तेव्हा कुठं प्रेम कळतं


कुणीतरी मनाला मनापासून आवडतं
तेव्हा मन गुंतून मनास प्रेम कळतं

कधी केव्हा कुठे कोण
भेटेल माहित नसतं
कधी केव्हा कसं कोण
आवडेल ठाऊक नसतं
नकळत आयुष्य वळण घेत जातं

कुणीतरी मनाला मनापासून आवडतं
तेव्हा मन गुंतून मनास प्रेम कळतं

तो चेहरा बघताच
मन नभी उडून जातं
उत्साहाचा वारा होऊन
मन वाहू लागतं
तो दिसताच मन त्याच होऊन जातं

कुणीतरी मनाला मनापासून आवडतं
तेव्हा मन गुंतून मनास प्रेम कळतं

कळत नाही कधी
त्याच्यासाठी मन झुरतं
रात्र रात्र त्याला आठवून
नवं स्वप्न बघतं
फक्त त्याची धुंदी स्वतःलाही विसरतं

कुणीतरी मनाला मनापासून आवडतं
तेव्हा मन गुंतून मनास प्रेम कळतं

मनास हवा वाटतो
फक्त त्याचा सहवास
तोच श्वास होऊन जातो
त्याचाच मनास लागतो ध्यास
तोच जगण्याचं कारणं होऊन जातं

कुणीतरी मनाला मनापासून आवडतं
तेव्हा मन गुंतून मनास प्रेम कळतं

उगीच नाही वेडं मन
तेव्हा कळतं जातं
हेच खंर प्रेम आहे
मनास उमजून जातं
जुळून मनाच्या तारा मन त्याचं होतं

कुणीतरी मनाला मनापासून आवडतं
तेव्हा मन गुंतून मनास प्रेम कळतं . 

कवी- अनामिक 

No comments: