"बाप"

माझ्या बापाला रडतांना पाहिलय....
माझ्या बापाला रडतांना पाहिलय....
"बाप"
शांत चेहरा, ना शब्द काही,
डोळ्यात प्रेम साठलेले,
तो मजसंगे नेहमी डोळ्यांनीच बोलत राहिला .
मी नेहमी त्याला कठोर समजायचो,
दुखी झालो की आईच्या कुशीत लपायचो,
तो मात्र मज़ साठी स्वतःचे रक्त विकत राहिला .

स्वतःच्याच हातून ,मी त्याच्या,
स्वप्नांना तुटतांना पाहिलय,
होय, मी आज...
माझ्या बापाला रडतांना पाहिलंय .

आई,मला सायकल हवी,
आई म्हणायची बेटा पैसे नाही,
दुसा-या दिवशी माझ्या हातात चावी असायची
मी आईला बिलगायचो,आई ही मला कुरवाळायची,
पण तिच्या डोळ्यात खिनता असायची,
कारणत्या सायकलमागे,त्याने त्याची भाकरी सुध्दा त्यागलेली असायची


मला हसतांना पाहून ,उपाशी पोटाने ,
मी त्याला शांत हसतांना पाहिलय,
होय ,मी आज... माझ्या बापाला रडतांना पाहिलंय.

मोठा झालो खर्च वाढला,
मी ही बाकींच्या सारखा मज्जा करायचो,
सिनिमा पहायचो,मुलीसोबत फिरायचो,
छान स्टाइल मधे सिगरेट फुकायचो,
पैसे कमी पडलेच तर आईला मागायाचो
तो थरथरणार्‍या हातानी राब राब राबायचा,
मळलेला कुर्ता फाटलेले धोतर,
पण कधीच मला काही कमी ना पडू द्यायचा


त्याच्या निघणार्‍या प्रत्येक घामाच्या थेंबात,
माझाच विचार आणि माझेच सुख पाहिलय,
होय, मी आज... माझ्या बापाला रडतांना पाहिलंय.

तो जळत राहिला वात बनून,
माझ्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी,
मी मात्र त्याचे अंग नि अंग नोचले,
स्वतःचे शॉक पाणी पूर्ण करण्यासाठी,
चुक कळली मला,
त्याच्या स्वप्नांना पूर्ण करावसं वाटतंय,
त्याच्या पायावर डोके ठेवून रडावसं वाटतंय .
पण, आज तो या जगात नाही.

तरीही....
माझ्या प्रत्येक संकटात,
मी त्याला माझा विश्वास बनून उभा राहतांना पाहिलय
होय, मी आज...
माझ्या बापाला रडतांना पाहिलय.

No comments: