उगाच मी उन्हातली फ़ुले मनात आणली


उगाच मी उन्हातली फ़ुले मनात आणली
क्षणात गारव्यातली सुखे उन्हात आणली ..

पुरेल हीच पानगळ पुढे मला हयातभर
फ़ुलायची उमेद तू अशा वयात आणली !..

नसेन मांडली कथेत वेगळी व्यथा जरी 
तिला न कोणत्याच मी कथानकात आणली !..

बघून पारिजातका दवातला सडा तुझा 
कधी न आर्जवे पुन्हा तुझ्या पुढ्यात आणली !..

नको विचार एवढा करू मना मनातला
तुझी न कल्पना कधी कुणी मनात आणली !..

अता कसे लढायचे पराभवा तुझ्या पुढे ?
तहातलीच जिंदगी रणांगणात आणली !..

निमूट भोगली तुझ्या समोर जन्मठेप मी 
कधी न कोणती सजा तुझ्या गुन्ह्यात आणली..
कवी - अनामिक 

No comments: