सांगेन पुन्हा कधीतरी..........

सांगेन पुन्हा कधीतरी.........
मी किती किती तळमळलो,
तुला टाळताना प्रिये
मी किती किती जळलो.
मी भांडलो तुझ्याशी
मीपणाला माझ्या मी भुललो,
काटा बनुन वाटेवरला
माझ्याच पायात सललो...
येताना डोळ्यात होते आसु
माझ्याच पाउलात मी असा अडखळलो,
पुन्हा फ़िरुन मी प्रिये
तुझ्याच कुशीत शिरलो.....

सांगेन पुन्हा कधीतरी!
प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मी
ते एक मन ज्याला दगड बनवले मी
कधी कोणी दुखवु नये तुला माझ्यामुळे
म्हणून जगापासुन तुझे नाव लपवले मी.

ज्या आसवांनी या रात्रींना जागवले मी
ते दोन डोळे ज्याना नेहमी रडवले मी
पण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेत
म्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी.

तुझ्यानंतर विनाकारण या देहाला जगवले मी
आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी
उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही
म्हणुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी.

तुझ्या विरहांत उगाचच शब्दांना सतवले मी
तुझा इतिहास लिहिताना कवितांना रडवले मी
तुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजाव लागत
म्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी.
सांगेन पुन्हा कधीतरी.........

No comments: