"प्रश्न"



कुठेच उत्तर मिळत नाही म्हणून
एक प्रश्नाने आत्महत्या केली
सर्व प्रश्न एकत्र आले आणि
एकान मडके आणले
एकानं सरणाची तयारी केली
सरणाला अग्नी देऊन.............
निश्वास टाकत एक प्रश्न म्हणला..
"चला एक तरी प्रश्न मीटला!

कारण तो मोठा झालाय ना....


..
..

त्याला जन्म देताना तिला वेदना असह्य झाल्या होत्या ....
वेदनेन कळवळून तीन किंकालीच फोडली ....
पण क्षणात तान्हुल्याचा चेहरा पाहून आनंदान देहभानच हरपून गेली ...

त्याच्या मुखातून जेव्हा पहिल्यांदा आई शब्द आला तेव्हा ती कौतुकान ऐकतच राहिली ....
जीभ अडखळत त्याच बोबड बोलन ती सार्यांना ऐकवायची ...

त्यान पहिल्यांदा पाऊल उचललं तो क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा ...
ती पाहतच राहिली ...

तो चिमुकला शाळेतून घरी परतण्याची वेळ झाली कि तिची नजर दरवाजाकडे जायची ...
अन तो आला कि माझ लेकरू आल म्हणून कवटाळायची ......

तीन पतीला सांगितला हवे तर माझे दागिने मोडा...एकवेळ जेवू ...
पण माझ लेकरू चांगल शिकलं पाहिजे ....
आपल्याला कष्ट पडले तरी चालतील ....
आपली फरपट झाली तरी चालेल
पण त्याच्या नशिबात कष्ट नकोत ..त्याची फरपट नको ...


जन्मल्यापासून तीन त्याची काळजी घेतली ..खूप सोसल ....
लहानाचा मोठा केला ...काळजाचा तुकडा म्हणून खूप जपल ...
आता तो मोठा झालाय....
कमाऊ लागलाय...स्वताचे निर्णय स्वत घेवू लागलाय ....
आज त्यान आईला वृद्धाश्रमात ठेवण्याचा एक निर्णय घेतलाय अन आईला ऐकवलाय...
त्याचा निर्णय ऐकून आज तिला पुन्हा असह्य वेदना झाल्या
पण किंकाळी नाही फोडता आली ..
.कारण तो मोठा झालाय ना....

आता त्याने तिला शाळेत टाकलंय...वृद्धांच्या शाळेत ...वृद्धाश्रमात ...
आताहि ती वाट पाहते त्याच्या येण्याची ...पण खिडकीच्या पलीकड्च काही काही दिसत नाही ...

आता तिच्याही तोंडून आई शब्द बाहेर पडतो ..पण पाठीत चमक उठल्यानंतर ...
ऐकायला कोणीच नसत ......कारण तो मोठा झालाय ...

ती पण पाऊल उचलते पुढे टाकण्यासाठी ...
गुढघ्याना भार सहन होत नाही ..कोलमडते ...पण काठीच्या आधारान पुन्हा उभी राहते ..
सावरते स्वताला ...
समजावते ....
येईल माझ लेकरू नक्कीच मला नेण्यासाठी ...
नाही आला तरी चालेल कारण तो आता मोठा झालाय ...त्याचा संसार मोठा झालाय ...

"एक चित्र"


(एवढ्यात एक चित्र माझ्या पाहण्यात आलं, त्याला कसला तरी पुरस्कार मिळाला होता. त्यामधे भर उन्हामधे एक छोटं बाळ निपचित पडलं आहे, मृत्युच्या दाराशी जणू. दुष्काळी उन्हाळ्याचा तो एक बळी असावा. आणि एक गिधाड दुरुन त्या मुलाकडे बघत आहे, त्याच्या मरणाची वाट बघत. ते बघून एक विचार आला मनात, तो खाली मांडलाय)


ऊन हसतंय, बेभान हसतंय
एवढं की जमिनीच्या डोळ्यातही पाणी नाही

कुठे आमरस, तर कुठे आईसक्रीम
कुणाकडे मात्र चतकोर भाकरही नाही

कुठे एसी ची थंड झुळुक , फ़्रीजचे गारगार पाणी
मृत्युच येथे कूलर, साधी जगायचीही सोय नाही

फ़िरंगी मंडळीना याचेच मोठे कौतुक
काय समजावं, ही गरिबी एवढी सुंदरही नाही
मोठमोठे पुरस्कार त्या फ़ोटोना लाभतात
जल्लोश करायला येथे स्मशानाचेही भाग्य नाही...

कविता लिहाविशी वाटतच नाही...



आता कविता लिहाविशी वाटतच नाही...
खर प्रेम शब्दात मावतच नाही..
भारंभार प्रेम कविता करूनही..
लोकाना प्रेम समजतच नाही...

आता कविता लिहाविशी वाटतच नाही...
सभोवतीच दू:ख शब्दात उतरतच नाही...
कितीही खोल शब्द असला तरी..
कुणाच्या काळजात दुखतच नाही..

आता कविता लिहाविशी वाटतच नाही...
कवितांच जंगल...आणि शब्दांच्या गर्दी..
ह्यात नेमकेपणाच नेमका सापडत नाही...
कवीला काय सांगायचय ते शेवटपर्यंत कळतच नाही...

म्हणून,
आता कविता लिहाविशी वाटतच नाही....

"दूर दूर त्या वळनावरती..."



दूर दूर त्या वळनावरती
भेट आपुली घडली होती
बघता बघता दोघांचीही
ह्रदय जणू धडधडली होती

ह्रदय अशी धडधडली जेव्हा
डोळ्यांचे जाहले इशारे
तुझी पापनी अलगद उठता
तीर मनाला भिडले सारे

तीर मनाला भिडतान्नाही
गंध तयाचा दरवळला
हलके हलके श्वासही माझा
गंधासोबत विरघलला

विरघलताना श्वास म्हणाला
सांग माझी तू होशील का?
चिंब भिजुनी पावसात या
मिठीत मजला घेशील का?

मिठीत मजला घेशील जेव्हा
धरणीला या सूर मिळे
भेट आपुली पाहून राणी
मंद मंद पाउस जले

मंद मंद पाउस जले हा
झुरू लागली ही धरती
प्रीतिचा गुलमोहर फुलला
दूर दूर...त्या वळनावरती......

आपलं नात

आपलं नात
राहिल का असच ते निरंतर
जसं आज आहे,

आपलं नात
जपशील का असच तू,
जसं आज जपतोयस?

आपलं नात
आहे का तुझ्यासाठी पण
तितकच मोलाच
जितक ते माझ्यासाठी आहे?

आपलं नात
विश्वास, प्रेम, ओढ़ ,
यानी गुंफलेलं
जपशील का त्यांचा उबदारपणा ?
जन्मभर, आयुष्यभर, निरंतर...........???

*** हळवं अनामिक नातं ***

*** हळवं अनामिक नातं ***
नाती अनेक प्रकारची असतात
पण एखादं नातं असं असतं
ज्याला नाही बांधता येत शब्दात
नाही अडकवता येत कुठल्याच बंधनात

ते असतं स्वैर ............ .
फ़क्त ह्रुदयाचं ह्रुदयाशी असलेलं नातं !!!
त्याचं गहिरेपण नाही कोणी समजू शकत
ते केवळ त्या दोन वेड्या जीवांनाच माहित असतं
अगदी जगावेगळं ............
कदाचित समाजाच्या रूढींमधे न बसणारं
तरीही अगदी हवंहवंसं ... खूपच खास
ज्या नात्याला नाही देता येत काही नाव .........

एक असं नातं .........
जसं कोणीतरी अंतर्मनात घर करून रहावं
जसं उदास असताना येऊन कोणीतरी हसवावं

एक असं नातं ........
जणू अंधाऱ्या वाटेवर दिसावा प्रकाशाचा किरण
जणू बेरंगी जीवनात उधळावे कोणी हजारो रंग

असं एक सुंदर, हळवं अनामिक नातं .......

रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त

रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त

सकाळ पासून वाट पाहणारा डब्बा केला मी फस्त
रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त
ओले होतात डोळे, जांभळ्या देऊन देऊन
घ्यावी एक डुलकी तर साहेब बघतो दुनकून

ऑफिस मधली दुपार, बंद पाडते नैसर्गिक घड्याळ
डोळे उघडून प्रभावी, होतात मानसिक हाल
डुबवून काढला चेहरा, पण झोप उडत नाही
काय करावे दुपारचे काहीच सुचत नाही

मी खुर्ची मध्ये, आणि वेळ पुढे-पुढे सरकत जाते
वेळेची गती, आणि माझी बुद्धिमत्ती संत होत जाते
अखंड काळाचे असतात एक ते तीन चे दोन तास
आणि मग कटिंग मारून संपतो दुपारचा वनवास








सुख दु:ख.........

आयुष्य हे असच असतं,
कधी फुंकर तर कधी वादळ असतं.

कधी सुखाची शाल ओढून,
दु:ख दबकत येत
तर कधी दु:खाचे काटे लावून,
सुख धावत येत.


सुखाचा उपभोग घेताना,
दु:ख कधी आलं हे कळत नाही
अन दु:खाचे काटे टोचत असताना,
सुखाची वाट साहवत नाही.


सुख नेहमी पाहुणा बनून येत,
दोन दिवस राहून लगेच निघून जातं
दु:ख मात्र कायमचा पाहुणा बनून येत,
अन हृदयाला चरे पाडून जातं.


पण आयुष्यात दोन्हीच महत्व तितकच आहे,
एक पोळणार उन तर दुसरी गडद सावली आहे.........

*तिच्या सहवासात दिवस*.......

*तिच्या सहवासात दिवस*.......

खुप आनंदात गेले
आज तिच्या आठवणीने
डोळे भरून आले

रडून रडून डोळ्यातल पानी
कधीच आटल होत
कोमल हृदयातुन
रडन... थांबतच न्हवत

आठवतय सगळ....मला .
तीच बोलन
गोड हसन
मधेच रागवन आणि
कारे अस वागतोस करत जवळ घेण

नको ना सोडुन जाऊ करत
खुप खुप रडन
आणि
गोड आयुष्याची स्वप्न रंगवत
हळूच निरोप घेण

नीरोप घेता घेता
आज खुप दूर गेलीस
दुखान माझ आज
भरल होत कालिज

न्हवत लागत माझ
आज कुठच मन
अर्पण केल होत
सार तन, मन धन
पण काय करू
सखे आडवे आले
मला "जन"
आज ही कोणताच
गोड नाही लागत सन
.....फक्त येते तुझ्या
सहवासाची आठवण


स्पर्शाने तुझ्या जीवन बदलून गेल

स्पर्शाने तुझ्या जीवन बदलून गेल
होत नव्हत ते सार तुझ झाल
तुझ रूप हे माझ्या मानत भरल
पाहता पाहता तुला माझ मन तुझ्या प्रेमात पडल

आठवन ही येते तुझी क्षणों क्षणी
तू राहतेस घर करुनी माझ्या मनी
रूप ही सुंदर मन ही सुंदर
तुझ्या पुढे शमतो हा सागर

रात्रण दिवस तुझीच आठवण
तुलाच पाहतो माझे हे मन
स्वप्नात ही तूच राहते
तुझ्याच साठी आहे माझा प्रत्येक क्षण

माझ्यावर केलेली कविता

Inline image 1

माझ्यावर केलेली कविता

ही कविता मी तुझ्यासाठी मी बनवली आहे ........................

कधी कधी विचारत होतीस " कसा आहेस " तू मला
बोलताना तुझ्याशी विसरायचो मी स्वतःला,

तुझा शब्द न शब्द भिडत असे मनाला,
तुझ्याइतके कोणीच नव्हते समजून घेत मला,

तुझ्याशी बोलण्यासाठी करीत असे मी नवीन बहाणे
काहीतरी सांगणे होते डोळ्यातून नव्हते ग नुसतेच पाहणे,

मन लागत नव्हते माझे कुठेच तुझ्याविना
तुला मी सांगण्याचा केला प्रयत्न तुला काही उमजेना,

किती सुखद वाटते जेव्हा असते आपले कोणीतरी ,
तुझ्या वागण्यातून सांग न मला कधीतरी,

"तू मला आवडतेस " हे शब्द आले होते माझ्या ओठामधे
पण... तू काय बोलशील या भीतीने ठेवले मी मनामध्ये,

खरच मी आवडतो का तुला विचार स्वतःला
कधीतरी समजून म्हणशील ना "तू माझा" मला.....?

तू बरोबर असतोस तेव्हा,




Inline image 1
तू बरोबर असतोस तेव्हा,

खूप खूप बोलावसं वाटत,

नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत...



तू बरोबर असतोस तेव्हा,


फक्त तुलाच पाहावस वाटत,


नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत...




तू बरोबर असतोस तेव्हा

,
तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत,


नाहीतर खिडकीतूनच, पडता पाऊस पाहावस वाटत...





तू बरोबर असतोस तेव्हा,


फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,


नाहीतर फक्त तुलाच आठवावस वाटत...

एक पाखरू मनातलं



एक पाखरू मनातलं,

कायम स्वप्नात रमणार,

वास्तवाशी बिनघोरपणे झगडणार,


एक पाखरू मनातलं,

मायेच्या कुशीत अलगद शिरणार,

मोठ होऊन समजुतदारपणे थोपटणार,


एक पाखरू मनातलं,

आवडतं गाण हळुवार गुनगुनणार,

स्वतःच अस्तित्व ताकदीने शोधणार ,


एक पाखरू मनातलं,

आपल्या माणसाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल,

तितक्याच तन्मयतेने वेगळी वाट नव्याने हुडकणार,


एक पाखरू मनातलं,

वाईट अनुभवांना भेदरणार,

अन दिलखुलासपणे हसत सर्वांगाने स्वीकारणार,


एक पाखरू मनातलं,

खूप घाबरून भुरकन उडणार, 

पण "वेड" होऊन आकाशाकडे झेपावणार, 


एक पाखरू मनातलं,

माझ्या-तुझ्या सगळ्यांच्या मनातलं.

फरक कुठे पडला आहे….


फरक कुठे पडला आहे….
लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वासअजुन तोच आहे|
लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरीखायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरककुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|
तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|
लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेलानिघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|
कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचातास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनहीतोच आहे|
जवळ असा की दूर , नाती रक्ताची कीमनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|

काहीजण मैत्री कशी करतात?



उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात या गोष्टी

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल



मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती


मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती


तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती


तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती


तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.


नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.


तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती


तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती


आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.


मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती

माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी येतो मनी, हा विचार आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी ओठांवर तिच्या
नाव माझे खुले,
रोजचे परी नव्याने
मजला मी मिळे,

माझ्यातच गुंतली ती, आपसूक आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी केसांत तिच्या
अडकता मी जरासे,
शहाऱ्याचे मोरपीस
फिरविते ती जरासे,

हळुवार मऊ हात, मग केसांत आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी गालांना तिच्या
स्पर्शिता मी अचानक,
मधुघटिका रित्या किती
मोजली ना मी एक,

चिंब चिंब पावसाची, कशी बरसात आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी डोळ्यांत तिच्या
खोल खोल बुडता मी,
गूढ त्या डोहांमधून
काळजात उतरता मी,

न कळे कोण कुठे, मी आरशात आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

कधी येतो मनी, हा विचार आपोआप ...
माझ्याचसाठी का हे, लावण्य निष्पाप ...

आता पुरे कर रे, किती रडतो आहेस…

एक मुलगा आणि मुलगी यांचे एकमेकावर खूप
प्रेम होते….
पण त्या मुलीचा एका अपघातात दुख:द
मृत्यू होतो..
मुलाला ते सहन होत
नाही….तो तिच्या आठवणीत
सतत रडत असतो…
तर रडत असताना काही २०-२५
परी तिच्याच वयातल्या त्याला
दिसतात…. त्यात ती पण असते…
त्या सर्व परी कडे एक एक
पेटलेली मेणबत्ती असते
पण तिची मेणबत्ती पेटलेली नसते…
मुलगा त्याचे तिला कारण विचारतो…..
तर ती सांगते..
..
..
..
आता पुरे कर रे, किती रडतो आहेस…..
तुझ्या अश्रूमूळे ….मेणबत्ती सारखी वीझत
आहे…...........

जिजाई …!


रायगडावर गेले तेव्हा पायथ्याशी
जिजामातेचं मंदिर दिसलं
त्या मातेच्या महान कर्त्रुत्वापुढे
मस्तक आपसुकच तिच्या चरणाशी झुकलं
तिनेही मग दिला आशीर्वाद तोंडभरून ….म्हणाली…
समाजात थकलेल्या ,सदा भुकेल्या
लोकांच्या पुढयातलं
समाधानाच्या अन्नाच ताट हो
भरकटलेल्या तरुणाना मार्गावर आणेल
अशीच तू एक वाट हो…
अनाथ म्हणुन हीणवल्या गेल्यांची
बनून बघ एकदा आई
आणि त्यातूनच
स्वराज्यानंतरचं ‘सुराज्य’ साकारू शकेल
असा शिवाजी घडवणारी
तुसुद्धा हो गं जिजाई
तुसुद्धा हो गं जिजाई …!
माहिती आहे ..स्वप्न आहेत
खुप खुप मोठी …तरीही
हात घालेन तिथे
घवघवित यशच लागाव हाती
असा कही माझा हट्ट नाही
पण म्हणुन “मला कसं जमणार ??”
म्हणत हातावर हात धरून
स्वतःपुरतच सावरून बसेन
इतकीसुद्धा काही मी निगरगट्ट नाही
इतकीसुद्धा काही मी निगरगट्ट नाही …!

आजही मी तिथेच आहे…

तू जात होतीस
अजूनही तो रस्ता इथेच आहे,
त्या रस्त्यावर वाट बघणारा
आजही मी तिथेच आहे…
तुझ्या कोमल पायांचा स्पर्श
आजही या मातीला सुखावत आहे,
तुझ्या एका नजरेने सुखावणारा
आजही मी तिथेच आहे…
शाळा सुटायच्या वेळी जी घंटा
वाजते आजही ती इथेच आहे,
शाळा सुटल्यावर तुला शोधणारा
आजही मी तिथेच आहे…
संगीताच्या वर्गाला जाणारी तुझी
साउली आजही इथेच आहे,
तुला जातांना न्याहाळणारा
आजही मी तिथेच आहे…
तासनतास तुझा विचार करणारा
आजही तो इथेच आहे,
वेळ मिळाला तर एकदा बघ
आजही मी तिथेच आहे…
मरणारे तुझ्यावर लाख असतील
प्रेम करणारा तर एक आहे,
कधी एक हाक तर देऊन बघ
आजही मी तिथेच आहे…

कुणीच आपल नसतं

कुणीच आपल नसतं

मग आपण कुणासाठी असतो

आपलं हे क्षणिक समाधान

इथ प्रत्येक जण एकटा असतो



शब्दांनाहि कोड पडावं

अशीही काही माणस असतात

किती आपलं भाग्य असत

जेव्हा ती आपली असतात



अस्तित्वाची किंमत

दूर गेल्याशिवाय कळत नाही,

सगळ कळतय मला

पण तुला सोडून दुरही जाववत नाही



जिवनात काहितरी मागण्यापेक्षा

काहितरी देण्यात महत्व असत

कारण मागितलेला स्वार्थ

अन दिलेलं प्रेम असतं



कधी कधी जवळ

कुणीच नसावसं वाटतं

आपलं आपण

अगदी एकट असावसं वाटत.

मुका स्पर्श .........

खळखळणारे हास्य तुझे
मनात मी साठवून घेतो
अन अश्रू तुझ्या नकळत
मी सदैव टिपून घेतो....

गालावरची खळी तुझी
हेच माझे विश्व आहे
गुंफलेले हात आपले
हेच चिरंतन सत्य आहे.....

विरहाचा कापरा वारा
सदा मला त्रस्त करतो
बरसणाऱ्या पावसातही
तुझी आठवण घेऊन येतो....

शब्द हेच साधन असतं
एकमेकांच्या जवळ येण्याचं
मुका स्पर्शही बोलून जातो
निमित्त फक्त कोसळणाऱ्या पावसाचं...!!

एवढे एक करशील ना ?

शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?

एवढे एक करशील ना ?

शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?

"वाट पाहत आहे"



स्वप्नातून माझ्या बाहेर कधी तू येशील,
प्रत्येक्ष्यात  माझ्या समोर कधी तू दिसशील.
रात्र काढली जागुन,प्रतिक्षेत तुझ्या,
तू निश्चित येणार,वाटते मनास माझ्या.
तुझ्या भेटीची आतुरतेने,दिवस मोजत राहतो,
बेभान होवून प्रत्तेक क्षणी वाट तुझ्यी मी पाहतो.
भानात येवून कळत की तो दिवस दूर आहे,
पण वेड्या मनास कसे समजावू, तो वाट पाहत आहे. 

प्रेमाचा झुला...........


 
 

समझली तगमग आपल्या...
तू सोडून गेलीस
तर जीवन एकाकी आहे
तूच सांग मला
तुझ्याशिवाय जीवन काय बाकी आहे
तुला कसं वाटल  की
मी तुझ्यावाचून जगेन
तुझी सोबत नसताना
कशी भविष्याची स्वप्न बघेन
दुनियेला नाही समझली
तगमग आपल्या मनाची
तुला तर कल्पना होती
आपण पाहिलेल्या स्वप्नांची
तू परत मागे वळ
आयुष्य पुन्हा बहरेल
तू पुन्हा साथ दे
हे दुःख  क्षणात सरेल
शपथ आपल्या प्रेमाची
मी देत आहे तुला
ह्या मनातल्या प्रेमाचा
परत एकदा झुलव तू झुला

प्रेम हे असंच असतं

कळतं पण वळत नाही,
असतं पण मिळत नाही,
प्रेम हे असंच असतं,
जे शोधूनही सापडत नाही.

जळतं पण विझत नाही,
रडतं पण हसत नाही,
प्रेम हे असंच असतं,
कधी होतं ते दोघांनाही कळत नाही.

रुसतं पण रागावत नाही,
सरतं पण करत नाही,
प्रेम हे असंच असतं,
सावरता सावरत नाही.

नशिबानं एखाद्याला मिळत असतं,
टिकवणं ते एखाद्यालाच जमतं,
प्रेम हे असंच असतं,
शेवटी प्रेमच प्रेमाला मिळत असतं.

मी हरण्या साठी नाही जन्माला आलो...!!

मी हरण्या साठी नाही जन्माला आलो...!!
मी जरा जरासा मस्त जगुन घेतो
मी हरण्या साठी नाही जन्माला आलो
 
मी दुख पाहिले तरीही नाही खचलो
मी रडण्या साठी नाही जन्माला आलो
 
मी होतो कोठे..? नि आलो आता कोठे ..?
मी जग बघण्यासाठी जन्माला आलो
 
हे दुख किती नि सुख किती येथे मिळते ..?
ना हिशेब केले की नाही मोजीत बसलो
 
हरणे अथवा जिंकून जाणे हे गौण समजलो होतो
मी रडीचा डाव न खेळत चुकून बसलो
 
दुख कधी मी कुरवाळीत नाही बसलो
दुखाला मी दूर लोटुनी मी शांत राहिलो
 
मी भणग होऊन आलो मी अनवाणीही फिरलो
मी कंदील घेउनी फिरलो ,नि तंबू ठोकून बसलो
 
जमेल तसे मी आनंदाचे रतिब टाकीत बसलो
सूर जराशे चाल जराशी गाणे गाऊन गेलो
 
मी जरा जरासा मस्त जगुन घेतो
मी हरण्या साठी नाही जन्माला आलो

भास

घाबरत घाबरत शब्द जुळवत
त्याने तिला एकदाचे विचारलं
“प्रेम करतो तुझ्यावर, तू करशील माझ्यावर?”
तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं
मग हळूच तिनं त्याला
डोळ्यांतूनच हो म्हणलं.
ढग नाही बरसले तेंव्हा
वारा नाही सुटला तेंव्हा
मोरही नाही दिसला नाचताना
एक कावळा तेवढा ओरडला
त्याला मात्र सतारीच्या झंकाराचा भास झाला.
 
अविश्वासानं त्यानं थरथरत
तिचा हात हातात घेतला
छाती फाटेस्तोवर एक भला मोठा
मोकळा मोकळा श्वास घेतला
चंद्र नाही हसला तेंव्हा
मोगरा नाही फुलला तेंव्हा
गाणंही नाही सुचलं गुण्गुणावं म्हणताना
एक स्कूटरवाला तेवढा शीवी हासडून गेला
त्याला मात्र सनईच्या ओल्या सुरांचा भास झाला.
 
मग पुढं लग्न-बिग्न, पोरं-बिरं
संसार-बिंव्सार करून झालं
चिमणा चिमणीचं एकच पाखरू
दूर विदेशात उडून गेलं
एके दिवशी घाबरत घाबरत शब्द जुळवत
त्याने तिला एकदाचे विचारलं
“जमलं का गं मला, तुला सगळी सुखं द्यायला?”
तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं
मग हळूच तिनं त्याला
डोळ्यांतूनच हो म्हणलं.
 
समाधानानं थरथरता त्याचा हात
त्यानं तिच्या हातात ठेवला
छाती फाटेस्तोवर एक भला मोठा
मोकळा मोकळा श्वास घेतला
पाऊस नाही पडला तेंव्हा
क्षीतीज नाही रंगलं तेंव्हा
झुलाही नव्हता तिथं झुलावं म्हणताना,
पोस्ट्मन तेवढं पोराचं पत्र टाकून गेला
त्याला मात्र आयुश्यच सतार झाल्याचा भास झाला.
 

प्रॉमिस डे स्पेशल..


वचन आहे ,
कधीही तुला एकटं वाटलं
तेव्हा मी तुझ्यासाठी असेल
तुझ्या डोळ्यात पाणी दाटलं
तर मी तुझे अश्रू पुसेल वचन आहे,
तुला शब्दच सापडले नाही
तर तुझा आवाज होईल
तुझ्या विरुद्ध गेलं कुणी
तर जगाशी मी लढा देईल वचन आहे,
तू रुसलीस माझ्यावर
तरी मी रुसणार नाही
आयुष्याच्या शेवटपर्यंत
तुझी साथ सोडणार नाही...!

थोडंसं मनातलं



प्रत्येकाच्या मनात ते शल्य,
कुठे तरी ते दडलेलं असतं
डोळे लपवत मित्रांशी चर्चा करण्यात,
मन उगाच गुंतलेल असतं
पाकीटातला दडवलेला तिचा photo
बऱ्याचदा बसच ticket काढताना दिसतो
आईने विचारलंच काय आहे रे ते बाळा ...
तर college ID चा बहाणा संकट
थोपवायला पुरा असतो
समोर जाऊन बोलायला तिच्याशी
कधीच हिंमत होत नसते
मित्रामध्ये मात्र आपल्या फट्टूपणाची
जणू loudspeaker वरून जाहीर
चर्चा होत असते
अडाण्याचा गाडा सारा
इथून तिथून भरकटलेला
काय कराव काय बोलाव तिच्याशी
याचाच सतत विचार करत दुखावलेला
सरते शेवटी हिंमत करत
एक गुलाब तिला द्यायचच
हो म्हणाली तर ठीक...... नाही तर
गुलाबाचे पैसे घेऊन माघारी यायचं
परीक्षा तरी किती द्यायच्या
आता तर अवघड paper ही तोंडपाठ
झालाय
प्रेमवीर बनून ताजमहाल बांधायचे गेले
दिवस.....
आता practical विचार
करायचा जमाना आलाय
Red rose , teddy bear देण्याऐवजी
काहीना bank passbook हवं आहे
का अशी शंका येते ...!!!
खऱ्या प्रेमाची व्याख्या आज
CCD, MacD, Discotheque मध्ये वेळ
घालावण्याशी केली जाते
असो ..... कालाय तस्में नमः म्हणत
हा ही बदल पुन्हा एकदा स्वीकारायचा
पण मन कोणावर जडण्याआधीच
पटकन जीवन विमा उतरून घ्यायचा
Break up नंतर हसरे मुखवटे चढवताना
थोडं जपूनच राहायला हवं .. बंर का ...!!!!
इथे आस्थेने चौकशी करणारे कमी
आणि मजा बघणारेच जास्त ..,
नाही का ...???

देवा तिला एव्हडच सांग......

देवा तिला एव्हडच सांग......
मी जगलो फक्त तिच्याच साठी..
आणि मरतोय पण तिच्याच साठी..
तिच्या साठीच मी व्यसने सोडली..
अन जीवनाची पण रेघ मोडली....
तिला बघूनच मी जगत होतो..
तिच्या साठीच झुरत होतो..
तू अस का केलास ग प्रिये..
का मला छाळालीस..
मी खोटा कधीच नव्हतो...ग
तुझा तो मित्रच ढोंगी होता..ग
तुला त्रास द्यायचा मला नव्हताच..
फक्त मला बोलायचं होत..
आणि त्याच एकूण तू मलाच झापलं..
अन माझ हृदय धारदार सुऱ्यान कापलं..
एव्हडा काय ग माझा गुन्हा..
आणि एवढीच माझी चूक
तुझ्या प्रेमाची लागली होती भूक
जातोय मी ग तुला सोडून..
तुझ्या सोबतची सर्व नाती तोडून..
फक्त एकदाच ग एकदाच म्हण..न
कि तुला पण मी आवडत होतो..
तुझ पण माझ्यावर प्रेम होत..
देवा तिला एव्हडाच सांग ..
मी जगलो फक्त तिच्याच
साठी आणि मारतोय पण तिच्याच साठी.....

आई-बाप; आई-बाप म्हणजे नक्की काय असतं?

आई-बाप; आई-बाप म्हणजे नक्की काय असतं?

आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं?
आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, अॅडव्हान्स पाठबळ असतं

तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं
तुमच्या जन्मापासून; त्यांच्या मरणापर्यंत, त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं

आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणार स्टीअरींग असतं
अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं

आईच प्रेम हे; रोजच्या आयुष्यात, कामाला येणार बँक बॅलन्स असतं
बाप म्हणजे; गरजेच्या वेळी मिळणारा, तुमचा बोनस किंवा वेरीएबल पेमेंट असतं

आई म्हणजे; तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं
कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “एस.एम.एस” असतं

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, “अँटी व्हायरस " असतं
शोधून काढलेले व्हायरस संपवायचं, बाप हे "क्वारनटाईन" बटण असतं

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, शिक्षणाचं विद्यापीठ असते
बाप म्हणजे चालती बोलती, अनुभवाची फॅकटरी असते

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातली, साठवलेली पुण्याई असते
बाप म्हणजे कर्म करून, आयुष्यभर मिळवलेली कमाई असते

आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला, मार्गदर्शक गुरु असतो
दाखवलेल्या वाटेवर, बाप हा जवळचा मित्र असतो

आई म्हणजे साक्षात, भगवंत; परमेश्वर असतो
त्या परमेश्वरापर्यंत, पोचवणारा बाप एक संत असतो

आई म्हणजे; तुमचे शरीर, मेंदू; हृदय; अन् मन असतं
बाप म्हणजे; भक्कम ठेवणारा, पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं

कधीही वेदना झाली कि, तोंडात वाक्य "आई गं SSS” असतं
आणि भले मोठे संकट आले, कि उच्चारात "बाप रे बाप" असतं

परमेश्वर समोर आला तरी, उभे राहायला वीट फेकलेल; पुंडलिकाच मन असतं
त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने; स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं

म्हणूनच म्हणतो, परमेश्वर; अध्यात्म; भगवंत हे सगळ, अजब गणित असतं
त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं, आई-बाप हे कनेक्शन असतं

आई-बाप म्हणजे नकळत मागे असलेली, मायेची सावली असतं
उगाच नाही ते; आपल्या संस्कृतीत, "मातृ देवो भव- पितृ देवो भव" म्हणलेलं असतं

लिहायचे ते लिहून टाकू !


-
प्रेमात पडलो आहे हे सांगून टाकू
पण तोंडाने सांगायची हिंमत कुठे
म्हणून लिहायचे ते लिहून टाकू !
-
स्वतात हरवून जायचे म्हणतोय
तरी कुठे लेखनी हरवू नये माझी
म्हणून लिहायचे ते लिहून टाकू !
-
हळू हळू वय वाढत चालले आहे
विसर पडत चालला आहे पुर्वीचा
म्हणून लिहायचे ते लिहून टाकू !
-
माहीत नाही पुन्हा तेच आठवेल का
शब्द नकोत राहून जायला कुठेही
म्हणून लिहायचे ते लिहून टाकू !

वेड मला लावुन तु शहाणी झालीस...

वेड मला लावुन तु शहाणी झालीस...

प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस?

नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं
तर का सुरुवात केलीस?

जायचे होते सोडुन मला तर का माझ्या जीवनात आलीस?

चुक झाली माझी

चुक झाली माझी कि मी तुझ्यावर प्रेम केले...

सुख नाही तर नाही पनं हे दुःख तु मला का दिलेस?

नको ढाळुस अश्रु आत्ता

नको ढाळुस अश्रु आत्ता
ऊत्तर दे माझ्या प्रश्नांना...

बंद कर हे रडु आत्ता नाही मी फसणार तुझ्या खोट्टया अश्रुंना...

आज रहाशील गप्पं

आज रहाशील गप्पं
तुझ्या कडे ऊत्तर नसताना...

ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...

ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...

ऊद्या दिसशील मला तु पुन्हा माझ्यावरचं हसताना...

सगळ्यासाठी मी आहे, पण माझ्यासाठी कोणीच नाही...

सगळ्यासाठी मी आहे, पण माझ्यासाठी कोणीच नाही...
सगळे मला सगळ काही सांगतात,पण माझं ऐकणार
अस कोणीच नाही... सगळ्यांच्या अडचणीत धावणारा मी,
पण माझ्या अडचणीत, मला हात देणारा अस कोणीच नाही...
मित्र म्हणून असणारे असे खूप आहेत, पण मैत्री निभावणारा
अस कोणीच नाही...

ती गेल्यावर..,
रोज रडतो मी आता, पण माझे डोळे पुसणारा अस कोणीच नाही...
माझ्यासाठी ती, अजूनही माझं विश्व आहे,
पण तिच्यासाठी, आता मी कोणीच नाही...
आता मी खूप एकटा आहे,
अन माझ्याशिवाय, मला आता कोणीच नाही...
अन माझ्याशिवाय, मला आता कोणीच नाही...

खंत आहे मला गुलाब देणारी कुणी नाही ......

मी आणि माझा एकांत

खंत आहे मला गुलाब देणारी कुणी नाही

खंत आहे आज हृदयाला स्पर्श करणारी कुणीच
नाही

एकटे आहे मी ह्या जगात

मला प्रेम करणारी ती असेल
कि नाही ...........


माझे हे गुलाब दरवळतच राहील

आहे कुठे ती माझी कल्पना

माझ्या फुलांचा सुगंध पाहील

खंत आहे मला गुलाब देणारी कुणी नाही ......

प्रेम

मी खुप काही केल,
मी खुप काही केल, ,
फक्त तुझ्यासाठी .

माझ वागन देखिल बदलल
रागित स्वभाव सोडून ,
शांत स्वभाव केल,

कारण तुझ्या रागावर माझा राग म्हणजे
तापलेल्या तव्यावर शिम्पडलेले पानी.

मी प्युर वेजेटेरियन ची नॉन -वेजिटेरियन झाले ,
त्रास झाला थोडा ,पण केल
फक्त तुझ्यासाठी.

पाउस म्हणजे माझा जिव होता पण
तुला चिखल- पाउस आवडत नाही म्हणून,
मी पावसात ओल-चिम्ब होणे सोडून दिल आहे ,
फक्त तुझ्यासाठी.

मी दिलेली वस्तु जपून ठेवायची,अशी माझी ताकीद असायची,
माझी वस्तु हरवल्यास मी कधी त्या व्यक्तीला
पुन्हा काही दिले नाही .

पण मी तुला देत राहिले आणि तू हरवत राहिला ,
आणि तरी मी तुला देतच राहिले.
फक्त तुझ्यासाठी .

माझ्या जीवनाच्या शब्दकोशात ,
कधी नसलेला शब्द ''प्रेम ''
माझ्या हृदयाने कोरुन लिहिला आहे,
फक्त तुझ्यासाठी .

मी तुझ्यासाठी मला पूर्ण बदलल ,
पण तू माझ्यासाठी कण भर सुद्दा
बदलला नाही??
आणि हां प्रश्न मी तुला कधीच केला नाही ,
कारण मी तुझ्यावर ''प्रेम'' केल
फक्त ''तुझ्यावर प्रेम केल''..

माझा जीव कासावीस झाला...

रात्र सरता सरता, तुझी आठवण आली,


जखमावरची खपली, अलगद निघून गेली,


कळलच नाही कधी, तुझ्यातच मी हरवलो,


अन पाहता पाहता सिगरेटच्या धुरात,

तुलाच मी शोधत बसलो...


पाहता पाहता रात्र संपली,


अन पाहता पाहता दिस उजडला ,


तुझ्या आठवणीन मध्ये कळलच नाही,


कधी चंद्र मावळला, अन कधी सूर्य वर आला...


ओघळू लागले ग आश्रू डोळ्यातून माझ्या,


अन आज हि....


सिगरेटच्या धुरात तुला पाहून,


माझा जीव कासावीस झाला...


माझा जीव कासावीस झाला...
 

बदललोय मी आता असं म्हणतात सारे

बदललोय मी आता असं म्हणतात सारे
विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे
पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची
सवय अजूनही आहे……!!!!
बदललाय मी माझा रस्ता
शोधल्यात आता नव्या वाटा
पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी
तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची
सवय अजूनही आहे……!!!
रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर
आजही वाटतो फिका,चंद्र तुझ्यासमोर
अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची
सवय अजूनही आहे……!!!!
माझा आणि देवाचा तसा
छत्तीसचा आकडा आहे…
पण गेलोच देवळात कधी तर
तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची
सवय अजूनही आहे……!!!
आताही जागतो मी रात्रभर
चांदण्यांनाही झोप नसते क्षणभर
मग आमच्या गप्पा रंगल्या की
चांदण्यांना तुझ्या गोष्टी सांगण्याची
सवय अजूनही आहे……!!!
एकटा-एकटा आता राहू लागलोय मी
दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी
भंगली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही
तुझ्या स्वप्नांत जगण्याची
सवय अजूनही आहे……!!!

पुन्हा एकदा परत ये

पुन्हा एकदा परत ये ,
आणि येशील तेंव्हा फक्त माझ्यासाठीच ये ,
जर कधी आठवण आलीच माझी ,
तर एक उचकी होऊन फक्त एकदाच ये ,
त्रास होयील मला थोडा या उचकीचा ,
पण क्षणभर मिळणाऱ्या आनंदासाठी तरी ये ,
कदाचित जमणार नसेल हि तुला आता पुंन्हा येण ,
पण सोबत पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करायला फक्त एकदाच ये ,
सोबत मिळाली आहे तुलाही तुझ्या नवीन संसाराची ,
पण असेलच ना माझ्याकरिता पण देवाने सातजल्मासाठी बांधलेली कुणी …
जरी बांधलो गेलो असलो आपण सातजल्मासाठी,
तरी आठवा जल्म घेऊन फक्त माझ्यासाठीच ये ,
कदाचित म्हणशील हि पुन्हा मला अजून हि तू वेडाच आहेस,
पण अर्धवट आहे प्रेम अजून आपल ,ते पूर्ण करायला फक्त एकदाच परत ये….

तुझी सावली…

आज पहाटे पहिल्या प्रहरी माझ्या दारी,
कोणाची पावले वाजली,
ती तू होतीस की तुझी सावली…
केसातील मोगरा दरवरळा,
त्या गंधाने जीव बहरला,
न सांगता जी परत फिरली,
ती तू होतीस की तुझी सावली…
आज पहाटे झोपाळ्यावर
तू घेत होतीस झोके,
कसे सांगू कितीदा चुकले
माझ्या काळजाचे ठोके,
बांगड्यांची किणकिण तुझ्या
अजुनही माझ्या कानी,
आठवतात अजुनही मजला
तु गायलेली गाणी,
अजुनही जी घरभर व्यापून उरली,
ती तू होतीस की तुझी सावली…
वाटले तुझ्या चेहऱ्याच्या चंद्राला
ओंजळीत घ्यावे,
मन भरून, जीव ओतून
प्रेम तुला द्यावे,
चांदण्यांचे अंग तुझे
डोळे भरून प्यावे,
जवळ येवून तुला घट्ट मिठीत घ्यावे,
तेवढ्यात पावसाची सर आली,
माझी स्वप्ने भिजून गेली,
थोडासा रुसलो मी अन
स्वतःशीच हसलो.
जडला कसा हा जीवघेणा ध्यास,
सगळीकडे फक्त तुझाच भास,
पण भास तरी म्हणू कसे?
सकाळी अंगणात होते
तुझ्या पावलांचे ठसे,
आता तरी खरे सांग,
आज पहाटे पहिल्या प्रहरी माझ्या दारी,
कोणाची पावले वाजली,
ती तू होतीस की तुझी सावली…

ह्रदयाच्या प्रत्येक कप्यात आणि प्रत्येक स्पदनांत तिचा आहे

ह्रदयाच्या प्रत्येक कप्यात
आणि प्रत्येक स्पदनांत तिचा आहे
एकवेळ ह्रदयाचा प्रत्येक कपा बंद करेल
... ... ... मग ह्रदयाच काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात
आणि प्रत्येक विचारात तीच आहे
एकवेळ तिचा विचार करणं बंद करेल
मग मनाचं काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

अंतकरणाच्या प्रत्येक स्वप्नात
आणि प्रत्येक जाणिवेत तिच आहे
एकवेळ स्वप्न बघण बंद करेल
मग अंतकरणाच काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

माझ्या प्रत्येक प्रत्यनात
आणि प्रत्येक आठवणीत तिचं आहे
एकवेळ आठवण काढण बंद करेल
मग माझ काय ?

सांग कसा मी विसरू तिला !!!

मी हि प्रेम केले होते तिच्यावर

मी हि प्रेम केले होते तिच्यावर,
पण तिला ते ओळखता आले नाही,
मी तर नेहमी तिचाच होतो,
पण तिलाच माझ होता आले नाही.

माझ्या मनातले खरे प्रेम तिला कधी पाहताच आले नाही,
डोळ्या समोरून दूर केले तरी तिला मनातून काढताच आले नाही.

तिच्या विरहाच्या दुख्हातून अजून हि बाहेर पडता आले नाही,
खूप प्रयत्न करून हि तुला विसरताच आले नाही.

ती सोडून गेली तरी मला तिला सोडताच आले नाही,
चारचौघात मला मोकळ हसतच आले नाही.

सात पावले हि तिला माझ्या सोबत चालता आले नाही,
सात ज्याला मानले,
त्याला या एका जन्मात सुद्धा माझ होता आले नाही.

सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.

अभ्यासाचं असाव कर्तव्य आध्य.
होईल जीवनात सार कांही साध्य.
गुंजतो हा संदेश सदा दिशा दाही.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.

आळसाशी नसाव कदापी मैत्र.
तयान जीवनाचं बिघडत सूत्र.
प्रगतीचा मार्ग मग खुंटतच जाई.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.

वेळेच महत्व पार पैशांसमान.
जर पाळलं तयाच व्यवस्थापन.
करून वेळेत होईल सारच सही.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.

असेल व्यायाम,प्राणायाम, योग नित्य.
मन:शांती सुआरोग्याची नसेल खंत.
मग बुवा अन वैध्यांची फिकीरच नाही.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.

आता वाईट सवयींची गुलामी सोडू,
अन गांभीर्याशी नित्य नात जोडू. 
मग कधी म्हणायची गरजच नाही.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.
 

खरी खरी साथ दे

आई-बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी ?

अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते

स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते

अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का ?
तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का ?

कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे
वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे

भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने
स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे

"साडी मस्त शोभतीये आज" मनमोकळी दाद दे
आठवणीने सुवासाचा कळीवाला गजरा दे

सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने
खमंग कणीस खातानाचा आनंद मनात टिपून घे

हॉटेलातील मेनू कधीतरी तिच्या चॉईसचा घेऊन दे
आईस्क्रीमची आवड सोडून तिच्याबरोबर कॉफी घे

मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे
वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे

वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे

पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे

झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे
जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे

हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे
नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे
अशी काहीशी साथ दे
मित्रत्वाचा हात दे............

मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो,

मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो,
माझ्यावरहि कुणाचं नियंत्रण असायचं.

नकळत का होईना मी हि हरवून जायचो,
कधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचो.

दिवसभराच्या कामात एकदा तरी फोन करायचो,
हळूच का होईना पण "I Love U" म्हणायचो.

नाहीच Phone तर Miss Call तरी द्यायचो,
रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ,
पण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचो.

सगळंच आता भूतकाळात विरून गेलं,
माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं,

जाता जाता मला खूप वेदना दिल्या,
पण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं.

जाता जाता खूप काही शिकवून गेलं,
किती तरी नाती आपण गृहीत धरतो त्यांचं अस्तित्वच आपण Assume करतो.

समजत नाही कधी मोल नात्यांचं आणि मग दुख करतो ते दुरावल्याचं आज खरंच समाधान वाटतंय कि मी हि कधी प्रेम केलं होतं.

खरंच माझं प्रेम व्यर्थ न्हवतं,
जाता जाता मला जगण्याच्या जवळ घेऊन गेलं.

माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,

माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...

सगळेच म्हणतात , मी तुझ्यासाठी चंद्र तारे घेउन येतो ,
त्यापेक्षा मी तुला चंद्र तार्यांवरच घेउन जातो ...
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...

मग आपनदेखिल चोरून चोरून भेटुया ,
लपून लपून मोबाइल वर बराच वेळ गप्पा मारुया ...
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...

तुला जर कधी एकटेपना भासेल तर ,
फक्त माझी आठवण कर मी तुझ्या जवळच असेन ...
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...

माझ्याशी बोलताना तू तुझे मन मोकळे करशील ,
आलेच तुझे अश्रु तर ते मी पुसेन ...
पण माझे म्हनने एकदा ऐकून तरी बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन तरी बघ ...

तुझ्या दुःखात मी सुद्धा तुझ्या बरोबर असेन ,
पण माझ्या बरोबर असताना तुला दुखाची जाणीवच नसेन ...
आता तरी माझे म्हनने एकदा ऐकून बघ ,
प्रेम माझ्यावर एकदा करुन बघ ...

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....



ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील....!