मनमाड- इंदूर रेल्वे मार्गामुळे मुंबई इंदोर हे अंतर 171 किमी अंतर कमी होणार आहे. इंदूरवरुन व्यापारी कंटनेर आता मनमाडवरुन जेएनपीटीला जाणार आहे. हा महामार्ग धुळ्यातील आदिवासी भागातून जाणार आहे
महाराष्ट्रात नवा सुपरफास्ट रेल्वेमार्ग बनणार आहे. खान्देशातील महत्वकांक्षी मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. मनमाड- इंदूर रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्य जोडले जाणार आहेत. JNPT पोर्ट सोबत कनेक्टिव्हिटी साठी याचा फायदा होणार आहे.
मनमाड- इंदूर रेल्वे मार्ग हा 18,036 कोटींचा प्रकल्प आहे. इंदूर आणि मनमाड नवीन मार्गामुळे मुंबई ते इंदूर अशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी पंतप्रधान-गती शक्ती नॅशनल मास्टर प्लॅनच्या अंतर्गत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. 309 किमी लांबीचा हा नवीन रेल्वेमार्ग असणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील संपर्कात नसलेले 6 जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत.
सध्या मध्य प्रदेशातील इंदूर येथे जाण्यासाठी गुजरातमार्गे जावं लागते. मुंबई आणि इंदूरला महत्त्वाची व्यावसायिक केंद्रे आहेत. इंदूर-मनमाड रेल्वे मार्गामुळे थेट केन्क्टिव्हीटी मिळणार आहे. मनमाड- इंदूर रेल्वे मार्ग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील राज्यातील सहा जिल्ह्यांना जोडणार आहे. या जिल्ह्यांमधूव जाणाऱ्या रेल्वे मार्गात 30 नवीन स्थानके बांधली जाणार आहेत.
6 जिल्ह्यातून जाणाऱ्या या नवीन रेल्वे मार्गाचा फायदा तब्बल 1000 गावांना होणार आहे. 30 लाख प्रवाशांना पर्यायी मार्ग मिळणार आहे. व्यापारासह श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरासह उज्जैन-इंदूर विभागातील अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळांवरील पर्यटकांना देखील मार्ग सोईचा ठरेल. यामुळे फक्त व्यापारच नाही तर हा नवा रेल्वे मार्ग पर्यटन वाढीला देखील चालना देईल
हा नवा रेल्वेमार्ग महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्हा तर, मध्य प्रदेशातील बरवानी, खरगोन, धार आणि इंदूर अशा एकूण जिल्ह्यांमधून जाणार आहे. मनमाड- इंदूर रेल्वे मार्गामुळे मनमाड आणि महू ही महत्त्वाची स्थानके थेट जोडली जाणार आहेत. 2028 - 29 पर्यंत हा नवा मनमाड- इंदूर रेल्वे मार्ग पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रातलं 186 किमी तर मध्य प्रदेशातलं 176 किमी अंतर या रेल्वेनं कापता येणार आहे.