" माफ कर देवा ………. "




तूच दिली हि सुंदर धरणी , अमुल्य अक्षय ठेवा

कसे करंटे आम्ही निपजलो , दोष तुझा ना देवा

सागर जंगल नदी नी नाले , जे जे होते छान

विकास करुया म्हणता म्हणता, केले आम्ही घाण

तुझ्याच सुंदर आकाशात , आमचा काळा धूर

हद्दपारही पक्षी झाले , गेले मंजुळ सूर

उधळत लाखो गाडी फिरते, अडकून पडती श्वास

माथेफिरू हा मानव झाला, त्याचमुळे हा त्रास

प्लास्टिकचे तर पर्वत झाले , हीच खूण नाशाची

विनाशरूपी जुगलबंदी ही , ढोल आणि ताशाची

ओरबडूनी घेता घेता , आलेच संकट माथी

बेफिकीर जर असे राहिलो , उरेल शून्यच हाती

आम्हास भवली आमची वृत्ती, देवा करशील माफ ?

की उघडोनी तिसरा डोळा , करशील पृथ्वी साफ ?
 
-अनामिक 

No comments: