नवीन वर्ष म्हणजे शेवटी काय असतं.?

नवीन वर्ष म्हणजे शेवटी काय असतं?
चार ऋतूंचा नवीन खेळ असतो..
नवीन कॅलेंडरचा सेल असतो
आणि लिहिताना नवीन नंबरचा घोळ असतो
एका प्रमोशनची वाट असते
त्याची वर्षभराची साथ असते
टैक्स रिटर्नची कटकट असते
आणि मिळालाच, तर बोनसची चैन असते
कोणाचं दुक्ख तर कोणाचं सुखं असतं
कोणाचं सोयर तर कोणाचं सूतक असतं
कोणी यशस्वी तर कोणी फेल असतं
दिवस आणि रात्रीचं फक्त एक चक्र असतं ..
(..
वर्ष म्हणजे शेवटी काय असतं?)
तरीही नवीन वर्ष, ही एक आशा असते
जणू एक नवी सुरुवात असते
तशी रोजच येणारी, पण एक नवी सकाळ असते
आणि परत मिळणाऱ्या संधीची, हलकी आणि थोडी फसवी, चाहूल असते.....
नववर्षाचा क्षण शेवटी काय असतो?
एक क्षण फसवणुकीचा असतो
एक क्षणाचा जल्लोष असतो वेगळा नसूनही, त्याचा भाव मात्र जास्त असतो
आकडे बदलतात, पण बाकी चक्र तेच असतं
नवीन रात्रंदिवस, पण सूर्य चंद्राचं नाट्य तेच असतं
शाळा, कचेरी, रस्ते आणि पब्लिक, सारं सारं तेच असतं
पण हे मन मात्र या सर्वाकडे, नवीन आशेने बघत असतं ....
कवी - अनामिक 

No comments: