजेच प्रेम नसते..
 
रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
 
म्हणजेच प्रेम नसते...
 
तर आपल्या आयुष्यात
 
कोणी तरी अशी व्यक्ती असणे
 
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे
 
कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..
 
त्यांचे मन किती हि दुखावलेत...
 
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत.....
 
ते केवळ " तुमचेच होते.. तुमचेच आहेत.... आणि तुमचेच राहतील.... "
 
हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल
 
वाटतो तेच आहेत तुमचे " खरे सोबती "
 
हेच खरे प्रेम आहे.

- अनामिक 

तुझासंग प्रीतीची पाऊले

गुणदोष ठेवा सावरुनी
द्या प्रेमभाव बहरूनी
सरते आयुष्य शेवटी
राही मनी प्रीत उरूनी ..
तुझासंग प्रीतीची पाऊले
सांग ना मज वेड का लावले ….

काटेरी आठवण तरी
मनी सदैव ती परी
एकटा जीव हुंडाळी
नेत्री काळोख जरी ....

रवि नयनात मावळे
सांग ना मज वेड का लावले ….

मनी कळीही फुलली
तिथ रात दिन डुलली
वाट काढली त्यातुनि
जरी होती काट्यातुनि ……

तिथ प्रेमफुल फुलले
सांग ना मज वेड का लावले ….

किती तुझे बहाणे
माझ्या प्रीतीचे तराणे
गुलाबही लागला कराया
गुलाबी ओठाचे गाऱ्हाणे …

त्यालाही बेरंगी वाटले
सांग ना मज वेड का लावले ….

मज वेड का लावले ….
तुझासंग प्रीतीची पाऊले

-अनामिक 

मैत्रीतले प्रेम....की प्रेमातली मैत्री


मैत्रीतले प्रेम....की प्रेमातली मैत्री

कधी न संपणारी
फक्त मैत्रीच असत्ते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
कधीच न संपणारे

मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन फसवा असतो
मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
प्रेम कीतीही नाजूक पण टूटतेच कधीतरी

प्रेम ह्याने केले प्रेम त्याने केले
प्रेम करणारा एकटाच असतो ना
मैत्री मी केली का त्याने केली
मैत्री तिधेही निभावतात....

मैत्रीनेच प्रेमाला सुरूवात होते
ऐकल होते पण खरच आहे की..
माझ्या मैत्रीत प्रेम आहे...
पण माझ्या प्रेमात मैत्री कधीच नसणार...
फक्त प्रेम आणि फक्त प्रेमच असेल..

तुम्हाला कोणते प्रेम आवडते...
प्रेमात मैत्री असते मैत्रीनंतर प्रेम असते
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की प्रेमापेक्षा जास्त मैत्री?
मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?

-अनामिक

अश्रू..

तुला नको असला तरी
मला शेवटचं भेटायचं आहे

तू कधीच न दिसण्याच्या
आधी डोळे भरून पहायचा आहे

ठरवलं आहे दोघांनीही कि भेटल्यावर
डोळ्यांत आणायचं नाही पाणी

पण माहिती आहे भेटल्यावर
अश्रुन्शिवाय बोलणार नाही कुणी

खूप काही बोलायचा आहे
खूप काही सांगायचं आहे

मनात साठवलेल्या शब्दांना
ओठावर आणायचं आहे

तुझा शेवटचा चित्र
मनात रंगवायचा आहे

हा चेहरा परत दिसणार नाही
म्हणून मनाला समजवायचा आहे

जाता जाता फक्त
माझी एवढीच अपेक्षा आहे

एकदा मिठीत घेऊन तुला
अश्रूंमध्ये चिंब भिजायचा आहे...

- अनामिक 

एक गरीब माणूस

एकदा एक गरीब माणूस थकून

उशीरा घरी येतो. आई नसलेले त्याचा ५

वर्षाचा मुलगा त्याची दारात वाटचं पाहत

असतो...

मुलगा - बाबा तुम्हाला एका तासाचे

किती मिळतात हो?

बाबा - त्याचं तुला काय करायचंय.

मुलगा - सांगा ना बाबा ...

बाबा - २० रुपये

मुलगा.- मला १० रु हवेयत !

बाबा - चल जा झोप गपचुप...

मुलगा कोमेजुन गपचूप वाकळ अंथरतो..

आणी उशी खाली डोक... टाकतो. .

बाबांचा राग शांत होतो ते मुलाकडे जातात

आणी, "बाळा हे घे तुझे १० रु"

मुलगा ते पैसे घेतो आणी त्याच्या उशीत

लपवलेली काही चिल्लर काढून मोजतो

मुलगा - बाबा माझ्या जवळ २० रु... आहेत

मला तुमचा एक तास विकत

घ्यायचाय, उद्या मला तुमच्या सोबत

जेवण करायचंय, उद्या लवकर याल

ना...!!!!!..
 
- अनामिक 
 

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो....

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो चंद्र आठवतो . 
उगाच चांदण्यांच्या गराड्यात एकटा भासतो ,
एकटा असूनही प्रकाश मात्र देतच राहतो . 

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो समुद्र आठवतो ,
खारट असूनही किती जीव सांभाळतो ,
लोक म्हणतात भरती आली ,
पण का कुणास ठाऊक मला मात्र तो किनाऱ्याला भेटल्याचा भास होतो .

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो अथांग वाटेवरचा वाटसरू दिसतो ,
लोक म्हणतात तो दूर जातोय ,
पण मला मात्र तो इच्छित ध्येयाच्या जवळ भासतो.

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
भूतकाळात कुठेतरी मी हरवून जातो ,
तू म्हणतेस मी मुमताज नाही तुझी ,
पण का कुणास ठाऊक,
मी मात्र शहाजानच असल्याचा भास होतो ….

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ………
-अनामिक 

तुझी मैत्रि आहे म्हणुनच...

तुझी मैत्रि आहे म्हणुनच
जगण्याची जिद्द आहे
तुझ्या मैत्रितुन बाहेर पडले तर
लगेचच मरणाची हद्द आहे

तुझी मैत्रि आहे म्हणुनच
आयुष्याचा हा प्रवास आहे
तुझ्या मैत्रिशिवाय
जगण्याचा नुसताच भास आहे

तुझी मैत्रि आहे
म्हणुनच तुझ्यासमोर दोन अश्रू ढाळू शकते
वेड्या या जगात
जगण्याच्या मर्यादा मी पाळू शकते

तुझी मैत्रि आहे....
माझ्यासाठी काळोखातही मिणमिणता दिवा
जग जळतं माझ्यावर
कारण माझ्याकडं आहे तुझ्या मैत्रिचा ठेवा...!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

-अनामिक 

पावसाला हि वाटलं

पावसाला हि वाटलं 
आज थोडसं भिजावं, 
प्रेम ते धरणीचे एवढं 
का खोलवर रुजावं?

वाटेला हि वाटलं 
वाटेवर गं थांबावं
तुझं येणं तरी ते
का एवढं लांबाव ?

सागराला वाटलं
थोडसं व्हाव शांत
का नदीने हि त्या
पाहावा एवढा अंत ?

वाऱ्याला वाटलं
श्वास घ्यावा थोडा
कुठल्या भावनेचा
असेल एवढा ओढा?

क्षितिजाला वाटलं
थोडंस ठेंगण व्हावं
कश्याला आभाळाने
एवढ्या खाली जावं?

शब्दांना वाटलं सये
आज निशब्द व्हावं
तेव्हाच का आपले
मग प्रारब्ध लिहावं ?

-अनामिक 

अजूनही तू हवीशी वाटतेस


का अजूनही तू हवीशी वाटतेस 
" एवढं " सारं झाल्या नंतरही .....

तुझे हात पहिले की ,
कधीकाळी झालेल्या स्पर्शांची आठवण होते 
तुझ्या अशा कितीतरी गोष्टींशी निगडीत 
अगणित गोष्ट आतःवत राहतात 

तुझं नि माझं झालेलं शेवटचं भांडण 
शेवटचे माझ्याशी बोललेले शब्द ,शेवटचा तो राग
आणि मग पुढे,मी लपवलेले
सुक्या पापण्यान्मागचे ओले अश्रू 
अन हसऱ्या खळीमागाची कडवट दुःख ....

वाटायचं की तुझेही डोळे भरून आले असतील 
कदाचित तुही गुडघ्यांत मान खाली घालून 
रात्रभर बसली असशील 
झोपेची वाट बघत, 
मी बोलल्याचे भास होऊन सुखावली असशील..तुही. ..कदाचित....

कोणास ठाऊक कदाचित सुटकाही मिळाली असेल तुला 
माझ्यापासून ...माझ्या स्वभावापासून ....

आता बरेच महिने लोटले
आता बऱ्यापैकी पुसलं गेलय दुःख 
शेवटी काळ हे जालीम औषध असतं 
" असल्या " जखमांवर ...
किंवा नसेलही कदाचित .....

का अजूनही तू हवीशी वाटतेस 
" एवढं " सारं झाल्या नंतरही .....

-अनामिक 

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ………

जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो चंद्र आठवतो .
उगाच चांदण्यांच्या गराड्यात एकटा भासतो ,
एकटा असूनही प्रकाश मात्र देतच राहतो .
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो समुद्र आठवतो ,
खारट असूनही किती जीव सांभाळतो ,
लोक म्हणतात भरती आली ,
पण का कुणास ठाऊक मला मात्र
तो किनाऱ्याला भेटल्याचा भास होतो .
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
मला तो अथांग वाटेवरचा वाटसरू दिसतो ,
लोक म्हणतात तो दूर जातोय ,
पण मला मात्र तो इच्छित ध्येयाच्या जवळ भासतो.
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,
भूतकाळात कुठेतरी मी हरवून जातो ,
तू म्हणतेस मी मुमताज नाही तुझी ,
पण का कुणास ठाऊक,
मी मात्र शहाजानच असल्याचा भास होतो ….
जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ………

खुप दिवसांनी ती दिसली...........!



आज..........
आज खुप दिवसांनी
ती दिसली,
तिला बघुन असे वाटले
जसे ती माझ्याशी
जन्‍मभरासाठीच रुसली.

जनु गुलाब या फुलाचे
प्रेमींसाठी महत्‍वच मेले,
जेव्‍हा तीने माझ्याकडे बघुन
न बघीतल्‍या सारखे केले.

मित्रानसमोर चेह-यावर
खोटे हासु आनुण हसत राहीलो,
ती बघेन या आशेने
मागुण तीच्‍याचकडे बघत राहीलो.

शेवटी ती नजरेआड झाली
मन दुखावल आणि निराश झालो,
ओल्‍या पापन्‍या घेऊन
घाई-घाईने घरी आलो.

स्‍लॅमबुक मधुन तिचा
जुना नंबर शोधला,
बंद असतांनाही
मुद्दाम फिरवला.

"नंबर मोजुद नही हे"
अस उत्‍तर मिळत होत,
उत्‍तर एकतांना मात्र
माझ हृदय रळत होत.

तीला भेटण्‍याची प्रत्‍येक
आशाच मेली,
नंतर मग नशिबालाच
दोष दीली, कि

आपल्‍याच जिवनात का
असे प्रसंग घडतात,
आपण त्‍यांच्‍यावर कितीही
जिऊ ओतला तरी, का
अस एकट्या अर्ध्‍यावर सोडुन जातात.

मन विचार करत असत
उत्‍तर मात्र का सापडत नाही,
कूठल्‍याही ख-या प्रेम करणा-याला
त्‍याच मनासारख प्रेम का मिळत नाही.
कुठल्‍याही ख-या प्रेम करणा-याला
त्‍याच मनासारख प्रेम का मिळत नाही.

-अनामिक 

काल लग्न झालेली माझी मैत्रीण मला भेटली..

काल लग्न झालेली माझी मैत्रीण मला भेटली,
सवाशनीच्या लेण्यामद्धे अजूनच सुंदर वाटली...!
नजरा-नजर होताच ती 'पुन्हा' एकदा लाजली,
आमच्या पहिल्या भेटीची आठवण, ताजी करून गेली...!
"कशी आहेस?" विचारताच, नेहमीचेच उत्तर मिळाले,
पण चेह~यावर, कुणास ठाऊक, तिने उगाच, उसने हसू आणले...!
दोघा सौमित्रांच्या गप्पा-गोष्टी अशा काही रंगल्या,
चेह~यावर हास्य आले...डोळ्यांच्या कडा मात्र पाणावल्या...!
'व्यक्त न केलेल्या भावना सांगाव्या', अशी कल्पना मनात आली,
पण माझी नजर पुन्हा एकदा तिच्या कुंकवाकडे गेली...!
असेच काहीतरी, तिच्या मनालासुद्धा वाटले,
पण कदाचित सप्तपदींच्या वचनांनी तिला रोखले...!
शेवटपर्यंत दोघेही, मनातले ओठांवर आणू नाही शकले,
साता जन्माच्या नात्यापुढे प्रेम हे, पुन्हा एकदा झुकले...!
 
कवी - माहित नाही

दुखः एका प्रेयसीचे ....

कुणीतरी विचारले तिला..., " तो " कुठे आहे....??

हसत उत्तर दिले तिने ....

माझ्या श्वासात...,

माझ्या हृदयात...,

माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात तो आणि फक्त
तोच आहे....

यावर पुन्हा विचारले गेले मग..., " तो " कुठे
नाही......??

तिच्या ओल्या डोळ्यांनीच तिचे उत्तर दिले...
.
.
.
.
.
" माझ्या नशिबात ... आणि माझ्या आयुष्यात....



-अनामिक 

एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने

एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने
दुस-याला विचारले......

'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन
बाहेर,

दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा
आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत
आपल्याला,
किनारा ही नाही साधा या
पापण्याला............

दुस-यालाही मग जरा प्रश्न
पडला,
खुप विचार करून तो बोलला,

रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,

सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच
महत्व,

आपल्याला नाही कोणी थांबवु
शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,

उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील
स्पंदनांचा ,

म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुळेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........

ऐकून ही अश्रुंची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले
पाणी...
 
 
 
-अनामिक