प्रेम कधी कुणावर ठरवून करता येत नाही

प्रेम कधी कुणावर ठरवून करता येत नाही
कुणी कितीही आवडलं तरी ते प्रेम असत नाही
प्रेम मनाच्या गाभाऱ्यातून
नकळत उमलून येतं
कुणीतरी मनाच्या डोहात
खोलवर दिसायला लागतं
उठता बसता दिवसा ढवळ्या
त्याचं स्वप्न पडायला लागतं
प्रत्येक क्षण त्याच्याच विश्वात
मन नकळत हरवायला लागतं
त्याच्या नुसत्या दिसण्यान
मन वेड व्हायला लागतं
त्याची भेट होता क्षणी
उंच नभात उडायला लागतं
त्याच्या थोडाश्या दुराव्यान
मन व्याकूळ होऊ लागतं
भेटल्यावरही भेटीसाठी
प्रत्येक क्षण झुरू लागतं
नाही राहू शकत त्याच्याशिवाय
मनास सारखं जाणवू लागतं
त्याच्या विरहाच्या क्षणी
मन बेचैन होऊन जातं
अन येतो तो मधुर क्षण
जेव्हा मनास कळून जातं
हे फक्त प्रेम आहे
हृदय बरोबर ओळखून घेतं ....
- संग्रहित 

तुला आवडणारा पावसाळा आता जवळ आलाय ...

तुला आवडणारा पावसाळा आता जवळ आलाय ...
पण तू ... तू मात्र दूर गेलीस ...
गेल्या वर्षी कोरडी ठेवलेली छत्री,
यंदा भिजवावी लागणारं ...
आणि गंमत म्हणजे ती छत्री आता मिच सांभाळणार ...
.......... ..........!
आठवतय ?...
आठवतय तू छत्री पकडायचीस ...
आणि मी .. मी तूला पकडायचो अगदी घट्ट !...
त्या इवल्या छत्रीचही
झूकतं माप तू मलाचं द्यायचीस ...
आणि स्वतः मात्र भिजत चालायचीस ..
त्या पावसाही तुझ्यावर तेवढंच प्रेम
जणू तुझ्यासाठीच तो यायचा
भिजलेल्या कमरेवर हात गेला की
त्या ढगांच नुसता गडगडाट व्हायचा !...
.......... ............!
गेल्या वर्षी पाऊस गेला
आणि पाठोपाठ तुही गेलीस ......
आता आलिच आहेस पण तो येण्या आधीच निघालिस !...
तुला जायचय तर जा मी नाही म्हणत थांब ...
पण त्या पावसाला काय उत्तर देऊ ते तरी सांग ...
घाबरू नकोस
तू मला फसवलसं हे मी त्याला नाही सांगणार
पण या डोळ्यातला पाऊस
तो कोसळल्या शिवाय कसा थांबणारं !.....
यंदाच्या पावसाळ्यात...
छत्री असली तरी नसली तरी ,
मला मात्र भिजावच लागणारं
मला मात्र ... भिजावचं लागणारं ......!!
................ ............!
पावसाळा जवळ आला की तुझ्या आठवणी
अगदी सरींसारख्या कोसळू लागतात ...
मग ह्र्दयाचे काही ठोके हरवून बसतो मी
आणि मनात विरहाचे ढग आदळू लागतात !.....
काळजात कुठेतरी खोलवर ...
आठवणींचं एक तळं साचत ...
आणि दगड झालेलं काळीज
पुन्हा पाझरू लागत !.....
कोसळणाऱ्या पावसात डोळ्यांना
आधार असतो ...
डोळे का ओले अशा प्रश्नाचां भडीमार नसतो !...
कोसळणा-या पावसात अश्रू लपवता येतात
कोण म्हणतो काळजाला ..
कधी कधी ढंगानाही वेदना होतात .....!
......... .........!

ओल्या पायांनी जखमा तुडवत,
मग निघून जातो पाऊस...
मी म्हणतो थांब ना रे इतक्यात नकोना जाऊस ....
पण तोही तुझ्यसारखाचं !....
माझं कुठे ऍकतोय ...
आजही त्या वळणावरं
प्रत्येक छत्रीखाली तो तुलाच शोधतोय ...

आता दर वर्षी चार महिने
तो तुझी वाट पाहतो..
आणि बारा महिने ....
बारा महिने माझ्या डोळ्यातून वाहतो !..........
- अनामिक 

मित्र मोठे होऊ लागलेत

मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
कामाच्या SMS शिवाय,
एकही विनोदी SMS येत नाही.
मित्रांच्या Callसाठी आता,
मिटींगही मोडता येत नाही.
बहुतेक कामाचा व्यापच आता,
सर्व जागा व्यापायला लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
फालतू विनोदावरही हसण्याची
सवय आता मोडायला लागलीय.
चेष्टेने केलेली चेष्टाही आजकाल,
भुरटेगिरी वाटायला लागलीय.
आणि वाटतय की आता,
धिंगाणाही कमी होऊ लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय……….
पुर्वी वेळ सर्वांसाठी असायचा,
आता स्वता साठीच वेळ वाढायला लागलाय.
पझेशनचा वेळ येईल तसा,
रूम मधला कालवा दडायला लागलाय.
ट्रिपचा रविवार आता,
नविन जोडीदार पाहण्यात जाऊ लागलाय.
मित्र मोठे होऊ
लागलेत,आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय
मान्य आहे स्वतासाठीही,
जीवन जगायचं असतं,
मग त्यासाठी कुणाला,
खरच का दुखवायचं असतं?n
पण हे मात्र खरं आहे की,
मित्राबरोबर मैत्रीचा अभिमानही वाढु
लागलाय.
मित्र मोठे होऊ लागलेत,
- अनामिक