आता साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे

आता साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो, मझ्या मनात एक मुलगी भरली आहे

आधी सिगारेट ''दैनिक सकाळ'' होती
आणि अंघोळ ''विकली ईलस्ट्रेटेड'' होती
दाढी पण फक्त आमवस्येलाच गायब होत होती
लाईफ कशी एकदम कूल मध्ये चालली होती

सिगारेट माझी आता सुटली आहे
अंघोळ रोज दोनदा घडू लागली आहे
मोलिव्ह शेवचा मुहुर्त अमावस्येएवजी सूर्यास्त झाला आहे
लाईफ मध्ये कसा एकदम एंथू आला आहे

साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे

दिसली पोरगी, मार शिट्टि भेटला चम्या,
उडव खिल्ली वेळ मिळाला तर कर भंकसगिरी
एकूण काय तर, आदर्श अशी जीवन पद्धती होती

पोरगी दिसल्यावर आता शिट्टी वाजत नाही
चम्या लोकांची खिल्ली, हल्ली आपण उडवत नाही
भंकसगिरी तर पुर्ण विसरलो एकूण काय तर,
आपण आता जेंटलमन झालो

साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे

पिक्चर पहायचा? ''नील'' कमल पाहू
भुक लागली आहे? वडा पाव मारु
शर्ट कोणता घालायचा? लाल भडक एकदम फंडू
हेयर स्टाईल कशी करायची? छोड यार टक्कलच करु
आता मात्र रोज ''RHTDM'' ची पारायणे करतो आहे
काटा चमचा वापरून पीज्झा खायला शिकतो आहे

इस्त्रि केलेला फॉर्मल शर्ट, पॅंटमध्ये व्यवस्थीत इन करतो
तेल लाऊन केसाला, कोंबडा काढुन भांग पाडतो

साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे

नशीब खुलले, भाग्य फळफळले, ग्रॅंड लॉटरी लागली
तिच्या कडून कॉफी प्यायची मला चक्क ऑफर आली
वाटले कष्ट आपले सार्थकी लागले
''खयालो की राणी'', ''बहारो की मलीका'' चे हृदय आपण जिंकले

भेटताच कँटीनमध्ये तिने मस्त क्लोज अप स्माईल दिले
दोन कॉफी ऑर्डर करुन.. मग माझ्याकडे पाहिले
''तुला काही सांगायचे आहे'', ती बोलली लाजत
'' मला तर सगळं आधिच कळले'' मी म्हणालो हसत

ईश्श... अशक्यपणे बोलली
ती गालावर खळी पाडून मला तर वाटले
माझे शुभमंगलच गेले आटपुन
''तुझा दादा मला आवडतो हे तुला कसे कळले?''...............................
एकून हे कानच काय, माझे हृदय सुद्धा फाटले

साध्या सरळ आयुष्यातली गडबड आता संपली आहे
इथून दूर कलकत्याला- दादा वहिनी मजेत आहेत.

1 comment:

CA Pandurang Lokhande said...

हा! हा!! हा!!! मानलं बुवा..आता कुठे वाटतय कि चला कोणीतरी आहे..समदु:खी