एक अबोल पाकळी

एक अबोल पाकळी
हळूच गालात हसली...
कोवळ्या रंगात न्हाऊन
फूल होऊन लाजली...!!!

काय सांगू कथा
स्वतास पाहून थिजलि..
डोळ्यात माझ्या येऊन
स्वप्न रंगवून गेली...!!!

जीवनात ती येऊन
सावली होऊन गुंतली..
क्षण सारे फुलवित
मेंदीसम ती रंगली...!!!

पाहून राघु मैनेला
पहा लालेलाल झाली..
हळूच मिठीत शिरून
रंगात माझ्या भिजली...!!!

मनात माझ्या येऊन
कविता होऊन रुजली..
शब्दाना आज माझ्या
अर्थ देऊन ती गेली...!!!
- अनामिक

बावळट


सांगा तर मित्रांनो
बावळट शब्दाचा अर्थ काय ?
प्रेमाने कुणी बोलले
तर तुम्ही रुसता काय ?

कधी कधी बावळट
हाक ऐकू येते
गालावरची खळी
अलगद खुलते

समजत नाहि मग
पुढे काय बोलु
ओठावरचे हसु
रागाने कसे टाळू.

सांगा तर मित्रांनो
बावळट शब्दाचा अर्थ काय ?
प्रेमाने कुणी बोलले
तर तुम्ही रुसता काय ?

खर सांगु मित्रांनो...

बावळट म्हणूनी कुणी
हुशारीला दाद देतेय
बावळट का असो ना
कानाला तो खास वाटतोय.
- अनामिक

ओळख....

ओळख.... नसतेच कधी कोणाची कोणाशी
ओळख.... नसतेच कोणाला कधी स्वतःची
ओळख.... असल्याचा आव असतो सर्वांशी
ओळख.... मग हीच गत असते सा-यांची

ओळख.... विसरलेत सारे आज अर्थच ह्या शब्दाचा
नाममात्र उरले आहेत आज हे शब्द
ओळख.... बनते कधी ही देखील आजी माजी
म्हणतात ना कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी

ताकाला जाऊन भांडे लपवणारेही बरेच असतात
ईथेही मग उगाच ओळखीचा आव आणतात
स्वार्थ स्वतःचा परमार्थ केल्याचा भासवतात
ओळखीच्याच जोरावर अनेक पदे मिरवतात

मग पुन्हा होतेच गत इथेही तशीच
म्हणतात ना गरज सरो वैद्य मरो
माणसाची प्रवृत्ती ही कायम अशीच
सार्थ साधताना मग कोणी येथे उरो अथवा मरो

कशाला करावी पर्वा कोणी कोणाची
जो तो समर्थ येथे घेण्या स्वतःची काळजी
पण इथे सत्ता मात्र सदैव आमची
आव असा जणू हाच वाहतो जगाची काळजी

मग पुन्हा कधी तरी अशीच जाणवते गरज
मग धुंडाळतो आम्ही जुन्या ओळखींना
देतो करून जाणीव मग त्यांनाही त्याची
अन उगाच येते उधाण जुन्याच विनोदांना

ओळख.... नसतेच कधी कोणी जपायची
खरं तर जपायची असतात नाती
नाती मैत्रीची निखळ मैत्रीची निस्वार्थी मैत्रीची
ओळख.... जपतात फक्त स्वार्थापुरती
- अनामिक

गर्लफ्रेंड म्हणजे कायअसते.. ??


पांढर्‍या केसावरील
हेयर डाय असते..

भुक लागली तेव्हा
इडली फ्राय असते..

आय लव्ह यु
मधला वाय असते..

लग्नाआधिचा रिलेशनशीप
चा मोठा ट्राय असते..

गर्लफ्रेंड चा काय त्रास असतो ...
?

सतत कानाशी
गुणगुणनारान मारता
येणारा डास असतो..

कितीही नाक दाबले
तरी न टाळता येणारा
वास असतो.

मोबाइलच्या व्हायब्रेशनला घाबरवनारा भास असतो..

जबरदस्तीच्या अटेंडंस
साठीकरावा लागनारा क्लास असतो..

कितीही आभ्यास केला तरी शेवटी बॉयफ्रेंड नापास असत...
- अनामिक 

मी वाट पाहिली तुझ्या येण्याची

मी वाट पाहिली तुझ्या येण्याची
तुला प्रेम करणे जमलेच नाही
आणि मला ते व्यक्त करणे...

तुला वाट पाहणे जमलेच नाही
आणि मला तुझ्या वाटेवर चालणे...

मी खूप एकटा होतो तुझ्याविना
तुला साथ देणे जमलेच नाही
आणि मला तुझी साथ मागणे...

मी गुंतत चाललो होतो तुझ्यात
तुला हे गुंतणे समजलेच नाही
आणि मला ते तुला समजावणे...

मी प्रेमात पडलो खरा तुझ्या
तुला या नात्याचा अर्थ कळलाच नाही
आणि मला त्याचा अर्थ सांगणे...
- अनामिक

आयुष्य म्हणजे..

आयुष्य म्हणजे..
४ मित्र
४ ग्लास
१ टेबल गरम चहा,
आयुष्य म्हणजे...
१ बाईक
१ मैत्रीण
ट्राफिक पोलीस
आणि
पिक्चर ला उशीर
आयुष्य म्हणजे...
१ मित्राचे घर हलका
पाऊस
आणि
खूप खूप गप्पा
आयुष्य म्हणजे...
कोलेज चे मित्र
बंक केलेले लेक्चर
तिखट १ सामोसा
आणि
बिला वरून भांडण
आयुष्य म्हणजे...
फोन उचलल्यावर मित्राची
शिवी
आणि
सॉरी बोलल्यावर आणखी
१ शिवी
आयुष्य म्हणजे..
३ वर्षा नंतर अचानक जुन्या
मित्राचा ढोलीत पडलेला
फोटो
आणि
डोळ्यात आलेले अश्रू ....
-अनामिक

कुणीतरी...

कुणीतरी हव असत ,जीवनातसाथ देनार
हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्....

कुणीतरी हव असत ,जीवालाजीव देनार
फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्......

कुणीतरी हव असत,हक्कान् रागावनार,
चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार........

कुणीतरी हव असत ,आपल म्हननार
नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार........

कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,
कशीही वाट असली तरी,मागन फ़िरनार........

कुणीतरी हव असत,वास्तवाच भान देणार..
-अनामिक

|| कहाणी मुंबईची ||


एक शहर आहे जागात
म्हणतात ते फार वेगळे आहे,
जे मी अनुभवले ते तेथेच राहून तुम्हाला सांगतो आहे,
पण प्रत्याकाच्या सांगायची एक वेगळीच पद्धत असते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.
सकाळी उठणे हे सुद्धा एक काम आहे,
रात्रीची झोप हा फक्त काल्पनीक आराम आहे,
दात घासणे, आंघोळ करणे यासाठी पुरेसा वेळ नाही,
नाश्ता करत असताना तयारी करणे यापेक्षा मजेशीर खेळ नाही,
देवासमोर एक मिनीट हिच आमची देवपुजा असते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.
बिल्डीँगचा गेट सोडला कि रांगांची रांग लागते,
रिक्षा बस ट्रेनचे टिकीट अगदी काहिहि कारण चालते,
रस्त्यावरून चालणारा प्रत्येक माणुस धावत असतो,
मिनीटाला शंभर पाऊले असा इथे नियम असतो,
रस्ता आपल्याच बापाचा समजून चालायचे असते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.
शिव्या देत शिव्या खात प्लँटफाँर्मवर पोहोचायचे असते
मुंग्यांमधली साखर शोधावी तसे मित्रांना शोधायचे असते
ट्रेनमधले मित्र मैत्रीला जागणारे असतात
एकामुळे दुसऱ्याला जागा मिळेल असे जागा अडवून बसतात
रिझर्वेशन नसुनही प्रत्येकाची जागा फिक्स असते
हि मुंबई आहे इथे असेच असते.
घरी पोहोचण्याचा विचारच फार आनंददायी असतो
पण पुन्हा ट्रेन बस हा विचारच मनाला टोचत असतो
आईच्या हातचा चहा हेच घरी पोहोचल्याचे समाधान
तिची सिरीयल माझी मँच यासाठी रिमोटची ताणाताण
ब्रेक वगळून एकाच वेळी तीन सिरीयल पहायची असते
हि मुंबई आहे इथे असेच असते.
जेवणानंतर लगेच झोप एक वाईट सवय आहे,
म्हणूनच बाहेर फेरफटका आता आमची गरज आहे,
एका तासात चाळीतल्या नव्या जुन्यांची खबर होते,
आपणही याचा एक भाग आहोत याची गोड जाणीव होते,
झोपण्यासाठी नव्हे तर सकाळी उठण्यासाठी घरी परतायचे असते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.
असाच हा नित्यक्रम सोमवार ते शुक्रवार असतो,
पण बाकिचे दोन दिवस आमचा दिनक्रम बदलतो,
जे पाच दिवस भेटले नाहीत असे मित्र भेटतात,
मग थिएटर, पब, बिचेस, टेरेस सगळी ठिकाणे गाजवतात,
आईला एक दिवस आराम हे बाहेर जेवण्याचे कारण असते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.
असा हा आठवडा त्याचेच महिने घडावे,
दिवसातील चोवीस तासही इथे कमी पडावे,
अशी हि श्रमाची बँक जिथे तक्रार काउंटर नाही,
मैत्रीचे व्याज मिळत राहत राहते पण जास्त नोटा मात्र नाहीत,
शोधनाऱ्यासाठी सगळे आहे फक्त वेळ मात्र मिळत नसते,
हि मुंबई आहे इथे असेच असते.
राज पाटील
मुंबई

विचार करत होतो मी

विचार करत होतो मी
कोण माझा विचार करतय का?
विचार करुन सांग मला
तु माझा विचार करतेस का?
जर करत् असशील विचार् माझा
तर पुढे काय विचार तुझा?
जर करत नसशील विचार् माझा
तर का करत नाहीस विचार माझा?
मी तुझा विचार करत असताना
तु माझ्याबद्द्ल अविचारी का?
हा प्रश्न मी तुला विचारलाच् का?
ह्याचा विचार तु कधी केलास का?
विचार करुन विचारतो तुला
जर् पटला माझा विचार तुला
तर कळव तुझा विचार मला
- अनामिक

कुणालाच नाही ठाऊक कोण इथे आपल्यासाठी जगतंय?

कुणालाच नाही ठाऊक कोण इथे आपल्यासाठी जगतंय?
स्व:ताचं विसरून जग...कुणीतरी आपल्यासाठी मागतंय...

कुणीतरी देवापुढे आपल्यासाठी हात मनापासून जोडतंय....
आपल्याला स्व:ताचं मन समजून अगदी मनापासून बोलतंय....

कुणालाच नाही ठाऊक आयुष्यात कोण कोण येणार....
कोण आपल्याला साथ देणार..कोण आपलं सर्वस्व नेणार...

कोणासोबत हसता हसता डोळ्यात पाणी येणार....
रडता रडता कुणीतरी आपल्याला आपलं हसणं देणार.......

कुठेतरी कुणालातरी आपल्यासारखेच असे प्रश्न पडणार.....
कुणीतरी आपलं उत्तर.....अन् आपणही कुणाचं तरी उत्तर बनणार.....

अपेक्षांना जरासं छोटं करावं नंतर हे सारं जग बघावं....
दु:खाचं कारण आपल्या स्व:तात असतं...
-अनामिक

प्रेम ♥

प्रेम ♥
करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत
नसत...♥

उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन
आपलच ऐकत नसत...
...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते...♥

लोक म्हणतात काय असत प्रेमात..,
करून बघा एकदा..,
काय नसत प्रेमात...?

प्रेम हे सांगून होत नसत...,
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..♥

दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक
भाव असतो...♥

प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....♥♥♥
-अनामिक

सारीपाट हा संसाराचा ....

सारीपाट हा संसाराचा .... ♥♥♥

सारीपाट हा संसाराचा 
जो तुझा माझा बनला 
हर्ष मनी फुलला 
असा हा खेळ सारा 
सारीपाट हा संसाराचा 

नाते अलगद जुळते  
प्रेम वेडे हे 
मनी गीत गाऊ लागते
असा हा खेळ सारा   
सारीपाट हा संसाराचा 

दोन चिमणी पाखरांचा 
हा संसार सारा 
आधार देई दोन जीवाला 
असा हा खेळ सारा 
सारीपाट हा संसाराचा 

न दृष्ट लागो या घराला 
म्हणुन हाक देतो देवाला 
असा हा खेळ सारा 
सारीपाट हा संसाराचा 

गुंतता हे हृदय माझे 
तुझीच स्वप्न पाहे 
घरकुल हे माझे 
जे माझ्या हृदयात असे 
असा हा खेळ सारा 
सारीपाट हा संसाराचा .... With - My Love ♥♥♥

@ एक उनाड पाखरू ....!!!! ( ऋषी ) ♥♥♥
    ८/२/२०१३

मेणा – आसावरी काकडे

मेणा – आसावरी काकडे

डोळ्यांत तरारून आला
अश्रूचा इवला थेंब
जग धूसर झाले तेव्हा
कायाही गेली लांब
मी होते तशीच होते
काही ना कळले कोणा
अश्रूच्या अल्याड होता
व्याकूळ सखीचा मेणा
तिज मीच घातली होती
ती साद आर्त हाकांनी
सामोरी जाऊ न शकले
पण मातीच्या हातांनी
डोळ्यात तरारून आलानग थेंब अश्रुचा इवलामी सावरले जग तेव्हातो मेणा निघून गेला.
 - अनामिक 

कायमचे मिटून जातात...

एका वळणावर सगळी नाती सोडून जातात,
नात्यांचे मर्मबंद तुटून जातात.
एकटाच जाव लागत अनंताच्या प्रवासाला,
जेव्हा डोळे कायमचे मिटून जातात.

रडत - रडत माणूस
जीवनाच स्वीकार करत असतो ,
येणाऱ्या सुख -दु:खाना
तो प्राधान्य देत असतो ....

दु:ख म्हणजे
काय असते ?
मनावर अपेक्षांचे
एक प्रकारचे वजन असते ......

रंग हे जीवनातले
जीवनातच खेळायचे असतात
जीवन निघून गेल्यावर
उधळायचे नसतात.,,,,,,
- अनामिक 

शेवटी आयुष्यापुढे झुकाव लागतं ....

शेवटी आयुष्यापुढे झुकाव लागतं .... 

आज सगळेच शब्द विरद्ध झाले 
अस का म्हणत आहेस 

दिलेल्या आठवणींना तू आज तोडून टाकत आहेस 
तू दिलेल्या आठवणींना मी मानीत होतो आपलस

पण सखे तू हे क्षणार्धात मोडून टाकलस  
जीवन आहे तिथे तू आहेस 
पण का अस म्हणून तू वेगळ करत आहेस 

अश्रू हे झालेल्या दुःखाची साक्ष असते 
रडण्याने काही होत नसत 
उलट दुखःला अजून जवळ करत असते 

हे दुखः सावरताना जीव जळत असतो 
पण ह्यातूनच सखे आयुष्याची वाट काढायची असते 

शेवटी आयुष्यापुढे झुकाव लागतं .... 

@ एक उनाड पाखरू ....!!!! ( ऋषी )♥♥♥
    २०/१/२०१२